राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, May 11, 2023

अधिक्षक अभियंता कुलकर्णी सार्वजनिक बांधकाम खाते शासकीय सेवातून निवृत्ती होऊन कार्य मुक्त ?


( अहमदनगर )
सार्वजनिक बांधकाम खात्यात गुणवता पूर्वक रस्ते इमारती दर्जेदार पारदर्शक कामकारणारे  यांना उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार जाहीर होऊन मिळाले अस्थांना दिनांक 30/04/2023श्री कुलकर्णी अधिक्षक अभियंता पदा वरून सेवा निवृत्ती कार्य सेवा मुक्त झाले तेंच्या शासकीय कार्य सेवेत पार पडल्याली कामे...
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयइमारत सामाजिक न्याय भवन, निंबळक व अरणगाव येथील रेल्वे उड्डाणपूल, नगरचा बायपास, अशा नगरच्या वैभवात भर टाकणाऱ्या अनेक वास्तू उभ्या करणारे सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता जयंत धोंडोपत उर्फ जे. डी. कुलकर्णी हे नियत वयोमानानुसार नुकतेच शासकीय से वेतून सेवानिवृत्त झाले
आहेत.कुलकर्णी यांनी आपल्या शासकीय सेवेची सुरुवात सहाय्यक अभियंता श्रेणी - १ या पदावरून मार्ग प्रकल्प उपविभाग क्र. २ नगर येथूनच केली होती. त्यानंतर त्यांनी नांदेड, गंगाखेड, औरंगाबाद येथे कार्य केले. कार्यकारी अभियंता म्हणून त्यां लातूर, अकोला, पेण जि. रायगड, नगर, पुणे येथे कार्य केले. तर अधीक्षक अभियंता म्हणून रत्नागिरी व नगर येथे कार्यरत होते शासनाच्या आशियाई विकास
बँकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते प्रकल्पाअंतर्गत राज्याचे समन्वय अधिकारी म्हणून केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सेवाकाळात शासनाच्या विविध समित्यावर त्यांनी काम केले. त्यांना सेवापूर्तीनिमित्त नुकताच निरोप देण्यात आला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, नव्यानेच पदभार स्वीकारलेले अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, दीपक दरे, उदय मुंढे, अनिल कोठारी अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आदी उपस्थित होते.



...राजु मिर्जा...🖊️✅️🇮🇳...












Wednesday, May 10, 2023

निवृत्ती वेतनातवाढ पत्रकाऱ्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून घोषणा ?

( मुंबई ) - प्रतिनिधी - विषेश - वार्ता 
महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत दरमहा ११ हजार रूपयांचे निवृत्तीवेतन देण्यात येते. त्यात वाढ करून आता २० हजार रूपये दरमहा निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली. शंकरराव चव्हाण
सुवर्णमहोत्सवी पत्रकारिता कल्याण निधी तसेच अधिस्वीकृती समिती देखील नेमण्याचा शासन निर्णय लगेचच काढू, असेही शिंदे यांनी जाहीर केले. कोविड असो वा इतर कोणती आपत्ती असो, बॉम्बस्फोट असो वा दहशतवादी हल्ला असो पत्रकार हा कायम पुढे असतो. पत्रकारितेसोबतच तो सामाजिक जबाबदारी देखील पार पाडत असतो. त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न सोडविणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना शिंदे पत्रकारांसाठी विविध घोषणा केल्या. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी तर भूमिका कार्यवाह प्रविण पुरो यांनी विशद केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले.प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या काही काळात मोठया प्रमाणात बदल झाल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पूर्वी प्रिंट मिडिया हा एकमेव होता. आता इलेक्ट्रॉनिक सोबत डिजिटल आणि सोशल मिडिया देखील आला आहे. आम्ही देखील पत्रकारांच्या भल्यासाठीच काम करतो. कोणी विरोधात बातमी दिली तर मी कधीही फोन करून विचारत नाही की विरोधात का बातमी दिली. पण जेव्हा सरकार चांगले काम करत असते तेव्हा चार शब्द जर चांगले लिहिले तर आमचाही हुरूप वाढतो. मेट्रोची कामे असतील. मुंबईचे सुशोभीकरण, खड्डे मुक्त मुंबई अशी अनेक कामे आम्ही करत आहोत. आमचा इतर काही अजेंडा नाही. सर्वसामान्यांना सुखाचे दिवस यावेत हाच आमचा अजेंडा
आहे. कारण आम्ही देखील संघर्ष करूनच इथपर्यंत आलो आहोत, असे शिंदे म्हणाले. निवृत्त पत्रकारांसाठीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.आहोत, असे शिंदे म्हणाले. निवृत्त पत्रकारांसाठीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आचार्य अत्रे यांना महाराष्ट्र भूषण द्या

संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात आचार्य अत्रे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे आचार्य अत्रे यांना मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी यावेळी केली.


-----------------------------------------------------========================================================================
सा : राज प्रसारित... कार्यकारी... संपादक...भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा... शब्द...✍️✅️🇮🇳रचना...संकलन... वार्ता...
========================================================================
----------------------------------------------------









Tuesday, May 9, 2023

चोरून विल्हेवाट लावणाऱ्या मोटर सायकली ( रॉयल इनफिल्ड ) कंपनी (Bulet) भंगार दुकानदारांसह चौगाणा अटक कोतवाली पोलीसांची कारवाई ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता -
शहरात  बुलेट दुचाकींची चोरी (Bullet Bikes) करून त्याचे पार्ट सुटे करून त्याची विल्हेवाट (Disposal) लावणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) धरून पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी चौघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.त्यातील चोरट्यांना न्याय लयाने कोठडीत रवानंगी केलीतर विल्हेवाट  लावणाऱ्यांना पण पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
20 फेब्रुवारी रोजी मनिष मदनलाल फुलढाळे यांची बुलेट दुचाकी ख्रिस्तगल्ली येथून चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना चोरीस गेलेली बुलेट (Bullet) अहमद मुन्ना शेख (रा. मुकुंदनगर) याने चोरी केली व ती साथीदार शाहरुख आलम शेख (रा. नागरदेवळे) याच्या घरात लपवून ठेवल्याची माहिती कोतवाली पोलिसांना (Kotwali Police) मिळाली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सदर बुलेट आम्ही चोरुन नंतर तीचे सर्व स्पेअरपार्ट
वेगवेगळे करुन ते भंगार दुकानदार जावेद रऊफ शेख (रा. सादिकमळा, भिंगार व राम विलास ससाणे (रा. गजराजनगर) यांना विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक (Arrested) करुन चोरीस गेलेल्या बुलेटचे स्पेअरपार्टस, इंजिन, चेसीज हस्तगत केली.
अधिक तपास पोलिस बाळासाहेब मासळकर हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोलिस कर्मचारी मनोज कचरे, हवालदार तनवीर शेख, हवालदार गणेश धोत्रे, हवालदार योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, योगेश खामकर, बाळासाहेब मासळकर, संदीप थोरात, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ आदींनी केली.
----------------------------------------------------======================================================================
सा : राज प्रसारित...कार्यकारी संपादक...भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन... वार्ता...
======================================================================
----------------------------------------------------









Monday, May 8, 2023

चक्रीवादळ मोचा धडकणार राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता ?

(दिल्ली) -  ANI - न्यूज एजन्सी वार्ता

अवकाळीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा संकटात सापडला आहे. अवकाळीचं हे संकट कधी दूर होईल याची वाट शेतकरी पाहत असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. चक्रीवादळाच्या (Cyclone Mocha) पार्श्वभूमीवर आज राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल आणि पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मोचा चक्रीवादळ (Mocha Cyclone) आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे.
महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस (Rain Alert) पडेल असा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांना अलर्टही जाहीर करण्यात आला आहे.
विदर्भ आणि छत्तीसगड भागात आज मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडत आहे, तर राज्यातील काही ठिकाणी गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
कुणी दिलं मोचा हे नाव?
जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (ESCAP) च्या सदस्यांनी एका यादी तयार केली आहे. या यादीमध्ये देशांची नाव आहे. प्रत्येक देश एका एका चक्रीवादळाला नाव देतो. यामध्ये भारताचाही समावेश आहे. मात्र सध्याच्या चक्रीवादळाचं
नाव भारताने सुचवलेलं नाही. अगदी सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर चक्रीवादळाचं नाव ठरवणारा एक संघ आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. या संघातील प्रत्येक देश चक्रीवादळाचं नाव सुचवत असतो.
अर्थात एका देशाला एकच नाव एकावेळी सुचवता येतं, नंतर दुसरा देश चक्रीवादळाला नाव देतो. हे नाव येमेननेसुचवलेलं आहे.मोचा नावामागची गोष्ट?
येमेनने या चक्रीवादळाचे नाव लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या 'मोचा' या बंदराच्या नावावरुन सुचवलं आहे. त्यामुळे या देशानं चक्रीवादळाला मोचा हे नाव दिलं आहे.

-------------------------------------------------------------------====================================================================
सा : राज प्रसारित...कार्यकारी...संपादक...भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन... वार्ता...
==================================
==================================
-------------------------------------------------------------------
























Saturday, May 6, 2023

दोन बुरखाधारी महिलांनी पावणेदोन तोळे सोने लांबविले सराफ बाजार श्रीरामपूर ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर शहरातील एका सराफाच्या दुकानात सोने खरेदी करत असल्याचे भासवत गेलेल्या दोन बुरखा भेशांतर केल्याले महिलांनी हात चलाखी दाखवत पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे शॉट गंठण चोरून नेले.शहरातील मे. पोपट उत्तम चापानेरकर या सराफ दुकानात अगोदर एक पुरुष व दोन महिला ग्राहक सोने खरेदी करत असताना त्याच्या शेजारी दोन बुरखा
घातलेल्या महिला सोने खरेदी करण्याच्या निदर्शन करुन त्यांच्या शेजारीच येवून थांबल्या. सोने घेवून बिल करण्यासाठी थांबलेल्या ग्राहकाच्या शेजारी या महिला सोने पाहण्याचे नाटक करत हातचलाखी करून काऊंटरवर असलेले (15.219) ग्रॅम वजनाचे शॉट गंठण लांबवत हळूहळू तेथून त्यांनी पोबारा केला.
सोने चोरी झाल्याचे समजताच शोधाशोध मोहीम केली. त्यानंतर याबाबतची माहिती दुकान मालकाने पोलिसांना सांगितली. त्यानंतर त्यांनी सीसी टीव्ही फुटेज तपासले असता दोन बुरखाधारी महिलांनी दुकानात प्रवेश करून सोने लांबविल्याचे दिसून आले. मात्र याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची घडल्याले चोरी गेले असल्याले प्रकरणा संदर्भ नोंद करण्यात आलेली नसल्याचे समजते


±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
=====================================
सा :राज प्रसारित...कार्यकारी संपादक...भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
=====================================
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±



















माहितीच्या अधिकारात उघड 450 बोगस टेस्ट तपासणी अहवाल कोट्यधिंची धनादेश देण्यात आले महापालिका अहमदनगर ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता - महापालिकेच्या बांधकाम विभागात 
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावे साडेचारशे खोटे टेस्ट रिपोर्ट व खोटे थर्ड पार्टी रिपोर्ट दाखल करून घेत त्याच्या आधारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची देयके काढल्याचा व यात मोठा भ्रष्टाचार (झाल्याचा आरोप शिवसेनेच्या चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी केला आहे.शेळके यांनी मनपाकडे 1 मार्च 2016 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीतील बांधकाम विभागाअंतर्गत सर्व कामांचे टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी रिपोर्टची मागणी केली होती. मनपाने 778 टेस्ट रिपोर्ट व 86 थर्ड पार्टी रिपोर्ट बांधकाम विभागाकडे (Construction Department) उपलब्ध असल्याची माहिती दिली. हे सर्व रिपोर्ट शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय यांच्याद्वारे प्रमाणित असलेले आहेत. तसेच, याच कालावधीतील टेस्ट रिपोर्टची माहिती
शेळके यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाकडे मागितली असता त्यांनी 329 टेस्ट रिपोर्ट दिले व एकही थर्ड पार्टी रिपोर्ट दिला नाही, असे स्पष्ट केले. यावरून नगर महापालिकेकडे (Ahmednagar Municipal Corporation) असलेले सर्व थर्ड पार्टी रिपोर्ट हे बनावट असल्याचे स्पष्ट होते. दोन्ही संस्थांकडील उपलब्ध माहितीनुसार सुमारे 449 टेस्ट रिपोर्ट खरे नसून खोटे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असा दावा शेळके यांनी केला आहे.मोठ्या प्रमाणात खोटे टेस्ट रिपोर्ट बांधकाम विभागात
दाखल होऊन त्या आधारे बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपयांची देयके अदा केली गेली आहेत. यातून मोठ्या
प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते. या सर्व गैर प्रकारची चौकशी करावी. जोपर्यंत सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत संबंधित कालावधीतील अधिकारी, अभियंते, कर्मचारी यांचा पगार तथा इतर देयके थांबवण्यात यावीत. सदर कालावधीतील कामांची ज्या ठेकेदार संस्थांना बिले दिलेली आहेत, त्यांची आताची सर्व देयके तातडीने थांबवावीत. सदर कालावधीतील बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी व संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई न केल्यास आयुक्तांविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशाराही श्री शेळके यांनी दिला आहे


-----------------------------------------------------
========================================================================सा : राज प्रसारित...कार्यकारी...संपादक...भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द... ✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
-----------------------------------------------------========================================================================

Wednesday, May 3, 2023

श्रीरामपुरात पत्याचा डाव लावून जुगार खेळणारे प्रतिष्टीतावर नासिक पोलिसांचा छापा अनेक जण रंगे हात पकडले ?


(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - विषेश - समाचार 

श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोडवरील जिल्हा बँकेसमोरील एका इमारतीत जुगार खेळणाऱ्या अड्डयावर नाशिक पोलीस महासंचालकांच्या पथकाने छापा टाकला. यात अनेक जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. यात काही प्रतिष्ठीत नामवंत मंडळींचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून या इमारतीत जुगार खेळला जात होता. येथे अनेक प्रतिष्ठीत मंडळी खेळण्यास येत होते. काल अचानक नाशिक पोलीस महासंचालकांच्या पथकाने छापा टाकला. त्यामुळे भेद्रापन थरकाप होऊन अनेकांची दाणादाण उडाली. आपल्यावर गुन्हा नोंदविण्यात येवू नये यासाठी या प्रतिष्ठीत मंडळींचा आणि त्यांच्या समर्थकांकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न ही करण्यात आलं अस्थांना व्यर्थ ठरलं
काहींनी वरच्या पातळीवरही प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पोलिसांकडूनही गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर होत होता. या इमारतीत अनेक दिवसांपासून जुगार खेळता जात होता. तरी स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही अस तर्क वितरक चर्चा नागरिकांकडून केली जात आहे.
-----------------------------------------------------========================================================================सा : राज प्रसारित... कार्यकारी... संपादक...भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द ✍️✅️🇮🇳... रचना...संकलन...वार्ता...
========================================================================----------------------------------------------------