परिसंवाद कार्यक्रमात सहभागी झालेले प्राध्यापक .: डायसजवळ समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, बसलेले डावीकडून.डॉ.केशव पवार ,प्रा.किशोर सुतार , डॉ.प्रदीप शिंदे ,प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,डॉ.विद्या नावडकर ,डॉ.संजयकुमार सरगडे , डॉ.मनोहर निकम मागे प्रा.श्रीकांत भोकरे व ग्रंथपाल प्रा. एकनाथ झावरे
वाचन प्रेरणा दिवस दिनी ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन हस्ते .प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,प्राध्यापक व विद्यार्थी
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सर्वांगीण विकासासाठी ‘वाचन’ दिग्दर्शन
- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषामंडळ व घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग,समान संधी केंद्र , विवेक वाहिनी ,ग्रंथालय विभाग यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी कोलेजच्या डॉ.एन.डी .पाटील सभागृहात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुलकलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम व ग्रंथ प्रदर्शन करून साजरी करण्यात आली. वाचन प्रेरणा दिन निमित्ताने ‘वाचन : सर्वांगीण विकासासाठी दिग्दर्शन ‘या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.यात महाविद्यालयातील भाषा व सामाजिक शास्त्र विभागातील प्राध्यापकांनी परिसंवादात आपली विषय मांडणी केली,या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे हे उपस्थित होते. तर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे व आंतरविद्याशाखा विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.आर. आर. साळुंखे या मान्यवरांची उपस्थिती होती. या परिसंवाद कार्यक्रमाचे समन्वयक ,विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वाचन हे सर्वागीण विकासाचे दिग्दर्शन आहे या विषयावर बोलताना प्रथम प्रा.श्रीकांत भोकरे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले हा दिवस केवळ वाचन प्रेरणा दिवस असत नाही.वाचनाची प्रेरणा कधीही मिळत असते. वाचणे महत्वाचे असते. श्रवण,भाषण ,वाचन ,लेखन ही कौशल्ये आत्मसात करावीत. वाचनाचे कुतूहल का कमी होते हा संशोधनाचा विषय आहे. का वाचायचे ,कसे वाचायचे आणि किती वाचायचे हे प्रश्न स्वतः समजून घ्यावे. वाचन हे व्यक्ती सापेक्ष आहे. कुठूनही वाचायला सुरुवात केलीच पाहिजे. अलीकडच्या काळात कोण कोण लेखक. लिहितात ही जिज्ञासा सतत असली पाहिजे. साहित्य माणसाला संवेदनशील बनविते. पुस्तकात आयुष्य ओतलेले असते. पुस्तक वाचल्याने शब्द संपत्ती वाढते .वाचन निरंतर करावे.त्यातून आपण शहाणे आणि समृद्ध होत जातो. केरळमध्ये अत्यावश्यक सेवेत ग्रंथालय येते. आत्महत्या कमी व्हायच्या असतील तर वाचले पाहिजे. आपण आतून शांत व्हावे तरच वाचलेले लक्षात राहते. आजचा रीडर हा उद्याचा लीडर आहे असे ते म्हणाले. प्रा. किशोर सुतार म्हणाले अर्थशास्त्राला समाजशास्त्राची राणी म्हणतात. पुस्तकाचा संग करावा. संत रामदास यांनी दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे असे म्हटले आहे. बुद्धांचे चरित्र वाचून भीमराव रामजी आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारताचे स्वप्न पाहिले. ते घटनाकार झाले. संविधानामुळे गुलामगिरीत राहिलेला देश आज विकसित राष्ट्र होण्याची आकांक्षा बाळगत आहे. ९ वर्षाच्या तुरुंग वासात ‘नेहरूंनी डस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला . मिसाईल मन असलेल्या अब्दुल कलामांनी खूप मोठे योगदान दिले. न्यूटन ने अभ्यास करून गुरुत्वाकरशन शक्तीचा शोध लावला. पेपर टाकणारे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय संशोधक झाले आणि जगातल्या सर्व पेपरनी त्यांची दखल घेतली. साने गुरुजी यांची सुंदर पत्रे वाचा , शिवाजीराव भोसले यांचे ग्रंथ वाचावेत. ४७ महापुरुषाची चरित्रे लिहिले.गांधीजीनी वाचूनच सत्याचे प्रयोग लिहिले.त्यातूनच स्वातंत्र्याचा मार्ग त्यांना दिसला. विश्वास पाटलांनी नेताजी सुभाष चंद्र बोस हे पुस्तक लिहिले . छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचून सुचली. पुस्तकांनी घडलेले मस्तक हे समाजाचे ,संस्कृतीचे व येणाऱ्या भविष्याचे दिग्दर्शन करेल.
.डॉ.मनोहर निकम म्हणाले ‘भगतसिंग यांनी कार्ल मार्क्सच्या साहित्याचे वाचन केले त्यातून ते नास्तिक झाले. ते देवाला कधी शरण गेले नाहीत. चित्रपट ,वेब सिरीज पेक्षा पुस्तक वाचणे अधिक चांगले. उपरा, उचल्या वाचल्यावर आपण आपल्या पद्धतीने व्यक्तीचित्रे उभी करत असतो. मी कोसला दरवर्षी वाचला,भुरा वाचला ,पुस्तकामुळे मुलांच्यात समरस व्हायला मला समाधान मिळते. पुस्तक वाचल्यावर आपल्या चांगल्या आशा वाढत असतात. कुसुमाग्रजाचे विशाखा,लेनिन,गौतम बुद्ध,संत कबीर,इत्यादी वाचनाने भक्ती रसापासून आम्ही बाहेर पडलो. तुम्हाला वाचनाने दिशा मिळते. बालकवी ,ना.धो.महानोर,नारायण सुर्वे,भालचंद नेमाडे, डॉ.आंबेडकर,कॉम्रेड शरद पाटील,जैन,बौद्ध तत्वज्ञान, कमलेश्वर अब्राहम लिंकन हे वाचले पाहिजे असे ते म्हणाले.
प्रा.डॉ.प्रदीप शिंदे म्हणाले की ‘आपण वाचतो आहोत ,त्याचा उद्देश माणूस बनणे आहे. जे ग्रंथात चांगले आहे त्याचा स्वीकार करावा,निरर्थक आहे ते टाकून द्यावे. कोणतीही क्रांती विद्वानांच्या मुले झाली. महात्मा गांधी हे देखील अनुभवातून लिहिते झाले. विनोबा भावे, इदगाह, प्रेमचंद साहित्य, विविध कथामधून विविध संघर्ष आपल्याला कळून येतात. साहित्य जीवनाचे दर्शन असते. संयम,समय सूचकता,वाचनातून मिळते. वाचनातून सद्सदविवेक बुद्धी जागृत होते. त्यांनी कपाट ही ग्रंथप्रेमी असले पाहिजे. हजारो रुपयाचा मोबाईल घेतात पण आपल्या घरात ग्रंथ घेत नाहीत. कसलेही पुस्तक न वाचता मुले पदवीधर होतात , पुस्तकाबद्दल उदासीन असता कामा नये. स्वयंप्रकाशित होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. आपल्या कॉलेजचे नियतकालिक वाचले पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमात पुस्तक भेट द्यावेत. पुस्तक भेट दिल्याने आठवणी कायम राहतात. ज्ञानकक्षा विस्तार करण्यासाठी ग्रंथ हेच उपयुक्त ठरतील असे ते म्हणाले. डॉ.केशव पवार यांनी आपल्या देशात कोणी वाचावे ,कोणी वाचू नये असे नियम होते. इंग्रज आल्यानंतर आपल्याला वाचण्याची संधी मिळाली. शेक्सपियर कोणत्या शाळेत शिकला नाही पण पुढे त्याने लिहिलेली पुस्तके जगातल्या सर्व ग्रंथालयात दिसतात. इग्लंड मध्ये १४-१५ व्या शतकात ज्ञान उत्सव साजरा केला .अनेक शोध इंग्लंड मध्ये लागले. कलकत्ता , मद्रास ,मुंबई येथे इंग्रजांनी विद्यापीठे सुरु केली. या देशातल्या मुलांनी इंग्रजी शिकून पुढे स्वातंत्र्य मिळवून दिले. महान लेखांच्या ग्रंथातून त्यांनी वाचन केले होते. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील दोन लाख ग्रंथाचा उपयोग करावा. बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधले असे ते म्हणाले. अन्न हे शरीराचे पेट्रोल आहे तसे पुस्तक हे मनाचे तेल आहे. डॉ.सुधामूर्ती यांनी ज्यांच्याकडे पुस्तक नाहीत त्यांना गरीब म्हटले आहे. पुस्तकांना वाळवी लागणे हे चांगल्या माणसांचे लक्षण नाही. ग्रंथालयातील अनेक नवी पुस्तक वाचकांची वाट पाहत आहेत. समाजच वाचणार नसेल तर तो काय होईल ? नवनवी पुस्तके वाचण्याचा संकल्प करावा, पुस्तके जवळ असतील तर वाचायला दिली पाहिजेत. आमचे विद्यार्थी वाचतील तेंव्हा आपल्याला समाधान होईल. असे त्या म्हणाल्या राजेंद्र केसकर यांनी मराठी व्याकरणाची मी तीन पुस्तके लिहिल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा सबंधीची पुस्तके देखील वाचली पाहिजेत असे ते म्हणाले.
डॉ.अनिलकुमार वावरे म्हणाले की अब्दुल कलाम यांना भारत ही महासत्ता व्हावी व विकसित भारताचे स्वप्न पाहिले. देशातील युवाशक्तीवर त्यांचा मोठा विश्वास होता असे ते म्हणाले. अब्दुल कलाम यांना प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे असे ते म्हणाले. प्रारंभी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन केले. समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले व ग्रंथपाल प्रा.एकनाथ झावरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विवेक वाहिनी, समानसंधी केंद्र ,भाषा व सामाजिक शास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================