राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, January 11, 2024

प्रात्यक्षिक केंद्र व मोबाईल व्हॅनद्वारे ईव्हीएम व व्हिव्हीपॅट बाबत जनजागृती,मतदारांनी माहिती जाणुन घेण्याचे आवाहन


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हयातील बारा मतदार संघामध्ये मोबाईल व्हॅनद्‌वारे ईव्हीएम व व्हिव्हीपॅट मशीनद्वारे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनदवारे सुद्धा जनजागृती करण्यात येत असुन जिल्ह्यातील मतदारांनी ईव्हीएम व व्हिव्हीपॅट मशिन्सबाबत माहिती जाणून घेण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

ईव्हीएम व व्हिव्हीपॅट बाबत १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत जनजागृती करण्यात येणार आहे. मोबाईल व्हॅनमध्ये एक अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस नियुक्त करण्यात आले असुन या व्हॅनद्वारे जिल्ह्यातील ३ हजार ७३१ मतदान केंद्रापैकी १ हजार ३९८ मतदान केंद्रावर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आले असुन जिल्ह्यातील १२ मतदार संघातील १४ तहसिल कार्यालयात ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. मतदारांनी ईव्हीएम व व्हिव्हीपॅट बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

क्रीडा पुरस्कारासाठी २२ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरस्कारासाठी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील ताज्या बातम्या मधील उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर २२ जानेवारी, २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अर्ज सादर करणा-या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

=================================-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

"निधी आपके निकट” कार्यक्रमाचे २९ जानेवारी रोजी आयोजन

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
कर्मचारी भविष्य निधी संघटन यांच्यामार्फत निवृतीवेतन धारक आणि कंपनी मालकासाठी प्रत्येक महिन्यात 'निधि आपके निकट' हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून या महिन्यात २९ जानेवारी २०२४ रोजी या कार्यक्रमाचे समता नागरी सहकारी संस्थाा मर्या, काळे मळा, कोपरगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.
 ज्या सदस्यांच्या भविष्य निधिबाबत काही अडचणी असतील त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक भविष्य निधी आयुक्त प्रभारी अधिकारी, जिल्हा कार्यालय, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक घटक आहेत. शासनाच्या योजनांच्या माध्यमातुन ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्याबरोबरच त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकीसन देवढे, ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभाग, अहमदनगरचे अध्यक्ष सर्वोत्तम क्षीरसागर, जिल्हा ज्येष्ठ नागरिक सल्लागार अशोक आगरकर, कार्याध्यक्ष के.डी. खानदेशे, सदस्य खोसेराव शितोळे, डॉ. जी.पी. शेख, डॉ.प्रितम बेदरकर, डॉ. अंजली धोंडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, आई-वडिल आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना शिक्षण, प्रेम, माया देतात.समाजामध्ये आपल्या पायावर उभे राहून मानाने जगण्याइतपत बळ त्यांच्यात निर्माण करतात. परंतु याच आई- वडिलांना त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या या पाल्यांच्या जीवनाला कुठलाच अर्थ नसल्याचे सांगत आपल्या आई- वडिलांचा सांभाळ करणे हे प्रत्येक मुला-मुलीचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. 
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. तसेच कायद्याचीही निर्मितीही केली आहे. ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्ह्यात योजनांची व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अहमदनगर शहरात विरंगुळा केंद्र उभारण्याबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक गावात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यासाठी संघटनांना प्रशासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त श्री देवढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी विभागामार्फत समन्वय साधण्यात येतो. वृद्धांची हेळसांड थांबून त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी शासनामार्फत वृद्धाश्रम सुरू करण्यास परवानगी देण्याबरोबरच अनुदानही देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विषयक व ताणतणावमुक्त जीवन या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

लालबहादूर शास्त्री यांनी देशाला जय जवान जय किसानचा नारा दिला - ससाणे🙏✅🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला जय जवान जय किसान चा नारा देऊन शेती, शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे देशाला सक्षम बनवण्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य केल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा.उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित लालबहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की, आपल्या समर्पित सेवेदरम्यान लालबहादूर शास्त्री निष्ठा, साधेपणा व कार्यक्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले. लालबहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधीजींच्या राजकीय शिकवणीचा व तत्त्वांचा मोठा पगडा होता. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य साधेपणाने व गोरगरिबांच्या सेवेसाठी व्यतीत केले. लालबहादूर शास्त्री यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, शंकरराव फरगडे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे सरवरअली मास्टर, सुरेश ठुबे, डॉ. राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, अशोक जगधने, सनी मंडलिक, सरबजीतसिंग चूग, रियाजखान पठाण, युनूस पटेल, रितेश चव्हाणके, लक्ष्मण शिंदे, योगेश गायकवाड, अजय धाकतोडे, गोपाल भोसले, राजेश जोंधळे, सुरेश बनसोडे, कल्पेश पाटणी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Wednesday, January 10, 2024

पत्रकार दिनी मोहसिन ए मिल्लत चे प्रकाशन...💥 💯💢💯💢💯💢💯💢

-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
महाराष्ट्रातील सर्व १२ कोटी जनतेचा
शासनातर्फे ५ लाखांचा आरोग्य विमा💐
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
मिलिंदकुमार साळवे यांची "मोहसिन - ए - मिल्लत"
मासिकाच्या प्रकाशन सोहळ्यात माहिती💐
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
प्रत्येक समाजातील महिलांनी पुढे येवून प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोदवणे गरजेचे - दिपालीताई ससाणे💐
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
महाराष्ट्रातील सर्व बारा कोटी जनतेसाठी अतिशय महत्त्वाची व लाभदायक ठरणारी पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विविध आजारांवरील उपचारासाठी होणारा ५ लाख रूपयांपर्यंतचा खर्च राज्य सरकार देणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक, मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी केले.

ज्येष्ठ संपादक शौकत शेख व त्यांचे चिरंजीव मोहसीन शेख यांनी पत्रकारदिनी सुरू केलेल्या "मोहसिन-ए-मिल्लत" या मासिकाच्या प्रकाशनप्रसंगी येथील समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट समोरील संत मदर तेरेसा सर्कल प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे
 अध्यक्षस्थानी हाजी इलाहिबक्ष कुरेशी हे होते.
मासिकाचे संपादक मोहसिन शेख यांनी प्रास्ताविक
 व सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ संपादक शौकत शेख,
माजी नगरसेवक नजीर मुलाणी, महेबुब कुरेशी, तौफिक शेख, असिफ तांबोळी, जाफर शहा, सलाऊद्दीन शेख, मुखतार मनियार,असलम बिनसाद, हाजी लतीफ सय्यद, रियाजखान पठाण, स्वामीराज कुलथे, विजय खाजेकर,
 डी.एल.भोंगळे, आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मिलिंदकुमार साळवे म्हणाले, महाराष्ट्रातील झोपडपट्टी पासून ते महालापर्यंत राहणाऱ्या सर्व आर्थिक व सामाजिक घटकातील वर्गाला ५ लाख रूपयांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करणाऱ्या या मोफत आरोग्य विम्याचा गोरगरीब जनतेस मोठा लाभ होणार आहे.
२८ जुलै २०२३ रोजी या अतिशय महत्त्वाच्या योजनेचा शासन निर्णय जारी झाला आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व केंद्र सरकारची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रात २ जुलै २०१२ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा कुटुंबांचा म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक,
 अंत्योदय, अन्नपूर्णा व दारिद्र्यरेषेवरील केशरी
 शिधापत्रिकाधारक यांचा या योजनेत समावेश होता. पात्र कुटुंबाला मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात आले होते. यासाठीचा विमा हप्ता महाराष्ट्र सरकार भरत होते. त्यामुळे रुग्णाला मान्यताप्राप्त रुग्णालयात कोणतीही रक्कम द्यावी लागत नव्हती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१४ मध्ये या योजनेचे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असे नामकरण करून यासाठी मंत्रालयात विशेष कक्षही सुरू करण्यात आला. दरम्यान २३ सप्टेंबर २०१८ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
 देशभरात केंद्र सरकारची आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना २३ सप्टेंबर २०१८ पासून लागू केली. १ एप्रिल २०२० च्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्याच्या दोन्ही योजनांची एकत्रित अंमलबजावणी सुरू झाली. केंद्राच्या योजनेत ५ लाखांचा, तर राज्याच्या योजनेत दीड लाख रुपये प्रति कुटुंब, प्रतिवर्ष आरोग्य विमा संरक्षण लाभ देय करण्यात आला.
२८ जुलै २०२३ ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार केंद्र व राज्य अशा दोन्ही योजनांची एकत्रित सांगड घालून महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या सर्व १२ कोटी जनतेला सरसकट ५ लाख रूपयांचे आरोग्य विमा संरक्षण लागू करण्यात आले. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व महाराष्ट्राचे रहिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना सुधारित महात्मा फुले ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू केली आहे. विम्याचे पैसे महाराष्ट्र सरकार संबंधित विमा कंपनीस देणार असल्याने १२ कोटी महाराष्ट्रवासियांना योजनेच्या यादीतील रूग्णालयांमधून ५ लाख रूपये खर्चापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत, असेही साळवे यांनी सांगितले.
*सध्या यांना मिळते केंद्राचे कार्ड*
सध्या २०११ च्या सामाजिक, आर्थिक, जातनिहाय

 सर्वेक्षणाच्या यादीत नाव असणारांनाच केंद्र सरकारच्या योजनेचे कार्ड ऑनलाईन मिळत आहे. त्यासाठीही शिधापत्रिकेचा बारा अंकी क्रमांक व आधार क्रमांक गरजेचा आहे. अनेकांकडे शिधापत्रिकेचा बारा अंकी ऑनलाईन क्रमांक नसल्याने त्यांना हे कार्ड मिळत नाही. त्यामुळे शिधापत्रिकेऐवजी थेट आधार क्रमांक व मतदार ओळखपत्राद्वारे रहिवासी असल्याची खात्री करून नव्या योजनेचे कार्ड तातडीने वाटप करण्याची मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.

*यामुळे रखडली योजना*
अंमलबजावणी सहाय्य संस्था व अंगीकृत रूग्णालयात आरोग्य मित्रांची नियुक्ती, योजनेच्या आज्ञावलीत बदल, राज्य आरोग्य हमी सोसायटी स्तरावर मनुष्यबळ नियुक्ती, एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्या विमा कंपनीची निवड अशी कार्यवाही न झाल्याने योजना मंत्रालयात

 रखडली आहे.
*जनतेतून साकारली योजना*
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जनतेकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार मी विदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी किमान ५ लाख रूपयांचा आरोग्य विमा (मेडिक्लेम) योजना लागू करण्याची सूचना केली होती. तिची दखल घेऊन ही योजना साकारली, याचा आनंद आहे. शासन जनतेचा आवाज ऐकते,याचा प्रत्यय यातून आला. मंत्रालयातील कार्यवाही जलदगतीने पूर्ण करून तातडीने योजनेची अंमलबजावणी झाली पाहिजे.

*--मिलिंदकुमार साळवे,* मिशन वात्सल्य शासकीय समिती, महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समिती.
<÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷>
<÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><><÷>
<÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷>
*प्रत्येक समाजातील महिलांनी पुढे येवून प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवणे गरजेचे - दिपालीताई ससाणे*
<÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷><÷>
*पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात
 आलेल्या मोहसिन ए मिल्लत या* *वर्तमानपत्र प्रकाशन  सोहळ्यात महिलांचा मोठा सहभाग लाभला*
*या कार्यक्रमास महिलांसाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव दिपालीताई ससाणे यांच्या हस्ते यावेळी मोहसिन शेख संपादित मोहसिन ए मिल्लत या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.*

*या प्रसंगी मोहसिन ए मिल्लत या वृतपत्रास शुभेच्छा व्यक्त करताना आपल्या शुभेच्छापर भाषणात सौ.ससाणे म्हणाल्या की, महिलांनी चुल आणि मुल यापर्यंतच मर्यादित न राहता प्रत्येक समाजातील महिलांनी प्रत्येक कार्यक्रमात पुढे येवून कामे केली पाहिजेत असे प्रोत्साहनही यावेळी त्यांनी महिलांना दिले. तसेच या कार्यक्रमात महिला भगीनींची मोठी उपस्थिती पाहून तथा मोहसिन ए मिल्लत या वृतपत्राच्या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहुन मनाला मोठे समाधान मिळाले असल्याचे ते म्हणाल्या.*
-----------------------------------------------
यावेळी महेबुब कुरेशी, हाजी लतीफभाई सय्यद,नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, जोएफ जमादार, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, मुखतार मनियार, आसिफ मनियार, असलम बिनसाद, विजयराव खाजेकर , शौकत शेख, ॲड. मुमताज बागवान, सलवा शेख, फरजाना शेख आदींची शुभेच्छापर भाषणे झाली.
यावेळी बोलताना शौकत शेख म्हणाले की ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुमार साळवे यांनी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही खुपच सविस्तरपणे याप्रसंगी दिली आहे,

 मोहसिन ए मिल्लत या वर्तमानपत्राच्या माध्यमातून देखील घराघरात शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्याची कामे केली जाणार असुन त्या अनुषंगाने अभा कार्ड/ आयुष्यमान भारत कार्ड कार्ड/ ई- श्रम कार्ड/ पेन्शन कार्ड याची सविस्तर माहिती सदरील अंकात सविस्तरपणे प्रकाशित करण्यात आलेली आहे, याप्रमाणेच शासनाच्या आणखी ज्या काही विविध जनकल्याणकारी योजना आहेत त्याची माहिती देखील प्रत्येक अंकात सविस्तरपणे दिली जाणार आहे, आमच्या मोहसिन ए मिल्लत कमेटी चा उद्देश केवळ हाच आहे की शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती ही तळागळातील जनसामान्यांपर्येंत पोहोचावी आणी त्यात त्यांचा फायदा व्हावा,शासनाने त्यांच्यासाठी निर्माण केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची त्यांना घरबसल्या माहीती मिळावी,यासाठी खास करुन सदरील कामी कार्यरत असलेल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखती देखील क्रमाक्रमाने या अंकात सविस्तरपणे प्रकाशित केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक नजीर मुलाणी, रियाजखान पठाण, हाजी लतीफभाई, महेबुब कुरेशी, जाफर शाह, शेख नजीर गफूर (मामु), जोएफ जमादार, तौफिक शेख (एकता), शेख शब्बीर (सर), अजहर शेख (एबीएस), असिफ तांबोळी, फिरोज शेख, रज्जाक पठाण, शेख जाकीर (सर), मास्टर सरवरअली सय्यद, सलाऊद्दीन शेख, इब्राहिम शेख, असलम बिनसाद, इम्रान एस. शेख, विजयराव खाजेकर, दशरथ भोंगळे, प्रविण साळवे, डॉ. पंडितराव पगारे, रमाताई भालेराव, परवीनभाभी शाह, विजय पाठक, दिलीप शेंडे (सर), ॲड.मुमताज बागवान, हाजी साजीद मिर्जा, शकील बागवान (सर), जलील कुरेशी (सर), समीर बागवान, लकी सेठी, जावेद पिंजारी, अजिज अत्तार, असिफ मंडपवाले, पत्रकार बाबासाहेब चेडे, राजेश भवार, नंदकुमार बगाडे, सचिन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोहसिन ए मिल्लत कमेटी चे शौकतभाई शेख, मोहसिन शेख, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, ॲड. हारुन बागवान, नदीमताज गुलाम, शब्बीर (राजु) कुरेशी , सरताज शेख, आरिफ कुरेशी, इब्राहिम बागवान (सर), मो.शफी अन्सारी, अफजल मेमन, मोहसिन बागवान, शब्बीर शेख, जावेद शेख, युनूस कुरेशी, हाजी फयाज बागवान, मुखतार मनियार, कलीम शेख, जाकीर शाह, समदानी शाह,जुबेर पटेल, वाजीद शेख तसेच सलवा शेख, फरजाना शेख,जेबा शाह, हिना मुलाणी, आस्मा सय्यद, जबीन पटेल, निलोफर बागवान, आर्शिया नदीम गुलाम, पूजा सकट, अनम खान आदिंनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी मोहसिन ए कमेटीचे कार्याध्यक्ष हाजी इलाहिबक्ष कुरेशी यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

शिरसगांव ग्रामपंचायत ग्रामसभा**खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न


शिरसगांव - प्रतिनिधि -/ वार्ता -

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव ग्रामपंचायतीची
 ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
 त्यामध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात
 आली.महाराणा प्रताप हौसिंग सोसायटीच्या मूळ प्लॉटधारक ६२ वगळून ज्या बोगस नोंदी झालेल्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहेत. बोगस प्लॉट धारकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ज्या लोकांनी आतापर्यंत पिण्याचे पाण्याचे नळ कनेक्शन्स डीपोझीट भरलेले नाही अशा बोगस कनेक्शनवर दंडात्मक कारवाई करणार असून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात येतील.शिरसगांव हद्दीतील व्यावसायिक प्लॉटधारक ज्यांनी आजपर्यंत ग्रामपंचायतमध्ये नोंदी केलेल्या नाहीत त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रु २५०००/- चे वर जे थकबाकीदार आहेत त्यांचेवर कोर्टात दावे दाखल
 करून त्याच्या प्लॉटला सरकार नाव लावण्यात येणार
आहे.
या झालेल्या ग्रामसभेत सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राणी वाघमारे ह्या होत्या.यावेळी ग्रामपंचायतीचे नेते गणेशराव मुदगुले यांनी सर्व ग्रामस्थांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ, त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे.आपली घरपट्टी पाणीपट्टी, वेळेवर भरावी.सर्व ग्रामस्थांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहील असे मत व्यक्त केले.ग्रामसभेस सरपंच राणी वाघमारे,उपसरपंच संजय यादव,ग्रामसेवक पी.डी. दर्शने, अशोकराव पवार,सुरेश ताके,बापूसाहेब काळे,भाकचंद जगताप,लक्ष्मण यादव,पाराजी ताके,रंगनाथ ताके,सर्व ग्रा.प.सदस्य ग्रामस्थ,ग्रा.प. कर्मचारी आदि उपस्थित
 होते.


*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*💐✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*