- श्रीरामपूर - प्रतिनिधी - /प्रतिनिधी - वार्ता -
भविष्यात ज्या ज्या ग्रामपंचायती नविन पाणीपुरवठा योजना करतील त्यांनी त्या योजना भंडारदरा कालव्याच्या पाण्यावर कराव्यात तरच भंडारदरातुन सुटणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनचा तालुक्याला फायदा होईल अन्यथा या पाण्यावर फक्त संगमनेर व राहाता तालुकाच हिरवेगार राहील असे प्रतिपादन मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त केले.
खोकर येथे विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण साहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत पाटील, जिल्हा बैंकेचे संचालक तथा श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, खासदार भाऊसाहेब वाक्चौरे यांचे चिरंजीव रोहीत वाकचौरे, काँग्रेसचे प्रदेश सरचीटणीस हेमंत ओगले, जिल्हा परीषदेचे बांधकाम समीतीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक राजू चक्रनारायण, उबाठाचे सदाशिव पटारे, सरपंच आशाबाई चक्रणारायण, उपसरपंच दिपक काळे, जयंत पाटील, गणेश छल्लारे आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत नुतन ईमारत लोकार्पण, ग्रामपंचायत कार्यालय दुसरा मजला बांधकाम भुमिपुजन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नुतन ३ वर्गखोल्यांचे उद्घाटन व नविन पथदिव्यांचे उद्घाटन आदि कार्यक्रम उपस्थितांच्या हस्ते पार पडले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित सोहळ्यात प्रस्तावना व सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजु चक्रणारायण यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. दुर्गावती पटारे, श्री. सदाशिव पटारे, तसेच सौ. सिंधुबाई दळवी व श्री तानाजी दळवी या दाम्पत्यांचे हस्ते विधीवत पुजन करण्यात आले.
यावेळी करण ससाणे,रोहीत वाकचौरे, हेमंत ओगले आदिंनी मनोगत व्यक्त करत विकासकामांचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या तर मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी विविध विकासकामांबद्दल खोकर ग्रामपंचायतचे कौतुक केले व बोलताना म्हणाले की, सध्या सर्वत्र केंद्र सरकाच्या जलजीवन योजना सुरु आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी नविन पाणीपुरवठा योजना स्थानिक गावातील विहीरीवर अथवा गावतळ्यावर न करता भंडारदरा कालव्याच्या पाण्यावर केल्यास उन्हाळ्यात सुटणाऱ्या पिण्याच्या रोटेशनमधुन योजनेला पाणी उपलब्ध होईल.सध्या सुरु असलेली निपाणी वाडगाव - खोकर ६१ कोटी रुपयांची जलजीवन योजना भंडारदरा कालव्यावर घेतल्याने त्या योजनेसाठी प्रत्येक रोटेशनमधुन त्यात पाणी सोडले जाणार आहे. श्रीरामपूरच्या पुर्वभागात ग्रामपंचायतच्या कुठल्याही पाणीपुरवठा योजना कालव्यावर नसल्याने पिण्याचे पाणी श्रीरामपूर च्या पुढे येत नाही. त्यामुळे त्या परीसरातील पाणीपातळी लवकर खाली जाते. तर संगमनेर, राहाता तालुक्यात अनेक पाणीपुरवठा योजना कालव्यालगत असल्याने हक्काने त्यांना पाणी दिले जाते, बंधारे भरले जातात. त्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना तशी विनंती असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर सध्या भंडारदरा धरण तर भरले परंतु जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरावे व आपले पाणी आपल्याच शेतीला मिळो अशी प्रार्थना सर्वांनी करावी असे ते म्हणाले.
यावेळी राजेंद्र सलालकर, लक्ष्मण चव्हाण, संजय काळे, प्रकाश पवार, रविंद्र पटारे, दत्तात्रय चव्हाण, जयवंता चव्हाण, शिवाजी दोंड, संजय पटारे, हरीभाऊ पवार, निवृत्त सैनिक नवनाथ पटारे, यशवंत पाटील, प्रकाश पवार, दत्तात्रय चव्हाण, निसार शेख, रावसाहेब चक्रणारायण, नंदकुमार सलालकर, रविंद्र पटारे, ज्ञानदेव पवार, शिवाजी सिन्नरकर, तानाजी दळवी, जयवंत चव्हाण, सुरेश गव्हाणे, फयाज सय्यद, अनिकेत सलालकर, रमेश पवार, मुन्ना सय्यद, रामनाथ गायकवाड, गोपीनाथ चक्रनारायण, ईंंजिनिअर राजू पठाण व विलास शिंदे, पोलीस पाटील अनिकेत चव्हाण आदि उपस्थित होते
श्रीरामपूरातील ग्रामपंचायतींनी नविन पाणीपुरवठा योजना भंडारदराच्या पाण्यावर कराव्यात - मा. आ. भानुदास मुरकुटे*
*खोकर ग्रामपंयतीचा कामाचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा मुरकुटे*
खोकर ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची यादी बघीतली असता ही यादी मी इतर गावातील कार्यकर्त्यांना दाखवणार असुन इतर ग्रामपंचायतींनी खोकर ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा असे मुरकुटे म्हणाले.
*दानशुरांनी ग्रामपंचायती साठी केली विनामोबदला भुमीदान*
खोकर येथे नुतन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीसाठी गावातील पाटिल परीवाराने स्व.दिगंबर पाटील यांच्या स्मरणार्थ २ गुंठे जागा विनामोबदला भुमीदान केली तर जलजीवन योजनेच्या पाण्याच्या टाकीसाठी गावातील माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी आपली २ गुंठे जागा ग्रामपंचायतीस विनामोबदला दान करत आदर्श उभा केला.याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने पाटील परीवार व चव्हाण परीवाराचा सन्मान करण्यात आला.
विरोधी सदस्यांची कार्यक्रमाकडे पाठ
दरम्यान ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत या आधीच झालेला उद्घाटन सोहळा पुन्हा करत असल्याचा आरोप करत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.तसेच कार्यक्रमस्थळी फ्लेक्स बोर्ड लावत या उदघाटन सोहळ्याचा निषेध केला. त्यावर भानुदास मुरकुटे यांनी प्रत्येक गावात असे डोक्यात उलटा खटका असलेले विरोधक असतातच असा टोमणा मारताच उपस्थितात एकच
=================================
-----------------------------------------------
हशा झाला.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - ✍️✅🇮🇳..भोकर
-----------------------------------------------
=================================