राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, February 21, 2023

वडगाव पान - झगडे फाटा रस्त्याची झाली दैनं अवस्था दुरुस्त न झाल्यास वाहन चालकांसह, साईभक्तांकडून आंदोलन उपोषण धरणे प्रदर्शने करण्यात न्यात येइल ?

( संगमनेर ) - वार्ता - समाचार -
सर्वाधिक रहदारीचा वडगाव पान फाटा ते झगडे फाटा या मार्गावर ठिक- ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा, अशी दुरावस्था झाल्याने वाहन चालकांसह साईभक्त प्रवाशी संतप्त झाले आहेत. रस्ता तत्काळ दुरुस्त न झाल्याने आंदोलन छेडण्याचा इशार देण्यात आला आहे.रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ता अनेक महिन्यांपासून मंजूर झाला आहे. वर्क ऑर्डर सुद्धा निघाल्याचे सा. बां. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. गैर प्रकार असल्याने मात्र या रस्त्याचे काम करण्यात नेमकं घोडं अडलं कुठं ? असा संतप्त सवाल वाहन चालकांमधून उपस्थित होत आहे.
कोपरगाव, मनमाड, मालेगाव, धुळे, नंदुरबार या मोठ्या शहरांसह गुजर, मध्यप्रदेश या
राज्यांकडे जाणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. वडगाव पान फाटा ते कोपरगाव या मार्गाचा अवजड वाहतूक करणारे वाहन चालक वापर करतात. संगमनेर व कोपरगाव तालुक्याचे शेतकरी शेतमाल संगमनेरला आणण्यासाठी या मार्गाचा वापर करतात, मात्र गेली अनेक वर्षांपासून गैर वेव्हार होत असुन या मार्गाची दुरुस्ती न केल्यामुळे वडगावपान फाट्यापासून निळवंडे गाव हद्दीपर्यंत ठिक-ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक वर्षांपासून खड्डे ठेकेदार थातुर मातुर काम करून बुजवून वाहन चालकांची बोळवण करीत असल्याचे दिसते.
वडगाव पानफाट्यापासून एक की, मी अंतरापर्यंत डांबरीकरण झालेले आहे. मात्र तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना साठवण तलावापासून निळवंडे गावाच्या सरहद्दीपर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच करुले ते तळेगावची भागवतवाडीपर्यंत रस्ता चांगला असून पुढे कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख,
जवळके, पोहेगाव, झगडे फाटा चांदेकासारे ते पुणतांबा फाटा या मार्गावरती ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमधून उंच सखल मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या खड्ड्यांमुळे अनेक वाहन चालकांच्या वाहनांचे पाठे तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तर चारचाकी आणि दुचाकी वाहने अक्षरशः खिळखिळी झाली आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढताना अनेक
 या रस्त्याबाबत राजकीय नेत्यांची अनास्था
                 <\\\\\\\\++++++///////////>
वडगावपान फाटा ते झगडे फाटा या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यातून सर्वच गावांचे राजकीय नेते सुद्धा मार्ग काढताना तारेवरची कसरत करीत आहे. मात्र आपले राजकीय वर्चस्व अबाधित राहण्यासाठी या मार्गावर असणाऱ्या कुठल्याच गावातील राजकीय पक्षाचे नेते आवाज उठविण्यास पुढाकार घेत नाहीत. पुढाकार घेतला तर आपल राजकीय भवितव्य धोक्यात येईल, म्हणूनच कोणीही हा रस्ता दुरुस्तीच्या संदर्भात आवाज उठविताना दिसत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे चांगलेच फुलो फलो फावले जात आहे.
दुचाकी स्वरांचे मणके ढिल्ले झाले आहे. तर एखाद्या आजारी व्यक्तीला या मार्गाने दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत त्याचा आजार आपोआप बरा होतो. नाहीतर त्याला देवा घरी जावे लागते. एवढी दुरावस्था या मार्गाची झालेली आहे.वडगावपान फाटा, निळवंडे, कवठे कमळेश्वर, काकडी विमानतळ मार्गे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठीचा हा जवळचा मार्ग म्हणून पुणे, मुंबई, सातारा, सांगली, सदरील वरिष्टानी गैर कारभार चौकशी करावी 
कोल्हापूरसह कोकणातून येणारे साईभक्त यामार्गाचा वाहतुकीसाठी वापर करत आहे. मात्र निळवंडे शिव- रातील एका पेट्रोलपंपाजवळ पडलेलेखड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालकांकडून अनेकवेळा अपघात सुद्धा झालेले आहेत. या अपघातामध्ये अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार आहे. की नाही.असा संतप्त सवाल प्रवासी वर्गामधून उपस्थित होत आहे. तसेज हे सर्व रस्त्याचे कामात अफरा तफरी होत असून शासनाचा निधि बहुतेक अधिकाऱ्यांच्या खिसा भरत आहे. असें संभ्रम निर्माण होते.

























श्रीरामपूर-अहमदनगर या एस टी बस मध्ये तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास विषय : तक्रार पोलिसांनी अटक करून केली कारवाई ?

( श्रीरामपूर ) - वार्ता - समाचार - याबाबत अधिक समजल्याली माहिती संदर्भ : असा आहे.श्रीरामपूर बस स्थानक आगारात श्रीरामपूर- अहमदनगर या बसमध्ये फिर्यादी तरुणी देवळाली गावी जाण्यासाठी ड्रायव्हर शीटच्या मागील सिटवर बसली होती. तिच्या मागच्या सीटवर खिडकीजवळ बसलेल्या संदीप सर्जेराव माळी (रा. देवळाली ता. राहुरी) याने पाठीमागून शीटच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून हात घालून फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलस ठाण्यात  संदीप सर्जेराव माळी याचेविरुध्द भादंवि कलम 354, 354 (अ), 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेतला व त्यास अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे करीत आहेत.तसेज आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल करुन घेतली आहे.

Monday, February 20, 2023

रमेश बैस यांनी मराठी भाषेतून घेतली शपथ व कार्य पद स्वीकारले तसेज महाराष्ट्र मुंबई येथे कार्यक्रम सोहळा प्रारंभ होऊन संपन्न झाले ?

( मुंबई ) वृत्तसेवा समाचार, संसदीय राजकारण आणि
समाजकारणाचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या रमेश बैस यांनी दिनांक 19/02/2023 शनिवारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.
राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी राज्यपालांना पदाची शपथ दिली. विशेष म्हणजे अमराठी भाषेतून असलेल्या
राज्यपालांनी मराठीतून भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
शपथविधीपूर्वी मुख्य सचिव
श्रीवास्तव यांनी
मनुकुमार राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता
झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे
( राज्यपालांना मानवंदना दिली.)

राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय राज्यमंत्री
रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के. के. तातेड यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे सचिव या सोहळ्याला उपस्थित होते.
राज्यपाल रमेश बैस यांचा अल्प परिचय 

-२ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्म. - छत्तीसगड राज्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव.

- नगरसेवक, केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या.

- १९७८ मध्ये पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. १९८० ते १९८५ या कालावधीत

ते मध्य प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. या काळात त्यांनी मध्य प्रदेश विधान मंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले..

- १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी..

- १९८९ मध्ये रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा त्यांनी विक्रम केलेला आहे. - १९९८ मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री.

- १९९९ ते २००४ या कालावधीत रसायने व खते, त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री.

• २००३ मध्ये केंद्रीय खाण राज्यमंत्रिपदाचा स्वतंत्र कार्यभार. काही काळ केंद्रीय पर्यावरण व वन राज्यमंत्री.

-पेट्रोलियम व नैसर्गिक वायुविषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा

आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य. -२००९ ते २०१४ या काळात भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. २०१४ ते २०१९ या काळात

१६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते.

- दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयका संदर्भात व्यापक संशोधन व

अध्ययन.

• २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल.

• १४ जुलै २०२१ रोजी झारखंडच्या राज्यपालपदी बदली.

- आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन. छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष. मध्य प्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष.

















Sunday, February 19, 2023

कोपरगावात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल साईबाबा मेडिकल रिसर्च पदाधिकाऱ्यावर ?

( कोपरगाव ) - समाचार -
तालुक्यातील आत्मा मालिक रुग्णालयातील मेडिकल चालविण्याचे बदल्यात 1 कोटी 77 लाख 65 हजार 862 रुपयांची गंडा घालून फसवणूक केल्याप्रकरणी मुबंई येथील साईबाबा मेडिकल रिसर्च अँड इंडस्ट्रीज प्रा.ली.चे अध्यक्ष आरोपी डॉ.सुमन सुकुमार बंडोपाध्याय व उपाध्यक्ष संजय नंदू कोळी यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.निलेश रवींद्र चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आत्मा मालिक हॉस्पिटल दोन वर्षांपूर्वी मुंबई येथील साईबाबा मेडिकल रिसर्च अ‍ॅड इंडस्ट्रीज प्रा.ली.चे अध्यक्ष डॉ.सुमन बंडोपाध्याय रा. मुंबई हे व उपाध्यक्ष संजय कोळी, रा. बारामती, जि.पुणे यांना चालविण्यास दिले होते. त्यांनी आत्मा मलिक रुग्णालय कराराने चालविण्यास घेतले होते. त्यांना एका मेडिकल चालविणार्‍या इसमांची गरज होती.हि माहिती समजल्यावर निलेश चौधरी यांनी त्यांचेशी संपर्क साधला. त्यानुसार डॉ.सुमन बंडोपाध्याय यांचेशी चर्चा झाली. त्यानुसार 30 लाख रुपयांची अनामत रक्कम मागितली होती. मात्र एवढी रक्कम नसल्याने चौधरी यांनी संस्थेच्या नावाने 5 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट करार करून दिला होता. सदर व्यवहारात एकूण 1 कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता. त्यात त्यांना 30 लाखांचा करारनामा केल्यावर तर उर्वरित 70 लाख रुपयांची रक्कम नफ्यातून देण्याचे ठरले होते.
त्यानुसार चौधरी यांनी सदर कंपनीस दि.30 जुलै 2021 रोजी 05 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, 02 ऑगस्ट रोजी 15 लाख धनादेशाने तर दि.30 ऑगष्ट रोजी आर.टी.जी.एस.ने 05 लाख दि.27 सप्टेंबर 2021 रोजी 02 लाख असे एकूण 27 लाख रुपये संस्थेच्या नावावर जमा केले होते व त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना 64 हजार 862 रुपयांची औषधे दिली. त्यानंतर चौधरी यांनी मेडिकलचा ताबा मिळविण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी टाळाटाळ केली.
या दरम्यान चौधरी यांची शैनेश सिद्धान नाशिक, नितीन जाधव रा. रानवड, जि.नाशिक, धनंजय श्रीहरी पाटील रा.तळेगाव रोही,ता.चांदवड, आकाश आनंदा मवाळ रा.विष्णूनगर विंचूर, राहुल उत्तम कहाणे रा.नांदूर मधमेश्वर सर्व ता.निफाड आदीं पाच जणांशी ओळख झाली. या सर्वांकडून संस्था चालकांनी मेडिकल अनामत रकमेपोटी 01 कोटी 50 लाख इतकी रक्कम विविध बँकांच्या धनादेशाद्वारे घेतली होती.
त्यानुसार चौधरी यांनी सदर कंपनीस दि.30 जुलै 2021 रोजी 05 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, 02 ऑगस्ट रोजी 15 लाख धनादेशाने तर दि.30 ऑगष्ट रोजी आर.टी.जी.एस.ने 05 लाख दि.27 सप्टेंबर 2021 रोजी 02 लाख असे एकूण 27 लाख रुपये संस्थेच्या नावावर जमा केले होते व त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना 64 हजार 862 रुपयांची औषधे दिली. त्यानंतर चौधरी यांनी मेडिकलचा ताबा मिळविण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी टाळाटाळ केली.
या दरम्यान चौधरी यांची शैनेश सिद्धान नाशिक, नितीन जाधव रा. रानवड, जि.नाशिक, धनंजय श्रीहरी पाटील रा.तळेगाव रोही,ता.चांदवड, आकाश आनंदा मवाळ रा.विष्णूनगर विंचूर, राहुल उत्तम कहाणे रा.नांदूर मधमेश्वर सर्व ता.निफाड आदीं पाच जणांशी ओळख झाली. या सर्वांकडून संस्था चालकांनी मेडिकल अनामत रकमेपोटी 01 कोटी 50 लाख इतकी रक्कम विविध बँकांच्या धनादेशाद्वारे घेतली होती.





छत्रपती संभाजी महाराजांची पहिली प्रतिक्रिया ठाकरे कडून नाव चिन्ह गेलेत अस्थांना म्हणाले, शिंदेंना आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ?

( नाशिक ) - वार्ता - धुळे येथे  युवराज माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांचे धुळे शहरांमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. त्या नंतर यावेळी चक्क जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून छत्रपती संभाजी महाराज यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
शिवजयंती निमित्ताने धुळे शहरात पवनपुत्र विजय व्यायाम शाळा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शन सोहळ्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आताच्या सरकारने आताच्या पुढाऱ्यांनी नुसता शिवाजी महाराजांचा जयजयकार करून चालणार नाही तर, छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार आत्मसाद करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचे स्मारक हे जिवंत ठेवायचे असेल तर सर्व गडकोठ किल्ल्यांचे संवर्धन केव्हा करणार आहेत असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.
भारतीय निवडणूक आयोग हे स्वतंत्र आयोग आहे, सर्वांनी त्याचा आदर करावा. ज्यांना चिन्ह व नाव मिळालंय त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. लोकांना काही घेणंदेणं नाही, कोणाला कोणतं चिन्हं मिळालं लोकांना इतकच माहिती आहे. मागील अडीच वर्षात अस्थिर सरकार असल्यामुळे बरीच कामं झाली नाहीत,आता तुम्ही अडीच वर्षात काय करून दाखवणार आहेत, याची लोक वाट पाहत आहेत. चिन्ह मिळून सगळ्या गोष्टी साधू शकत नाही. साधायचेच असेल तर लोकांची सेवा  मना पासून करा व रायतेस सर्व घटक सोबत घेऊन शिकर गाठा व मंग यश प्राप्त करा प्रलंबीत प्रश्न त्यांनी सोडवावे, अशी प्रतिक्रिया संभाजी महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.















नाशिक,कर धावले हजारो चा सहभाग रनमध्ये गरजूंच्या मदतीसाठी ?

( नाशिक ) - समाचार -
समाजातील गरजू व वंचित घटकांच्या मदतीसाठी नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित 21 व्या नाशिक रन मध्ये महात्मा नगर क्रीडांगणावर हजारोंच्या संख्येने नाशिककरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी संगीताच्या तालावर उपस्थित स्पर्धकांना वॉर्म अप करायला लावण्यात आले.यावेळी नवीन तोलाणी इन्स्टिट्युट च्या वतीने नृत्य सादरीकरण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने नाशिक रनचीसुरवात करण्यात येऊन क्रीडापटूंच्या हस्ते नाशिक रनच्या ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व ध्वज दाखवून मॅरेथॉनची सुरवात करण्यात आली.
यावेळी लहान मुलांसाठी नाशिक रन चा शुभारंमहात्मानगर क्रीडांगणापासून रिलायन्स फ्रेश,पारिजात नगर,वर्ल्ड ऑफ टायटन, मधुइलेक्ट्रानिक्स, परत समर्थ नगर,पारिजात नगर,सिक्स सिग्मा हॉस्पिटल व महात्मा नगर.त्याचप्रमाणे प्रौढांसाठी महात्मा नगर,रिलायन्स फ्रेश,पारिजात नगर, वर्ल्ड ऑफ टायटन,रॉकेट सर्कल,
जेहान सर्कल, स्वामी समर्थ सर्कल ,आयसीआयसीआय बँक एटीएम परत रॉकेट सर्कल,समर्थ नगर,पारिजात नगर,सिक्स सिग्मा हॉस्पिटल महात्मानगर ,बंजारा हॉटेल व परत महात्मा नगर क्रीडांगण असा रन चा मार्ग होता.

मॅरेथॉन नंतर नाशिक रन 2024 चे आयटीडीकेकडून बॉशकडे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, नाशिक रनचे
अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष आर. आर. भुयांन, सचिव अनिल दैठणकर, राजाराम कासार, ए अनंथरामन, प्रबल रे, मुकुंद भट, अशोक पाटील,श्रीकांत चव्हाण, सुधीर येवलेकर, उत्तम राठोड, रमेश जी आर, करीन गीलगिस, अविनाश देशपांडे, कलोल सहा, गगन बन्सल, नाशिक रन चे स्वयंसेवक स्नेहा ओक, नितिन देशमुख, राजू माने, गोविंद बोरसे सचिन शिलोथे,
वासुदेव भगत आरटीओ नाशिक, संचालक सुमित बजाज, शशांक बेथारिया, डी के राय, टी बी चौधरी, आकाश कसोदकर, दयानंद कुलकर्णी,अरविंद पाटील, पल्लवी पांडे, राहुल संघवी, रणजित कोपिकर यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी लकी ड्रॉ द्वारे स्पर्धकांसाठी बक्षिसांची लयलूट करण्यात आली. यावेळी डिजिटल स्क्रीनवर नाशिक रनचा हेतू व राबविण्यात आलेले प्रकल्प व विविध उपक्रमांच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. नाशिक रनचे सचिव अनिल दैठणकर यांनी उपस्थितांचे व सर्व सहकारी संस्थांचे आभार मानले.














नोकरी लावून देतो असें आमिष दाखवून 54 लाखांची नगर जिल्हा परिषद फसवणूक सांगली येथील राहणारे दोघां जना विरूद्ध गुन्हा दाखल ?

(अहमदनगर) - समाचार - दोघा मुलांना नगर जिल्हा परिषदेत क्लार्कची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लातूरच्या महिलेची नगरमध्ये 54 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना फेबुरवारी ते 8 ऑगस्ट 2022 दरम्यान नगरमध्ये घडली. मनिषा रवीकिरण आदमाने
(रा. काळेबोरगाव, ता. लातूर) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद (FIR) दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रदीप बजरंग माने (रा. आंधळे, ता. पलूस, जि. सांगली) व त्याच्या साथीदारविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी आदमाने या मुलगा आशिष, राजन आणि सासू सोबत लातूर जिल्ह्यातील कोळेबोरगाव याठिकाणी राहतात. त्यांचे पती रविकिर आदमाने आणि सासरे दामोदर आदमाने हे दोघे झेडपीत प्राथमिक शिक्षक होते. यातील सासरे दामोदर हे 2018 मध्ये मयत झाले तर पती 2021 मध्ये कोविडमध्ये मरण पावले. फिर्यादेचे (FIR)माहेर असल्याने त्यांचे नगरला हे नगर असल्याने त्यांचे नगरला नेहमी येणे-जाणे होते. 11:58
त्यावेळी माने यांचे मंत्रालयात मोठे वजन असून काही काम असल्यास त्यांना सांगा, ते मार्गी लावून देतील, असे आदमाने यांना सांगितले होते. त्यानंतर एकदा आदमाने यांनी माने यांना माझ्या मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याबाबत माने यांना विचारणा केली. त्यावर माने याने आदमाने यांच्या दोन्ही मुलांना नगर जिल्हा परिषदेत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी खर्च करावा लागले असे सांगितले. माने याच्यावर विश्वास ठेवून आदमाने यांनी फेबुवारीपासून 8 ऑगस्ट 2022 पर्यंत वेळोवेळी त्याला 48 लाख रोख दिले.
यात पहिल्यांदा वाघमारे यांच्यासमोर नगरला पाच लाख रुपये रोख दिले होते. मात्र, नोकरीचे काम होत नसल्याने माने याच्याकडे विचारणा केली असता त्याने मंत्रालयात फेरबदल झाले असून झेडपी ऐवजी आरोग्य खात्यात तुमच्या मुलांचे नोकरीचे काम करून देतो असे माने आदमाने यांना म्हणाला. तसेच त्यासाठी आणखी सहा लाखांची मागणी केली.
दरम्यान, यावेळी माने याने त्यांचे बँक ऑफ बडोदा (सांगली) च्या खात्याचे सहा धनादेश आदमाने यांच्याकडे ठेवण्यास दिले. हे धनादेश सिक्युरिटी म्हणून तुमच्याकडे ठेवावा, असा विश्वास माने यांनी आदमाने यांना दिली. त्यानंतर आदमाने यांनी त्यांच्या बँक खात्यातून आणखी सहा लाख रुपये माने यांना आरटीजीएस केले. मात्र, 54 लाख रुपये घेवूनही माने नोकरीचे काम करत नसल्याचे, तसेच फोन घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यावर आदमाने यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले असल्याचे त्यांच्या फिर्यादीत ( FIR) मध्ये नमुद केलेले आहे.