अंदोलक महिलांच्या साक्षीने तोडले ५ अनाधिकृत मुख्यवाहीनीचे कनेक्शन
भोकर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे पाटबंधारेच्या हेकेखोरपणामुळे एक महिन्यात दुसर्यांदा पाणी टंचाई सुरू झाली असून आमदार कानडेंच्या आदेशाला डावलत पाटबंधारे विभागाच्या सुरू असलेल्या दुर्लक्षीतपणामुळे गावातील नळपाणी पुरवठा योजना पुन्हा दिवसाआड झाल्याने गावात तीव्र पाणी टंचाई भासु लागली आहे. तर दुसरीकडे मुख्यवाहीनीला असलेल्या अनाधिकृत जोडणीमुळे या पाणी टंचाईत आणखी भर पडल्याने संतप्त महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर पुकारलेल्या ठिय्या अंदोलनानंतर ग्रामविकास अधिकारी सक्रीय होत संतप्त महिलांच्या साक्षीने अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्यास आरंभ करत सक्रीय झाल्याने आता सर्वसामान्यांच्या नळाला पाणी येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. या महिला मुख्य वाहीनेच अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्यासाठी दिड कीमी ग्रामविकास अधिकार्यांसमवेत होत्या.
भोकर गावास नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गावालगत असलेल्या गावतळ्याजवळील बारवेतून गावास पाणी पुरवठा केला जातो परंतू येथील बारव अचनक नादुरूस्त झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून येथील माजी उपसरपंच महेश पटारे व सोसायटीचे संचालक संजय पटारे या पटारे बंधूच्या विहीरीतून गावास पाणी पुरवठा सुरू आहे व या पटारे बंधुंना पर्यायी पाणी व्यवस्था म्हणून गावच्या चौकोणी बारवेतील बदली पाणी देण्यात आले आहे, अशा पद्धतीने येथील नळपाणी पुरवठा योजना सुरू आहे. हि योजना पुर्णत: गावालगत असलेल्या गावतळ्याच्या पाणी उद्भवावर अवलंबून आहे तर गावतळ्यात पाटबंधारेच्या वितरीकेद्वारे पाणी सोडले जाते.
गेल्या मे महिण्यात पाटबंधारे विभागाच्या वितरीका क्र.15 मधून गावास तीव्र पाणी टंचाई असताना व कालवा नियोजन समीतीचे सल्लागार असलेले आमदार लहु कानडे यांनी समक्ष गावात भेट देवून संबधीत कालवा निरीक्षकास सुचना करून ही सुमारे आठवड्यानंतर गावतळ्यात पाणी सोडले ते ही अपुर्या प्रमाणात दिल्याने एक महिण्यात गावतळ्याची पातळी खालवली अन् गेल्या सहा दिवसांपासून गावातील नळपाणी पुरवठा योजनेद्वारे दिवसाआड पाणी सोडले जात आहे.
आमदार लहु कानडे यांनी परीसरात पाऊस लांबल्यामुळे मे महिन्याच्या आवर्तनाला जोडूनच शेवटचे आवर्तन घेण्याचा आग्रह धरला त्यास मान्यता मिळत या परीसरातील कालवे पुन्हा वाहते झाले, त्याप्रमाणे गेल्या सहा दिवसांपासून येथील वितरीका क्र. १५' ही वाहती झाली, ग्रामपंचायतीने तातडीने पाटबंधारे विभागास गावतळ्यात पाण्याची नितांत गरज असल्याचे लेखी कळविले. त्याच बरोबर आमदार कानडे यांनी ही शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तातडीने भरून घेण्याच्या सुचना दिलेल्या असतानाही हेकेखोर पाटबंधारे विभागाने यावेळी ही या मागणीकडे व आमदारांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करत केवळ शेतीला प्राधान्य दिले जात असल्याने ग्रामस्थात नाराजीचा सुरू दिसत आहे.
तर दुसरीकडे याच पाणी टंचाईला सामोरे जात असलेल्या येथील इंंदिरानगर परीसरात टेलटँकहुन येणार्या पाण्याच्या मुख्यवाहीनीला अनेकांचे अनाधिकृत कनेक्शन असल्याने येथील माध्यमिक विद्यालय प्रांगणातील पाण्याची टाकीत पुरेसा पाणी साठा होत नसल्याने येथे ही तीव्र टंचाई भासत असल्यामुळे येथील महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर मोर्चाने येत ठिय्या अंदोलन पुकारत मुख्या वाहीनीचे अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्याचा हट्ट धरला. अर्थात या विषयावर अनेकदा ग्रामसभा गाजलेल्या असतानाही संबधीतांच्या दुर्लक्षीतपणामुळे अशा प्रकारे मुख्या वाहीनीला व इतरत्र अनाधिकृत कनेक्शनची संख्या मोठी असताना या विषयाकडे सर्वांचे दुर्लक्षच होते.
परंतू या महिलांचा हट्ट बघता येथील ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी प्रसंगावधान ओळखत तातडीने कारवाई सुरू केली. संवेदनशिल विषय असल्याने या महिलांनी दुपारी उशीरापर्यंत ग्रामविकास अधिकारी यांचा पिच्छा सोडलाच नाही. गावातील काही संघटनांच्या पदाधिकार्यांचे कनेक्शन तोडल्यानंतर या महिलांचा मोर्चा व ग्रामपंचायतीचा लवाजमा टेलटँककडे राजेंद्र वाकडे यांचे वस्तीपर्यंतची पाहणी करत अनाधिकृत कनेक्शन तोडणी केली. यात काही माजी पदाधिकारी व काही संघटनांचे पदाधिकार्याच्या कनेक्शनचा समावेश असल्याचे समजते.
आता आज उर्वरीत मुख्यवाहीनीचे अनाधिकगत तसेच गावातील इतर अनाधिकृत कनेक्शन तोडणीची कारवाई करत अधिकृत नळकेनक्शन धारकांना पुरेश्या दाबाने पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ज्यांचे कनेक्शन अनाधिकृत व मुख्य वाहीणीला होते त्यांना सक्त सुचना करत त्यांचेकडून नियमानुसार अनामत भरणा घेवून त्यांना उपवाहीनीला कनेक्शन दिले जाणार आहे. दरम्यानच्या काळात जर पुन्हा अशाच प्रकारे अनाधिकृत कनेक्शन जोडणी झाल्यास प्रसंगी पंचनामा करून संबधीतांविरूद्ध सार्वजनीक मालमत्तेच नुकसान केल्याची तक्रार पोलीसांत करण्यात येवून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे या वेळी ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी सांगीतले.
दरम्यान या कारवाई दरम्यान अनेकांनी काही पदाधिकार्यांना संपर्क करत नळतोडणीस विरोध केला परंतू त्यास ग्रामविकास अधिकार्यांनी दाद न देता सर्वांप्रमाणे उपवाहीनीला प्राधान्याने कनेक्शन देण्याचे आश्वासन देत कारवाई सुरूच ठेवली. त्यातच येथे सध्या प्रशासकीय सरपंच राज असल्याने आता कुणाचा वशीला लावायचा हा मोठा प्रश्न काहींना पडलेला दिसला तर दुसरीकडे पाणी टंचाईने त्रस्त नागरीकांनी ग्रामविकास अधिकार्यांच्या या कारवाईचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
या ठिय्या अंदोलनात येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष डूकरे यांच्या पत्नी सौ. ज्योती डूकरे, अलका डूकरे, पुजा डूकरे, सरीता डूकरे, अर्चना डूकरे, कमल डूकरे, हिराबाई डूकरे, सोनाली डूकरे, बेबी डूकरे, सुनिता डूकरे, दिपाली शिंदे, अलका शिंदे आदि महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, सतीष पवार, सुनिल साळवे, नामदेव वाकडे, गोरख डूकरे, अशोक डूकरे, किरण डूकरे, सुकदेव गायकवाड, सुदाम शिंदे, संतोष गायकवाड, संजय डूकरे, बाळू डूकरे, बबन डूकरे आदि उपस्थीत होते.
((( वृत्तसंकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111