श्रीरामपूर - प्रतिनिधि -वार्ता -
मराठमोळ्या मातीतील खेळ म्हणजे कबड्डी.भारतासह पाकिस्तान,बांगलादेश,श्रीलंका, इराण,जपान,थायलंड,दक्षिण कोरिया या आशियाई देशांमध्येही आता कबड्डी हा खेळ लोकप्रिय झाला आहे. कबड्डी खेळाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देण्याचं काम प्रो कबड्डीनं (PKL) केलं आहे. पीकेएलचा दहावा सिझन सुरू होणार आहे. दहाव्या सिझनसाठी युपी योद्धा संघाची बचाव फळीची भिस्त ही मराठमोळ्या कबड्डीपटू अजित पवारवर याच्यावर असणार आहे.
अजित पवार हा श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव गावचा आहे.
सुरुवातीला गावामध्ये यात्रेत कुस्ती हा खेळ खेळला जायचा. यात्रेमध्ये कुस्ती बघत बघत कुस्ती खेळणं सुरू केले.७ वीला असताना शाळेमध्ये कबड्डी खेळाचा सराव मुले करत असत. पवारने देखील कबड्डीचा सराव
करायला सुरुवात केली. सुरुवातीला खेळत असताना अनेक प्रकारच्या इजा देखील झाल्या.टी-शर्ट व शॉट घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे देखील नव्हते. मित्रांकडून पैसे घेऊन कबड्डी खेळण्यासाठी किट घेतले.त्याचे कबड्डी खेळणे त्याच्या आई- वडिलांना आवडत नसे,यासाठी त्याला लहानपणी कधी कधी मार खावा लागला.१० वी असताना त्याचा शाळेचे शिक्षकाने सांगितलं की टाकळीभान येथे आझाद क्रीडा मंडळ क्लब आहे,त्या क्लब मध्ये तू सरावासाठी जात जा.सन २०१४-१५ साली कबड्डी प्रशिक्षक श्री रवि गाढे यांचा आजाद क्रीडा मंडळ या क्लब कडून त्याने खेळायला सुरुवात केली व त्याच्या कबड्डी करिअरमध्ये यशाचा आलेख उंचावत गेला.
अजित पवारने २०१३-१४ पासून कबड्डी खेळायला सुरुवात केली. आझाद क्रीडा मंडळ या क्लब कडून खेळायला सुरुवात केल्यानंतर पवारने शालेय स्पर्धेत सहभाग घ्यायला सुरुवात केली.१६ वर्षे वयोगट व १९ वर्ष वयोगट या वयोगटात त्यांनी तालुका,जिल्हा,विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.सन २०१९ मध्ये प्रथमच तो राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरला.यानंतर त्याने मागे वळून बघितलंच नाही. व्यावसायिक,खाजगी स्पर्धेमध्ये सहभाग घेत अनेक स्पर्धेमध्ये त्याचा उत्कृष्ट बचाव पट्टू म्हणून सन्मान करण्यात आला.सन २०२२-२३ मध्ये ७० व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना दुसरा क्रमांक मिळाला.सन २०२२-२३ मध्ये पुन्हा त्याला महाराष्ट्र ऑलिंपिक कबड्डी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.सन २०२२-२३ जबलपूर येथे झालेल्या विद्यापीठ स्पर्धेमध्ये भारतीय विद्यापीठाचे त्यांने नेतृत्व केले.महाराष्ट्रात नव्हे तर देशातील विविध भागांमध्ये व्यवसायिक तसेच शासकीय स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला.या सुरेख कामगिरीवर महिंद्रा व महिंद्रा कंपनीने त्याला करारबद्ध केले आहे.शिर्डी,जळगांव,नाशिक,पुणे,मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध भागातील स्पर्धेमध्ये त्याला स्पर्धेचा उत्कृष्ट बचाव पट्टू म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सन २०२२-२३ मध्ये आयोजित झालेल्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा सिरीज कबड्डी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. अहमदनगर जिल्ह्याचे कर्णधारपद त्यांनी भूषवले आहे.६४ टाकल पॉईंट घेऊन तो स्पर्धेतील उत्कृष्ट बचावटू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.
आझाद क्रीडा मंडळामुळे यश
ग्रामीण भागामध्ये टाकळीभान गावी आझाद क्रीडा मंडळ हा कबड्डीचा एक नामांकित क्लब आहे.तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक भागांमधून मुले या ठिकाणी कबड्डीच्या सरावासाठी येतात.पवारने देखील याच क्लब मध्ये सराव करण्यास १० वर्षांपूर्वी सुरुवात केली. अनेक राष्ट्रीय,राज्य खेळाडून सोबत सराव करत त्याने आपला खेळ उंचावला.क्लबचे प्रशिक्षक रवी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक भागांमध्ये कबड्डी स्पर्धेत सहभागी झाला. जास्त स्पर्धा सहभागामुळे व्यावसायिक खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू,राष्ट्रीय खेळाडू यांच्याबरोबर खेळत असताना त्याचा खेळ उंचावला व सीजन १० साठी त्याची युपी योद्धा संघात प्रो कबड्डी लीग साठी निवड झाली.
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))