राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, October 12, 2024

महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्यामुळे गावाल भरीव निधी - शरद नवले

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
गेल्या २० वर्षात आला नाही इतका निधी महसुलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्याने बेलापुर गावास मिळाला तसेच शेती महामंडळाच्या मोफत मिळालेल्या ४३ एकर जमिनीमुळे गोरगरीबांची घरकुले, घनकचरा प्रकल्प, क्रिडा संकुलासह विविध समाजाच्या स्मशानभुमीचे प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन माजी जि प सदस्य शरद नवले यांनी केले. बेलापुर बु!! ग्रामपंचायतीच्या वतीने १५% मागासवर्गीय निधी व १० % महीला- बालकल्याण निधी मधुन मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल कुटुंबातील २०० विद्यार्थीनींना सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी श्री. नवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते, जनसेवा पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुवालाल लुंक्कड हे होते.
आपल्या भाषणात शरद नवले पुढे म्हणाले की, शासनाकडून मोफत मिळालेल्या ४३ एकर जमीनीमुळे गावातील१२०० कुटुंबाचा घरकुलाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, निराधार नागरीकांनाही सुविधा उपलब्ध होणार आहे. गावातील घनकचरा व सेंद्रिय खत प्रकल्प तसेच अनेक समस्या सूटणार आहेत.गावकरी मंडळाच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे होत असुन हि विकासकामे सहन होत नसल्यामुळे ज्यांना सत्तेवर असताना काही करता आले नाही असे निष्क्रिय लोक विनाकारण ग्रामपंचायतीची बदनामी करत आहे. माहीती अधिकाराचा दुरुपयोग करुन गावाच्या विकासकामांना आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही नवले यांनी केला. प्रास्ताविक भाषणात बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की,नाम.राधाकृष्ण विखे तसेच माजी खा.डाॕ.सुजय विखे यांच्या सहकार्यामुळे कधी नव्हे ती भरीव विकासकामे होत आहेत. १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना लवकरच पूर्णत्वास जाणार आहे.ही विकासकामे देखवत नसल्यामुळे काही विघ्नसंतोषि विनाकारण उठाठेव करत आहेत. कन्या दिनाचे औचित्य साधून नवरात्री उत्सवाच्या काळामध्ये शाळकरी मुलींना सायकल वाटप होत असल्याचा विशेष आनंद होत आहे असे .खंडागळे म्हणाले. यावेळी सरपंच स्वाती आमोलीक, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य पुरुषोत्तम भराटे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड, पत्रकार देविदास देसाई, गावकरी पतसंस्थेचे संचालक मोहसीन सय्यद आदिनी मनोगत व्यक्त केले. सायकल वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य करणारे जे.टी. एस हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय पुजारी, क्रीडाशिक्षक पोपटराव गावडे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन साळूंके, खंडेलवाल सायकल मार्टचे गोपाल खंडेलवाल आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील सर्व शाळेतील २०० विद्यार्थींनीना सायकल वाटप करण्यात आले.कार्यक्रमास उपसरपंच तबस्सूम बागवान, माजी उपसरपंच मुस्ताक शेख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, प्रियंका कुऱ्हे, सुशिलाबाई पवार, मीना साळवी, उज्वला कुताळ, भाऊसाहेब कुताळ, सुधाकर खंडागळे,विष्णुपंत डावरे, राज मोहम्मद शेख बाबूलाल पठाण, पोलीस पाटील अशोक प्रधान,तस्वर बागवान, गणेश बंगाळ, रावसाहेब अमोलिक,सुभाष अमोलिक,अन्नूभाई सय्यद,भैय्या शेख, दिलीप दायमा, दिपक क्षत्रिय,प्रसाद खरात,मास्तर हुडे, सुभाष आमोलीक दिलीप अमोलिक, माजी उपसरपंच अशोक गवते,रमेश शेलार, राजमोहम्मद शेख,रफिक शेख,रविंद्र कुताळ,राकेश कुंभकर्ण,प्रविण बाठीया, शहानवाज सय्यद,रविंद्र कोळपकर,गोरख कुताळ, जब्बार पठाण,राजेंद्र कुताळ, राजेंद्र काळे,किरण गागरे, मोहसीन सय्यद, गोपी दाणी, भाऊसाहेब तेलोरे,सुभाष शेलार,सोमनाथ जावरे, दिलीप दायमा प्रभात कुऱ्हे, शफिक बागवान, विशाल आंबेकर,बाळासाहेब शेलार, अल्ताफ शेख,विनायक जगताप,सुनिल भांड,सागर खरात,प्रभाकर ताके,सुधीर तेलोरे, सुलतान शेख, अली सय्यद,राज गुडे, अमिन सय्यद, फिरोज बागवान यांचेसह पालक, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी निलेश लहारे यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ता संकल्प मेळावा उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/वार्ता -
शहरातील लक्ष्मी त्र्यंबक मंगल कार्यालय या ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्ता संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधान मंडळाचे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या निवडणूकपूर्व कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा म्हणजे प्रचंड मोठे शक्तीप्रदर्शनच होते. दस्तूरखुद्द विधिमंडळ पक्षाचे नेते आ. थोरात यांची उपस्थिती व त्यांच्याच हस्ते प्रकाशित करण्यात आलेला आ. कानडे यांच्या कार्यकाळातील जनकार्य अहवालाचे प्रकाशन या गोष्टी श्रीरामपूरची उमेदवारी पुन्हा विद्यमान आमदार लहु कानडे यांनाच मिळेल याचे स्पष्ट संकेत आहेत. यामुळे पक्षातीलच एका इच्छुकाने उमेदवारी बाबत निर्माण केलेल्या संभ्रम आ. थोरात यांच्या उपस्थित असण्याने दूर झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.

श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संकल्प मेळावा पार पडला. यावेळी आ. कानडे यांच्या सन २०१९ - २०२४ या कार्यकाळातील जनकार्य अहवालाचे तसेच आ. कानडे लिखित पाच पुस्तकांचे प्रकाशन आ. थोरात, ज्येष्ठ साहित्यिक व माजी संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी आ. डॉ. सुधीर तांबे हे होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष लताताई डांगे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, अमृत धुमाळ, माजी नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, रवींद्र गुलाटी, राजेश अलग, मुख्तार शहा, विजय शेळके, कलीम कुरेशी, प्रकाश ढोकणे, मोहम्मद शेख, सलीम शेख, भाऊसाहेब मुळे, मल्लू शिंदे, प्रा. कार्लस साठे, ॲड. समीन बागवान, अशोक कारखान्याचे माजी संचालक लाल पटेल, राहुरी बाजार समितीचे संचालक रखमाजी जाधव, आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, पी. एस. निकम, विष्णुपंत खंडागळे, श्रीरामपूर विधानसभा पक्ष निरीक्षक मधुकरराव नवले यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. कानडे यांनी पाच वर्षात केलेली विकास कामे त्यांच्या जनकार्य अहवालात सामावली आहेत. त्यांनी स्वतःचे कौशल्य वापरून विकास कामांसाठी निधी आणून कामे केली. त्यासाठी मोठी धडपड केली. साहित्यिक लेखक प्रशासकीय कामाचा अनुभव तसेच विकास कामांचा ध्यास असलेले आ. कानडे माझ्यासोबत विधानसभेत असणे आवश्यक आहे. आ. कानडे लेखक आहेत. जीवनाचा अर्थ सांगणारे समाज जीवनातील दोषांवर बोट ठेवणारे व त्याचे उत्तर सांगणारे लेखक आहेत. लेखक व प्रशासनातील अधिकारी राजकारणात येऊन समाजाचे दुःख समजावून घेऊन त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतात, त्याचे उत्तम उदाहरण आ. कानडे आहेत. त्यांनी सुंदर पुस्तकांची निर्मिती केली आहे. पाच वर्षातील कार्यकाळाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे. त्यांचे व माझे जीवाभावाचे नाते आहे. राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता येण्यासाठी या पक्षाचे आमदार अधिक असणे आवश्यक असून त्यासाठी आ. कानडे हे आपल्यासोबत असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी आ. थोरात यांनी केंद्र सरकार व राज्यातील महायुती शासनावर जोरदार टीका केली. धर्माचे राजकारण करायचे, दंगली घडवायच्या आणि आपल्या मतांची पोळी भाजायची, ही भाजपाची पद्धत आहे. केंद्र राज्यातील सरकारचा उद्देश पुन्हा चातुर्वाद, मनुवाद आणणे हा आहे. हे सरकार देश, समाज व संविधान मोडायला निघाले आहेत, हे जनतेने ओळखले पाहिजे. सत्तेसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना आणली मात्र त्यांना बहिण लाडकी नसून सत्ता लाडकी असल्याची टीका त्यांनी केली.

आ. कानडे यांच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात चमत्कार घडल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले, राजकारणात खूप कमी साहित्य आहेत. तसेच साहित्य समजून घेणारे खूप कमी राजकारणी आहेत. लेखक साहित्यिक व प्रशासकीय अनुभव असणारे विधानसभा निवडणुकीला उभे राहून जिंकून येणारे दुर्मिळ उदाहरण म्हणजे आ. कानडे होय. ते समोरच्या दाराने आले आहेत. राज्याच्या साहित्य क्षेत्रातील हे नवे वळण आहे. राजकारण सुंदर स्वच्छ व नैतिक व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील माणसांचा वावर वाढला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसांचा विश्वास वाढतो, चांगले राजकारण पाहिजे असेल तर चांगल्या माणसाला निवडून दिले पाहिजे. जाती-धर्माच्या, पंथाच्या प्रवाहाचे राजकारण समाजाला नको आहे. समाजाचा विचार करणारा हा साहित्यिक असल्याचे ते म्हणाले.

आ. थोरात कमी बोलतात परंतु निर्णय योग्य घेतात. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगून डॉ. तांबे म्हणाले, आ. कानडे यांनी जनकार्य अहवालातून केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांना सुराज्य पाहिजे होते. संविधानाच्या माध्यमातून जनतेला मतांचा अधिकार मिळाला. परंतु हे संविधान मोडण्याचे काम सुरू आहे. संविधान वाचवण्याची जनतेची जबाबदारी आहे. सोंग घेऊन येणारे लोक खूप असतात. त्यांना ओळखायला शिकले पाहिजे. लोकशाहीच्या बाजूने उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. अन्यथा पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, तालुक्यातील जनतेने २०१९ साली मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आपण ती जबाबदारी मानली. या कार्यकाळात आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रामाणिकपणे काम केले. मतदारांसमोर केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे, ही भूमिका घेऊन आपण अहवाल प्रकाशित केला आहे. आ. थोरात केवळ गटनेते नसून ज्येष्ठ नेते आहेत. महायुती सरकार आल्यापासून त्यांनी विधानमंडळात सर्वाधिक प्रश्न विचारले. जनतेचे दुःख प्रश्न त्यांनी मांडले आहेत. काँग्रेस पक्ष अनेक संकटातून गेला आहे. मात्र आ. थोरात पक्षाला बळ देत ठामपणे उभे आहेत. प्रतिगामी शक्तीने धर्मांध नावाने राजकारण सुरू केले. त्याने प्रत्येक म्हणून व्यथित झाला आहे. भाजपची मंडळी समाजात विस्फोट निर्माण करू पाहत आहे. अशावेळी आ. थोरात यांनी काँग्रेसचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असल्याचे सांगून आ. कानडे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.

महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष लताताई डांगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अंजुम शेख, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, अमृत धुमाळ, सचिन ब्राह्मणे, मल्लू शिंदे, शिवाजी गांगुर्डे, विष्णुपंत खंडागळे, अनिल ढोकचौळे, दवणगावच्या खपके ताई यांनी आपल्या मनोगतातून आ. कानडे यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेत येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी करत त्यांना पुन्हा निवडून आणू, अशी ग्वाही दिली. आमदार कानडे एकटे असल्याचे विरोधक सांगत होते. मात्र तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ. कानडे यांना समर्थन देत त्यांना निवडून आणण्यास कटिबद्ध आहोत, असे सांगत विरोधकांना चोख उत्तर दिले तसेच आ. थोरात यांच्या स्पष्ट संकेताने त्यांना मोठी चपराक मिळाली, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.
ऍड. समीन बागवान यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महिला तालुकाध्यक्षपदी प्रीतीताई जगताप यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना आ. थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उद्योजक अंकुश कानडे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, बाबासाहेब कोळसे, रज्जाक पठाण, दीपक कदम,अक्षय नाईक, मुदस्सर शेख, संभाजी कदम, सुखदेव मुसमाडे, नारायण टेकाळे, अजय खिलारी, रवीअण्णा गायकवाड, सचिन ब्राह्मणे, शिवाजी शेजुळ, डॉ. सर्जेराव सोळंके, दीपक पवार, महिला तालुकाध्यक्ष प्रीतीताई जगताप, तालुका समन्वयक रुबीना पठाण, कविताताई कानडे, विजय शेलार, सुरेश पवार, सरपंच अविनाश पवार, आबा पवार, रमेश आव्हाड, राजेंद्र कोकणे, राजेंद्र ओताडे, सरपंच सागर मुठे, अमोल आदिक, हरिभाऊ बनसोडे, प्रताप पटारे, सुदाम पटारे, दीपक निंबाळकर, नानासाहेब रेवाळे, महेश खंडागळे, अनिल बीडे, ऍड. मधुकर भोसले, संदीप दांगट, शिवाजी वाबळे, नानासाहेब बडाख, विलास तुपे, बाळकृष्ण मुंगसे, भाऊसाहेब थेवरकर, नारायण रिंगे, आप्पासाहेब पवार, ज्ञानेश्वर बिडगर, सुभाष नान्नोर, शरद पवार, युवराज पवार यांच्यासह श्रीरामपूर तालुका शहर व ग्रामीण तसेच राहुरी तालुक्यातील ३२ गावातील गाव कारभारी, मतदार संघातील मराठा,आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूरमध्ये सकारात्मक विचारांचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे शिबीर संपन्न


श्रीरामपूर :- विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजनकरण्यात आले होते. यावेळी सर्व समाजातील तरूण तरूणी व सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कवी आनंदा साळवे, कवी रज्जाक शेख व शाहीर भीमराव कदम यांच्या प्रबोधनपर शाहिरी व कवितानी करण्यात आली. या कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी श्रीरामपूर तालुका विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष डॉ. सलीम शेख होते. उद्धघाटनाच्या कार्यक्रमामध्ये जीवनसुरुडे, जीवन मकासरे यांनी सांस्कृतिक, सामाजिक चळवळी पुढे असलेल्या आव्हानांबाबत आपले विचार मांडले. या कार्यक्रमामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीची ध्येय धोरणे याबाबत राज्य सचिव डॉ. जालिंदर घिगे यांनी मांडणी केली. पहिल्या दिवशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी विद्रोही कोणाला म्हणायचे आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीची गरज याविषयावर मार्गदर्शन केले.त्यानतंर प्रा. राहुल हांडे यांनी अहमदनगर जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास आणि नाथ सुफी परंपरा या विषयावर अनेक उदाहरणा सह मार्गदर्शन केले. संध्याकाळी शाहीर भीमराव कदम आणि सहकाऱ्यांनी चळवळीची गाणी सादर केली. दुसऱ्या दिवशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्याध्यक्ष येथील कॉ. धनाजी गुरव यांनी "महाराष्ट्रातील आरक्षणाचे लढे आणि त्यामागील राजकारण " या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सोलापूर येथील ज्येष्ठ विचारवंत सरफराज अहमद यांनी "सुफी परंपरेचा इतिहास आणि त्या विरोधातील कटकारस्थाने या विषयावर संदर्भासह मार्गदर्शन केले. समारोपाच्या सत्रामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या पुढील वाटचालीबद्दल डॉ.सलीम शेख, गोरख आढाव, अनिल शेंडे व विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. या शिबिराच्या आयोजनासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉ. सलीम शेख, तालुका सचिव अशोक दिवे, विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार भिंगारे, अमोल सोनवणे, यांनी परिश्रम घेतले. शिबिरासाठी प्रवीण कोंडार, नवनाथ भांगरे, नामदेव धराडे, दीपक भांगरे, संकेत कोरडे, इंजि. राजू पठाण, अकबर भाई शेख, इक्बाल काकर, संगमनेरचे डॉ. एजाज शेख, सलीमखान पठाण, शरिफ शेख, अहमदनगर येथील कॉ. फिरोज शेख, काँ. फय्याज इनामदार, इब्राहीम शेख, डॉ संजय दुशिंग, रंभाजी कोळगे, रामदास आढाव, वसंत पवार, रफिक शेख, डॉ.पुनम साबळे, कविता दिवे आदींनी परिश्रम घेतले. 
या संपुर्ण दोन दिवसाच्या शिबीराचे सूत्रसंचालन विद्रोहीचे सचिव अशोक राव दिवे यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
लेखक :- ✍️✅🇮🇳...डॉ सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================

Thursday, October 10, 2024

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत भव्य योगा स्नेह मेळावा तसेच भारत प्रोजेक्ट आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 
 तालुक्यातील आर्ट ऑफ लिव्हिंग साधक 
या माध्यमातुन सर्वच साधकांसाठी योगा तसेच विविध कार्यक्रम संपन्न झाले तसेच होणार आहे तरी याकरिता श्रीरामपूर आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने भारत प्रोजेक्ट अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विकास कामाचे नियोजन करण्यात आले व तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावयाची या संदर्भात बैठक करण्यात आली यासाठी जिल्हा समन्वयक पद्माकर भैय्या कुलकर्णी तसेच श्रीरामपूर तालुक्यातील दिनेश भैय्या चव्हाण, एडवोकेट तात्या बनगे, एडवोकेट जयंत चौधरी, सोमनाथ शेठ महाले, राजेंद्र थोरात,  महेश पठारे,  एकनाथ भाऊ जोंधळे,पवन भैय्या, बाळासाहेब गोरे मामा, विजय सूर्यवंशी, अर्चनाताई सानप या सर्वांच्या उपस्थितीत भारत प्रोजेक्ट अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.सर्वांचे आभार श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कसार यांनी मानल

=================================-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई, वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

… तर मतदानावर बहिष्कार टाकू - सुरजभाई आगे


- श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व "शिवप्रहार"च्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह "श्रीरामपूर जिल्हा" व्हावा या मागणी करताच्या साखळी उपोषण आंदोलनाचा आज दि.१० ॲाक्टोबर २०२४ रोजी ५६ वा दिवस आहे.
      श्रीरामपूर शहरातील वार्ड ०७, बेलापूररोड, बजरंगनगर या ठिकाणी चालू असलेल्या या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मुंडन आंदोलन करण्यात आले.
४० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिण्यात आले. ५० दिवस पुर्ण झाल्यावर काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला.
     श्रीरामपूरसह नगर जिल्ह्याच्या इतिहासात ५६ दिवस इतक्या दीर्घकालीन आंदोलन झाले नाहीये. तरीदेखील जर अजूनही सरकार दखल घेणार नसेल, आचारसंहितेआधी सरकार मागण्यांबाबत ठोस कृतीशील कार्यवाही करणार नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सर्व व्यापारी बांधव, श्रीरामपूर जिल्हा कृती समिती सदस्य व शिवप्रहारच्या मावळ्यांसोबत विचारविनिमय करून मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असे शिवप्रहारप्रमुख,माजी पी.एस.आय सुरजभाई आगे यांनी स्पष्ट केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳... B
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

स्वतंत्रता सेनानी सरसैय्यद अहमद खान जयंती निमित्त अलकरम हॉस्पिटल तर्फे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
स्वतंत्रता सेनानी सरसैय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त अलकरम हॉस्पिटलच्या वतीने व आनंदऋषी जी नेत्रालय अहमदनगर यांच्या सहकार्याने रविवार दिनांक १३ अक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते १ वाजे पर्यंत अल-करम हाॅस्पिटल इंगळे मेडिकल मागे किंग्जगेटरोड रामचंद्रखुंट शहादवाल दर्गा समोर अहमदनगर येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे तसेच चष्मे अल्पदरा मध्ये देण्यात येणार असल्याची माहिती संयोजक तौफिक तांबोली यांनी दिली. 
तपासणीसाठी नांव नोंदणी आवश्यक आहे. येताना रुग्णांनी रेशन कार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र यापैकी एकाची झेरॉक्सप्रत दोन पासपोर्ट फोटो, घेऊन येणे. शस्त्रक्रिया करण्याचे तपासणी नंतर ठरल्यास रुग्णांना आनंदऋषी मध्ये नेवुन शस्त्रक्रिया केली जाईल. तरी या संधीचा रुग्नांनी लाभ घ्यावा व नांव नोंदणीसाठी शेरअली शेख यांच्याशी 9921991492, 9860708016 व 02412423333 या नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन आयोजकां मार्फत करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
----------------------------------------------
=================================


आठवणीतले रतन टाटा


अखेर रात्री उशिरा ती दु:खद बातमी समजलीच.बहुतांशी भारतीयांच्या दैनंदिन जीवनात आणि मनामनात आदर स्थानी राहिलेले टाटा उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा हे आता शरीराने कधीच समक्ष पाहता येणार नाहीत.आयुष्यात कधीतरी अशा असामान्य व्यक्तिमत्वांना समक्ष भेटता येईल का,त्यांच्याशी बोलता येईल का, हस्तांदोलन करता येईल का असे अनेकांना वाटते,मलाही वाटायचे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आमचे मार्गदर्शक, पद्मविभूषण डॉ. माशेलकर सर आणि आमचे कौटुंबिक स्नेही होते असे आणखी एक मार्गदर्शक, महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार सर या दोघांकडून रतन टाटा यांच्याविषयीच्या आठवणी अनेकदा ऐकल्या. माशेलकर सरांवरील मी लिहिलेल्या *दुर्दम्य आशावादी* या चरित्रग्रंथात त्यातील काही आल्या आहेत.
           त्या आठवणी ऐकून तर रतन टाटा सरांची भेट झालीच पाहिजे असं खूप मनापासून वाटू लागलं. विशेष म्हणजे असा योग हुबळी इथं एकदा तर मुंबईत एकाच ठिकाणी सलग तीन वर्षे असा चार पाच वेळा आला,तोही माशेलकर सर आणि इनामदार सरांमुळेच.
          हुबळी येथील एका कार्यक्रमासाठी माशेलकर सरांबरोबर प्रवास होता. हुबळी इथं तर माशेलकर सर, रतन टाटा, इन्फोसिसचे डॉ. नारायण मूर्ती,सौ. सुधा मूर्ती, गुरुराज देश देशपांडे यांच्या सहवासात पूर्ण एक दिवस होतो, त्यांच्या गप्पा, हास्य विनोद,त्यांची प्रेरणादायी व्याख्याने,काही संस्थांना भेटी हे सर्व जवळून अनुभवता आलं.
             अरविंद इनामदार फाऊंडेशनचा एक विश्वस्त या नात्याने तर मुंबईत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात खास पोलिसांसाठी आयोजित पुरस्कार प्रदान सोहळा आयोजनात मला सहभागी होता आले. इनामदार सर प्रास्ताविक करायचे आणि आभार मानायची जबाबदारी माझ्यावर.
                   यानिमित्ताने रतन टाटा यांचे स्वागत करण्यापासून ते चहापान,बोलणे आणि सहभोजनाचाही आनंद लाभला.पहिल्या वर्षी इनामदार फाऊंडेशनचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी असलेले पुरस्कार रतन टाटा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, पुढील वर्षी माशेलकर सरांच्या हस्ते आणि टाटा सर प्रेक्षकांत बसलेले. नंतर माशेलकर सरांमुळे डॉ. नारायण मूर्ती आले आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा सुरू असताना टाटा आणि माशेलकर सर दोघेही प्रेक्षकांत बसून आनंद घेत होते. 
     या सगळ्या आठवणी स्वतंत्र लेखातूनच सविस्तर लिहाव्या लागतील इतक्या त्या ह्रद्य आहेत.
             हे सारं त्यावेळी अनुभवताना, आठवताना आजही,मनात एकच भावना दाटून येते,ती कृतार्थतेची.
               रतन टाटा सरांना भावपूर्ण आदरांजली 

±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*डॉ. सागर देशपांडे*✍️✅🇮🇳...
मुख्य संपादक
 मासिक जडण - घडण, पुणे
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================