राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, February 13, 2024

गुरुद्वारा अधिनियम निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा ; श्रीरामपूर शिख समाजाची मागणी


शिख समाजाकडून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

=================================
- श्रीरामपूर - भगवंत सिंग बतरा -/ वार्ता -
-----------------------------------------------
राज्य सरकारने नांदेड येथील गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावा,या निर्णयाचे श्रीरामपूर येथील सिख पंजाबी समाजाच्यावतीने जाहीर निषेध करून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्तित भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा गुरुबचन सिंग चुग, लकी सेठी, सरबजीतसिंग सेठी, गुलशन कंत्रोड, रिम्पी चुग, तेजेंद्रसिंग सेठी, तमन भटियानी, हिरासिंग भटियानी, अमरकसिंग चुग, अमरप्रीतसिंग सेठी ,बंटीसेठ गुरुवाडा,प्रीतीपालसिंग बतरा, मोहनसिंग कथुरिया, अमरमितसिंग चुग, मनजीतसिंग चुग,जसबीरसिंग चुग, अमरमितसिंग गुरुवाडा, गुरुमितसिंग ठकराल,श्रीकृष्ण बडाख,मनजितसिंग चुग,
आदींसह सिख समाजातील बांधव यावेळी उपस्थित होते.

=================================
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्युरो चीफ: नाशिक विभाग)
===================
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------

श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावेत असे मागणी प्रांत अधिकारी कार्यालयात श्रीरामपूर येथे सिख समाजा चे वतिने निवेदन निषेध अर्ज देण्यात आले ?


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
 श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावी
श्रीरामपूर महाराष्ट्र - राज्य सरकारने नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावी
या निर्णयाचे श्रीरामपूर येथील सिख पंजाबी समाजाचा जाहीर निषेध करून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
      येथे गुरुद्वारा श्री गुरु सभा सिख पंजाबी समाजाच्यावतीने प्रांतकार्यालयात जाऊन प्रांतअधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा गुरुबचन सिंग चुग, लकी सेठी, सरबजीतसिंग सेठी, गुलशन कंत्रोड, रिम्पी चुग, तेजेंद्रसिंग सेठी, तमन भटियानी, हिरासिंग भटियानी, अमरकसिंग चुग, अमरप्रीतसिंग सेठी ,बंटीसेठ गुरुवाडा,प्रीतीपालसिंग बतरा,मोहनसिंग कथुरिया,अमरमितसिंग चुग,मनजीतसिंग चुग,जसबीरसिंग चुग,अमरमितसिंग गुरुवाडा,गुरुमितसिंग ठकराल,श्रीकृष्ण बडाख,मनजितसिंग चुग,
आदींसह सिख समाजातील बांधव यावेळी उपस्थित होते.
      पत्रकात म्हंटले आहे की ,नुकतेच राज्य सरकारने सोमवार दिनांक ५ फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम रद्द करण्यात जाहीर निषेध वैक्त केले आहे.

=================================
-----------------------------------------------
: - भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा - संकलन - वार्ता 
-----------------------------------------------
=================================


जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ



जिल्ह्यातील बालकांच्या मदतीसाठी प्रशासन तत्पर - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
=================================

- अहमदनगर - जिमाका -/ वृत्तसेवा -
आजची बालके हे उद्याच्या उज्ज्वल देशाचे भविष्य आहेत. या बालकांच्या विकासातुनच आपला देश अधिक बलशाली होणार असल्याने जिल्ह्यातील बालकांना सर्व प्रकारची मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
स्नेहालय संकुल येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.बी. वारुडकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, परीविक्षा अधिकारी श्रीमती संध्या राशिनकर, स्नेहलयाचे गिरीश कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव अनेक बालकांनी सहभाग नोंदवला आहे. बालकांना मदत करण्यासाठी प्रशासन तत्पर असुन १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सक्रियपणे सहभाग घेऊन आनंद व्दिगुणित करावा. कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचे तांत्रिक अडचणी येणार नाही याची काळजी घ्यावी. मैदानी खेळ खेळताना कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्पर राहणाच्या lसूचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.बी. वारुडकर म्हणाले की, १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन शेवटच्या दिवशी समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरणही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमास जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच बालमंडळाच्या सदस्या बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच महिला बाल विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



राजळे महाविद्यालयात केंद्रीय अर्थसंकल्पावर परिसंवाद


- पाथर्डी - प्रतिनिधि -/ वार्ता -
कासार पिंपळगाव: आदिनाथनगर येथील श्री दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेचे- दादा पाटील राजळे कला आणि विज्ञान महाविद्यालय आदिनाथनगर, तालुका: पाथर्डी, जिल्हा: अहमदनगर येथे वाणिज्य शाखा आणि अर्थशास्त्र पदवी व पदवीव्युत्तर विभागांतर्गत
 "केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५" या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. याकरिता मा. प्रा. डॉ . श्री. अजय पालवे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच एनसीसीचे सर्वेसर्वा) बाबुजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी, जिल्हा: अहमदनगर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्प आणि महाविद्यालयाचे नियतकालिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विविध करांच्या माध्यमातून शासनानला मिळणारे उत्पन्न शासन पायाभूत सुविधांच्या विकासावर तसेच लखपती दीदी उपक्रम, आरोग्यसेवा, आवास योजना (गृहनिर्माण) ,शेतकरी सन्मान योजना, सर्वसमावेशक वाढीवर लक्ष इत्यादी योजनांसाठी कशाप्रकारे खर्च करते याविषयीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली . 
          व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता मा. डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख,(अर्थशास्त्र पदवी व पदव्युत्तर विभाग तसेच वाणिज्य शाखाप्रमुख), प्रा. श्रीमती अर्चना नवले, रामेश्वरी सरोदे, स्वाती सातपुते, कुमारी तेजस्विनी तिजोरे, कुमारी प्रीती माळवदे यांनी विशेष परिश्रम घेतले. 
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना २ क्रेडिटसाठी या परिसंवादाचा उपयोग होणार आहे.
या व्याख्यानात वाणिज्य शाखेतील ३३ तर प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र विषयाच्या १४ विद्यार्थ्यांनी म्हणजे एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
          कार्यक्रमाचे आयोजन करताना शिक्षण संस्थेचे सचिव मा. जे. आर. महाजन, शिक्षण संस्थेचे संचालक माननीय आमदार मोनिकाताई राजळे, माननीय श्री राहुल राजळे, मा. प्राचार्य डॉ. राजधर ज. टेमकर, माननीय श्री विक्रमराव राजळे (अधीक्षक) आदींचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार वजीरभाई शेख - पाथर्डी*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अशोक महाविद्यालयाचे गुरुवारी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ


- श्रीरामपूर,- प्रतिनिधि -/ वार्ता -
अशोक कारखाना संचालित माजी आमदार लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार (दि.१५) रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि ज्येष्ठ कवी व साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. सुनिताताई गायकवाड यांनी दिली.
तालुक्यातील अशोकनगर येथील निवृत्तीभाऊ बनकर सांस्कृतिक भवन येथे या पारितोषिक वितरण समारंभाचे आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव सोपानराव राऊत, रा.यु.काँ. माजी जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, जि.प.माजी सदस्य मिलिंद गायकवाड, अशोक बँकचे चेअरमन ऍड.सुभाष चौधरी, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.सुनीताताई गायकवाड, उपप्राचार्य सुयोग थोरात, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन प्रा.सुनील म्हांकाळे, प्रा. दिलीप खंडागळे, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे आदींनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


१९७२ च्या दुष्काळात संस्थेची सुरुवात सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तींना आधार दिल्याने आज संस्थेची वेगाने घोडदौड - पद्मश्री पोपटराव पवार

 - अहमदनगर - प्रतिनिधि -/ वार्ता - 
 हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढी लिमिटेड अहमदनगरच्या वास्तू नूतनीकरण व सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, पतसंस्थेमध्ये सभासद हिताला कसे प्राधान्य असावे व संस्था कशामुळे मोठ्या होतात मोठ्या झालेल्या संस्था मुळे सभासदाचा भविष्यकाळ किती उज्वल होवू शकतो हे या सुवर्ण महोत्सवातून दिसते. तसेच महाराष्ट्रात शैक्षणिक आर्थिक असे सगळे बदल झालेले असल्याची चर्चा असते व दुसरीकडे चैनल वर ब्रेकिंग न्यूज असते की झालेला घोटाळा ? मात्र जबाबदारी कोणाची आहे. संस्था कशा टिकल्या पाहिजे याचे उत्तम उदाहरण दिले व ज्या सभासदांनी 72 च्या दुष्काळात या संस्थेची सुरुवात केली व सर्वसामान्य ग्रामीण भागातील सभासदांना आधार दिला आज ती संस्था अतिशय वेगाने आपली सुवर्ण महोत्सवी घोडदौड करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढीचा सुवर्णमहोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .वास्तू नूतनीकरणाच्या कोनशिलेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अँड. अनंतराव फडणीस, अजित बोरा,, डॉ.पारस कोठारी ,रणजित श्रीगोड, ज्योतीताई कुलकर्णी , संस्थापक संचालक , सुरेश भाटे ,सुधाकर कुलकर्णी , हणमंत सिद्धापूर, चंद्रकांत जोशी, मधुकर कुलकर्णी, सुरेश शिंदे, सुजाता मालपाठक, अुषा घुमरे, पतपेढीचे माजी सर्व पदाधिकारी ,हिंद सेवा मंडळाच्या पतपेढीचे अध्यक्ष अधिक जोशी, उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे, खजिनदार सुभाष येवले, सर्वश्री संचालक महेश डावरे, अमोल कदम, दीपक आरडे, सतीश म्हसे, नितीन केणे, राहुल गागरे, बाळासाहेब भोत सतीश फरताडे, मधुकर पवार, दीपक शिरसाट, स्मिता पुजारी, वैशाली दारवेकर, रावसाहेब नवले, रामकृष्ण कुलकर्णी, सेक्रेटरी किशोर कुलकर्णी, ज्ञानेश भागवत , सौरभ ठाणगे, राहुल साठे आदीसह पतपेढीचे माजी पदाधिकारी सर्व सभासद व सेवानिवृत्त अ. वर्ग सभासद, हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हिंद सेवा मंडळाच्या वास्तू नूतनीकरण व सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पतपेढीच्या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच पतपेढीचे मोबाईल अँपचे उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पतपेढीचे अध्यक्ष अधिक जोशी यांनी वास्तू नूतनीकरण व सुवर्ण महोत्सव सोहळ्या निमित्त पतपेढी विषयी माहिती सांगितली व अनेक मान्यवरांनी हिंद सेवा मंडळाच्या पतपेढी विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात सर्वश्री संस्थेचे मानद सचिव संजय जोशी, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, अहमदनगर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजी कर्डिले, अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी मनोगत व्यक्त करून पतपेढीच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी वास्तू नूतनीकरण व सुवर्ण महोत्सवास शुभसंदेशातून आपल्या शुभेच्छा दिल्या तत्पूर्वी पहिल्या सत्रात पतपेढीचे संस्थापक संचालक व माजी पदाधिकारी यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सेवानिवृत्त सभासद यांचा तिळगुळ समारंभ ब स्नेहमेळावा. कार्यक्रम घेण्यात आला त्यात सभासदांनी पतपेढीची आजपर्यंतची वाटचाल कशी झाली. हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले व संस्थापक संचालकांच्या हस्ते सर्व सभासदांना तिळगुळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. सतीश म्हसे व बबन धनवडे यांनी केले. उपस्थित सर्व सभासदांना २५ ग्रॅम चांदीचे नाणे देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ व आदिनाथ जोशी यांनी केले तर आभार नितीन केणे यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम -श्रीरामपूर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================