राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, July 2, 2023

फ्रान्स पेटला! वाहतुकीचा नियम मोडला म्हणून अल्पवयीनावर पोलिसांनी गोळी झाडली, निषेध व्यक्त...

( देश विदेश )

Ani - News -Ejancy - गेल्या पाच दिवसांपासून फ्रान्समध्ये (France) सतत हिंसाचार सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये एका किशोरवयीन तरुणाची पोलिसांनी (France Police) गोळ्या झाडून हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ करत फ्रान्समध्ये दंगली घडवल्या आहेत. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या वापर केला जात आहे. या आंदोलनातून 875 जणांना अटक करण्यात आली असून या संघर्षात 200 पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.

फ्रान्समधील या गंभीर परिस्थितीमध्ये युरोपियन डॉक्टर आणि प्रोफेसर एन जॉन कॅम यांनी भारताकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना दंगलीची परिस्थिती हाताळण्यासाठी पाठवण्याची मागणी केली आहे. 'फ्रान्समधील दंगलीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारताने योगी आदित्यनाथ यांना पाठवले पाहिजे, ते 24 तासांत सर्व काही ठीक करतील, असे प्रोफेसर एन जॉन कॅम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


Saturday, July 1, 2023

प्रभावीपणे शासकीय योजनांची अधिकाऱ्यांनी अधिक अंमलबजावणी करून लोकाभिमुख करावीत कामे

शासन आपल्या दारी उपक्रम गाव-गावात राबवा - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
शासन सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेकविध लोकोपयोगी योजना राबवते. याचा लाभ तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून अधिकाऱ्यांनी अधिक लोकाभिमुख कामे करावीत. तसेच शासन आपल्या दारी उपक्रम गावा-गावात राबविण्यात यावा, अश्या सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. सहकार भवन येथे अहमदनगर तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जलजीवन मिशन योजना संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी आपल्या जिल्ह्याला ४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ज्या गावात कामे सुरू आहेत त्या प्रत्येक गावास अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट द्यावी. कामांमध्ये असलेल्या अडचणी व त्रुटी गावकऱ्यांशी संवाद साधून दूर कराव्यात व याबाबतचा अहवाल १५ जुलैपर्यंत सादर करावा. कामाच्या ठिकाणी प्रत्येक गावात नागरिकांच्या माहितीसाठी योजनांची माहिती असलेले फलक बसविण्यात यावेत. तसेच ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी रस्त्याच्या मधून पाईपलाईन टाकल्याने रस्ते खराब झाले असतील ते रस्ते तातडीने दुरुस्त करून घेण्यात यावेत. योजनेअंतर्गतची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री विखे-पाटील यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील जनतेला योग्य दाबाने व अखंडितपणे विजेचा पुरवठा होण्यासाठी शासनामार्फत विद्युत विकासावरही भर देण्यात येत आहे. ज्या भागात उच्च दाबामुळे रोहित्रावर ताण येऊन वीज वितरणामध्ये अडचणी निर्माण होत आहेत अशा ठिकाणची माहिती संकलित करून प्रस्ताव सादर करण्यात यावा. नवीन रोहित्रांसाठीच्या उभारणीसाठी आवश्यक निधी देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विजेची वाढती मागणी लक्षात घेता सौरऊर्जा निर्मितीवर भर देण्यात येत आहे. शासकीय जमिनी तसेच खासगी जमिनीवर प्रकल्प उभारणीसाठी जमीन मालकाला मोबदला देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विजेच्या मागणीमधील किमान ४ हजार मेगावॅटची गरज भागेल यादृष्टीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी दिल्या.
जमीन मोजणीसंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. जमीन मोजणी वेळेत होऊन नागरिकांना नकाशे मिळावेत यासाठी शासनाने रोव्हर तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या तंत्रज्ञानाचा वापर करत मोजणीही करण्यात येत असून जिल्ह्यात मोजणीची प्रलंबित असलेली प्रकरणे येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी मोजणीसाठी अर्ज केल्यास १५ दिवसांमध्ये मोजणी होऊन नागरिकांना ऑनलाईन नकाशे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री विखे- पाटील यांनी यावेळी दिल्या.
सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे शासन आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाला महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून पाच लक्ष रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेणारे देशातील एकमेव असे आपले राज्य आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये पीकविमा देण्याचाही निर्णय शासनाने घेतला असून येत्या काळात पशुधनाला एक रुपयांमध्ये विमाकवच, गुंठेवारी, तुकडेबंदी तसेच शासकीय बांधकामांना वाळू ऐवजी क्रशसॅण्ड वापरण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.
हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत शेती व्यवस्था मजबूत करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. देशाची आर्थिक क्षमता वाढविण्यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान. देशातील जनतेला मोफत धान्य वितरण केवळ शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यामुळेच शक्य झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले म्हणाले, अहमदनगर तालुका हा दुग्धव्यवसाय करणारा तालुका आहे. पशुपालकांना व्यवस्थितपणे त्यांचा व्यवसाय करता यावा यासाठी वीज वितरण प्रणाली सुरळीत व्हावी. शेतीमध्ये जाणाऱ्या रस्त्यांचे प्रश्न आहेत ते तातडीने सोडविण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पीकस्पर्धेत यशस्वी शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र तसेच शेतकऱ्यांना बियाण्यांचेही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी शासन योजना अधिक गतीने व पारदर्शकपणे राबविण्याच्या सूचना केल्या.
सर्वप्रथम स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.

संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी जिल्‍ह्यातील देण्‍याचा राज्‍यातील पहिला अभिनव उपक्रम - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

अहमदनगर -  जिल्हा - माहिती - कार्यालय - वृत्तसेवा:

देशाचा खऱ्या अर्थाने विकास साधावयाचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. गावे स्वच्छ व्हावीत, स्वयंपूर्ण व्हावीत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या संकल्‍पनेला अधिक गती देण्यासाठी ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींना विद्युत घंटागाडी वितरणाचा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम राज्यातील पहिला अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत स्वचछ भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी व वाहतुकीसाठी तीन चाकी विद्युत घंटागाड्यांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, राहुल शेळके, सेवानिवृत्‍त उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच गावांच्या सर्वांगिण विकासावर शासनाचा भर देण्‍याचा प्रयत्‍न आहे. ग्रामीण भागातील जनतेला स्‍वच्‍छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत आपल्या जिल्ह्यासाठी ४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या निधीतून पिण्‍यासाठी स्‍वच्‍छ पाणी पुरवठ्याची कामे करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गावातील गावक-यांच्‍या विविध समस्या सोडवून गावाचा विकास साधण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात यावेत. राज्यातील प्रत्येक बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार निर्मितीवर शासन भर देत आहे. जिल्हा परिषदेमार्फत वितरित करण्यात आलेल्या विद्युत घंटागाड्या आपल्या अहमदनगर येथील एम आय डी सी तील उद्योग समुहात तयार झाल्या असून ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ. सुजय विखे-पाटील म्हणाले की, लोकसंख्या वाढीमुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील कचऱ्याच्या संकलनासाठी विद्युत घंटागाड्यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. विद्युत घंटागाड्या असल्याने पेट्रोल व डिझेलचा खर्च वाचून गावाची स्वछता होणार आहे.
देशात मेक इन इंडिया संकल्‍पनेप्रमाणे विद्युत घंटागाड्यांची अहमदगनरमध्‍ये निर्मिती करण्‍यात आल्‍याने मेक इन अहमदनगर असे म्‍हणायला हरकत नसल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले. अशा प्रकाराच्‍या घंटागाड्या जिल्‍ह्यातील सर्व ग्रामपंचातींना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी जिल्‍हा नियोजन समितीतुन निधीची तरतुद करण्‍यात येईल. जिल्‍ह्यातील गावे सक्षम करण्‍यासाठी, बचत गटांना स्‍टॉल, जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेच्‍या खोल्‍या बांधकाम या कामांसाठी मागील वर्षात निधी उपलब्‍ध करुन दिलेला आहे. विद्यमान सरकार हे जनतेच्‍या हिताचे सरकार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्‍या सुरवातीला जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आपल्‍या प्रास्‍ताविकात म्‍हणाले की, स्‍वच्‍छ भारत मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतींना पुढे येण्‍याची गरज असून कचरामुक्‍त गाव ही संकल्‍पना राबविणे आवश्‍यक आहे. स्‍वच्‍छतेची चळवळ गावात या माध्‍यमातुन उभी राहिली पाहिजे. जिल्‍ह्यातील इतर ग्रामपंचायतींना कचरा संकलन व वाहतुकीसाठी तीन चाकी विद्युत घंटागाड्या टप्‍प्‍याटप्‍प्‍याने उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सां‍गितले.

===================
75 विद्युत घंटागाड्यांचे वाट
===================

14 व्‍या वित्‍त आयोग योजनेअंतर्गत जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमातुन एकुण 177 विद्युत घंटागाड्या खरेदी करण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यापैकी 75 विद्युत घंटागाड्यांचे पालकमंत्र्यांच्‍या हस्‍ते वितरण करण्‍यात आले. यामध्‍ये राहुरी तालुक्‍यासाठी 10, शेवगांव 8, पाथर्डी 10, जामखेड 4, कर्जत 8, श्रीगोंदा 12, पारनेर 10 तर अहमदनगर तालुक्‍यासाठी 13 घंटागाड्यांचे वितरण करण्‍यात आले.

        ((( संकलन )))
     समता न्यूज नेटवर्क 
 श्रीरामपूर - 9561174111

देशदुत जीवन संजीवन गौरव सोहळा नाशिक मध्ये संपन्न

१) प्रास्ताविक करताना 'देशदूत'च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले.
२) अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा सत्कार करताना
'देशदूत' वृत्तसमूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा,
३) मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,
४) आयव्होक ऑप्टिकल अॅण्ड विजन केअरचे संचालक कर्नेलसिंग भट्टी यांचा सत्कार करताना 'देशदूत' वृत्तसमूहाचे अध्यक्ष विक्रम सारखा.
५) ऋणनिर्देश करताना जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक अमोल घावरे,
६) मनोरंजन करताना प्रसिध्द रॉक बैंड ऑर्केस्ट्राचा संच.
७) सत्कारार्थीच्या वतीने मनोगत व्यक्त करताना प्रसिद्ध अस्थितज्ज्ञ डॉ. विजय काळतकर,

((( संकलन )))
सौजन्ये उत्त सेवा
देशदूत नेटवर्क नाशिक 

रस्त्याचे कामकाज साठी आणलेल्या सिमेंट नळ्या ब्राम्हणगाव - येसगावगायब परिसरातिल गायब ?

कोपरगाव - प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्यातील ब्राम्हणगाव ते येसगाव या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेकेदारांनी घेतले मात्र गोदावरी डाव्या कालव्याजवळील नंबर २६२ मधील ९ शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होऊनही संबंधित यंत्रणेच्या भोंगळ आणि बेजबाबदारपणामुळे रस्ता कामासाठी आणून ठेवलेल्या नळ्या ठेकेदारांनी उचलून नेल्या. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचेउपअभियंता श्री. शिंदे यांना सांगूनही कामाकडे दुर्लक्ष होत आहे. तेव्हा या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले नाही तर उपोषण करू, असा इशारा सुभाष शामराव गाडे यांच्यासह ९ शेतकऱ्यांनी दिला आहे.कामात गोदावरी डाव्या ते म्हणाले, ब्राह्मणगाव येसगाव रस्त्याचे ठेकेदारांनी काम २०१७ मध्ये घेतले होते. सदर रस्ता कालव्याजवळ पूर्वी सिमेंट नळ्या होत्या. मात्र त्याचा अडसर होता म्हणून त्यांनी त्या काढल्या. २२ सप्टेंबर २०२० रोजी अचानक अती पावसामुळे सुभाष शामराव गाडे, पुंडलिक शामराव गाडे, बाळासाहेब एकनाथ हुळेकर,नामदेव अण्णासाहेब बुहाडे, योगेश सोमनाथ नागरे, कोल्हे पाटील, पांडुरंग महिपत वाबळे, शेखर बोरावके, धोंडीराम महिपत वाबळे या शेतकऱ्यांचे कपाशी, मका, सोयाबीन, भाजीपाला आदी पिकांत गुडघ्याच्यावर पाणी साठले होते. पाणी जाण्यास पर्यायी मार्ग नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतरही सतत पाऊस होऊन या सर्व शेतकऱ्यांना पिकात साठणाऱ्या पाण्याची डोकेदुखी निर्माण झाली. याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. याठिकाणी सिमेंटच्या नळ्या टाकल्या पण त्याचे कामच केले नाही. पाच वर्षांपासून संबंधित अधिकारी करतो, बघतो, आज होईल, नक्की होईल, तुम्ही आमदार खासदारांकडे जाऊ नका अशी साचेबध्द थातूरमातूर उत्तरे देऊन आम्हा शेतकऱ्यांची बोळवण चालू ठेवली आहे. २४ सप्टेंबर २०२० व त्यानंतर वेळोवेळी याबाबत संबंधित खात्याचे मंत्री व जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत निवेदने दिली होती. सिमेंट नळ्या ठेकेदाराने उचलून नेल्या. त्याबाबत कोपरगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. शिंदे तसेच त्यांचे सहकारी श्री. गाडे यांना भ्रमणध्वनीवर तक्रार करूनही या कामाकडे ते सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. नळ्या न टाकल्यामुळे वारंवार पावसाळ्यात साठणारे पाणी जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांचे शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. तीन पावसाळे पूर्ण झाले आता चौथा पावसाळा आला तरी हे काम अर्धवट स्थितीतच पडले आहे. तेव्हा हे काम तातडीने पूर्ण झालेनाही तर उपोषण करू, सहनशीलतेचा अंत आता संपला आहे, असा इशारा या सर्व शेतकरी बांधवांनी दिला आहे.

===================================
---------------------------------------------------
: - सह संपादक रंजित बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================










महाराष्ट्र सुरक्षा बलाच कवच; ७४ जवानांची तुकडी दाखल साई मंदिराला शिर्डी...

शिर्डी - प्रतिनिधि - वार्ता -
आंतराष्ट्रीय ख्याती असलेल्या साईसमाधी मंदिराला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर विशेष सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक तैनात असणार आहे. शिर्डीत दिवसेंदिवस भाविकांची वाढती गर्दी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी होणारी दमछाक हे साई संस्थान सुरक्षेला व पोलीस सुरक्षा यंत्रणेला मोठं आव्हान होतं, तसेच मंदिराच्या पाचही गेटवर दररोज काहींना काही वाद होत होते तर विनापास प्रवेश करून अनेकजन भाविकांचे फुकट दर्शन घडवून स्वतःचा आर्थिक फायदा घेत होते. याचे वाढते प्रमाण व त्यामाध्यमातून वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण ठेवणे संस्थानला मोठे कठीण जात होते.
त्यातच साई संस्थानने गेट नं. ३ हे शिर्डी ग्रामस्थांसाठी दररोज दर्शनासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले होते, मात्र त्याठिकानीही ग्रामस्थांच्या नावाखाली अनेक लोक फुकटच्या दर्शनाचा लाभ घेत होते. तर ओळखपत्र हे फक्त नावालाच होते. त्यामुळे त्या गेटवर अनेक एजंट हे भाविकांकडून अव्वाच्या सव्वा भावात दर्शनाची सेटिंग करून प्रवेश देत होते. यावरून अनेकवेळा गेट नं. ३ वर बाचाबाची, हाणामाऱ्या झाल्याच्या घटना ताज्या आहेत. मात्र आता महाराष्ट्र राज्याची अग्रगण्य अशी महाराष्ट्र सुरक्षा बल ह्या यंत्रणेची नियुक्ती साई संस्थानने केली असून त्यासाठी करारही करण्यात आला आहे.
याची अंमलबजावणी २ जुलै अर्थात गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर केली जाणार असून सुरुवातीला ह्या विशेष पोलीस सुरक्षा बलाचे ७४ जवान शनिवारी दाखल झाले असून त्यांनी शनिवारी साईसमाधी मंदिर, मंदिर परिसर, दर्शनरांग, पाचही गेट याची सखोल पाहणी केली आहे. ही सुरक्षा यंत्रणा सुरक्षेचे घालून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळत असते त्यामुळे अनेकांनी याची धास्ती घेतली असून कामाशिवाय, ओळखपत्राशिवाय, विणापास, तसेच पाहुणे, मित्र यांना प्रवेश देणार नाही. या विशेष सुरक्षा यंत्रणेच भाविकांनी स्वागत केलं असून यापूर्वी मंदिर व मंदिर परिसरात चालत आलेले गैरप्रकारावर आता आळा बसणार आहे.

====================================
-----------------------------------------------------
: - कार्य संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द... ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================


संघर्ष ग्रुपतर्फे सत्कारस संपन्न डॉ.बाबुराव उपाध्ये यांना साहित्यभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल - श्रीरामपूर

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांना साहित्यभूषण पुरस्कार - 2023 मिळाल्याबद्दल संघर्ष (ग्रुप) वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य सचिव सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते शिरसगाव इंदिरानगरमधील वाचन संस्कृती वाचनालयात सत्कार करण्यात आला.
  श्रीरामपूर येथील भीम पॅन्थर सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकोण पन्नासव्या जयंतीनिमित्त विविधक्षेत्रात सेवाभावाने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, त्यामध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथनिर्मिती,ग्रन्थप्रसार, मोफत वाचन चळवळ, उपक्रम करणारे डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा साहित्यभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता, या पुरस्कारप्राप्तीबद्दल संघर्ष ग्रुपतर्फे शाल, बुके, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कडा येथील संघर्ष राज्यग्रुप सचिव सुभाषराव देशमुख,सदस्य दत्तात्रय देशमुख, सौ.अनिताताई देशमुख, सौ. कमलताई देशमुख,सौ.गीतांजली गाढे, सौ. मंदाकिनी उपाध्ये, श्रीमती सुमनबाई मांढरे, गणेशानंद उपाध्ये, सौ. आरती उपाध्ये आदी उपस्थित होते.
  डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सुभाषराव देशमुख आणि उपस्थित पाहुण्यांचा 'मातृपितृ देवोभव', 'बाबुराव पासष्टी 'आदी पुस्तके देऊन प्रतिष्ठानतर्फे सत्कार केले.सुभाषराव देशमुख म्हणाले,डॉ. बाबुराव उपाध्ये यांची विविध वाड्.मयीन प्रकारात पन्नास पुस्तके प्रकाशित असून त्यांना विविध संस्थेचे साठ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कडा येथील श्रीराम वाचनालयासाठी त्यांनी अनेक पुस्तके भेट दिली. माऊली वाचनालयासाठी कपाटभर पुस्तके दिली, अनेक व्यक्ती, संस्थेला त्यांनी हजारो पुस्तके दिली आहेत.अशा साहित्यतपस्वी डॉ. उपाध्ये यांना साहित्यभूषण पुरस्कार देणारे भीम पॅन्थर सामाजिक संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष शिवाजीराव गांगुर्डे,प्रदेश महासचिव कादिर अन्वर खान उर्फ राज खान, उत्तरनगर जिल्हाध्यक्ष नानासाहेब यादव शिंदे,उपक्रम संयोजक पत्रकार राजेंद्र देसाई यांच्या उपक्रमाविषयी सुभाषराव देशमुख यांनी विशेष कौतुक केले,कारण असे पुरस्कार व्यक्तीसत्कार्याला प्रेरक ठरतात.यावेळी सौ. गीतांजली गाढे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे अभिनंदन करून पुस्तके देऊन पाहुण्यांचा असा सन्मान करणे ही त्यांची वाचनसंस्कृती आजच्या स्थितीत रुजली पाहिजे, असे सांगून त्यांनी आम्ही आमच्या नातवांना पुस्तके देतो, ते वाचनप्रेमी झाले आहेत.वाढदिवस, विवाह, वास्तूशांती असे उपक्रम हॆ पुस्तक भेटीने गौरवीत केले तरच उद्याची पुढी ग्रन्थप्रेमी होईल, असे सांगितले.उपस्थित मान्यवरांनी डॉ. उपाध्ये परिवाराचे अभिनंदन केले.सौ. आरती उपाध्ये यांनी आभार मानले 

समता
न्यूज नेटवर्क,
       श्रीरामपूर - 9561174111