राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, March 5, 2023

सर्वोच्च न्यायलय नवि दिल्ली येथून नामकरण'ची याचिका फेटाळली ?

(नवी दिल्ली) - वृत्तसेवा - समाचार - अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या एका याचिकेसंबंधी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारत याचिका फेटाळली. उपाध्याय यांनी विदेशी आक्रमणकर्त्यांच्या नावांवर ठेवण्यात आलेल्या अनेक ऐतिहासिक स्थळांच्या नावांत बदल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. अशाप्रकारची याचिका दाखल करून देशातील वातावरण तापवत ठेवायचे आहे का? असा सवाल न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी उपस्थित केला.
या मुद्द्याला जिवंत ठेवून आपण देशातील वातावरण तापवायचे आहे का? एका विशेष समाजाकडे बोट दाखवण्यात आले आहेत. समाजाच्या एका विशेष वर्गाला तुम्ही खाली दाखवत आहात. भारत एक धर्मनिरपेक्ष देश तसेच व्यासपीठ आहे, अशा शब्दात न्या. जोसेफ यांनी उपाध्याय यांना सुनावले. हिंदू धर्म
जीवनाची एक पद्धत आहे. भारताने त्यामुळे सर्वांना आत्मसात केले आहे. याचमुळे आम्ही सर्व एकत्र राहण्यास सक्षम आहोत. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा, या धोरणामुळे समाजात राग निर्माण झाला आहे, अशी भावना न्या. नागरत्ना यांनी व्यक्त केली.असलेल्या अनेकऐतिहासिक  नाव
वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख स्थळांचे विदेशी आक्रमणकर्त्यांच्या नावावर ठेवण्यात आल्याचे उपाध्याय यांनी याचिकेतून निदर्शनात आणून दिले होते. देशात लोधी, गजनी, गोरीच्या नावावर रस्ते आहेत. पांडवांच्या नावावर एकही रस्ता नाही. इंद्रप्रस्थचे निर्माण युधिष्ठिरने केले होते. ज्या व्यक्तीने
शहराला लुटले त्याच व्यक्तीच्या नावावर फरिदाबादचे नाव ठेवण्यात आले. देशासोबत औरंगजेब, लोधी, गजनी यांचा का संबंध? असा सवाल याचिकेतून उपाध्याय यांनी उपस्थित केला होता.
धार्मिक पूजेचा रस्तांसोबत काही घेणे-देणे नाही. मुगलसम्राट अकबर यांनी विविध समाजात सद्भावना बनवण्याचे लक्ष ठेवले होते, असे न्या. जोसफे यांनी नोंदवले. इतिहासातून आक्रमण' कशाप्रकारे दूर केले जाऊ शकते? असा सवाल न्या. नागरत्ना यांनी उपस्थित केला. दरम्यान, धर्मनिरपेक्ष प्रकृती तसेच बंधूभावावर मत व्यक्त करीत खंडपीठाने याचिका फेटाळली.













फसवणूकीचा गैर कारभार प्रकरणी नौकरी चा अमिश दाखून 86 लाख लुबाडले कोतवाली पोलीस ठाण्यात नगर येथे तिघांविरोधात गुन्हा दाखल ?

( अहमदनगर ) - प्रतिनिधि - वार्ता - 
तरुणां मुलांना नोकरी लावून देण्याच्या आमिष दाखून सुमारे 86 लाख 28 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या संदर्भात श्रीगोंदा तालुक्यातील सौरभ शिंदे यांनी फिर्याद दिली असून दिनेश बबनराव लहारे (हनुमान नगर अरणगाव), शेख (रा.टाकळी खातगाव, ता.नगर) आणि जावेद पटेल (रा.गंगापुर,ता.गंगापुर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, शिंदे हे बेरोजगार असून त्यांनी सैन्यदलात नोकरी लागण्यासाठी कराड येथील अ‍ॅकडमीत प्रवेश घेतला होता. पण नोकरी लागली नाही. आरोपी लहारे व शेख यांचे श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव जाणे, येणे होते. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. आरोपी शेख याने सौरभ शिंदे याला तुला नोकरी लावुन देतो पण पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यावरुन फिर्यादी शिंदे यांनी आरोपीला वेळोवेळी 15 लाख रुपये दिले. आरोपी शेख याला लहारे व पटेल यांनी साथ
पैसे घेवुन नोकरी तर दिलीच नाही, तसेच पैसेही परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. पैसे घेताना शिंदे व त्याच्या मित्राला मंत्रालयात, जिल्हा रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दिले होते. जिल्हा रुग्णालय तसेच सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरीचे बनावट नियुक्ती पत्रही दिले होते. नियुक्तीचे पत्र दिल्याने शिंदे यांचा विश्वास बसला त्यांनी त्यांचे मित्र स्वप्नील शिंदे, (4 लाख), कुलदिप लगड (4 लाख 60 हजार), वैभव शिंदे (5 लाख 29 हजार), सिध्दार्थ भिंगारदिवे (5 लाख 35 हजार), अभिजित तुपे (4 लाख 70 हजार), अतुल धोंडे (4 लाख 35 हजार), सागर अनारसे (4 लाख 35 हजार), क्ष्रफुल्ल वैराळ (4 लाख 40 हजार), प्रशांत वाघमारे (5 लाख 45 हजार), गोविंद
तुपे (4 लाख 95 हजार), पायल भिंगारदिवे (6 लाख 15 हजार),संदीप शिंदे (4 लाख 24 हजार), जालींदर खेतमाळीस (7 लाख 75 हजार)अशी एकुण 71 लाख
28 हजार व फिर्यादीचे 15 लाखांची फसवणूक झाली आहे.आरोपींनी ठाणे जिल्ह्यात सुध्दा अनेकांची फसवणुक केली आहे. पोलीसांनी लहारे याच्या घरी छापा टाकुन बनावट स्टँप पेपर, सरकारी खात्याचे लेटरहेड जप्त केले आहेत. तसेच त्याला अटकही केली आहे. फिर्यादीच्या मित्रांनाही अशाच प्रकारे फसविण्यात असल्याचे.सांगण्यात आले आहे.
















Saturday, March 4, 2023

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दि.7 ते 30 मार्च दरम्यान मोफत तपासणी शिबीर इंजिओग्राफी 3 हजार, सिटी स्कॅन 1250 रुपयांत, एमआरआय 2500 रुपयात व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया अहमदनगर ?

(अहमदनगर)-प्रतिनिधी-तथा-उप-संपादक जस्पाल सिंघ साहनी,------------------------------------====================================
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दि.7 ते 30 मार्च दरम्यान मोफत तपासणी शिबीर कार्यक्रम मध्ये गरजू पिडीत रुग्ण व इच्छुकांनी शामिल हुन अल्फ खर्चात तज्ज्ञ डॉक्टर मार्फत उपचार करा 
अंजिओग्राफी 3 हजार, सिटी स्कॅन 1250 रुपयांत, एमआरआय 2500 रुपयात व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया
अहमदनगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 31 व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड हार्ट सर्जरी सेंटर येथे दि.7 मार्च ते दि. 30 मार्च 2023 या कालावधीत विविध मोफत आरेोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची मानवसेवेची शिकवण व प्रबुध्द विचारक प.पू.आदर्शऋषीजी म.सा.यांच्या प्रेरणेतून हे शिबिर घेण्यात येत आहेत. दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत रूग्ण तपासणी करण्यात येणार आहे. दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ असंख्य रूग्णांना झाला आहे.  आनंदऋषीजी हॉस्पिटलला एन.ए.बी.एच.मान्यता मिळालेली असून ही मान्यता असलेले नगर जिल्ह्यातील 260 बेडस्‌‍चे हे पहिलेच हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमधील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ या मोफत शिबिरांतून सर्वसामान्य रूग्णांना होणार आहे.हॉस्पिटलमध्ये एमआरआय तपासणी 2500 रुपये, सर्व प्रकारचे सिटी स्कॅन 1250 रुपये, सीटी अँजिओग्राफी 2500 रुपये, सोनोग्राफी कलर प्रिंट व रिपोर्टसह 600 रुपये, डिजीटल एक्स रे तपासणी 250 रुपयात केली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये प्रशस्त व अतिप्रगत पॅथॉलॉजी विभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्लड बँक, 34 डायलेसिस मशिन कक्ष, परिपूर्ण फिजिओथेरपी विभाग आहे.
या भव्य विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मंगळवार दि.7 मार्च रोजी सुरूवात होणार आहे. पहिल्या दिवशी मेंदूविकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबीर होईल. यात डोकेदुखी, अपस्मार, पॅरालिसिस, कंबरदुखी, नसांचे विकार, स्नायूंचे विकार, मेंदूतील जंतुसंसर्ग, मेंदूज्वर, स्मृतीभ्रंश इत्यादी आजारांची तपासणी व उपचार केले जातील. मणक्यातील चकती सरकणे, झटके येणे इत्यादीवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील. ईईजी, ईएमजी तपासण्या 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.गौतम काळे, न्यूरोसर्जन डॉ.शैलेंद्र मरकड रूग्ण तपासणी करतील.
बुधवार दि.8 मार्च रोजी  स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यात दुर्बिणीव्दारे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया, सिझेरियन प्रत्येकी 10 हजार रुपयात केले जाईल. गर्भवती मातांची सोनोग्राफी, रक्त, लघवी इत्यादी तपासण्या शिबिरापासून पुढील महिनाभराच्या कालावधीत 50 टक्के सवलतीच्या दरात केल्या जातील. शिबिरातील गर्भवती मातांना बाळंतपणावेळी होणाऱ्या फीमध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे रूग्ण तपासणी करतील.
गुरुवार दि.9 मार्च रोजी मधुमेह, थायरॉइड, ग्रंथीविकार संबधित आजार तपासणी शिबीर होईल. यात कमी, जास्त रक्तदाब, जाडपणा, लवकर वयात येणे, वयात उशिरा येणे, मुलांमधील कमी उंची, पाळीतील अनियमितता, हाडांचा ठिसूळपणा, हाडे सतत फ्रॅक्चर होणे, चेहऱ्यावरील अनावश्यक केस, लैंगिक समस्या, चरबी संबंधित आजार, हार्मोन्स संबंधित आजार, रजोनिवृत्तीच्या समस्या, लहान मुलांमधील मधुमेह, थायरॉइड आजार, वयोवृध्दामधील हार्मोन्स समस्या, रजोनिवृत्तीनंतरच्या समस्या, पुरुष वंध्यत्त्व आदी समस्यांवर उपचार होतील. शिबिरात एंडोक्रायनोजीस्ट डॉ.पियुष लोढा, फिजिशियन डॉ. गजेंद्र गिरी, डॉ.पियुष मराठे, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार उपचार मार्गदर्शन करतील.
शुक्रवार दि.10 मार्च रोजी जनरल सर्जरी शिबीर घेण्यात येईल. यात सवलतीच्या दरात जनरल शस्त्रक्रिया करण्यात येतील. ॲपेंडिक्स शस्त्रक्रिया 7 हजार रुपये, इंगवायनल हर्निया 7 हजार रुपये तर हायड्रोसील शस्त्रक्रिया 4 हजार रुपयांत केली जाईल. जनरल सर्जन डॉ.प्रविण मुनोत, डॉ.भास्कर जाधव, डॉ.विवेक भापकर शिबिरात उपचार करतील.
 करण्याची गरज पडली तर ॲन्जिओग्राफीचे 3 हजार रुपये परत केले जातील. हृदय शस्त्रक्रिया हृदयातील झडप बदलणे, छिद्रे बुजवणे, लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया व अँजिओप्लास्टी  महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत  मोफत केल्या जाणार आहेत. शिबिरात कार्डियाक सर्जन डॉ.स्वप्नील कर्णे, डॉ.श्रीरंग रानडे, डॉ.वसंत कटारिया, कार्डिओलॉजीस्ट डॉ.राहुल अग्रवाल, डॉ.अमित थोपटे, कार्डियाक अनेस्थेटिस्ट डॉ.राहुल एरंडे, डॉ.विनय छल्लाणी,  डॉ.प्रवीण डुंगरवाल, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.पियुष मराठे, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार रूग्ण तपासणी करतील.
मंगळवार दि.14 मार्च रोजी अस्थिरोग तपासणी, मणके व सांधेबदली शस्त्रक्रिया शिबीर होणार आहे. यात इंपोर्टेड इम्प्लांटसह संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण,  संपूर्ण खुबा प्रत्यारोपण इंपोर्टेड इम्प्लांटसह 65 हजार रुपयांपुढे केले जाणार आहे. औषध खर्च वेगळा असणार आहे. यासह ए.सी.एल., रि कन्स्ट्रक्शन व ऑर्थोस्कोपी निदान केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनोंतर्गत पात्र लाभार्थींच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.विशाल शिंदे, डॉ.अमित सुराणा तपासणी करणार आहेत.
बुधवार दि.15 मार्च रोजी  किडनी आजार तपासणी शिबिर होणार आहे. यात अंगावर सूज येणे, लघवी कमी अथवा लाल होणे, किडनी जंतू संसर्ग, डायलेसिस रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत डायलेसिस मोफत केले जाईल. यात नेफ्रोलॉजीस्ट डॉ.गोविंद कासट, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार रूग्ण तपासणी करतील.
शनिवार दि.18 मार्च रोजी दंतरोग तपासणी व उपचार शिबीर होणार आहे. यात दातांच्या नसावरील उपचार मेटल कॅप एक हजार रुपये, सिरॅमिक कॅप 1500 रुपये, रुट कॅनल 1800 रुपये, दातांची कवळी बसवणे 7 ते 14 हजार दरम्यान, दात साफ करणे, दातात सिमेंट भरणे प्रत्येकी 400 रुपये, दात काढणे आदी उपचार केले जाणार आहेत. दंतरोग तज्ज्ञ डॉ.अपर्णा पवार, डॉ.संजय असनानी, डॉ.कोमल ठाणगे, डॉ.प्राची गांधी, लहान मुलांचे दंतरोग तज्ज्ञ डॉ.प्रणव डुंगरवाल या शिबीरात उपचार करतील.
रविवार दि.19 मार्च रोजी मोफत नेत्र रीग तपासणी शिबीर होणार आहे. महावीर भवन येथील आनंदऋषीजी नेत्रालय येथे होणाऱ्या या शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, रेटिना तपासणी व शस्त्रक्रिया, तिरळेपणा, लहान मुलांचे मोतीबिंदू तपासणी होईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत येणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी संपर्क- 8686401515. नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.अशोक महाडिक, डॉ.संदीप राणे, डॉ.विशाल तांबे, डॉ.कौस्तुभ घोडके, डॉ.नेहा भराडिया, डॉ.किरण शिंदे, डॉ. आदित्य नाकाडे, डॉ.कृतिका रेवणवार, डॉ.विजय दगडे, डॉ.पियुष सोमाणी, डॉ.सचिन कसबे, डॉ.थोपटे रूग्ण तपासणी व उपचार करतील.
सोमवार दि.20 मार्च रोजी एंडो युरोलॉजीकल मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशय, मूत्रमार्ग स्टोन शस्त्रक्रिया शिबीर होईल. प्रोस्टेट रोग उपचार, पुरुष वंधत्य समुपदेशन, मूल्यमापन आणि व्यवस्थापन, महिलांचे मूत्र मूल्यमापन, मूत्रमार्गातील विकार, अंडाशय कर्करोग व्यवस्थापन आदींवर उपचार मार्गदर्शन केले जाईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. शिबिरात मूत्रविकार शल्यचिकित्स डॉ.संकेत काळपांडे उपचार करतील.
मंगळवार दि.21 मार्च रोजी कान, नाक, घसा व स्पीच थेरपी तपासणी शिबीर होणार आहे. या शिबिरात डॉ.सुकेशिनी गाडेकर, वाचा व भाषा उपचार तज्ज्ञ डॉ.अझहर शेख रूग्ण तपासणी करणार आहेत.
गुरुवार दि.23 मार्च रोजी कॅन्सर तपासणी शिबीर सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत होणार आहे. यात घसा, फुफ्फुस, आतडे, तोंडाचा इत्यादी कॅन्सर तपासणी, स्त्रियांचे कॅन्सर तपासणी, स्त्रियांमधील स्तनाच्या कॅन्सरची तपासणी मॅमोग्राफी मशिनव्दारे करण्यात येईल. स्त्रियांच्या गर्भ पिशवीच्या कॅन्सरच्या तपासणीसाठी सवलतीच्या दरात पॅपस्मीयर तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी तपासणी फक्त 100 रुपयात करण्यात येणार आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे केमोथेरपी उपचार मोफत उपलब्ध आहेत. या शिबिरात कॅन्सर सर्जन डॉ.विनायक शेंडगेे, कॅन्सर विकार तज्ज्ञ डॉ.लिझा बलसारा, फिजिशियन डॉ.पियुष मराठे, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार, सर्जन डॉ.विवेक भापकर, डॉ.प्रवीण मुनोत, डॉ.भास्कर जाधव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे, रेडिओलॉजीस्ट डॉ. मितेश कटारिया, डॉ.भक्ती फलके, डॉ.सोनाली सोलट, डॉ.निखिता जैन (कटारिया), पॅथॉलॉजी डॉ.मुकुंद उंडे, डॉ.सारिका झरेकर, मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ.नरेंद्र पाटील रूग्ण तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
शुक्रवार दि.24 मार्च रोजी बालरोग तपासणी शिबीर होणार आहे. लहान मुलांच्या शस्त्रक्रिया हर्निया, डायाफ्रामॅटिक हर्निया, हायड्रोसेल, फिमोसिस, अंडिसेंड टेस्टीस व इतर शस्त्रक्रिया करण्यात येतील. यात बालरोग तज्ज्ञ डॉ.वैभवी वंजारे, डॉ.सोनाली कणसे, पिडियाट्रीक सर्जन डॉ.रूपेश सिकची रूग्ण तपासणी करतील.
रविवार दि.26 मार्च रोजी पोटाचे आजार, सर्व प्रकारचे यकृताचे विकार व स्वादूपिंडाचे आजार तपासणी शिबीर होईल. यात गॅस्ट्रोस्कोपी 1500 रुपयात तर कोलोनोस्कोपी 3 हजार रुपयांत केली जाणार आहे. नगरमध्ये प्रथमच हायड्रोजन ब्रेथ टेस्ट व हाय रिझोल्युशन मॅनोमेट्रीची सोय सवलतीच्या दरात उपलब्ध. शिबिरात पोटाचे विकार तज्ज्ञ डॉ.राजेंद्र गुंजाळ  उपचार करतील.
सोमवार दि.27 मार्च रोजी प्लॅस्टिक सर्जरी शिबीर होणार आहे. यात लहान मुलांच्या हाताच्या जन्मजात समस्या, व्यंग, मधुमेहामुळे होणाऱ्या जुनाट जखमा, पायाच्या जखमा, दुभंगलेले ओठ, तुटलेले कान, चेहऱ्यावरील व्रण आदी समस्यांवर उपचार करण्यात येतील. प्लॅस्टिक सर्जन डा.माया मरकड शिबिरात तपासणी व उपचार करणार आहेत.
बुधवार दि.29 मार्च रोजी मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबीर होणार आहे. यात फिजिशियन डॉ.वसंत कटारिया, डॉ.प्रविण डुंगरवाल, डॉ.गजेंद्र गिरी, डॉ.पियुष मराठे, डॉ.जयप्रकाश शिरपूरवार तपासणी करतील.
गुरुवार दि.30 मार्च रोजी दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया (बिनटाका) शिबीर होणार आहे. यात लॅप्रोस्कोपीव्दारे पोटातील, बेंबी, जांघेतील हर्नियाची शस्त्रक्रिया 10 हजार रुपये, पित्ताशय काढणे शस्त्रक्रिया 12 हजार रुपये, स्त्रियांच्या गर्भाशयाची पिशवी काढणे 10 हजार रुपये, स्टॅपलर लेझर पाईल्स शस्त्रक्रिया 15 हजार रुपये, अपेंडिक्स शस्त्रक्रिया 4 हजार रुपये, स्त्रीयांचे वंध्यत्व तपासणीसाठी ट्युबल पेटेन्सी टेस्ट 2 हजार रुपये, स्त्रीयांची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया 3 हजार रुपयांत केली जाईल. या शस्त्रक्रियांसाठी औषधे, जाळीचा व आयसीयुचा खर्च वेगळा असेल. या शिबिरात लॅप्रोस्क्रोपिक सर्जन डॉ.भास्कर जाधव, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रवींद्र मुथा, डॉ.सोनल बोरुडे रूग्ण तपासणी करतील.
या शिबिराची नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी 0241-2320473/74/75 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 9404399911 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जैन सोशल फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे. रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांकरिता हॉस्पिटल शेजारील महावीर भवन येथे फक्त 35 रुपयांत भोजनाची व्यवस्था कार्यरत आहे. तसेच 24 तास आनंदऋषीजी ब्लड बँक कार्यरत आहे.




Friday, March 3, 2023

सहाय्यक निबंधकास पंधरा हजारांची लाच घेताना लाच लुचपत अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले ?

( नासिक ) - सिन्नर - वार्ता -
येथील सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांना  दि. -02-02-2023   दुपारी दीड वाजेच्या दरम्यान त्यांच्याच कार्यालयात घडलेला गैर कारभार विषय 15 हजार 500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेपाथरे येथील एका पतसंस्थेच्या सेवकाने थकीत 17 कर्जदारांचे 101 चे वसुली दाखले मिळण्यासाठी पाटील यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले होते. पाटील यांनी प्रत्येक प्रस्तावाचे 2 हजार याप्रमाणे 34 हजारांची मागणी संबंधित सेवकाकडे केली होती.तडजोडीनंतर 25 हजार 500 रुपये देण्याचे संबंधित सेवकाने मान्य करीत 26 फेब्रुवारीला 10 हजार रुपये पाटील यांना दिले होते. दाखले तयार झाल्यानंतर उर्वरित 15 हजार 500 रुपये देत नसल्याने पाटील यांनी दाखल्यांवर सही करण्यास नकार दिल्यानंतर संबंधित सेवकाने बुधवारी (दि. 1) लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली
तेथे पाटील यांच्यासह तक्रारदारांचे जबाब घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार सुखदेव मुरकुटे, पंकज पळशीकर, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.होती.तडजोडीनंतर 25 हजार 500 रुपये देण्याचे संबंधित सेवकाने मान्य करीत 26 फेब्रुवारीला 10 हजार रुपये पाटील यांना दिले होते. दाखले तयार झाल्यानंतर उर्वरित 15 हजार 500 रुपये देत नसल्याने पाटील यांनी दाखल्यांवर सही करण्यास नकार दिल्यानंतर संबंधित सेवकाने बुधवारी (दि. 1) लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर बुधवारी (दि.1) संबंधित सेवकाने पुन्हा पाटील यांची भेट घेऊन 1500 हजार 500 रुपये उद्या (दि.2) देण्याची तयारी दाखवली होती.
त्यानुसार आज (दि. 2) दुपारी सव्वा वाजेच्याच्या दरम्यान सरकारी पंचांच्या समोरच पाटील यांनी 15 हजार 500 रुपयांची लाच घेतली त्यानंतर परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी लाचेच्या रकमेसह पाटील यांना ताब्यात घेतले. आज सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाची माघारीची अंतिम मुदत होती. पाटील हेच या संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी होते. त्यामुळे कार्यालयात माघारीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी होती. या गर्दीतच ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर केबिनचा दरवाजा आतून बंद करून पाटील यांच्यासह त्यांच्या टेबल व बॅगची झडती घेण्यात आली. त्यानंतर पाटील यांना घेऊन लाचलुचपतचे अधिकारी सार्वजनिक बांधकामच्या विश्रामगृहावर पोहोचले.
तेथे पाटील यांच्यासह तक्रारदारांचे जबाब घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार सुखदेव मुरकुटे, पंकज पळशीकर, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. संधर्भात वार्ता समजते.
----------------------------------------------
================================
कार्य.संपादक.भगवंत.सिंघ.प्रितम.सिंघ.बत्रा.








































Wednesday, March 1, 2023

ग्रामसेवक कर्तव्य ग्रामिण क्षेत्रात ली काम काज पार पाडत संयम व भान ठेऊन जनतेची भले करिता पुर्ण करावा लागतात ?


राष्ट्रीय संविधानिक अधिनियम (Article 243) ( नगर ) ग्रामसेवक कर्तव्य व कामे पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी 'लोकशाही संस्था' असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता, सरपंच सोबत ग्रामसेवकालाही Gram Sevak महत्वाची भूमिका बजावावी लागते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास अधिकारी Village Development Officer अशा नावांनी देखील ओळखले जाते.
गावाचा विस्तार, लोकसंख्या आणि उत्पन्न लक्षात घेता, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक किंवा एकापेक्षा अधिक ग्रामसेवकाची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यापरिषदकडून नेमणूक केली जाते. त्याचे वेतन व भत्ते जिल्हा निधीतून दिले जाते.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ तसेच, ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे काम पाहत असतात. या पदावर कार्यरत असतांना त्यांनी करावयाच्या कामांची कर्तव्यसूची Gram Sevak Kame शासनाकडून वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते.
ग्रामसेवक कामे / कर्तव्ये व अधिकार: 
ग्रामसेवकाला गावाच्या विकासाच्या दृष्टीने, विकासकामांचे नियोजन, ग्रामपंचायत निधी, ग्रामसभा अहवाल, ठरावांची अंमलबजावणी, पत्रव्यवहार, शासकीय योजनेचे व्यवस्थापन इत्यादी सारख्या अनेक जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडाव्या लागतात.
• महाराष्ट्र ग्रामपंचात अधिनियम, १९५८ कलम ७ नुसार ग्रामपंचातीच्या सहकार्याने ग्रामसभा, मासिक सभा बोलाविणे, त्यांची नोटिस काढून संबधितांना देणे, सभेचा कार्यवृत्तांत लिहणे व सभेमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी व पूर्तता करणे.
• मनरेगा व वित्त आयोग योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीचे उत्पन्न व इतर प्रशासकीय व जिल्हापरिषदकडून उपलब्ध होणारे अनुदान याचा विचार करून, ग्रामपंचायतीचे सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेऊन, गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने गावविकासाचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे.
पंचवार्षिक आराखडा तयार करीत असताना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विकास योजनेवर लाभार्थी निवडीसह जानेवारी महिन्यात वार्षिक कृती आराखडा तयार करून एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या ग्रामसभेपुढे कामाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणे.
• ग्रामसभेत प्रस्ताव मान्य झाल्यानंतर, सदर प्रस्ताव संबंधित खातेप्रमुख तांत्रिक अधिकारी यांच्याकडे मंजुरीकडे पाठवणे.
• ग्रामपंचायतीने विकास विषयक कामांवर केलेल्या कामाचा अहवाल तयार करणे आणि त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावणे.
टीप : ग्रामपंचायत अधिनियम कlलम (६०-क) (२) नुसार, ग्रामपंचायतीने विकासकामांवर केलेल्या कामाचा अहवाल तयार करण्यात आणि त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात ग्रामसेवकाने कसूर केल्यास, महाराष्ट्र जिल्ह्या परिषद जिल्हा सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९६४ च्या नियम ४ अन्वये संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाण्यास पात्र असेल.
हे देखील वाचा : ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो?
• सरपंच, उपसरपंच यांना सभेच्या वेळी व आवश्यकता असेल तर कायदेविषयक सल्ला देऊन आपले मत मांडणे. 
• ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारची माहितींचे जतन करणे व सरपंचाच्या मदतीने गाव विकासाची कामे पार पाडणे.
• राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व अभिलेख (Records) जतन, वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्ययावत (updated) ठेवणे. 
• शासनाने व जिल्हा परिषदेने बसविलेले विविध ग्रामपंचायत कर व फी यांची वसुली करणे. प्रत्येक चार वर्षांनी कर आकारणीत वाढ सुचविणे व ग्रामनिधीची संपूर्ण जबादारी सांभाळणे.
• ग्रामपंचायतीचे पत्रव्यवहार सांभाळने व ग्रामपंचायत व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून काम करणे.
• ग्रामपंचायत हद्दीतील जमीनी, रस्ते, इमारती, पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोज
ग्रामपंचायतीचे पत्रव्यवहार सांभाळने व ग्रामपंचायत व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून काम करणे.
• ग्रामपंचायत हद्दीतील जमीनी, रस्ते, इमारती, पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे दस्तऐवज, कराराचे दस्तऐवज अद्ययावत ठेवणे. ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे.
• जन्म-मृत्य, विवाह नोंदणी इत्यादी बाबत रजिस्ट्रेशन अक्टनुसार निबंधक/कुलसचिव म्हणून कर्तव्य पार पाडणे.
• ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोसायट्यदूध डेअरी, नागरी पत संस्था, स्थानिक महिला मंडळे, बालवाडी, तरुण मंडळे, बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्व्य साधून गावात लोकोपयोगी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
• ग्रामपंचायतीच्या पातळीवर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आणून गावातील प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा करणे व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.
• ग्रामपंचायत काही नियमांची व कायद्याची उल्लंघन करणारी कृती करत असेल किंवा तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे.
• निवडणूकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे.
• ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे व त्यांच्याकडून कर वसुली करण्याची जबाबदारी पार पाडणे. तसेच, त्यांच्या रजेच्या हिशेब, भविष्य निर्वाह निधी, बोनस इत्यादी शासनाच्या कायद्यानुसार व नियमानुसार देणे.
• सेवा हमी कायद्यानुसार दाखले विहित मुदतीत देणे.
• गावातील दारिद्ररेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे.

--------------------------------------------------
===================================

आई आर मिर्जा.(संपादक) शक्तीचा संचार ,