राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, August 8, 2024

राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी बाबासाहेब पवार


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील कवी, गीतकार बाबासाहेब पवार यांची शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्री क्षेत्र देवगड येथे रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांनी सर्वानुमते निवड केली असल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.
कवी बाबासाहेब पवार यांच्या आकाशवाणी केंद्रावर कवितांचे,गीतांचे मुलाखती असे अनेक कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत, त्यांचे 'साजं' व 'ती' हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत,यूट्यूब चॅनलवर त्यांची अनेक गीते प्रकाशित आहेत, त्यांच्या या निवडीबद्दल सामाजिक, सांस्कृतिक,साहित्यिक क्षेत्रासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




Wednesday, August 7, 2024

ओव्हरफ्लोच्या पाण्याचे शेती व गावतळी भरणेसाठी आवर्तन घ्यावे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
अन्यथा पाटबंधारे कार्यालयावर माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन

श्रीरामपूर  प्रतिनिधी
प्रवरा नदीपात्रात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आलेले असून अशा परिस्थितीत भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील शेतीसाठी प्रवरा डावा व उजव्या कालव्यांना पाणी सोडून आवर्तन घ्यावे व पिकांना जीवदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळी भरून घेण्यात यावी, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने वडाळा पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता संजय कल्हापुरे यांना निवेदन देण्यात आले.
             जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भंडारदरा व निळवंडे धरण परिक्षेत्रात जोरदार पाऊस होत असून श्रीरामपूर तालुक्यात मात्र दोन महिन्यांपासून पावसाचे अत्यल्प प्रमाण आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जगविलेली ऊसासह अन्य पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सुदैवाने भंडारदरा व निळवंडे धरणाच्या परिक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी वाढत असून प्रवरा नदीपात्रात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील शेतीसाठी प्रवरा डावा व उजव्या कालव्यांना पाणी सोडून आवर्तन घ्यावे व पिकांना जीवदान देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळी भरून घेण्यात यावी, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने शुक्रवार दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वा. माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपूर रेल्वे स्टेशनजवळील हनुमान मंदिर येथून वडाळा पाटबंधारे कार्यालयावर श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन व लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
           निवेदन देतांना लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, नानासाहेब गांगड, रविंद्र झरेकर, प्रमोद करंडे आदी उपस्थित होते. 


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




शेतकरी युवक संवाद यात्रा,निपाणी वडगावात युवकांची जंगी मोटार सायकल रॅली


करण ससाणे आणि हेमंत
ओगलेंचे केले भव्य स्वागत

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता 
श्रीरामपूर - फटाक्यांची आतषबाजी करत करण ससाणे, हेमंत ओगले आगे बढोच्या घोषणा देत तालुक्यातील निपाणी वडगाव येथील युवकांनी जंगी मोटार सायकल रॅली काढत करण ससाणे आणि हेमंत ओगले यांचे भव्य स्वागत केले. दरम्यान ही रॅली अशोक कारखान्याच्या गेस्ट हाऊस जवळील डॉ. बाबासाहेब आबेंडकर चौकातुन काढून संपूर्ण गावात फिरवण्यात आली. या संवाद यात्रेत अनेक शेतकरी आणि युवकांनी आपल्या समस्या मांडल्या.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली असून यात्रेच्या पाचव्या दिवशी करण ससाणे आणि हेमंत ओगले यांनी सकाळच्या सत्रात श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव, खिर्डी, तर दुपारच्या सत्रात कारेगाव, मातापूर, निपाणी वडगाव येथील ग्रामस्थां समवेत संवाद साधला.
निपाणी वडगाव येथे झालेल्या सभेत मनोगत व्यक्त करताना मुरली राउत यांनी स्व. जयंतराव ससाणे यांच्या आठवणींना उजाळा देत मागील दहा वर्षात आम्ही पोरके झालो असुन आम्हाला आधाराची गरज आहे. स्व. जयंतराव ससाणे होते तेव्हा गावातील गोरगरीब समाजाचा माणुस त्यांनी दत्तक घेतला होता. तोच वारसा तुमच्याकडे असल्याने आम्ही पुढारी बदललो तरी तुम्ही बदलु नका असे भावनीक अवाहन त्यांनी करण ससाणे यांना केले. गावाबद्दल काळजी करायच काम नाही. आम्ही सर्वच तुमच्या सोबत आहोत त्यामुळे करण ससाणे सांगतील तोच आमचा नेता असेही ते म्हणाले. यावेळेस युवक काँग्रेस चे गणेश गायधणे व प्रशांत राऊत यांनी शेकडो युवकांना बरोबर घेऊन भव्य मोटार सायकल रॅली काढली.कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी शेतकरी युवक संवाद यात्रेनिमित्त आवाज तुमचा संपर्क आमचा हे ब्रिद वाक्य घेऊन, मतदारसंघातील अंतिम घटकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी शेतकरी युवक संवाद यात्रा सुरू केलेली आहे. तालुक्यातील गावांच्या समस्या जाणून घेऊन यात्रेच्या शेवटी सर्व समस्यांचे एकत्रीकरण करून एकत्रीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, भविष्यात काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षाचा तसेच स्व. जयंतराव ससाणे यांचा बालेकिल्ला असल्याची ओळख कायम ठेवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीचे सरचिटणिस हेमंत ओगले म्हणाले की, निष्क्रीय लोकप्रतीनिधी आल्याने गावांच्या समस्या सुटल्या नाहीत. श्रीरामपूर एमआयडिसीत परप्रांतीय तरुण काम करतात भुमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहीजे हि आमची भुमिका असून याचा जाब विचारला जाईल. तसेच इतर बंद कंपन्या चालु करण्यासाठी प्रयत्न करून रोजगाराची निर्मिती केली जाणार आहे. तसेच शेतीसाठीच्या विजेचे प्रश्न, शेतीमालाला भाव, दुधाचे दर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहीजे याबाबत आवाज उठवला जाणार आहे. यावेळी शेतकरी युवक संवाद यात्रेतील सभेत युवक, शेतकरी, आणि ससाणे समर्थकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


श्रीरामपूर तालुक्यातील४४ हजार महिला पात्रमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीची बैठक; उद्या प्रमाणपत्र वाटप


श्रीरामपूर...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ स्तरावरील समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजप महिला मोर्चाच्या तालूकाध्यक्ष मंजुषा ढोकचौळे, सदस्य अभिषेक खंडागळे, पुष्पलता हरदास यांचा सत्कार करताना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ. समवेत मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब हरदास, मेजर महेश ढोकचौळे, नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहायक गटविकास अधिकार  उस्मान .
शेख.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷•÷÷÷÷÷÷÷÷
=================================

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातून आतापर्यंत ४६ हजार २४५ अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी ४४ हजार १२६ महिलांचे अर्ज प्राथमिक स्तरावर पात्र ठरले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुक्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी भाजप महिला मोर्चाच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मंजुषा ढोकचौळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीची पहिली बैठक मंगळवारी सायंकाळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या दालनात झाली. यावेळी वाघ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंची माहिती दिली. श्रीरामपूर तालुक्यातून आतापर्यंत ४६ हजार २४५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी संगणकावरील अर्ज, कागदपत्रांच्या आधारे ४४ हजार १२६ महिलांचे अर्ज प्राथमिक स्तरावर पात्र ठरले आहेत. १८ अर्ज अपात्र ठरले आहेत. तर १ हजार ९६८ अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यांना दुरूस्ती व त्रुटी पुर्ततेसाठी एक संधी मिळणार आहे, असे समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार वाघ यांनी बैठकीत सांगितले. 
यावेळी नवनियुक्त सदस्य पुष्पलता हरदास, अभिषेक खंडागळे यांच्यासह भाजपचे शहर उपाध्यक्ष व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब हरदास, मेजर महेश ढौकचौळे, सहायक गटविकास अधिकारी उस्मान शेख यांच्यासह बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना समितीचे नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर यांनी स्वागत केले. 
योजनेचा श्रीरामपूर तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. प्राथमिक स्तरावर पात्र ठरलेल्या अर्जांची छाननी होऊन त्यांना समितीची मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर ही यादी जिल्हा स्तरावरील समितीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर महिला व बालविकास आयुक्तांच्या समितीकडे पात्र अर्ज पाठवून अंतिम मंजुरी दिली जाणार आहे, असे समितीच्या अध्यक्षा मंजुषा ढोकचौळे, सदस्य अभिषेक खंडागळे व पुष्पलता हरदास यांनी सांगितले. शहर व ग्रामीण भागातील अर्जांचा ताळमेळ लावण्यासाठी नागरी व ग्रामीण बालविकास प्रकल्पांमध्ये समन्वयक साधण्याची सूचना मिलिंदकुमार साळवे यांनी केली. तर योजनेच्या लाभासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, तसेच इतर प्रकारे होणाऱ्या फसवणुकीस महिलांनी बळी पडू नये , असे आवाहन अभिषेक खंडागळे यांनी केले.
 पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते योजनेच्या काही लाभार्थी महिलांना गुरूवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता थत्ते मैदानात होणाऱ्या सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. याप्रसंगी तालुक्यातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंजुषा ढोकचौळे, अभिषेक खंडागळे, पुष्पलता हरदास, मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब हरदास, मेजर महेश ढोकचौळे यांनी केले आहे.

*समिती अध्यक्षपदी मंजुषा ढोकचौळे*
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या शिफारशी नुसार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष मंजुषा ढोकचौळे यांची समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा पुष्पलता हरदास व श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती तसेच बेलापूरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांची समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, अनिता शर्मा, पूजा चव्हाण, सुप्रिया धुमाळ, कविता दुबे व इतरांनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================







Tuesday, August 6, 2024

विद्रोही सांस्कृतिक साहित्यिक चळवळीच्या डॉ.सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा यांचा आमदार श्री लहुजी कानडे साहेबांनी कडून सत्कार...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर:-दिनांक ०४-०८-२०२४रवीवार रोजी श्रीरामपूर विधानसभाचे आमदार श्री लहुजी कानडे साहेब यांनी फातिमा हौसिंग सोसायटी वार्ड नं ०१ ईदगाह संजय रोड मधील रहिवाशाशी संवाद यात्रेच्या निमित्ताने येथील रहिवाशांशी संवाद साधुन नुकतीच श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर - समाजसेवक - व - 🌲 झाडे लावा - झाडे जगवा- पर्यावरणाचा समतोल राखा 🌲 या वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन चळवळीचे श्रीरामपूर शहरातील प्रणेते -पुरस्कर्ते व तसेच रमजान महिन्यातील " इस्लाम समजून घेताना" या जागतीक प्रसिद्ध मालिका लेखनाचे लेखक व विविध स्थरातील सामाजिक चळवळीमध्ये सतत भाग घेणारं व्यक्तीमत्व डॉ .सलीम सिकंदर शेख, बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर यांची निकतीच महाराष्ट्र राज्यातील " विद्रोही सांस्कृतिक साहित्यिक चळवळी "चे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष पदी निवड झाली म्हणून आमदार श्री लहुजी कानडे साहेबांनी स्वतः हुन बोलावून सत्कार व सन्मान करण्यात आला.. त्यावेळी आपल्या खास भाषणात विद्रोही सांस्कृतिक साहित्यिक चळवळीच्या बाबतीत दहा मिनिटे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या बाबतीत गौरव उदगार काढून प्रशंसा केली. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नुकतीच उप- अध्यक्ष म्हणून निवड झालेले व प्रसिद्ध कवी रज्जाक शेख सर यांनी कार्यक्रमाचे आपल्या कवी मनाच्या शैलीत सूत्रसंचालन व प्रास्तावीक केलेत. 
यावेळी नगरसेवक राजेशजी आलघ, समाजसेवक रज्जाकभाई पठाण, मुख्याध्यापक हाजी जाकीर शहा सर , हाजी अल्ताफ शहा सर , सेंट्रल रेल्वे चे नईमखान पठाण , नदीम मेमन सोडावाला , राजु पठाण,व फातिमा हौसिंग सोसायटीतील रजा - ए- इलाही या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रजा शकूर शेख व त्यांचे विविध पदाधिकारी शोएब तांबोळी,सलमान शेख, जावेद शेख,परवेज शेख,आदिल शेख,सलमान पठाण व फातिमा हौसिंग सोसायटीतील विविध प्रतिष्ठित उपस्थितांनी ही आपल्या हस्ते ही डॉ सलीम शेख यांचा सत्कार सन्मान व कौतुक केले..


=================================
-----------------------------------------------
डॉ .सलीम सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर +९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



समीर काझी यांचा सत्कार


💐💐💐
- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
 काझी समाज सेवा संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष शफी काझीं यांचे बीड येथील बंधु समीर काझीं यांची महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीरामपूर शहर काझी मौलाना सय्यद अकबर अली काझी, अमजद अली शहर काझी सोलापूर व शफि काझीं (बीड), अहमदनगर प्रेस क्लबचे कार्यकारी सदस्य गुलामकादर जहागिरदार आदिंकडून सत्कार करण्यात आला.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================


शिक्षणात माता,पिता,बंधूची लाभली मोठी खंबीर साथ !



अन् यशात शिक्षक आणी
 गुरुजणांचाही मोठा हात !!

शिर्डीची कन्या कु.सोनाली काटकर बनली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक 

प्रयत्न करत रहा, एकदिवस नक्कीच तुम्ही देखील यशस्वी व्हाल - कु. सोनाली काटकर

- राजेंद्र बनकर - शिर्डी -/ वार्ता 
शिर्डीची भूमीकन्या सोनाली किसन काटकर हिची नुकतीच महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने तीचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
शिर्डीची भूमीकन्या व श्री साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी किसन पाराजी काटकर यांची सुकन्या आणी संदीप काटकर यांची धाकटी भगीनी कु. सोनाली काटकर हिने अगदी प्रतीकुल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. अनेकदा तीला अपयशाला सामोरे जावे लागले माञ कष्टाने व जिद्दीने तीने अखेर महाराष्ट्र लोकसेवा परिक्षेत उत्तीर्ण होत आपल्या यशाची वाट मोकळी केली आहे. सोनाली काटकरचे
 शिर्डीच्या पावननगरीत आगमन होताच मोठ्या जल्लोषात तीचे स्वागत करण्यात आले.यावेळी शिर्डी शहरात धनगर समुदायातील पहिल्याच मुलीने आपल्या कष्टाने व जिद्दीने हे यश संपादन केल्याने तीचे आगमन होताच फटाक्याची आतषबाजी व पुष्पवृष्टी करत केक कापून तीचे औक्षण करण्यात आले. शिर्डीची कन्या पोलीस अधिकारी झाली याचा सार्थ अभिमान शिर्डीकरांना असुन मुला - मुलीमध्ये कुठलाही भेदभाव न करता त्यांना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण घेऊ द्या, त्या नक्कीच आपल्या माता - पितांचे नाव उज्वल करतील असे मत यावेळी शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केले. 
तर या यशापर्यंत जाण्यासाठी मला मोठा संघर्ष करावा लागला माञ मी कधी जिद्द सोडली नाही, अनेकदा अपयश माझ्या नशीबी आले माञ हार न मानता,खचून न जाता प्रयत्न हे सातत्याने सुरुच ठेवले आणि शेवटी यश मिळाले असुन आयुष्यात संघर्ष अटळ आहे, यश तुम्हाला हुलकावणी देत असते, माञ अशावेळी हताश निराश न होता पुन्हा नव्याने आपले प्रयत्न सुरु ठेवावे, मग तुम्ही यशस्वी होणारच.
माझ्या या यशात माझे माता - पिता आणि बंधू संदीप काटकर यांची मोठी खंबीर साथ लाभली असुन,त्यांनी मला कधीच निराश न करता शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिले असुन
यासोबतच माझे शिक्षक आणी गुरुजण यांचाही यशात मोठा हात असल्याचे कृतज्ञ होत सोनाली काटकर हिने आपले अनुभव सांगताना स्पष्ट केले.
आपल्या मायभूमीत येताच केलेल्या सन्मानाबद्दल सोनाली काटकर हिने यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले.
          सोनाली काटकर च्या निवडी बद्दल राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर शिर्डी शाहरात धनगर समुदायातील पहिलीच कन्या ही पोलीस अधिकारी झाली असुन आमच्या कष्टाचे सार्थक झाले,यापुढे बहिण सोनालीने महाराष्ट्र शासनाच्या पोलिस खात्यात आपली प्रामाणिक सेवा करुन देशसेवा करावी असे मत संदीप काटकर यांनी व्यक्त केले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================