राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, September 7, 2023

अहमदनगर मध्ये दैनिक जलभूमीचे विभागीय कार्यालय सुरु...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहमदनगर-प्रतिनिधि-वार्ता

गेल्या दोन वर्षांपासून नियमिततेचे सातत्य टिकवत दैनिक जलभूमी ने वाचकांची मने जिंकली आहे, दैनिक जलभूमी ची वाढती लोकप्रियता तथा वाचक संख्या बघता दैनिक जलभूमी ने आपला विस्तार वाढवत अहमदनगर शहरात विभागीय कार्यालयाची सुरुवात केली आहे,
सदरील कार्यालय शहरातील मुकुंदनगरमधील राजकोट चाळ, दर्गाह दायरा रोडवर असुन दहीहंडीच्या शुभ मुहूर्तावर काल बुधवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी दैनिक जलभूमी अहमदनगर कार्यालयाचे उद्घाटन इंजि. अर्शद शेख आणि दै.जलभूमीचे प्रमुख संपादक बाळासाहेब जाधव, उपसंपादक जी. एन. शेख, पत्रकार भैय्यासाहेब बाॅक्सर यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा माजी नगरसेवक मुद्दस्सर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जहागिरदार एन्टरप्राजेसचे साजिद जहागिरदार, दिशान शेख, अब्दुल्ला कुरेशी यांच्या सह 
शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती.
 शेवटी अहमदनगर विभागीय कार्यालयाचे मुख्य उपसंपादक ॲड. शेख सलमान जहागिरदार यांनी आभार मानले.

===================================----------------------------------------------------
*सहयोगी:* 
जी.एन.शेख - अहमदनगर 
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
===================================
---------------------------------------------------

Saturday, September 2, 2023

सकल मराठा समाजाचेे प्रांताधिकार्‍यांना निवेदन जालना येथील लाठीमाराच्या घटनेचा श्रीरामपुरात जाहीर निषेध....

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

 अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या जालना जिल्ह्यातील आंदोलनात पुरुष, महिला व लहान मुले सहभागी असताना त्यांच्यावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा तसेच गोळीबाराचा श्रीरामपुरात सकल मराठा समाजाने जाहीर निषेध करत आंदोलन केले. या निषेधार्थ आज रविवार दि.3 सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहर व तालुका बंदची पुकारन्यात आले आहे.

  मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना अचानक 2 हजार पोलीस फोर्स पूर्वनियोजित आंदोलकांवर लाठी हल्ला केला. महिलांना मारहाण केली. लहान मुलांना बंदुकीच्या छर्‍याने जखमी केले. 120 पेक्षा जास्त आंदोलकांना रुग्णालयात ऍडमिट होईपर्यंत मारहान केली. त्यामुळे या हल्ल्याची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी. तसेच याबाबत सकल मराठा समाजाच्यावतीने श्रीरामपूर येथे प्रांताधिकारी व तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, शांततेच्या मार्गाने सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट करा किंवा जालना घटनेची जबादारी घेऊन आपण तिन चाकी सरकार बरखास्त करा. अशी मागणी करण्यात आली.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी श्रीरामपूर आगाराने एसटी बसेस बंद केल्या होत्या. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातून शाळा, कॉलेजमध्ये आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींची घरी जाण्याची गैरसोय झाली होती. म्हणून सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आगारात जाऊन बसेस सुरू ठेवण्याची विनंती केली. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव बस सुरू करण्यास आगार प्रमुख कुटे यांनी असमर्थता दाखवली.त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बसेस सोडण्यात आल्या पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना पाचारण केले.

=================================
=================================
: - सह,संपादक - रंजित बतरा - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================








Tuesday, August 29, 2023

शिर्डीच्या हवालदारावर गुन्हा दाखल पोलीस निरीक्षकासाठी लाचेची मागणी....

शिर्डी - प्रतिनिधि - वार्ता -

पोलीस निरीक्षकासाठी एक ते दीड लाख रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी शिर्डीतील पोलिस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंगाच्या गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी तसेच तडीपार व एमपीडीए अन्वये कारवाई न करण्यासाठी
 पोलीस निरीक्षकासाठी एक ते दीड लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली व त्यानंतर दि 26 जुलै रोजी आरोपी पोलीस हवालदार संदीप गडाख यांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. म्हणून शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संदीप गडाख (वय 40) याचे विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर तसेच कारवाईमध्ये नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैशाली पाटील, पोलीस नाईक शरद हेंबाडे, पोलीस नाईक राजेंद्र गीते, चालक पोलीस नाईक परशुराम जाधव यांचा समावेश होता. या घटनेने मात्र पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तसेच लातूरचा प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक माधव रेड्डी पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

===================================----------------------------------------------------
: - सह, संपादक - रंजित बतरा - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================












Monday, August 28, 2023

*अशोक कॉलेज ऑफ फार्मसी' चा उद्घाटन सोहळा संपन्न**औषध निर्माण शास्त्र क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या विविध संधी; माजी आ. मुरकुटे*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

तांत्रिक शिक्षणासाठी ओ.बी.सी., अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींसाठी शासनाच्या शिष्यवृत्ती आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्याने घेतला पाहिजे आणि कालसुसंगत असे तांत्रिक शिक्षण घेतले पाहिजे. अशोक फार्मसी महाविद्यालयामुळे आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले आहे. औषध निर्माण शास्त्र क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तांत्रक शिक्षणास प्राधान्य द्यावे, असे आवाहन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. 
       तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना संलग्न अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ‘अशोक कॉलेज ऑफ फार्मसी’ चा उद्घाटन सोहळा माजी आमदार श्री.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री.अमोल न्यायनित, सहाय्यक संचालक (तांत्रिक) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ.मंजुश्री मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, सुरेश गलांडे, हिम्मतराव धुमाळ, नाना पाटील, ज्ञानेश्वर काळे, विरेश गलांडे, सौ.शितलताई गवारे, हरीदास वेताळ, अ‍ॅड.सुभाष चौधरी, मयुर पटारे, भाऊसाहेब दोंड, संतोष देवकर, संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे, अशोक महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य सौ. सुनिता गायकवाड, अशोक पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापु शिंदे, अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख, अशोक इंग्लिश मिडीयमचे प्राचार्य संपत देसाई आदी उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तांत्रिक शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक श्री.अमोल न्यायनित म्हणाले की, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेने सुरु केलेले फार्मसी महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती शासनाकडून दिल्या जातात. त्याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती करुन घेतली पाहिजे. तांत्रिक कोर्सेससाठी ओ.बी.सी. प्रवर्गाला ५० टक्के तर अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व भटक्या विमुक्त जमातींसाठी १००  टक्के शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना माफक दरात शिक्षण घेता येते. अशी माहिती श्री.न्यायनित यांनी दिली.
            प्रास्ताविकात संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालिचा आढावा घेतला. तसेच अशोक कॉलेज ऑफ फार्मसीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची औषध निर्माण शास्त्रात शिक्षणाची गरज पूर्ण झाली आहे. यावर्षी डि.फार्मसी सुरु करण्यात येणार असून पुढील टप्प्यात बी.फार्मसीही चालु करण्यात येणार आहे. अशोक कॉलेज ऑफ फार्मसीमुळे अशोक शिक्षण संस्थेच्या वैभवात भर पडली आहे. अशोक शैक्षणिक संकुलात आपल्या परिसरातील तसेच नेवासा, राहुरी आदी भागातील ३ हजार ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशोक शिक्षण संस्थेचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्षात रुपांतर झाल्याचे त्या म्हणाल्या. प्राचार्य अंजाबापु शिंदे यांनी फार्मसी महाविद्यालयाबाबत सविस्तर माहिती दिली. सहसचिव भास्कर खंडागळे यांनी स्वागत केले. तर प्रा.अरुण कडू यांनी अतिथी परिचय करुन दिला. प्राध्यापक महेश नवपुते यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सुचनेस प्रा.मोहित गायकवाड यांनी अनुमोदन दिले. तर प्रा.रामेश्वर पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दत्तात्रय झुराळे यांनी केले. यावेळी कारखान्याचे सभासद, विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*
---------------------------------------------------
===================================

*श्रीरामपूरच्या जडणघडणीत व्यापाऱ्यांचा**मोठा वाटा - डॉ.वंदनाताई मुरकुटे**व्यापारी असोसिएशनच्या* *नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

श्रीरामपूरच्या शहराच्या जडण घडणीमध्ये श्रीरामपूरच्या व्यापारी बांधवांचे मोठे योगदान आहे. श्रीरामपूर शहर हे व्यापाऱ्यांनी नावारूपास आणले असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी केले.
श्रीरामपूर मर्चन्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित
संचालकांचा सत्कार श्रीरामपूर येथे मुरकुटे यांच्या निवासस्थानी करण्यात आला. त्याप्रसंगी त्या
बोलत होत्या.
यावेळी बोलताना डॉ .मुरकुटे म्हणाल्या की,आपल्या व्यापाराबरोबरच सामाजिक, धार्मिक तसेच करोना काळात काम करून आपले सामाजिक दायित्वत जोपासण्याचे काम इथे व्यापारी बांधव करत असतात.येथील व्यापाऱ्यांनी
श्रीरामपूर शहराचे वैभव जपले असून श्रीरामपूरच्या प्रगती व विकासामध्ये व्यापारी बंधूंचा मोठा वाटा असल्याचे डॉ..मुरकुटे म्हणाल्या.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले, शहर व ग्रामीण भागाची नाळ व्यापारी बांधवांबरोबर जोडली गेली असून व्यापारी बांधव हे तालुक्याच्या व शहराच्या भरभराटीसाठी मोठे योगदान देत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रा .किसनराव वमने म्हणाले की, व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार मुरकुटे कुटुंबाच्या वतीने करण्यात आला असून ही व्यापाराच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट आहे 
या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे नवनिर्वाचित संचालक गौतम उपाध्ये, अनिल लुल्ला, निलेश नागले, संजय कासलीवाल, धर्मेश शहा यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यावेळी किसनराव वमने,भागवतराव मुठे, बाळूशेठ खाबिया, नंदू कोठारी, जगन्नाथ नागले , कैलास शिंदे, नितीन नागले आदी उपास्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी तर आभार भागवतराव मुठे यांनी मानले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*हरेगाव येथील घटना धक्कादायक* *व निंदनीय; माजी आ. मुरकुटे*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

तालुक्यातील हरेगाव येथील चोरीच्या संशयातून चार मुलांना अमानुषपणे झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याची घटना धक्कादायक व निंदनीय आहे. या घटनेचा भारत राष्ट्र समितीच्या वतीने निषेध करण्यात येत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केली आहे. 
             यासंदर्भात बोलताना श्री. मुरकुटे म्हणाले की, हरेगाव येथे किरकोळ चोरीच्या संशयावरुन चार अनुसुचित जातीच्या मुलांना सहा व्यक्तींनी मारहाण केल्याचे समजले. सदरची घटना ही मानवतेला काळिमा फासणारी आहे. अशा तऱ्हेने मुलांना झाडाला उलटे टांगून मारहाण करणे निंदनीय आहे. आजच्या काळात अशी घटना घडणे हे संतापजनक आहे. तसेच सामाजिक असंतोष निर्माण करणारी आहे. 
            या घटनेचा भारत राष्ट्र समिती निषेध करीत आहे. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री.मुरकुटे यांनी केली आहे.

===================================
---------------------------------------------------
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*
---------------------------------------------------
===================================

दोघांना गुणे अन्व्हेशन विभाग LCB ने केले गजाआड हरेगाव मारहाण प्रकरण......


अहमदनगर - प्रतिनिधि - वार्ता 

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे संशयस्पद प्रकरणात युवकांना मारहाण प्रकरणी दोघांना एलसीबीने अटक केली आहे. युवराज नानासाहेब गलांडे (वय ३६) व मनोज वसंत बोडखे असे त्यांची नाव असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीने ही कारवाई केली.

दरम्यान गुरुवारी घडलेली या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वातावरण तणावपूर्ण वाढले होते . या घटनेच्या निषेधार्थ हरेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दोन दिवसांत या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यावे, अन्यथा मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय श्रीरामपूर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.सदर प्रकरणाची माहिती ची बातमी कळताच महसूल मंत्री ना.विखे पाटील यांनी तात्काळ पाहणी करून सदर घडल्याले घटने चा आढावा घेऊन सम्माधित पोलिस प्रशासन ला आरोपीवर कडक कारवाई करण्याचे  आदेश दिले....

तालुक्यातील हरेगाव येथील कुणाल मगर, शुभम माघाडे, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे यांना हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती. सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ काल हरेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यातील आरोपींना दोन दिवसात अटक करुन त्यांच्यावरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. सुमारे तासभर चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे नेवासा रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली होती. वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रंगाची थप्पी लागली होती.

===================================
---------------------------------------------------
: - सह,संपादक - रंजित बतरा - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------