राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, March 30, 2023

मोक्षदा पाटील IPS अधिकारी यांच्या नावाचा वापर करून उकळले पैसे कोण आहे अज्ञान व्यक्ती सायबर क्राईम ब्रँच पोलीस कसून शोध घेत आहे ?

(छत्रपती संभाजीनगर)-औरंगाबाद-प्रतिनिधि-वार्ता-भारतात सर्व राज्यात सध्या सायबर गुन्ह्यांची (Cyber ​​crime) संख्या वाढली आहे. दिवसेंदिवस या गुन्ह्यांचे स्वरूप आणि प्रकार यांच्यात मोठा बदल होत चालला आहे. सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून कधी आर्थिक तर कधी व्यक्तिगत हानी पोहचवली जाते.या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर वाढत चालले आहे. पण पोलिसच जर या गुन्ह्यांचे शिकार ठरत असतील तर.परिस्थिती जरा किचकट स्वरूपात भयानकच आहे.असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे.सायबर गुन्हेगाराने चक्क एका महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्याच्या नावाने पैसे उकळविण्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडून पैसे उकळण्यात आले
आहे.छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने हे पैसे उकळण्यात आले आहे. विशेष म्हणजे या बनावट खात्यावरून सायबर गुन्हेगाराने देशभरातील IPS अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मोठे चर्चेचा विषय : उत्पन्न झालं आहे 
त्या गुन्हेगाराने बनावट अकाऊंटवरून, एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची पोस्ट केली. सोबतच या मुलीला उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा मेसेज केला. उपचार सुरू असलेल्या मुलीसह एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्विट करून व्हायरल केला. तर हे अकाऊंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचा विश्वास ठेवून, देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवून मदत केली.
दरम्यान या सर्व प्रकाराबाबत मोक्षदा पाटील यांना माहिती
मिळताच त्यांनी लोहमार्ग, ग्रामीण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट खाते बंद करण्यासाठी ट्विटरला रिपोर्ट करण्याबाबत कळविले. अनेक ठिकाणांवरून ट्विटरला रिपोर्ट गेल्यानंतर 27 मार्चला रात्री 11 वाजेदरम्यान हे बनावट खाते बंद झाले. तसेच या सायबर गुन्हेगाराचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तर ट्विटरवर माझे कोणतेही खाते नसून, नागरिकांनी सायबर महाठग भामट्यांच्या पोस्टला बळी पडू नयेत, असे आवाहन मोक्षदा पाटील यांनी केले आहे. हे खाते बंद करण्यात आले असले तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.तसेज कुठलेही ऑनलाईन वेव्हार करता खातर जमा करूनच वेव्हार करावेत असे अहवान केले आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी.संपादक.भगवंत सिंघ प्रितम.सिंघ. बत्रा. शब्द. ✍️ ✅️ 🇮🇳रचना. संकलन. वार्ता...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------




















नाशकात तालुका सहायक निबंधकला तब्बल २० लाखाची लाच घेताना एसीबी अधिकाऱ्यांचे पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले ?

(नाशिक)-प्रतिनिधि-वार्ता-
नाशकात तालुका सहायक निबंधकच तब्बल २० लाखाची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यान पथकाने शिथाफिने रंगेहाथ धरले यात तालुका निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाचाही सहभाग आहे. त्यामुळे सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर रणजीत महादेव पाटील, वय-32 वर्ष, पद- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नेमणूक-सहकारी संस्था निफाड, अतिरिक्त कार्यभार सिन्नर., प्रदीप अर्जुन वीर नारायण, वय-45 वर्षे, पद- वरिष्ठ लिपिक निफाड, कार्यालय-सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड. (वर्ग 3) यांनी सावकारी कायद्यातर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी यांनी २० लाख रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली. त्यानंतर एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.
एसीबीच्या पथकाने सापळा रचला. दिनांक 29/3/2023 रोजी नमूद 20 लाख रुपये लाचेची रक्कम मुंबई नाका येथे तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे.नाशिक परशाभूमी वर  गेल्या तीन चार महिन्या भराच्या काळात लांचलूचपत विभागाने  कारवाई करुन लाच घेत असल्याचे प्रकार अनेक स्वरूपात निदर्शनास समोर आल्याचे दिसत आहे .

----------------------------------------------------=========================================================================================================
कार्यकारी.संपादक.भगवंत.सिंघ.प्रितम.सिंघ.बत्रा.शब्द.✍️✅️🇮🇳.रचना.संकलन.वार्ता...
=========================================================================================================
----------------------------------------------------













Wednesday, March 29, 2023

श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीसाठी अनेक.राजकीय पक्ष रिंगणात उत्तर न्याचे तयारीत स्वम्भवते ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काल काँग्रेस, राष्ट्रवादी , उध्दव ठाकरे शिवसेना व शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन बैठक घेत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर कोण उभे ठरणार याची उत्सुकता लागली आहे. ससाणे गटाने याकडे पाठ फिरवली तर विखे व मुरकुटे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीस काँग्रेसच्यावतीने आ. लहू कानडे, अशोक कानडे, इंद्रनाथ थोरात, अरुण पा. नाईक, विष्णूपंत खंडागळे, ज्ञानेश्वर मुरकुटे, वंदना मुरकुटे राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, कैलास बोर्डे, शिवसेनेचे अशोक थोरे, अरुण पाटील, सचिन बडधे, शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, सुरेश ताके, अनिल औताडे,जगताप, किशोर बकाल,रज्जाक पठाण, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. कानडे यांनी सांगितले की, वरिल पातळीवर सध्या महाविकास आघाडी म्हणून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने त्या पार्श्वभीमूवर आज तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी संघटना यांना एकत्रित करुन बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी लागणार असल्याचे सांगितले. यावर सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने महाविकास आघाडी तयार होऊन या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेणार असल्याचे चित्र दिसले. वरिल पातळीवर सर्वच पक्षांनी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावून त्यांना महाविकास आघाडीच्यावतीने या निवडणुका लढविण्याचे संकेत दिले
होते त्यानुसार काल याबाबत प्राथमिक बैठक
यावेळी राष्ट्रवादीचे अविनाश आदिक यांनीही सांगितले की, यापुढील सर्व निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढविण्याचे शरद पवार यांनी सांगितले असल्याने आपण महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले.
ससाणे गटाची अद्याप स्पष्ट भूमिका मांडण्यात आली नसल्याने समजते
श्रीरामपूर बाजार समितीच्या निवडणुकीबाबत ससाणे यांना विचारले असता अद्याप आपण काहीच निर्णय घेतला नसल्याचे सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आम्ही एकत्रित निर्णय घेऊ असे सांगितले. मात्र काल काँग्रेस म्हणून जी बाजार समितीबाबत बैठक आ. लहू कानडे यांनी बोलावली होती त्याकडे त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजून दिशा उघड केली नाही त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अद्यापही स्पष्टता आहे. मुरकुटे यांच्या बरोबर युती करून निवडणूक लढवितात की स्वतंत्रपणे लढतात याकडे अनेक जण तर्क वितरक लावत आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी.संपादक.भगवंत. सिंघ. प्रितम. सिंघ. बत्रा. शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
----------------------------------------------------------------------------------------------------------


Tuesday, March 28, 2023

पांजरपोळच्या संवर्धनार्थ पर्यावरणप्रेमी रस्त्यावर निसर्ग रक्षण करा निसर्ग प्रेमीन च या संदर्भात : निवेदन अर्ज सादर जिल्हा अधिकारी नाशिक ?

(नाशिक) - प्रतिनिधि - वार्ता -
नाशिक पंचवटी पांजरपोळची चुंचाळे, बेलगाव ढगा, सारूळ या ठिकाणी असलेली 825 एकर जागा उद्योगांसाठी संपादित करण्यास शहरातील विविध पर्यावरणीय मित्र संस्थांतर्फे विरोध करत याबाबतचे निवेदन सोमवारी (दि.२७) जिल्हाधिकारी गंगाथरण डी.यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, पांजरपोळ संस्थेचे चुंचाळे, बेलगाव ढगा, सारूळ हे जैव विविधता क्षेत्र हे संस्थेने फार पूर्वी विकत घेतलेले असून हे क्षेत्र नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी आहे.
यामुळे या ठिकाणी लाखो झाडे, 27 रेन वॉटर हार्वेस्टिंग,शेततळे, अनेक पशुपक्ष्यांचे निवासस्थान अनेक जलचर, भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या 300 मोरांचे नंदनवन, चौदाशे गायींची गोशाळा, गांडूळ खत प्रकल्प,साडेचारशे किलो वॅटचा सौर विद्युत निर्मिती प्रकल्प, परागीभवनासाठी मधमाशी पालन असे विविध प्रकल्प या ठिकाणी आहेत.तसेच हे क्षेत्र पर्यटन (Tourism) संचालनालयाकडे एक दिवसीय सहल केंद्र म्हणून नोंदणीकृत आहे. यात संस्थेद्वारे पर्यटकांना मोफत तीन तासांचे टेकर सफारीही घडविली जाते व मोफत अल्पपोहारही देण्यात येतो. या ठिकाणी मोठी समृद्ध अशी जैवसाखळी विकसित झाली आहे.असे हे समृद्ध क्षेत्र औद्योगिक वसाहतीकरिता (Industrial estates) संपादित करण्याचे नियोजन आहे.
मात्र, यास आम्हा सर्व विविध पर्यावरणीय मित्र संस्थांचा तीव्र विरोध आहे. या ठिकाणी औद्योगिक वसाहत करण्याऐवजी पेठ, त्र्यंबक, सुरगाणा तालुक्यांमधील कोरडवाहू क्षेत्रावर औद्योगिक वसाहत उभारल्यास या भागातील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध अशा पद्धतीने येथे औद्योगिक वसाहत उभारावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रमेश अय्यर, नितीन शुक्ल, राम खुर्दळ, ऍड.एन.एस.संधान, तुषार पिंगळे, भारती जाधव, दिगंबर काकड आदींच्या अनेक सर्व धर्माचे सामाजिक कार्य करते तथा समाज मोठ्या संख्येने उपस्तित राहून सह्या करून निवेदन दाखल केले आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी.संपादक.भगवंत.सिंघ.प्रितम.सिंघ.बत्रा.शब्द.✍️✅️ 🇮🇳.रचना संकलन.वार्ता...
------------------------------------------------------------------------=====================================------------------------------------------------------------------------===============================================================================================================




गोरगरीब लाचार ना सन्मान पूर्वक रॉयल चॅरिटी ट्रस्टच्या वतीने गरजूंना मदतीचा हात श्रीरामपूर ?

(श्रीरामपूर) -प्रतिनिधि-इम्रान शेख-

श्रीरामपूर : येथील रॉयल चॅरिटी ट्रस्टच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून गोरगरीब, गरजूंना, वृद्धांना, तसेच अनाथांना ब्लांकेट्स, सॉक्स वाटप केले जाते. कुडकुडत्या थंडीत त्यांनाही ऊब मिळावी, व उन्हाळ्यात उन्हाची झळ न लागावी हा त्यामागचा उद्देश आहे. रॉयल परिवार हे श्रीरामपुरातील एक बहुउद्देशीय संस्था आहे. जे गतीने आपले सेवाभावी कार्य मागील पाच वर्षापासून शहरात करीत आहे. मागील दहा वर्षांपासून छोटेमोठे उपक्रम राबविले जात होते. 
२०१७ पासून रस्त्यावर वेदनादायी जीवन जगणाऱ्या लोकांसाठी प्रत्येक हिवाळ्यात ब्लंकेट, सॉक्स तसेच उन्हाळ्यात कपडे, चप्पल तसेच रस्त्याच्या बाजूला असलेले प्रत्येक गरजू व्यक्तीला जेवण, कपडे व जीवनावश्यक वस्तू देवून आपले जबाबदारीचे कार्य पूर्ण करीत आहे. त्यासोबतच सर्व धर्मियांचे अनाथ मुलांचे लग्नाचे स्थळ जुळवून लग्न थाटामाटात संपन्न करणे तसेच अनाथ आश्रम, लहान मुलांचे मूकबधिर शाळा, वृद्धाश्रम अशा ठिकाणी शक्य तेवढी मदत रॉयल ट्रस्ट सतत करत आहेत. नवरात्रनिमित्त खिचडी वाटप करून सर्व धर्मियांचे सण, उत्सव, कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. प्रत्येक 
ज्या दानशूर व्यक्तीना कपडे, जेवण किंवा जीवनावश्यक वस्तू तसेच रोख स्वरूपात देणगी द्यावयाची असल्यास

----------------------------------------------------------------------------------------------------------
मुख्य :कार्यालय, जुने प्रांत ऑफिस श्रीरामपूर. येथे संपर्क साधावे.असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष कलीम शेख, उपाध्यक्ष सचिन काळे, सचिव आस्मा शेख व इतर सदस्यांनी केले.
----------------------------------------------------------------------------------------------------------








सय्यदबाबा उरूसाला सुरुवात.दिर्घ काळ.अनेक वर्षा पासून डावखर कुटुंबीयांकडे मजारवर चादर चढविण्याचा मान हिंदू मुस्लिम सालोख्या चे प्रतिक ?

(श्रीरामपूर) - वार्ता - समाचार -
श्रीरामपूर - येथील हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांच्या ९३ व्या उरुसाला सोमवारपासून सुरुवात झाली. शहरातील गोपाळराव डावखर यांनी १९२६ मध्ये सय्यद बाबा यांची तुरबत बांधल्यामुळे त्यांच्या मजारवर चादर चढविण्याचा मान याच कुटुंबाला मिळालेला आहे. त्यामुळे या उरुसाची हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा दीर्घ काळ वर्षा पासून चालू असून, सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून राज्यभर या उरुसाची ओळख आहे. शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गानजीक
राज्यातील प्रसिद्ध हजरत सय्यद शाह कादरी बाबा यांचा दर्गाह आहे. या दर्गाहवर उरूसानिमित्त आकर्षक विद्युत पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे, उरूस मानले जाते.
विधुत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा पवित्र रमजानच्या उपवासामुळे उरूस साध्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे कव्वालीला जाते. कार्यक्रम रद्द केल्याची माहिती उरूस समितीने दिली.शहराच्या जडणघडणीत
मोलाची भूमिका असलेल्या गोपाळराव गंगाराम डावखर यांची सय्यद बाबा यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. १९२६ मध्ये सय्यद बाबा यांच्या निधनानंतर डावखर यांनीच सय्यद बाबांची कबर त्यावेळी बांधली. त्यामुळे डावखर कुटुंबीयांकडून मानाची चादर चढविल्यानंतर उरूसाला प्रारंभ होतो. यानंतर तहसील कार्यालय, तालुका
समिती व भाविकांकडून मजारवर चादर चढविली जाते. गोड भाताच्या (न्याज) भंडाऱ्याचे यानिमित्त आयोजन केले
सय्यद बाबांच्या उरूसानंतर तीन दिवसांनंतर शहरातील श्रीराम नवमी यात्रेला सुरुवात होते. श्रीराम नवमी यात्रा समितीकडून उरूस समितीच्या सदस्यांचा मंदिरामध्ये सत्कार केला जातो, तर श्रीराम नवमी यात्रा समिती सदस्यांना सय्यद बाबांच्या दर्गाहमध्ये बोलावून गौरविले जाते. दोन्ही यात्रोत्सवपाठोपाठ आनंदाने एकत्रितरित्या साजरे केले जातात. राज्यात हिंदू-मुस्लीम सलोख्याचे हे प्रतीक
उरूस समितीचे अध्यक्ष मुन्ना पठाण, विश्वस्त दिलावर गुलाम रब्बानी, सचिव रज्जाक पठाण, नजीरभाई शेख, कार्याध्यक्ष हाजी मुख्तार शाह, कलीम कुरेशी, स्वागताध्यक्ष रियाज पठाण, उपाध्यक्ष जोऐब जमादार, अशोक उपाध्ये, संजय छल्लारे, लकी सेठी, साजिद मिर्झा, गणेश मगर, रमजानी मामू, जलीलखान पठाण, मुजफ्फर शेख, अंजूम शेख, महंमद रफिक शेख, याकूब बागवान, नजीर मुलाणी, अकिल सुन्नाभाई, बंटी जहागीरदार, सलीम पठाण, रमजान शाह, जेष्ठ.सामाज सेवक. अहमद.भाई जहागीरदार.यांनी उरूस व रामनवमी यात्रेत सहभागी होऊन सर्व घटकाणी सोबत राहून कार्यक्रम आनंदाने व शांतता पूर्वक पार पाडण्याचे सांगितले व अहवान केले आहे...

------------------------------------------------------------------------
====================================
कार्यकारी.संपादक.भगवंत...सिंघ...प्रितम...सिंघ.बत्रा...संकलन वार्ता.✍️✅️ 🇮🇳. श्रीरामपूर...
------------------------------------------------------------------------====================================















श्री रामनवमी जत्रा निमित्त मनोरंजन पाळणे थत्ते मैदानावरच परंतु नियंत्रण यात्रा कमिटीच्या हाती हिंदुत्ववादी अनेक संघटनांनी केले स्वागत दर फक्त 20 व 30 रुपये ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीराम नवमीनिमित्त थत्ते मैदानावर सरळ व गोल फिरणारे पाळणे व खेळणी दुकानांसाठी ठेकेदार व नगरपालिका यांच्यात सरकारी बोलीच्या कारणावरुन गेल्या दहा दिवसांपासून दर निश्चित होत नव्हते. मात्र काल अखेर नगरपालिकेने यात्रा कमिटीलाच पाळणे चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. पालिकेने यात्रा कमिटीला पाळणे चालविण्याचा ठेका दिल्याने हिंदुत्वादी संघटनांनी स्वागत केले आहे. त्यामुळे पाळण्याचे दर सर्वसामान्याना परवडतील असे 20 व 30 रुपये इतकेच आकारले जाणार आहेत. मात्र रासकरनगर येथ काही पाळणेवाल्यांनी पाळणे उभे केले होते ते मात्र आता काढावे लागणार असल्याने या वादात पाळणेवाल्याचे हाल होत आहेत.
मागील वर्षी पालिकेने पाळण्याचा ठेका 34 लाख 11 हजार 100 रुपयांना दिेला होता. त्यामुळे पालिकेने सरकारी बोलीही 34 लाख रुपये ठेवली होती. मात्र सरकारी बोली 15 लाखांपासून सुरु करावी अशी मागणी पाळणेधारकांनी केली होती. पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याशी चर्चा करुन सरकारी बोली ही 34 लाखांऐवजी 31 लाख रुपये ठेवली. मात्र ठेकेदारांनी ही बोली 15 लाखांऐवजी 17 लाख रुपयांवरुन सुरु करावी, अशी मागणी केली. मात्र यास मुख्याधिकार्‍यांनी नकार दिला आणि पुन्हा एक़दा तिसर्‍यांना ठेवलेला फेरलिलाव रद्द करण्याची वेळ आली. चार दिवसांवर यात्रा येवून ठेपली असतानाही अद्यापही या दरामुळे पाळणेवाल्यांचा प्रश्न ‘जैसे थे’ होता.
श्रीरामनवमी यात्रा काही दिवसावर येवून ठेपलेली असताना पाळण्यावाल्यांनी थेट रिकाम्या जागा मालकाचा शोध घेवून त्यांच्याशी चर्चा केली आणि काही नाममात्र पैसे आकारुन सदरचे पाळणे रासकरनगर येथे बसविण्याचा निर्णय घेतला. नगरपालिकेच्या नाहरकत दाखल्याबाबत श्री. रासकर यांनी अर्जही केला होता. काही पाळणे उभे करण्याचे कामही सुरु झाले होते.
काल मात्र भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, माजी नगरसेवक रवी पाटील, दीपक बा. चव्हाण, मनसेचे बाबा शिंदें, डॉ्र दिलीप शिरसाठ, गौतम उपाध्ये, यांच्यासह असंख्य
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काल प्रशासक व मुख्याधिकार्‍यांची भेट घेवून सदरचे पाळणे थत्ते मैदानावरच ठेवावेत व सदरचे पाळणे हे यात्रा कमिटीकडेच द्यावेत. यापूर्वी सदरचे पाळणे व खेळणी दुकानांचे अधिकार हे यात्रा कमिटीकडेच होते.
मात्र मध्यंतरीच्या काळात याचे टेंडर काढून ठेकेदारांना सदरचे पाळणे चालविण्यात देण्यात येत होते. मात्र ही प्रथा बंद करुन पुन्हा यात्रा कमिटीकडे सदरचे पाळणे व अन्य दुकाने कमी दराने चालविण्यास देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार काल मुख्याधिकार्‍यांनी यात्रा कमिटीला 17 लाख रुपयांना हा ठेका देण्याचा निर्णय घेतला. मात्र यादरम्यान पाळण्याचे दर हे केवळ 20 रुपये व 30 रुपये अशीच दरे ठेवावेत, असेही मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. मुख्याधिकार्‍यांनी काल यात्रा कमिटीला पाळणे देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल काही हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांचा हार्दिक सत्कार केला. असल्यामुळे हर्षवो उल्लासने शांतता पूर्वक श्री रामनवमी उत्सव पार पडेल  असे सांगण्यात आले आहे

----------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी संपादक भगवंत सिंघ  प्रितम सिंघ बत्रा शब्द. ✍️✅️🇮🇳.रचना संकलन.वार्ता...
========================================================================