राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, September 10, 2023

*मास्टर सरवरअली * सय्यद यांची औरंगाबाद * जिल्हा शहर व ग्रामीण समन्वयकपदी नियुक्ती*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहमदनगर - प्रतिनिधि - वार्ता - 
कॉंग्रेस सेवा दलाचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा कॉंग्रेस सेवा दला चे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद यांची औरंगाबाद जिल्हा शहर व ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्या आदेशन्वय प्रदेश महासचिव सुरेश पवार यांनी नियुक्तीपत्र दिले आहे,
अहमदनगर जिल्ह्याबरोबरच औरंगाबाद जिल्ह्याची देखील जबाबदारी मा.सरवरअली सय्यद यांच्यावर सोपविण्यात आल्याने हे श्री.सय्यद यांच्या एकनिष्ठता आणी प्रमाणिकतेचे फळ असल्याचे जाहीर होते.श्री.सय्यद यांच्या या नियुक्तीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


जेथे लोकशाही नाही तिथे मुक्त पत्रकारिता नाही - माजी कुलगुरू प्रा.डॉ. सुधीर गव्हाणे

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहमदनगर (एस.एम.आदिल)

अहमदनगर येथील सीएसआरडी संस्थेत ग्रासरूट जर्नालिझम संधी उपयोगिता या विषयावर 
जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते
माजी कुलगुरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर गव्हाणे आणि महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन मुंबईचे संपादक
अभिजित कांबळे यांची व्याख्याने झाली. 
अभिजित कांबळे यांनी ग्रासरूट जर्नालिझम विषयी माहिती दिली
आजच्या युगात डिजिटल आणि व्हिडीओ यांचा पत्रकारितेत महत्व किती वाढला आहे 
आणि बातमी हि ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न प्रशासना पर्यंत पोहचविणायची जबाबदारी 
ही पत्रकाराची असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 
यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात प्राध्यापक डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की,जेथे लोकशाही नाही तिथे मुक्त पत्रकारिता नाही आणि सत्य सांगण्याचा व्यवसाय हीच पत्रकारिता सत्य मांडण्याची पत्रकारिता संपता कामा नये आणि पत्रकारितेत पत्रकाराचा पाठीचा कणा ताठ ठेवणे 
आवश्यक आहे तो झुकता कामा नये ही आजच्या काळात अत्यावश्यक बनली आहे असे प्रतिपादन माजी कुलगुरू व
 डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. 
ग्रासरूट जर्नालिझम या कार्यशाळेत पुढे बोलतांना प्रा. गव्हाणे म्हणाले की, मुख्य प्रवाहातील पत्रकार आणि 
माध्यमे ही जनतेपासून दूर जात आहेत आणि चुकीच्या मार्गावर जास्त जात असल्याचे सध्या दिसत आहे. 
जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा जनसामान्यांचे प्रश्न मांडणार कोण? असा प्रश्न निर्माण होतो आणि तेव्हा लोकांनां आपले प्रश्न वेशीवर टांगावी लागतात. आजची बातमी शुद्ध आणि पवित्र राहिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी 

महाराष्ट्र अधिस्वीकृती समितीच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
 लोकमतचे संपादक सुधीर लंके आणि सांयदैनिक स्नेहप्रकाशचे संपादक प्रकाश कुलथे यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अधिस्वीकृती समितीच्या राज्य सदस्यपदी निवड झाल्याबद्दल 
प्रा.डॉ सुधीर गव्हाणे,पत्रकार अभिजित कांबळे यांच्या हस्ते हार्दिक शभेच्छा सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश पठारे, बापू चंदनशिवे आदी उपस्थित होते. 
सत्य दाबता येणार नाही आणि सत्य लपविताही येत नाही तेव्हा सत्याच्या बाजूने उभे राहून सत्य जनतेसमोर आणण्याची खरी जबाबदारी पत्रकाराची आहे, समस्या आणि प्रश्ने ज्या-ज्या भागात आहेत त्या भागातून तिथल्या रहिवाशी असलेल्या नागरिकांनी पत्रकार म्हणजेच सिटीझन रिपोर्टर ही काळाची गरज आहे आणि अशा प्रकारची
अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. 

*Grassroot Journalism:*
*ग्रासरूट जर्नालिसमने क्रांती घडविली*
*आफ्रिकेतील एका गावात भीषण पाणी टंचाई झाली असताना लोकांना पाणी विकत आणावे लागत असल्याचे पाहून एका ११ वर्षीय लहान मुलीने हा विषय तिथे विहिरीची अत्यावश्यक गरज त्या मुलीने सोशल मीडियावर अत्यन्त प्रभावीपणे मांडली आणि काही दिवसातच विहिरीसाठी संपूर्ण जगभरातून निधी आला आणि यानंतर पुढे ९ ते ११ गावांमध्ये या मुलीच्या ग्रासरूट जर्नालिसमने क्रांती घडविली*

या कार्यशाळेत अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील पत्रकार,
सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी  उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Thursday, September 7, 2023

अधिस्वीकृती समिती नाशिक विभागीय अध्यक्षपदी सुधीर लंके


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

नाशिक - विमाका - वृत्तसेवा

नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीची अध्यक्ष निवडीची बैठक विभागीय माहिती कार्यालय,नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दै.लोकमत अहमदनगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांची विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यक्ष निवडीसाठी निवडणुक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य किरण लोखंडे यांनी सूचक म्हणून सुधीर लंके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात यावी असे सुचविले. त्यांच्या सुचनेला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. श्री.सुधीर लंके यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूक प्रक्रिया विभागीय माहिती कार्यालय, नाशिकचे उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य विजयसिंह मोहनराव होलम, अभिजित कुलकर्णी, किरण लोखंडे, सहायक संचालक मोहिनी राणे उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता

श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे प्रथम जनक आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. उमाजी राजे नाईक यांनी इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असल्याने जनतेनेही त्यांना मनापासून साथ दिली. अशा या क्रांतिकारकांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक दिलीप नागरे, के.सी.शेळके, कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, अशोक जगधने, सुरेश ठुबे, डॉ. राजेंद्र लोंढे, बाबा वायदंडे, सनी मंडलिक, रितेश चव्हाणके, विशाल साळवे, संजय गोसावी, अजय धाकतोडे, प्रताप गुजर, राजेश जोंधळे, सिद्धार्थ सोनवणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

शासकीय योजनांची साथ “शासन आपल्या दारी” उपक्रमातुन शेतकऱ्यांच्या कष्टाला १२ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना लाभ


शेतकऱ्यांना शेतीतुन शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी कृषी आणि कृषीशी निगडीत असणाऱ्या विविध विभागांच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवुन देत त्यांचे जीवन अधिक सुखकर बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला शासकीय योजनांची साथ लाभत असल्याचा प्रत्यय “शासन आपल्या दारी” उपक्रमातुन पहावयास मिळाला. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमांतुन तब्बल १२ लक्ष १० हजार ७६८ शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देत कृषी विभागाने एक उच्चांक गाठला आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डी येथे दि.१७ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हास्तरीय "शासन आपल्या दारी" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  परिसरामध्ये विविध विभागांच्या ८० स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. त्यामध्ये कृषी विभागाच्याही चार स्टॉलचा समावेश होता. या स्टॉलमधुन कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचे फलक उभारण्यात आले होते. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळे, भाजीपाला, तृणधान्य, फुले यांचे उत्कृष्ट नमुन्यांचे प्रदर्शन तसेच रानभाज्यांचे आहारातील महत्व लक्षात घेता जिल्ह्यात मान्सून हंगामात उत्पादीत होणाऱ्या रानभाज्यांचा महोत्सवही या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याला शेतकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त आहारातील तृणधान्यांचे महत्व पटवून देण्यासाठी कृषि विभागाने तृणधान्याच्या मंगल कलशाची निर्मिती केली होती. हा मंगल कलश शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

*कृषी यांत्रिकीकरण योजनेतुन ४*
 *हजार ८७६ शेतकऱ्यांना लाभ*

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, कल्टीवेटर, रोटावेटर इत्यादी प्रकारची यंत्र अवजारे शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर लाभ देण्यात येतो. योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प महिला शेतकरी यांना ५० टक्के अनुदान तसेच इतर बहुभुधारक शेतकरी यांना ४० टक्के अनुदान वितरित करण्यात येते. “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत ४ हजार ८७६ शेतकऱ्यांना ३५ कोटी ८२ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.

*प्रधानमंत्री कृषी सिंचन*
 *योजनेतुन ४८ कोटीचा लाभ*

“शासन आपल्या दारी” उपक्रम कालावधीमध्ये मागेल त्याला सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ६ हजार ५०५ शेतकऱ्यांना १९ कोटी ९६ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना पूरक अनुदान अंतर्गत २४ हजार ३०० शेतकऱ्यांना २८ कोटी ५१ लक्ष एवढे अनुदान वितरित करण्यात आले.  

*५५१ शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे*

या योजनेअंतर्गत “शासन आपल्या दारी” उपक्रम कालावधीत मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत ५५१ शेतकऱ्यांना ४ कोटी ५८ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.

*एकात्मिक फलोत्पादन*
 *विकास अभियानातून लाभ*

“शासन आपल्या दारी” उपक्रम कालावधीत कांदाचाळ घटकासाठी ३६० शेतकऱ्यांना
 ३ कोटी ५ लक्ष मागेल त्याला अस्तरीकरण घटकासाठी २२७ शेतकऱ्यांना १ कोटी ५५ लक्ष, मागेल त्याला हरितगृह शेडनेट घटकासाठी ४५ शेतकऱ्यांना ३६ लक्ष एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे. मागेल त्याला फळबाग लागवड घटकासाठी २३ शेतकऱ्यांना १० लक्ष एवढे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

*पीएमएफएमई योजनेतुन*
 *८१ शेतकऱ्यांना लाभ*

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (पीएमएफएमई) योजनेतून उपक्रम कालावधीमध्ये अन्नप्रक्रिया अंतर्गत ८१ शेतकऱ्यांना ५ कोटी ५३ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

*प्रधानमंत्री पिक विमा योजना*
*एक रुपयात पिक विमा*

 प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२३-२४ अंतर्गत जिल्ह्यामध्ये यावर्षी एकूण ११ लक्ष ७३ हजार ७४७ शेतकऱ्यानी सहभाग घेतला आहे. यामध्ये ६ लक्ष ७७ हजार ४९० हेक्टर क्षेत्रावर विमा उतरवलेला आहे. यासाठी केंद्र सरकारचे १७५ कोटी व राज्य  शासनाचे २७७ कोटी २ लक्ष असा एकूण ४५२ कोटी १४ कोटी हिस्सा समाविष्ट आहे. एकूण विमा संरक्षित रक्कम ३ हजार ३२६ कोटी ६४ लक्ष एवढी आहे.

*बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेतून ७ कोटीचा लाभ*

लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषि नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेऊन शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासास  मदत करण्यासाठीच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेतून “शासन आपल्या दारी” उपक्रमामध्ये अन्न प्रक्रिया अंतर्गत ३७ शेतकरी उत्पादक कंपन्यांना ७ कोटी ५४ लक्ष रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले. 
आपल्याकडे जेवण झाले की अन्नदाता सुखी भव म्हणण्याची पद्धत आहे. जो कष्ट करुन ऊन, पाऊस,वारा सहन करुन अन्न पिकवतो, त्या अन्नदात्या शेतकऱ्याचे एक प्रकारे आभार व्यक्त करणे किंवा आपली सकारात्मकता त्याच्या पाठीशी देणे हाच यामागचा हेतु आहे. परंतु आता फक्त तेवढेच पुरेसे नाही. शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध व्हावा यासाठी शासन शेतकऱ्यांप्रती अधिक सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी आग्रही आहे. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या “शासन आपल्या दारी” या उपक्रमातुन शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरीव मदत उपलब्ध करुन देण्यात आली हे या उपक्रमाचे यशच म्हणावयास हरकत नाही.

===================================
---------------------------------------------------
*अमोल शिवकांत महाजन*
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय,अहमदनगर.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

श्रीकृष्णचरित्र म्हणजे सर्वधर्माचे सारतत्व होय=ह.भ.प. प्रा. सखाराम महाराज कर्डिले


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता-

श्रीकृष्णचरित्र म्हणजे सर्वधर्माचे सारतत्व असून महानुभाव पंथ हा पंचकृष्ण मानतात,त्यांचे भक्तितत्व द्वैत स्वरूपाचे आहे, त्यातच जीवनाचे कल्याण आहे, असे विचार ह.भ.प. प्रा.सखाराम महाराज कर्डिले यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर नेवासा रोडवरील महानुभाव श्रीकृष्ण मंदिरात भजन गायन,पूजाविधी, दहीहंडी, पुस्तक भेट,श्रीकृष्णचरित्र पारायण इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी श्रीकृष्णजीवन म्हणजे माणुसकीचे, लोकशाहीचे अमृतफळ असल्याचे सांगून ह.भ. प.प्रा.कर्डिले महाराज यांचा परिचय करून दिला.महानुभाव गोविंदबाबा व महानुभाव विशालबाबा यांनी प्रा.कर्डिलें महाराज आणि आलेला सर्वांचा सन्मान केला.यावेळी लेविन भोसले,भगीरथराव जाधव, शिवाजीराव गायके आदिंनी मंदिर प्रमुख महंत ब्रिजलालदादा पंजाबी यांच्या योगदानाचे कौतुक केले.ह.भ.प.प्रा.सखाराम महाराज कर्डिले यांनी श्रीकृष्णजन्म अष्टमीचे महत्व विशद केले.श्रीकृष्ण म्हणजे सर्वात होते, सर्वांचे होते. त्यांनी समतेचे आणि न्यायाचे राज्य केले.महंत ब्रिजलालदादा हे आजारी असले तरीही ते श्रीकृष्णभक्तीत लीन असल्याचे सांगून महानुभाव आश्रमातील सर्वांच्या आदर्श सेवाभावाचे कौतुक केले.माजी प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी श्रीकृष्णमंदिर आणि ब्रिजलालदादा पंजाबी यांचे दर्शन घेतले, सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सोनाली पंजाबी, शकुताई पंजाबी,मनोरमाताई पंजाबी, चंद्रकलाताई पंजाबी, शैलाताई पंजाबी, स्वातीताई पंजाबी, विद्याताई पंजाबी, कु. मनस्वी गोविंदराज पंजाबी यांनी दोन दिवसाचे श्रीकृष्ण जन्म सोहळ्याचे नियोजन केले. अनेक भक्तिपरिवार उपस्थित होते. लेविन भोसले यांनी ग्रंथभेट देत सर्वांचे आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



महात्मा फुले विचार मंच, धुळे आणि बापूसो. ग.द.माळी गुरुजी व्याख्यानमाला समितीतर्फे जयंती कार्यक्रम संपन्न


पत्रकार धनंजय सोनार यांचेसह सर्वच स्पर्धकांचे प्रबोधन दिशादर्शक - प्रा.अण्णा माळी
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

केवळ धुळेच नव्हे तर महाराष्ट्रातील उच्च कोटीच्या ह्या महाजन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात व्याख्यानमालेची परंपरा चालविणाऱ्या प्रांगणात अमळनेर येथील सामाजीक कार्यकर्ते धनंजय सोनार यांचा सत्कार करण्यात आला.ना. छगन भुजबळ यांचे बद्दल निबंध स्पर्धेतील प्रथम विजेते म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. धनंजय सोनार यांचेसह सर्वच विजेत्या स्पर्धकांचे कार्य दिशादर्शनासाठी माईलस्टोन ठरेल असे प्रा. अण्णा माळी यांनी यावेळी सांगितले.
कालकथीत ग.द. माळी परिवारातर्फे वैचारीक जागरणाचे हे कार्य अभिनंदनीय असून मोठमोठ्या व्याख्यानमालांच्या परंपरेसारखे आहे. 
मिलींद सोनवणे, प्राचार्य व्ही. बी. पाटील आणि प्रा.अण्णा माळी यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. असे मान्यवरांनी सांगितले. 
दिवंगत बापूसो. ग.द.माळी गुरुजींच्या जयंती निमित्त २ सप्टेंबर रोजी आयोजित केलेला बापूसाहेबांच्या कार्याचा गौरव प्रशंसनीय ठरला. 
.डॉ. बापूराव देसाई, प्राचार्य व्ही.के.भदाणे, डॉ अभिनव दरवडे, यांच्या हस्ते सदर प्रसंगी ओम गांगुर्डेस ,कु.दर्शना महाजन व अनेक स्पर्धेतील बक्षीसपात्र गुणवंताना रोख रक्कम व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी मोहन दयाराम सोनवणे, दिलीप दयाराम सोनवणे, आनंदा धर्मा पाटील, राजीव पंडितराव पाटील, सुशिलाताई दंगलराव महाजन, डॉ. सूरज सुनिल सोनवणे, अमित सोनवणे, प्रा. वाय्.आर्.माळी, हिरामण चौधरी,जे.एस्.पाटील, प्राचार्य बी.एच्.जाधव, प्राचार्य बी.बी.महाजन, प्राचार्य एस्.एस्. पाटील,व्ही.एन्.बिरारी तसेच डॉ. सुशिल महाजन,डॉ.रविंद्र पाटकरी, वामनराव जाधव, गोपालभाऊ देवरे, पदाधिकारी उमेश महाजन, माजी नगराध्यक्ष हनुमंतराव वाडिले, उद्यानपंडित विलासराव माळी,विठोबा वाडिले, चैत्राम भदाणे, देवेंद्र पाटील, मंसाराम माळी, शिवाजीराव जाधव, ज्ञानेश्वर महाजन,आर.डी. तायडे, ज्ञानेश्वर तुकाराम माळी, दिलीप देवरे इत्यादींसह म.फुले विद्या प्रसारक संस्थेच्या सर्व शाखांचे कर्मचारी बंधु भगिनी, आदर्श माध्यमिक विद्यालय देवपूर व कळमसरे येथील कर्मचारी बंधु भगिनी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती अध्यक्ष मिलींद सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचलन समिती कार्याध्यक्ष प्रा. अण्णा माळी यांनी केले. आभार प्रदर्शन विचार मंच कार्याध्यक्ष तथा समिती प्रचार प्रमुख राहुल महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अमित सोनवणे यांचेसह महाजन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा आणि आदर्श माध्यमिक विद्यालय देवपूर व कळमसरे यांच्या सर्व अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी बंधु भगिनींचे सहकार्य लाभले.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार लियाकतखान पठाण - संगमनेर
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================