राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, November 3, 2024

संत लोयोला चर्च आयोजित पवित्र माळेच्या भक्तीची चर्च प्रांगणात सांगता


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
दरवर्षी संपूर्ण ऑक्टोबर महिना कॅथोलिक भाविक पवित्र मरीयेची विशेष आराधना करतात,याही वर्षी प्रमुख धर्मगुरू रेव्ह.फा. प्रकाश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मग्रामातील विविध लहान ख्रिस्ती समूह व पॅरिश कौन्सिलच्या सेवक प्रतिनिधींनी एकत्र येऊन पवित्र माळेच्या भक्तीचे उत्तम नियोजन केले होते. 
महिनाभर चालणाऱ्या या भक्तीची लोयोला सदन चर्चच्या प्रांगणात नुकतीच सांगतात करण्यात आली. समारोपा प्रसंगी चर्च परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. 
 पवित्र माळेनंतर पवित्र मिस्सा बलिदान विधी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख याजक म्हणून उपस्थित असणारे बेळगांव येथील धर्मगुरू रेव्ह फा. अँथोनी त्रिभुवन यांनी "धर्मग्राम एक कुटुंब" या विषयावर अर्थपूर्ण प्रवचन केले. यावेळी वेदीवरती लोयोला धर्मग्रमाचे प्रमुख धर्मगुरू फा. प्रकाश भालेराव, सेंट झेवियर्स स्कूलचे प्राचार्य फा.विक्रम शिनगारे, दिव्यवाणीचे संचालक फा.अनिल चक्रनारायण व फा. जेकब गायकवाड हे उपस्थित होते.
दरम्यान महिनाभरात प्रवचन करणाऱ्या ३१ प्रवचनकांराचा व माळेचे नियोजन करणाऱ्या महिलांचा उपस्थित धर्मगुरूंच्या हस्ते सत्कार
 करण्यात आला. लोयोला गायन मंडळाने गायलेल्या सुमधुर गीतांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
धर्मग्रामातील भाविकांना मारियादास आढाव व युवकांच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास सेंट लुक हाॅस्पिटल व कनोसा कॉन्व्हेन्टच्या सर्व धर्मभगिनी उपस्थित होत्या.
  सांगता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित, विजय त्रिभुवन, जाॅन धीवर, उत्तम गायकवाड, लाजरस गायकवाड, डॅनियल साळवे, राकेश दुशिंग, प्रवीण सात्राळकर, संदीप साळवे, लुकस दिवे, रविन्द्र त्रिभुवन, लत्ता बनसोडे, मंगल दुशिंग, निर्मला अमोलीक, पुष्पा साठे , संगीता पंडित आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कमलाकर पंडित यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
रवि त्रिभुवन- श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


साहित्यिकांनी केली दिवाळीसाजरी अनाथांच्या आश्रमात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
दीपावली सण आनंदाची पर्वणी असते, मानवी जीवनातील अंधार घालविणे आणि प्रकाशाचे पूजन करणे हे जीवनसूत्र या सणाच्या मुळाशी आहे, याच ध्येयांनी साहित्यिकांनी ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांच्या अनाथांच्या आश्रमात साजरी केली.
  श्रीरामपूर  - बेलापूर रोडवरील गोखलेवाडी येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमात साहित्यिकांनी दिवाळी पाडवा सण विविध उपक्रम आणि देणगीद्वारे साजरी केली. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी दीपावली सणाचे महत्त्व सांगत संतांचे आणि साहित्यिकांचे कार्य हें ज्ञानदीप लावू जगी असे आहे. साहित्यिकांच्या लेखनात आणि मनात संतत्त्व, साधुत्त्व असले पाहिजे. ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांचे अनाथांच्या कार्याला देवत्वाची प्रचिती आहे. त्यांना सहकार्य लाभले तर त्यांच्या देवकार्याला गती मिळेल अशी भावना व्यक्त करून साहित्याचे महत्वही सांगितले विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी कृष्णानंद महाराज यांनी वयाच्या १५ व्या वर्षापासून मायेच्या मायेने दुर्लक्षित अनाथ मुला मुलींना आधार दिला, शिक्षण देत आहेत, चांगले संस्कार करीत आहेत हे कार्य पुण्यशील आहे, असे सांगून श्रीरामपूरच्या साहित्यिकांचा हा वेगळा दिवाळी पाडवा असल्याचे सांगितले. प्रा. शिवाजीराव बारगळ, साहेबराव सुकळे यांनी आश्रमातीत कार्याचे कौतुक केले. यावेळी सौ. सुरेखा बुरकुले, संजय बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, सुयोग बुरकुले, सुबोध बुरकुलेसह आश्रमातील मुले उपस्थित होते. ह.भ.प. कृष्णानंद महाराज यांनी सर्वांचे स्वागत करून हा आश्रम सदगुणी मायबापांच्या आधारातून आकाराला आला आहे, अनाथांच्या सहवासात साहित्यिकांनी दिवाळी साजरी केली, याबद्दल आनंद व्यक्त केला. सुखदेव सुकळे यांनी किराणा सामान दिले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कपडे दिले, बाळासाहेब बुरकुले यांनी दोन हजार रुपये तर प्रा. बारगळ यांनी दीड हजार रुपये देणगी दिली. सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग - ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



भोकर - आशांकुर संस्थेत दिपावलीनिमित्त महागुरुस्वामींच्या हस्ते विद्यार्थ्यांना भेटवस्तू


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नासिक धर्मप्रांतात दिपावली व भाऊबीज सण हा प्रथमच भोकर येथील आशांकुर संस्थेत साजरा करण्यात आला.लहान मुले ही महत्वाची मुले आहेत.कारण काहींना शिक्षण घेता येत नाही.काही घेतात.हा सण साजरा करताना नासिक धर्मप्रांत बिशप या पदावर असताना माझा मुख्य उद्देश असा आहे की, या यंदाच्या मुलांना चांगले मार्गदर्शन दिले की चांगले नागरिक होतील.हे सांगता येत नाही की बहुतेक शिक्षण झाल्यावर आमची मुले प्रधानमंत्री,मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री,आदी होऊ शकतात ते नाही झाले तर समाजात मुले चांगली नागरिक व्हावीत.म्हणून हा दिवाळी सण पहिल्यांदा आमच्या धर्मप्रांतात साजरा करीत आहोत.या संस्थेत आलो मुलांना मार्गदर्शन केले. त्यांचेशी संवाद साधला.चांगला अभ्यास करावा.मोबाईलचा वापर कमी करा.असे सुचविले यानंतर दुसऱ्या धर्मग्रामात सुद्धा साजरा केला जाईल असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना प्रेरणा,प्रोत्साहन देणारे नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी रा रे डॉ.बार्थोल बरेटो यांनी आशाकुर या संस्थेत केले. प्रारंभी दीप प्रज्वलन महागुरूस्वामी रा,रे डॉ बार्थोल बरेटो,संचालिका सिस्टर प्रिस्का,फा.संतान, सिस्टर सविता, अतुल, आदींच्या हस्ते झाले प्रास्तविक सिस्टर प्रिस्का यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक नृत्य आदी कार्यक्रम सादर केले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दिपावली सणानिमित्त शालेय साहित्य व भेटवस्तू महागुरुस्वामी डॉ बरेटो,सि.प्रिस्का,फा संतान रॉड्रीग्ज,फा फ्रान्सिस ओहोळ,यांच्या हस्ते देण्यात आल्या.यावेळी हरिगाव प्रमुख धर्मगुरु फा डॉमनिक रोझारिओ,सिस्टर्स अग्नेस, आश्विनी पवार, संगीताताई, कल्पना,सि.रिटा,प्रकाश,आदी उपस्थित होते.सूत्र संचालन रेखा थोरात यांनी तर आभार प्रदर्शन फा. संतान यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग - ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Saturday, November 2, 2024

वीज तारेच्या घर्षणाने ऊसाला लागली आग,सात एकर ऊस जळून खाक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथे वीजेच्या तारीचे घर्षण होऊन सात एकर ऊस जळून खाक झाला आहे, वर्षभरातील ही दुसरी घटना आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सिताराम पवार यांच्या मालकीचे वडाळा महादेव - खोकर शिवारात गट नं २३३ क्षेत्र असून सदर ठिकाणी ऊस लागवड केलेली आहे सदरचे ऊसाचे पिक हे जोमात असुन परिसरातील शेतीमधून विजेच्या तारांच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरू असतो, या ठिकाणी विजेच्या तारेचे घर्षण निर्माण होऊन वीजेचे लोळ निर्माण झाले,यामुळे शेतकरी सुजित कैलास पवार तसेच प्रवीण कैलास पवार यांच्या मालकीचे सात एकर ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाले आहे. 
येथील परिसरातील श्री.उघडे हे नेहमी प्रमाणे शेताशेजारून जात असताना संबंधित प्रकार त्यांच्या लक्षात आला, घटनेचे गांभीर्य ओळखत श्री. उघडे यांनी तात्काळ कैलास पवार तसेच माजी सरपंच सचिन पवार, इंजि. सुजित पवार यांना घटनेची माहिती दिली तसेच आगीचे लोळ वाढत असल्याने अग्निशमन बंब यांना पाचारण करण्यास सांगितले, तसेच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेत 
आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने उग्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल पवार यांनी उघडे वस्ती व सिन्नरकर आणी पवार वस्ती येथील नागरीकांना मदतीसाठी फोनवरून माहिती दिली,
मोठ्या प्रमाणावर आगीचा तांडव सुरू असल्याने अग्निशमन बंब पोहोचू पर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, काही दिवसापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे नुकसान झाल्याने येथील शेतकरी श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय फंड तसेच कैलास पवार यांनी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना याविषयी माहिती दिली होती. वेळोवेळी माहिती देऊनही संबंधित गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ऊस शेती पिकाचे प्रचंड असे नुकसान झाले आहे.वारंवार अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याने वडाळा महादेव येथील शेतकरी व नागरीकांमधून महावितरण विषयी प्रचंड नाराजीचा सूर निघत आहे.
यावेळी कैलास पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ. चंद्रकला पवार, इंजि. सुजित पवार,प्रवीण पवार यांनी सदरील बाबी दुर्घटनेमध्ये प्रचंड असे नुकसान झाले असून भरून न येणारे असल्याची माहिती दिली. तसेच अनेक वेळा माहिती देऊनही टाळाटाळ करत असल्यानेच आमचे नुकसान झाले असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


Friday, November 1, 2024

बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिणे चोरी करणारा श्रीरामपुर येथील सराईत गुन्हेगार जेरबंद


गुन्हेशाखा युनिट क. १ ची कारवाई

- माजीद खान - नाशिक -/ वार्ता -
हल्ली चोऱ्यांचे प्रमाण खुप वाढल्याचे दिसून येत आहे, एस.टी.बस अथवा इतर प्रवासी वाहनातून प्रवास करताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून (चेन सिनॅचिंग) नेणे,असे प्रमाण दिवसेंदिवस जास्त प्रमाणात घडत असल्याचे दिसून येते आहे.
नाशिक मध्ये असाच एक प्रकार दिनांक २६/१०/२०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्टॅण्ड नाशिक येथे घडला. मुंबई ते नंदुरबार बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हे झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादयाच्या संमती शिवाय लबाढीच्या इरादयाने चोरून नेले होते, म्हणून दिनांक २६/१०/२०२४ रोजी फिर्यादी यांनी देवुन सरकारवाडा पोलीस ठाणे येथे। २६८/२०२४ भा.व्य. संहीता ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

नाशिक शहरामध्ये ठक्कर बाजार, मुंबईनाका या बसस्टॉप परिसरात गर्दी वाढत असुन या गर्दीचा फायदा घेवुन चोरटे हे प्रवाशांच्या बॅगेतील सोने व रोख रक्कम चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सुचना दिल्या होत्या. मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. श्री. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन केले होते.

सदर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे गुन्ह्याचे गांभिर्य पाहता सदर गुन्हा हा मा. पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखा युनिट क्रं.१ कडे वर्ग केल्याने गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असतांना पोहवा /१८८३ विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हे हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार करीत असुन ते दिनांक २७/१०/२०२४ रोजी ठक्कर बसस्थानक या ठिकाणी येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देवून त्यांच्या मार्गदर्शना नुसार गुन्हे शाखा युनिट ०१ कडील सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि/रविंद्र बागुल, पो. हवा. / प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, सुकाम पवार अशांनी ठक्कर बाजार बसस्थानक या ठिकाणी सापळा लावुन थांबले असता बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे इसम हा ठक्कर बाजार बसस्थानक या ठिकाणी येताना दिसला असता नमुद पथकाने सदर इसमास मोठ्या शिताफीने त्यास पकडले व त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव साहिल निसार पठाण, वय-२३ वर्षे, रा-वार्ड नं ०२, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर असे सांगितले. त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता आरोपी ने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन आरोपीने अटके दरम्यान गुन्ह्यांची कबुली दिली असुन आरोपीने गुन्ह्यातील गेला माल ३,५०,०००/- रूपये किंमतीची ४.५ तोळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहे.
१) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं २४३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
२) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं २५०/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
३) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं २६८/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे
४) सरकारवाडा पोलीस ठाणे गुर्न २०२/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
५) मुंबईनाका पोलीस ठाणे गुरनं १९३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे
असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपी यास पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे. सदर आरोपीकडून नाशिक शहरातील या सारखे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रविंद्र बागुल, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, गुन्हेशाखा युनिट ०१ नाशिक शहर हे करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि/हेमंत तोडकर, पोउनि / रविंद्र बागुल, पो. हवा. / प्रशांत मस्कड, विशाल काठे, विशाल देवरे, सुकाम पवार, शरद सोनवणे, संदिप भांड, प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, जगेश्वर बोरसे यांनी केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - ९५६११७४१२२
-----------------------------------------------
=================================

Wednesday, October 30, 2024

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन


- माजिद खान - नाशिक -/ वार्ता -
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन कारवाईत २ घातक हत्यारे व रु. ८३६५/- किंमतीची अवैध देशीदारुचा माल जप्त करण्यात आले.

श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुन्ह्यांना प्रतिबंध करणेसाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारां विरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे. त्यादृष्टीने, नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ -२ मधील पो. स्टे. हद्दीत दि.२९/१०/२०२४ रोजी ७ ते १० वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविणे साठी श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांनी, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड व नाशिकरोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.

श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्री. शेखर देशमुख, सहाय्यक
पोलीस आयुक्त, अंबड विभाग व डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी अधिनस्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन परिणामकारक कोम्बिंग ऑपरेशन राबवून खालील प्रमाणे कारवाई करुन घेतलेली आहे.

१. रेकॉर्डवरील २०७ गुन्हेगार चेक करुन, मिळून आलेल्या गुन्हेगारांकडे चौकशी करुन त्यापैकी ३६ गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरुन घेण्यांत आले. तसेच ४४ हद्दपार इसमांना चेक करण्यांत आले.

२. अवैध शस्त्रसाठा शोध अंतर्गत ६२ गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यांत आलेल्या आहेत.

३. सातपुर व अंबड पो. स्टे. हद्दीत अनुक्रमे इसम नामे मयुर पोळकर, व हासिम खान यांचे ताब्यात घातक हत्यार (कोयते) मिळून आल्याने भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे ०२ गुन्हे दाखल करण्यांत आले आहे.

४. अंबड, एम. आय. डी. सी. चुंचाळे चौकी, उपनगर, नाशिकरोड व देवळालीकॅम्प पो. स्टे. हद्दीत, ०५ इसमांचे ताब्यात विनापरवाना देशीदारुच्या बाटल्या, एकुण किंमत रु. ८३६५/- चा माल मिळून दारुबंदी कायदयान्वये ०५ गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यांत आली आहे.

 ५. सातपुर पो. स्टे. हद्दीत कोटपा कायदयान्वये ०७ इसमांवर कारवाई करण्यांत आली आहे.

६. टवाळखोर १३ इसमांवर म. पो. का. कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्प्यांत आली आहे.

७. ४३ समन्स व २२ वॉरंटची बजावणी करण्यांत आली आहे.

८. मोटार वाहन कायदयान्वये ९७ इसमांवर कारवाई करण्यांत आली आहे.

विधानसभा आचारसंहिता कालावधीत रेकॉर्ड वरील माला विरुध्द, शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घडझडत्या घेवून तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन परिणामकारक अशी कारवाई मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरु राहणार आहे असल्याचे श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांनी सांगितले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

महंत काशिकानंदजी महाराजांच्या हस्ते जनेश्वर प्रतिष्ठाण रिक्षा संघटनेच्या सभासदांना दिवाळी फराळ वाटप


- शिर्डी - प्रतिनिधी -/ वार्ता -
ना.राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना प्रणित जनेश्वर प्रतिष्ठाण रिक्षा संघटना साईआश्रम एक हजार  रुम रिक्षा संघटनेतील सभासदांना दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी महंत काशिकानंदजी महाराज यांनी रिक्षा संघटनेच्या सामाजिक कार्य व उपक्रमांचे कौतुक करत श्री साईबाबांच्या पवित्र भूमित रिक्षा चालक हा खरोखर  श्रमिक वर्ग असुन येणाऱ्या साईभक्तांना प्रामाणिक सेवा देत असल्याचे सांगितले. तर दिवाळी हा आनंदाचा सण आणि या सणानिमित्त रिक्षा चालक , अनाथालय व गरजवंताना दिवाळी फराळ वाटप करुन संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते व अध्यक्ष रविंद्र शेळके हे साईबाबांच्या शिकवणीचे पालन  करत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी महंत काशिकानंदजी महाराज यांनी उपस्थिती देऊन त्यांच्या शुभहस्ते हा दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला याचे समाधान व्यक्त करत जनेश्वर प्रतिष्ठाण हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असुन याकामी असंख्य कार्येकर्त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे संस्थापक प्रशांत कोते यांनी स्पष्ट  केले.तर साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हणत संघटनेचे अध्यक्ष  रविंद्र शेळके यांनी आज महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते दिवाळी फराळ वाटप झाले असल्याचे समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी जनेश्वर रिक्षा संघटनेचे  संस्थापक प्रशांत कोते , अध्यक्ष रविंद्र शेळके , संतोष जेजुरकर , शंकर आवारे , विशाल दहीवाळ , नासीर पठाण , संतोष आवारे , अवी जेजुरकर , अमोल वाडगे , गोकुळ बारगळ , प्रमोद कदम , जाकीर पठाण , रविंद्र जगताप , दिपक वाघ , बाळासाहेब शिंदे , दिपक मगर , मनोज उदावंत , साईराम सोळसे , जयंत शेलार , मछ्चिंद्र तांदळे , प्रवीण डेंगळे आदीसह सदस्य उपस्थित होते.

<^><७><७><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी 
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±