राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, October 14, 2024

पर्यावरण हा जगण्याचा भाग - प्रमोद मोरेसभेत पर्यावरण विषयक स्पर्धा आणि कार्यालय सुरू करण्याचा ठराव संमत


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन पर्यावरणाच्या समतोलासाठी आवश्यक असून पर्यावरण हा सर्वांच्या जीवनाचा आणि जगण्याचा भाग आहे, असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी व्यक्त केले. 
अहिल्यानगर (अहमदनगर) सावेडी येथील सिद्धिविनायक मंदिरात नुकतीच निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाची सभा कार्याध्यक्ष छायाताई राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, अध्यक्ष प्रमोद मोरे, सचिव वनश्री मोरे-गुणवरे,  सचिव डॉ. अनिल लोखंडे, सरपंच बाळासाहेब ढोले यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वप्रथम  सिद्धिविनायकास पुष्प वाहून वंदन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक व स्वागत राज्य संघटक डॉ. शरद दुधाट यांनी केले. याप्रसंगी मंडळातील पदाधिकारी यांची वेगवेगळ्या निवडीबद्दल व विशेष प्राविण्याबद्दल डॉ. अनिल लोखंडे, डॉ. शरद दुधाट, संतोष परदेशी, चंद्रकांत भोजने, वर्षाताई घुले, उत्तम पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आंबीखालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, कार्याध्यक्ष संतोष परदेशी, जिल्हाध्यक्ष लतिका पवार, सचिव डॉ. अनिल लोखंडे, जिल्हाध्यक्ष तुकाराम आडसूळ, अर्जुन राऊत, महादेव लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी  सजीवांच्या अस्तित्वासाठी प्राणवायू खूप मोलाचा असून पर्यावरण आणि वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. तसेच प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मंडळाच्या यशस्वी वाटचालीबद्दल त्यांनी कौतुक केले. प्रमोद मोरे यांनी सभेतील विविध विषयांचे सविस्तर विवेचन केले तर अध्यक्षा छायाताई राजपूत यांनी मंडळाच्या तालुक्यानुसार शाखा सुरू कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी डॉ. प्रवीण गुणवरे, बाळासाहेब गाडेकर, अशोक भोसले, प्रकाश केदारी, राजेश परदेशी, मोहन खवळे, आशा कांबळे, मदन राजपूत, पद्मा राजपूत, राजेंद्र आहेर, राजश्री आहेर, चंद्रकांत भोजने, बाळासाहेब बोडखे यांच्यासह पर्यावरण मंडळातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष लतिका पवार व अवधूत पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार कार्याध्यक्ष संतोष परदेशी यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ. शरद दुधाट, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


साजापूर जि.प.उच्च प्राथमिक शाळेत रंगले एकपात्री सांस्कृतिक कार्यक्रम


साहित्यिक अय्युब पठाण लोहगांवकर यांच्या मधूर आवाजाने विद्यार्थी मंत्रमुग्ध

- पैठण - प्रतिनिधी -/ वार्ता -
प्रसिध्द साहित्यिक तथा शाहू विद्यालय जायकवाडी उत्तर ता. पैठण येथील सहशिक्षक अय्युब पठाण लोहगावकर यांनी नुकतेच छ्त्रपती संभाजीनगरच्या जवळ असेलेल्या साजापूर येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत " मुले रंगली काव्यात " हा धमाल विनोदी एकपात्री आणि संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. यामध्ये श्री.अय्युब पठाण यांनी मधुर आवाजात देशभक्तीपर गीते, भारूड, पोवाडे, पाळणे, शालेय गीते, बोधात्मक विनोदी नकला सादर केल्या. तर बिडकीन येथील शालीमन शिंदे यांनी अय्युब पठाण यांना ढोलकीवर उत्कृष्ट साथ देऊन कार्यक्रमात रंगत आणली. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक धनंजय नागमवाढ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात साहित्यिका तथा उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती अलकनंदा घुगे- आंधळे हे होते.तसेच शेख इलियास, अबूजर पठाण, मुदस्सर पठाण यांची कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यास शिक्षक- अनिल जाधव, भास्कर गोपाल, देविदास काळे तसेच शिक्षिका- ज्योती ढोमणे, अश्विनी मोरे, प्रिती गंगवाल, सोनाली रेसवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

इंटक च्या राज्य कार्याध्यक्षपदी अरुणभाऊ विरकर यांची नियुक्ती


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र इंटक ची नवनिर्वाचीत कार्यकारणीची सभा मुंबई येथे नुकतीच संपन्न झाली. 
यामध्ये राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या महाराष्ट्र इंटक शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारणीच्या सदस्यपदी तसेच महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस (इंटक) च्या राज्य कार्याध्यक्षपदी अरुण विरकर यांची सर्वानुमते नियुक्ति करण्यात आली.
तथा महाराष्ट्र इंटक अध्यक्ष कैलासभाऊ कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस चे सरचिटणीस दादारावजी डोंगरे उपस्थित होते.

        यावेळी बोलताना महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, आपण आपल्या कार्यक्षेत्रात संघटीत व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करून संघटना वाढवाल तसेच महाराष्ट्र इंटकचा नावलौकिक वाढवाल असा इंटकच्या सर्व सदस्यांना विश्वास असल्याचे नमूद करत अरुण विरकर यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳... 
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Sunday, October 13, 2024

मोटारसायकल गोदापात्रात पडून कमालपूर बंधार्‍यात चौघे बुडाले



माळवडगाव :- 
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीवरील कमालपूर केटीवेअर बंधार्‍यावरून शेतमजुरीची कामे आटोपून मोटारसायकलवरून घराकडे जात असताना एका वृध्द महिलेसह चौघे जण बंधार्‍यावरून पाण्यात पडून बुडाले. एकास वाचविण्यात मासेमारी करणार्‍या तरुणांना यश आले असून वृध्द महिलेचा मृतदेह सापडला आहे. अन्य दोघांचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता. शनिवारी दसरा सणाच्या दिवशीही पावसाच्या शक्यतेमुळे शेती कामे सुरूच होती. दिवसभर मोलमजुरीची शेतातील कामे आटोपून हे आदिवासी समाजातील मजूर सायंकाळी सुर्यास्तासमयी नदीकाठावरील घराकडे निघालेे होते.

मात्र कमालपूर बंधार्‍यावरून दुचाकी, चारचाकी वाहन चालविणे म्हणजे मोठी कसरत असते. बंधार्‍यालरील काँक्रिट खड्ड्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सणाचा दिवस असल्याने घराकडे जाण्यासाठी उशीर झाल्याने घाईगडबडीत खड्ड्यांमुळे चालकाचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. बंधार्‍यास लोखंडी कठडे नसल्याने मोटारसायकलसह चौघेजण बंधार्‍यातील पाण्यात भामाठाणच्या बाजूने पडले. सायंकाळच्या वेळी बंधार्‍यावरून तुरळक वर्दळ सुरू होती. आरडा-ओरड झाल्यावर स्थानिक लोक मदतीला धावले. श्रीरामपूर हद्दीतील बंधार्‍यावर पाटबंधारे कर्मचारी सोमनाथ शिरसाठ जवळच राहतात. ते घटनास्थळी मदतीला धावून आले. स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने सुरू झालेल्या मदतीने या चौघांपैकी मच्छिंद्र गोपीनाथ बर्डे (वय 25) याला वाचविण्यात यश आले. तर वेणुबाई मनोहर बर्डे (वय 70) या वृध्द महिलेचा मृतदेह सापडला. मात्र दिलीप सोमनाथ बर्डे (वय 30) व रवी सोमनाथ मोरे (वय 25) या दोघांचा रात्री 11 वाजेपर्यत शोध सुरु होता. मात्र त्यांचा शोध लागलेले नव्हता.

यावर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यातील पाण्याचा फुगवटा कमालपूर बंधार्‍यापर्यंत आलेला आहे. त्यामुळे बंधार्‍यात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. यामुळे बंधार्‍यात पडलेल्या तरुणांना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. दरम्यान रात्री उशिरा ही शोध मोहिम थांबविण्यात आली. आज रविवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील आपत्ती निवारण पथक येणार असून त्यानंतर दोघांचा शोध पुन्हा सुरु होणार आहे. बंधार्‍यात बुडालेले हे सर्व आदिवासी समाजाचे व कमालपूर गावातील असल्याने ग्रामस्थांसह आदिवासी बांधवांवर शोककळा पसरली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



विकासाचे व्हिजन असलेल्या खोरेंचा भविष्यकाळ उज्ज्वल - ना. विखे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/वार्ता -
शहरातील राजकारणात विकासाचे व्हिजन ठेवून काम करणाऱ्या केतन खोरे व माजी नगरसेविका स्नेहल खोरे यांना भविष्यात मोठी संधी असून त्यांना ताकद देण्याचे काम आपण करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 
यावेळी माजी आ. भाऊसाहेब कांबळे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, नानासाहेब पवार, शरद नवले, जयबाबाचे बाळासाहेब आगे, गणेश मुदगुले, शंतनू फोफसे, नितीन भागडे, अशोक सातुरे, चंद्रशेखर आगे आदी उपस्थित होते.
प्रभाग क्र.१६ मधील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना ना.विखे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह आम्ही फक्त जनतेच्या विकासाचे धोरण अवलंबत संपूर्ण राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. त्याच धर्तीवर केतन व स्नेहल खोरेंनी शहरात सर्वाधिक निधी आणत प्रभागातील जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम केले. आगामी काळात खोरे यांच्या पाठीशी जनतेने राहून विकासाला साथ द्यावी आम्ही त्यांना नक्कीच ताकद देऊ असे अभिवचन विखे पाटलांनी दिले.
तर केतन खोरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानत गेल्या ८ वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती दिली.
यावेळी लक्ष्मी आई रस्ता, अशोका पार्क ते गाढे यांचे घर दक्षिण - उत्तर रस्ता डांबरीकरण, अशोका पार्क पलीकडील लबडे पाटील यांचे घरासमोरील रस्ता डांबरीकरण, पूर्णवादनगर चर ते शेलार, भोंगळ वस्तीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण, स्व.राजेंद्र महांकाळे यांचे घर ते गौतमनगर ते करडीले सर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण, डॉ.भारत गिडवाणी यांचे घरासमोरील रस्ता डांबरीकरण, म्हसोबा महाराज चौक येथे हायमास्ट, पूर्णवादनगर गाढे यांचे घराच्या कॉर्नरला हायमाक्स बसविणे आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

निपाणी वडगांव शिव आणि शक्तीचे अधिष्ठान - ह.भ.प. डॉ. शुभम महाराज कांडेकर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
श्रीरामपूर तालुक्यातील (निपाणी वडगांव) अशोकनगर येथील जागृत देवस्थान श्री क्षेत्र जगदंबा देवी मंदिर या ठिकाणी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी उपस्थित भावीक भक्त यांना मार्गदर्शन करताना श्री आदिमाया आदिशक्ती जगदंबा देवीचा महिमा तसेच निपाणी वडगांव हे शिव आणि शक्तीचे अधिष्ठान असल्याचे प्रतिपादन केले, तसेच धार्मिक कार्यामध्ये येथील भाविकांचा सदैव उत्स्फूर्त प्रतिसाद असून या उत्सवाच्या माध्यमातून परिसरात धार्मिक परंपरा जोपासली जाते असे ते म्हणाले.
यावेळी श्री वीरभद्र मंदिर व श्री जगदंबा देवी मंदिर अशोकनगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, किर्तन प्रसंगी परिसरातील बाल वारकरी यांनी टाळ मृदुंग विणा हातात घेऊन सेवा दिली. तसेच सप्ताह कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ .आरती . भजन सेवा असे दैनंदिन नित्य उपासना व कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी श्री मोहठा - जंगदबा देवी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते.
सायंकाळी रथामधुन सवाद्य देवीची मिरवणुक काढण्यात आली या नंतर महाआरती संपन्न झाली.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 यावेळी ग्रामपंचायत तसेच विविध कार्यकारी सोसायटी विविध संघटना, सामाजिक, राजकीय तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे पो.हवा. संतोष परदेशी, पो.ना. किरण टेकाळे, पो.कॉं. प्रविण कांबळे, गृहरक्षक दलाचे चंद्रकांत मोरकर जरीना सय्यद, राजेन्द्र देसाई आदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील होते.
 श्री जगदंबा देवी ट्रस्ट यांच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

शब्दगंध च्या वतीने पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन


- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
  “एप्रिल २०२३ ते आक्टोबर २०२४ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, लेखसंग्रह,कादंबरी,बालवाडमय ,संशोधन ग्रंथ,समीक्षा ग्रंथ च्या दोन प्रती राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी पाठवाव्यात ” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे. 
       शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक,कवींना प्रोत्साहन व प्रेरणा देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात.त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन, परिसंवाद,चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा,पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, बालसंस्कार शिबीर इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.यावर्षी “ सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन ” लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुस्तकं मागविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
          सन २०२३- २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती, परिचय,पोस्टाची रु.५ ची ५ तिकिटे, १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद,फुलोरा,लक्ष्मी कॉलनी,तपोवन रोड, सावेडी,अहमदनगर – ४१४००१ - मो.९९२१००९७५० येथे पाठवावे असे आवाहन प्रा. डॉ.अशोक कानडे, सुभाष सोनवणे,भगवान राऊत, भारत गाडेकर,ज्ञानदेव पांडूळे,अजयकुमार पवार, बबनराव गिरी,राजेंद्र पवार, स्वाती ठूबे,शर्मिला गोसावी, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, राजेंद्र फंड, प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================