राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, January 30, 2023

औरंगाबाद,एटीएम फोडले ता.कन्नडला.अतभूत यंत्रणा मुळे सायरन वाजले थेट मुंबईला. पोलिसांनी आरोपीला टाकल्या बेड्या चॊर गजाआड ?

( औरंगाबाद )- उत्त -सेवा - वाढत्या टेक्नॉलॉजीचा फायदा होत असल्याचे अनेकदा वेगवेगळ्या घटनांमधून समोर आले आहे. अशीच काही घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यात पाहायला मिळत आहे. कारण कन्नड शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम (State Bank Of India ATM) मशीन शनिवारी मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र सायरन (Syreon) वाजल्याने बँकेच्या मुंबई येथील सतर्क असणाऱ्या यंत्रणेला तत्काळ माहिती मिळाली आणि त्यांनी कन्नड शहर पोलिस यांना (Police) फोन करून माहिती दिल्याने पोलिसांनी थेट घटनास्थळ रवाना होहून एका व्यक्ती ला ताब्यात घेतले. शेख सलीम शेख शब्बीर पठाण ( 40 वय रा. गराडा, ता. कन्नड) आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 28 जानेवारीला शनिवारी मध्यरात्री शहरातील बाजार समिती लगत असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरटे आले. दरम्यान चोरट्याकडून रात्री सव्वा एक वाजता एटीएम फोडण्यासाठी सुरुवात झाली. मात्र बँकेची यंत्रणा सक्षम असल्याने मुंबई येथील कार्यालयात एटीएम फोडण्यात येत असल्याचा सायरन वाजला. त्यामुळे बँकेच्या  मुंबई येथील कार्यालयातील यंत्रणेकडून तंतोतंत याची माहिती कन्नड शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली.
एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्न करताना पकडले 
मुंबई येथील कार्यालयातील यंत्रणेकडून माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक राजू तळेकर यांनी मोटारसायकलवर गस्त घालणाऱ्या पथकातील पोलिस नाईक सुशील सुराडे, विलास घातगिने तसेच पोलिस नाईक प्रवीण बर्डे, सहायक फौजदार कैलास मडावी, हेड कॉन्स्टेबल गणेश जैन, पोलिस अंमलदार विशाल कुलकर्णी यांना घटनास्थळी पाठवले. पोलिस तेथे पोहचल्यावर देखील चोरट्याचे सुरुवातीला त्यांच्याकडे लक्ष नव्हते. तो एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्न करीत अस्थांना व्यस्त होता.
त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 
यापूर्वी देखील एटीएम फोडण्याचा केला होता प्रयत्न
शेख सलीम शेख शब्बीर पठाण यास ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याच्याकडे त्यावेळी एटीएम कार्ड नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने एटीएम फोडत असल्याचे मान्य केले. सोबतच याच आरोपीने यापूर्वी पिशोर नाका येथील एचडीएफसीचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे देखील मान्य केले आहे. तर तेथील सीसीटीव्ही फुटेजमधील चोरट्याचे व याचे वर्णन मिळते जुळते स्पष्ट दाखन्यात येत आहे. 




श्री छत्रपती संभाजीराजे नाशिकात जोरदार फटकेबाजी,काय म्हणाले राजे ?

( नासिक प्रतिनिधी )  स्वराज्यचा अजेंडा पटल्यामुळे सुरेश पवार आमचे उमेदवार झाले आहेत. नाशिक पदविधर निवडणूकीत सुरेश पवार चमत्कार घडविणार घडवतील अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.नाशिक – गाव तिथे शाखा आणि घरोघरी स्वराज्य हा संकल्प हाती घेतला आहे.
आत्तापर्यंत आमच्या राज्यत 500 शाखा झाल्या आहेत.
यांची संख्या अजून वाढेल, लोकांच्या स्वराज्यकडून खूप अपेक्षा आहेत. सामान्यांना ताकत देण्यासाठी स्वराज्यची स्थापना करन्यात आली आहे. तसेच सर्वाना सोबत घेऊन या .स्वराज्यचा अजेंडा पटल्यामुळे सुरेश पवार आमचे उमेदवार झाले आहेत. नाशिक पदविधर निवडणूकीत सुरेश पवार चमत्कार घडविणार घडवतील अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान दोन दिवसांपुर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. तेलंगणा येथे जाऊन संभाजीराजे यांनी तेलंगणा मॉडेल समजून घेतले. आज त्यांनी पत्रकारपरिषदेत त्याचा उल्लेख केला. संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना सुरू केली आहे.
पंचसूत्रीच्या माध्यमातून संभाजीराजे थेट सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला हात घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये स्वराज्य संघटना राजकीय पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तसेज सर्व घटंकांना सोबत घेऊन सर्वांचे जे काही समस्या अस्तिल ते शासन दरबारीं निदर्शनास आणून सोडविण्यासाठी प्रयत्न शील राहु. त्यात राज्यातील राजकारण बघता नवीन राजकीय संस्कृती निर्माण करण्यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहे. तेलंगणा मॉडेल संपूर्ण देशात परिचित आहे.

Sunday, January 29, 2023

पत्रकारावर हल्ला केल्यास ३ वर्षे कारावास ?



( मुंबई ) पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारं विधेयक अखेर महाराष्ट्र विधानसभेत काही दिवसा पूर्वी मंजूर करण्यात आलं आहे. यानुसार आता पत्रकार वा माध्यमांवर हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होणार आहे. तसेच पत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे 
पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांना संरक्षण देणारं विधेयक अखेर महाराष्ट्र विधानसभेत 2017 मध्ये मंजूर करण्यात आलं होत. त्यानुसार सरकार परत आदेश नियमित सुधारणा करून काही तफावत राहिल्यास शिंदे फरडणवीस सरकार प्रसार माद्येम कायदे यानुसार सुधारना करतील असं अपेक्षित धरलं जात आहे आता पत्रकार हल्ला करणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होणार आहे. तसेचपत्रकारांवरील हल्ला दखलपात्र व अजामीनपात्र असणार आहे.महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७' या नावाने हा कायदा अस्तित्वात झालेला आहे.चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात आले होते.                                                                                            विधेयकातील तरतुदी 
                                                       
प्रसारमाध्यमातील नियमित किंवा कंत्राटी तत्वावर नियुक्त पत्रकार या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. त्यात संपादक, वृत्तसंपादक, उप संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रlलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस आणि मुद्रितशोधक यांचा समावेश आहे. व्यवस्थापन किंवा प्रशासकीय पद असलेल्या व्यक्तीला या कायद्याचं संरक्षण नसेल.
- वृत्तपत्र म्हणजेच मुद्रित किंवा ऑनलाइन नियतकालिक, वृत्तपत्र आस्थापना, केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी असलेली वृत्तवाहिनी हे या अधिनियमाच्या कक्षेत असतील.

- पत्रकार वा माध्यमसंस्थेवरील हल्लेखोरास तसेच हल्ल्याची चिथावणी देणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील, अशी तरतूद करण्यात आली आहे.

- या कायद्याचा गैरवापर केला गेल्यास संबंधित पत्रकार व संस्थेलाही तेवढीच शिक्षा भोगावी लागणार आहे. याबरोबरच संबंधिताची अधीस्वीकृती पत्रिका कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल व कोणतेही शासकीय लाभही मिळण्यास तो पात्र नसेल.

- या अधिनियमाखालील गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत होणार आहे.

- प्रसारमाध्यमातील प्रतिनिधी किंवा प्रसारमाध्यम संस्थेच्या मालमत्तेची नुकसानभरपाई आणि वैद्यकीय खर्चाची रक्कमही गुन्हेगाराला अदा करावी लागणार आहे. ही रक्कम न दिल्यास जमीन महसुलाची थकबाकी होती असे समजून ही रक्कम वसूल केली जाणार आहे.

Thursday, January 26, 2023

राहुरी. तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे खात्यावर ऑनलाईन पेमेंट पाठवा, तुमचा माल तुमच्या दुकानात पोहच होईल, असे तीन लाख रुपयांना लुबाडण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन ( FIR ) दाखल केली ?

( राहुरी ) - वार्ता-
देवालाली प्रवराच्या एका वेपाऱ्याला खात्यावर ऑनलाईन पेमेंट पाठवा, तुमचा माल तुमच्या दुकानात पोहच होईल, असे सांगून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नरेंद्र मुथा या व्यापार्‍याला जवळपास तीन लाख रुपयांना ठगवण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापार्‍याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन ( FIR ) दाखल केली.
नरेंद्र खुशालचंद मुथा (वय 55) रा. देवळाली प्रवरा यांचे देवळाली प्रवरा येथे मुथा सेल्स नावाचे एजन्सींचे दुकान आहे. मुथा हे त्यांच्या दुकानात तेल व खाद्य पदार्थांची ठोक खरेदी व विक्री करतात. त्यांना ठोक स्वरुपात कंपनीकडून तेल खरेदी करावयाचे असल्याने त्यांनी 9 जानेवारी रोजी मध्यप्रदेश येथील व्हीपी इंडस्ट्रीज देवास यांचा संपर्क क्रमांक असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज केला. त्यांनी नरेंद्र मुथा यांना व्हीपी इंडस्ट्रीज देवास राज्य मध्यप्रदेश या कंपनीचे तेलाचे दर पाठवले.
त्यावेळी नरेंद्र मुथा यांनी सोयाबीन तेलाची ऑर्डर देऊन दि. 10 जानेवारी 2023 रोजी मुथा यांनी त्यांच्या खात्यावर 2 लाख 61 हजार रुपये पाठविले. त्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवशी दि. 11 जानेवारी रोजी फोन आला की, तुम्ही काल तेल खरेदी करण्यासाठी जी ऑर्डर दिली आहे, ती गाडी लोड करण्यासाठी कमी होत आहे. तुम्हाला अजून 20 सोयाबीन तेलाचे बॉक्स खरेदी करावे लागतील.
नरेंद्र मुथा यांनी आणखी 30 हजार 120 रुपये त्यांनी दिलेल्या खाते नंबरवर पाठविले. अशा प्रकारे त्यांनी एकूण 2 लाख 91 हजार 120 रुपये त्यांच्या खात्यावर पाठवीले. त्यांच्याकडून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेमेंट मिळाले. तसेच 15 जानेवारीपर्यंत तुम्हाला माल तुमचे दुकानावर पोहोच होईल, असा मेसेज पाठविला.
16 जानेवारी पर्यंत माल पोहोच न झाल्याने नरेंद्र मुथा यांनी त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर मेसेज केला. तेव्हा त्याने माझाया आईचे निधन झाले आहे. तुमचा माल दोन दिवसांनी पाठवतो असे मेसेजव्दारे सांगीतले. नरेंद्र मुथा यांनी दोन दिवस वाट पाहून तेलाचा माल पोहोच न झाल्याने त्यांना व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज केला. त्यांनी काहीएक प्रतिसाद दिला नाही. नरेंद्र मुथा यांनी चौकशी केली असता त्यांनी ज्या खात्यावर रक्कम पाठवली ते खाते अनामिका सिंग यांचे नावावर असून ते राजस्थान मधील कोटा येथील आहे, अशी माहिती मिळाली.
नरेंद्र मुथा यांनी व्हीपी इंडस्ट्रीज देवास राज्य मध्यप्रदेश येथे त्यांचे अधिकृत फोनवर संपर्क करुन तेलाचे ऑर्डर बाबत विचारले असता त्यांनी आम्हाला तुमची तेलाची कुठलीही ऑर्डर मिळालेली नसून पैसेही आमचे व्हीपी इंडस्ट्रीज देवास राज्य मध्यप्रदेशच्या बँक खात्यावर जमा झालेले नसल्याचे सांगितले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नरेंद्र खुशालचंद मुथा यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद ( FIR ) त्यांच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमा विरोधात गुन्हा रजि. नं. 76/2023 भादंवि कलम 420, 465 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्या चे हक्का साठी कायम लडा करणारा आणि त्यांची बाजु मांड नारा भारतीय किसान-सांघ परिसंघ (सिफा) मा.रघुनाथदादा पाटील यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.


झाला कहर पांडुरंगा सावर " पंढरपुरात शेतकरी संघटनेचा स्वतंत्र ध्वजारोहण साजरा.* 
( पंढरपूर ) संपादकीय लेखक स्वतः रघुनाथ दादा पाटील. ( शेतकरी संघटना अध्येक्ष महाराष्ट ) देशाचा अमृत महोत्सव साजरा होत आहे पण गेल्या 75 वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ध्वजारोहण होत आहेत. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील त्यावेळी प्रजासत्ताक राज्य निर्माण होईल. 'शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी' शेतकरी संघटनेकडून पंढरपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर या ठिकाणी ध्वजारोहण आणि जनजागरण सप्ताहाचा प्रारंभ झाला. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि भारतीय किसान-सांघ परिसंघ  (सिफा) मा.रघुनाथदादा पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी ध्वजारोहणास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजीनाना नांदखिले म्हणालेत की, 'हे राज्य प्रजेचे नसून ते नेत्यांचे आहे यालाच नेतेसत्ताक राज्य म्हणतात. देशाला लागलेला आत्महत्यांचा कलंक पुसायच्या असतील तर शेतीमालावरची निर्यात बंदी कायमची उठवली पाहिजे.  
राज्य कार्यकारणी सदस्य महादेव कोरे म्हणालेत की, 'शेतकरी संघटनेने मा.रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी अधिकाऱ्यांना कायद्याने वागायला शिकवले एका हातात चाबुक आणि एक हातात जीआर घेऊन आम्ही बँका,पतसंस्थांना कायद्याने वागायला शिकवलं.
सरकारचे धोरण शेतकऱ्याचे मरण, शेतकऱ्यांना गळफास ठरणाऱ्या घटना दुरुस्त्या रद्द करा, शेतकऱ्यांना बाजारात तंत्रज्ञानाचे स्वतंत्र द्या अशा घोषणा देऊन मा.रघुनाथदादा पाटील यांचे भाषण चालू झाले.सरकारने शेतकऱ्यांना 75 वर्षे अंधारात ठेवून उद्योगपतींना कच्चा माल स्वस्त, उद्योगपतींना स्वस्त मजूर, त्या मजुरांना खाण्यासाठी स्वस्त शेतीमाल उपलब्ध करून दिला. चुकीच्या धोरणाचा त्रास फक्त शेतकऱ्यांना झाला परिणामी शेतकरी आत्महत्या वाढल्या. उद्योगपतींच्या उत्पादनांना निर्यात बंदी नाही, पण फक्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाला निर्यात बंदी जर निर्यात बंदी नसती तर शेतकऱ्यांनी सरकारला कर्ज दिले असते. त्यामुळे सरकारचे धोरण शेतकऱ्याचे मरण हे सिद्ध झाले आहे. उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. शेती करण्यासाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठ महाग झाल्यामुळे शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव यामुळे शेतकरी कर्जाच्या चक्रवाढ अडकतो. या कर्जाच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेची कास धरली पाहिजे. आपल्याला शेतकरी विरोधी धोरणामुळे आत्महत्या करायला लागते जर ही धोरणे बदलली तर शेतकऱ्यांना बरे दिवस येतील. शेतकरी आत्महत्या थांबवायचे असतील तर शेतीमालावरील निर्यात बंदी, शेतकरी विरोधी असणारे संपूर्ण कायदे यामध्ये आवश्यक वस्तू कायदा, सीलिंगचे कायदे, भूसंपादन कायदे घटनेचे ९वे परिशिष्ट हे रद्द होणे गरजेचे आहे.                                              
दिल्लीपासून ग्रामपंचायत पर्यंत आजचा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. स्वातंत्र मिळाल्यापासून आज पर्यंत फक्त झेंडावंदन होत आहे. यामध्ये आपल्या कृषिप्रधान देशाच्या शेतकऱ्याचा एकही प्रश्न सुटण्यासाठी चर्चा होत नाही. रुपयाचे अवमूल्यन दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बेरोजगारीचा कहर चालला आहे. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतच आहे.पण याकडे कोणतेही सरकार लक्ष देत नाही. फक्त मत मिळवण्यापुरते लोकांच्या सारखे बोलून लोकांची मते मिळवून आपल्याला ज्या प्रकारे राज्य पाहिजे तसे राज्य चालवतात. शेतकरी संघटनेकडून पंढरपूर येथून 26 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असा जनजागरण सप्ताह साजरा होत आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या गावात आपापल्या तालुक्यात शेतकऱ्यांना शेतीमालाच्या भावाचा तक्ता समजावून सांगणार आहेत. शेतकरी विरोधी कायदे शेतकऱ्यांना कशाप्रकारे नुकसान काय आहेत याबद्दल जनजागरण होणार आहे. महाराष्ट्रातील दोन साखर कारखान्यामधील अंतराची अट, दुधाचा दर, सोयाबीन, कापूस, बेकायदेशीर पतसंस्था, बँकांच्या वसुल्या, अशा विविध विषयांवर चर्चा विचार मंथन आणि मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड अध्यक्ष शिवाजी नांदखिले, राज्य कार्यकारणी सदस्य महादेव कोरे, शेतकरी संघटना सचिव बाळासाहेब वाळके, सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ सारवडे, सांगली जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष वस्ताद दौंडकर, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष हणमंत वीर, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पांडुरंग मारवाडकर, युवा आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष प्रतिक कुलकर्णी, ग्रामगीता तत्त्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिरचे दिलीप भोयर, बीड जिल्हा संघटक परशुराम राठोड, सांगली जिल्हा सरचिटणीस धनपाल माळी कवठेमंकाळ तालुका महिला आघाडी अध्यक्ष बेगम बी शेख, पुणे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ 🇮🇳

Wednesday, January 25, 2023

पठाण' चित्रपट बगन्यासाठी सांगलीच्या तरुणांनी ऑडिटोरियम एस आर के युविव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे. 




( सांगली ) वार्ता अभिनेता  शाहरुख खानच्या  पठाण या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अनेक शहरांमध्ये पठाणच्या अडव्हान्स बुकिंग सुरुवात झाली आहे. शाहरुखचे चाहते पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी या चित्रपटाचं आढवान्स बुकिंग करत आहेत. सांगलीमधील शाहरुखच्या काही चाहत्यांनी पठाण चित्रपटाच्या एका शोचं अॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. पठाण हा चित्रपट पाहण्यासाठी सांगली एस आर के युविव्हर्स या फॅन क्लबनं अख्खं ऑडिटोरियम बुक केलं आहे.
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याने -पठाण- चित्रपटाद्वारे मोठ्या ब्रेकनंतर शानदार कम बॅक केल्याने चाहते त्याचा चित्रपट बघण्यासाठी वेडे झाले आहेत. पठाण चित्रपट जेवढा वादाच्या घेऱ्यात अडकला त्याहूनही जास्त चित्रपट प्रेमींचा पाठिंबा दिसून येत आहे. पठाण चित्रपटाच्या टिकाची विक्री जोरदार सुरु आहेत. अनेक सिनेमागृहामध्ये हाउसफुलचे बोर्ड लागले आहेत
पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे. सकाळी 8.30 वाजता सेलिब्रेशन करून थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाणार आहेत. दुसरीकडे बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवत पठाण चित्रपट प्रदर्शित करू नका, असे निवेदन दिले आहे. अमरावतीमध्येही आज पठाण सिनेमाच्या पहिल्या शो साठी एका शाहरुख खानच्या फॅनने अख्खा थिएटर बुक केला. एसआरके फॅन क्लब, अमरावतीचे फाऊंडर आशिष उके यांनी याबद्दल माहिती दिली. पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशामध्येच आता शाहरुखच्या जबरा फॅनने पठाण पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरचं बुक केलय. अमरावतीमधील तापडिया सिटी सेंटरमधील मिराज मल्टिप्लेक्स सिनेमा याठिकाणी आज सकाळी 9 ते 12 वाजताचा शो बुक केला असून यापूर्वी त्याठिकाणी शाहरुख खानच्या फॅन कडून केक कापून सिनेमा पाहिला जाणार आहे.
मोस्ट अवेटेड शाहरुख खान स्टारर पठाण चित्रपटाची उत्सुकता शिगेला येऊन ठेपली आहे. एकीकडे पठाण चित्रपटाचा वाद आहे तर दुसरीकडे चित्रपटाप्रती प्रेक्षकांप्रती उत्सुकता पाहायला मिळत आहे. पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच कोट्यावदी गल्ला जमवला आहे. एडवांन्स बुकिंगनेच चाहत्यांप्रती पठाणची क्रेज पाहायला मिळत आहे. काही प्रेक्षकांना तर टिकिट माळाली नाही म्हणून त्याने थेट अभिनेत्याकडेच धाव घेतली होती, अशातच अजून एका चाहत्याने असं काही केलं आहे ज्याुळे स्वत: शाहरुख भारावून गेला 
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) याने पठाण (Pathan) चित्रपटाद्वारे मोठ्या ब्रेकनंतर शानदार कम बॅक केल्याने चाहते त्याचा चित्रपट बघण्यासाठी वेडे झाले आहेत. पठाण चित्रपट जेवढा वादाच्या घेऱ्यात अडकला त्याहूनही जास्त चित्रपट प्रेमींचा पाठिंबा दिसून येत आहे. पठाण चित्रपटाच्या टिकाची विक्री जोरदार सुरु आहेत. अनेक सिनेमागृहामध्ये हाउसफुलचे बोर्ड लागले आहेत.
प्रत्येकच चाहता पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी उत्सुक आहे. अशातच शहारुखच्या एका जबऱ्या फॅनने पठाण चित्रपट पाहाण्यासाठी चक्क पुर्ण थिएटरच बुक केलं आहे. सांगलीमधील एसआरके फॅनक्लबने ट्वीटरद्वारे एक फोटो शेअर केला. या फोटोबरोबरच सांगलीतील तरुणांनी थिएटर बुक केलं असल्याचं सांगितलं आहे. हे ट्वीट पाहिल्यानंतर शाहरुख देखिल भारावून गेला आहे.
शाहरुखच्या Tagsपठाण चित्रपटामुळे बॉलिवूडला मोठे यश प्राप्त होणार आहे. कारण 2020 साल हे वर्ष फक्त साउथ चित्रपटांनी गाजवलं आणि त्यांच्या चित्रपटांसमोर हिंदी चित्रपट फ्लॉप ठरले. आता पठाण कोणता नवीन इतिहास रचेल हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे. आज (दि, 25 जानेवारी) रोजी पठाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tuesday, January 24, 2023

पोलीस आयुक्तालया मार्फत पाच अधिकाऱ्यांचा, गुण गौरव,पुरस्कार ने सन्मानित सराहीत चोर पकडले व कोटींचे चंदन जप्त, ?

( मुंबई ) वार्ता जबरी चोरी आदी विविध गुन्ह्यांची उकल करून कुख्यात टोळ्या जेरबंद करणाऱ्या पाच पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते डिसेंबर, महिन्यातील उत्कृष्ट उकल' चा (बेस्ट डिटेक्शन) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात काशिमीरा, वालीव ठाणे तसेच गुन्हे शाखा १, २ आणि ३ च्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दर महिन्याला उत्कृष्ट तपास करून गुन्हयांची उकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते 'उत्कृष्ट उकल'चा पुरस्कार देण्यात येतो. नायगावमधील स्टार सिटी येथे २० डिसेंबरला सुनील तिवारी या मूकबधिर व्यक्तीची हत्या झाली होती. गुन्हे शाखा २ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने तांत्रिक विश्लेषण करून पुरावा नसताना आरोपी यशवर्धन झा वाला अटक केली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शाहूजी रणावरे तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांना उत्कृष्ट तपासासाठी गौरविण्यात आले.

त्याचबरोबर १९९४ मध्ये पेणकरपाडा येथील राजनारायण प्रजापती यांच्या पत्नी आणि तीन मुलांची हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखा १ च्या पथकाने २८ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा छडा लावला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी काल्या ऊर्फ राजकुमार हा परदेशात पळून गेला होता. त्याचा माग काढून मुंबई विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली.
शाहूजी रणावरे तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांना शाखा १ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुन्हाडे यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.

वालीव पोलिसांनी महामार्गावरून रक्तचंदनाची चोरटी तस्करी उघडकीस आणली. पोलिसांनी कारवाई करून एक ट्रक अडवला आणि नऊ कोटी ६१ लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त केले. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई होती. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांना गुन्हयाची 'उत्कृष्ट उकल' केल्याप्रकरणी गौरविण्यात आले.
मोबाइल चोरणारी टोळी जेरबंद

मोबाइल चोरणारी टोळी जेरबंद

 काशिमीरा पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात यश मिळवले होते. ही टोळी विविध प्रकारे नागरिकांचे मोबाइल लंपास करत होती. या
१७ चीजकल पोलिसानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय
हजारे यांना या कार्याबद्दल गौरविण्यात आले.
शहरात गाड्यांच्या काचा तोडून महागड्या 'म्युझिक सिस्टीम' चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने या टोळीचा छडा लावला आणि तिघांना लागून अटक केली. या टोळीकडून चोरलेले ३० कार टेप आणि एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण् करण्यात आला. गुन्हे शाखा ३ चे प्रमुख प्रमोद बडाख यांना याप्रकरणी उत्कृष्ट उकल केल्याबद्दल गौरविण्यात आले.