बलात्काराची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. वाटलं होत निर्भया नंतर तरी . पूर्णविराम लागेल, परंतु निर्भयानंतर स्वल्प विरामच लागत गेले, याला पूर्णविराम लागणार तरी कधी ? वारंवार असे का घडत आहे? निर्भयाचे नाव बदलते ,पण तिचे मरण थांबत नाही. आणखी अजून किती निर्भया पहायच्या?
चार वर्षांपूर्वी दिल्लीतील निर्भया नावाच्या तरुणीवर अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने कठोर कायदे तर केलेत पण त्यानंतरही बलात्कार थांबले नाहीत. अशाच घटना आज रोज घडतांना दिसत आहेत. ताजी बातमी आहे. कोलकात्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवरील नृशंस बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणाच्या वेदना आणि याचा संताप लोकमानसात कायम असतानाच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले. कोलकाता, बदलापूर आणि अन्य ठिकाणी घडणाऱ्या बलात्कार अत्याचाराच्या घटना अत्यंत शरमेच्या आहेत. या गुन्ह्यांचे स्वरूप आता अधिक भेदक, नृशंस आणि अमानूष होत चालले आहे . दरवेळी अशी एखादी घटना घडल्यानंतर शासन आणि समाज जागा होतो. पण अशाप्रकारचे कृत्य घडू नये, यासाठी उपाययोजना का केल्या जात नाहीत?
अलीकडील काळात
बालिका, तरुणी आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.
मणिपूर कोलकाता, बदलापूर आदी ठिकाणी घडलेल्या अत्याचाराच्या घटनानंतर तेथील शासनकर्त्यांकडून "आम्ही आरोपीला कठोर शिक्षा करू" अशा प्रकारची वेगवेगळी वक्तव्ये केली जातात, पण ही सर्व प्रक्रिया गुन्हे घडून गेल्यानंतर केली जाते. परंतू प्रत्यक्षात अत्याचाराचे गुन्हे घडू नयेत यासाठी भरीव काहीतरी करण्याची गरज भासत आहे . परंतू त्यादृष्टीने शासनाने कोणते धोरण आखले आहे का किंवा त्यासाठी काही पावले टाकली जात आहेत का? हे पाहणे देखील तितकेच गरजेचे आहे? हे लक्षात घेता शासन आणि समाज यांनी अशी घटना घडू नयेत, यासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. पण पण तशाप्रकारचे ठोस प्रयत्न अथवा कृती होताना आपल्याला का दिसत नाही , निर्भयानंतर आजपर्यंत बलात्कार होऊ नयेत, यासाठी कोणतेच प्रयत्न होताना का दिसले नाहीत, बलात्कार अत्याचार, लैंगिक शोषण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या जात नाहीत?
देशाच्या स्वातंत्र्याला आज ७७ वर्षे पूर्ण झाली.
पण तरी देखील आज महिलांवरील अत्याचार थांबले आहेत का? किंवा महिला सुरक्षेच्या दृष्टीकोणातून. विचार केला जातोय का ? महिलांसाठी सुरक्षित समाजाची निर्मिती करू शकलो का? याचे उत्तर नकारार्थीच भेटेल ही शोकांतिका म्हणावी लागेल, आपण पाहतोय, स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी असंख्य भाषण बाजी झाली कायदेबदल झाले, नव्याने कायेद केले गेले आणि देशातील महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत असे सांगितले गेले, पण त्या खरोखरच सुरक्षित कशा होतील याकडे शासण का लक्ष घालत नाही..
मुळात अत्याचाराच्या घटनांकडे आणि महिलांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलण्यामध्ये आपल्याला अपयश आले का ही क्रूर मानसिकता बदलण्यासाठी आपण काही करायला नको का? सांगण्याचा मुद्दा इतका की. बालिकांवरील, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी, महिलांनी स्वतः पुढे येऊन
तक्रारी नोंदविणे गरजेचे आहे, लहान मूलांबाबतीत असे घडल्यास त्यांच्या पालकांनीही कोणतेही समाजभय न बाळगता या प्रवृत्तींना लगाम बसावा यासाठी प्रयत्न केले पाहिले. एखादी महिला स्वत:वर झालेल्या अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी कधीच पुढे येत नाही, परंतू ती न्याय मिळावा या आशेने न्यायालयाचा उंबरठा चढली तरी तिच्या पदरात फक्त निराशाच पडते. शिवाय ज्या स्त्रिया बदनामीच्या भीतीपोटी तक्रार दाखल करत नाहीत त्यांच्यासाठी सरकारकून विशेष समुपदेशन मोहीम राबविले जाणे गरजेचे आहे.
सूरक्षेच्या संदर्भात कोणी पावले उचलली तर सरकार सहकार्य करत नाहीत, महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलेही उचलणे गरजेचे आहे.
दाहि दिशांत भारताच्या, रोजच अत्याचार किती
दृष्ट हैवान जिकडे तिकडे भारत कसा घडायचा
अजून किती निर्भया जातील बळी देशामध्ये
फक्त वाहून अश्रु आता, हा प्रश्न नाही सुटायचा ..
आपला देश खुप प्रगती करत असूनही देशातील मुलींसाठी लोकांची विचारसरणी मागासलेली आहे,
सध्या चे उदाहरण घ्यायेचे झाले तर आपल्याकडे वेगवेगळ्या स्त्री देवता आहेत ज्यांच्या प्रतिमांची समाज भक्तीभावाने पूजा करतो, पण देव माणसातच आहे ही गोष्ट मात्र विसरून जातो. मग त्या स्त्री चे काय जी काम करू लागली व्यक्त होऊ लागली, यशाची शिखरे गाठू लागली, तिचा मात्र समाजाला जाच वाटू लागतो, मग ती कसे कपडे घालते, कुठे जाते, किती वाजता जाते, कुठे काम करते, कोणासोबत फिरते, कोणाच्या विरोधात ती आवाज उठवते या सर्व गोष्टींचे मूल्यमापन सूरु होते आणि त्यातून अंतिमतः तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. हे वास्तव आपण कधी बदलणार?
महिला सक्षमीकरणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून दिड हजार रूपयांमध्ये महिलांचे तोंड गोड केले जाते, पण महिला सूरक्षित राहून त्यांचे आयुष्य कधी गोड होणार? तिला समाजामध्ये मूक्तपणाने कधी वावरता येणार? आजकाल तर मूलींना घरातून बाहेर पडायची देखील भिती वाटते की आज सकाळी जाऊ, पण दिवसभरात कोणत्या
परिस्थतीला सामोरे जाऊन घरी सूखरूप येऊ की नाही... हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित राहतो? आपण कथी सूरक्षित होऊ, ही भीती त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कायम असते. निष्पाप चिमुकल्यां विकृत लोकांच्या शिकार बनत आहेत ,ही घसरलेली नैतिकता पाहिली तर महिलांवरील अत्याचार हे सर्वात मोठे आव्हान समाजापुढे उभे ओहे. पण विचार करायला कुणाला वेळ आहे? धकाधकीच्या आयुष्यात आपण बरेच काही हरवून बसलो आहोत. राजकारणही नासले आहे, समोर आदर्श नसलेल्या वातावरणात तरुणांना आवरणार कोण?
मला ऐवढेच सांगायचे आहे. नवीन कायदे निर्माण करण्यापेक्षा जे आहेत जे ते तरी व्यवस्थित दिल्या पाळले गेले पाहिजेत. कायदे .आस्तित्वात असून उपयोगाचे नाही, त्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी देखील झाली पाहिजे.
'स्त्री' कडे बघण्याचा वाईट दृष्टीकोण बदलला पाहिजे, जोपर्यंत हा दृष्टीकोण बदलत नाही तोपर्यंत हे थांबणे शक्य नाही. आणि म्हणून उपायाच्या दृष्टीने विचार करता, प्रत्येक आई - वडीलांनी आपल्या मूलांसोबत बिनधास्तपणे संवाद साधण्याची गरज आहे. मुलांसोबत प्रत्येक विषयावर संवाद साधल्यावर त्यांच्या विचारांचा मार्ग कुठे जात आहे. हे लक्षात येईल, संवाद साधला की प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्नांना योग्य उत्तर मिळाले की चांगला मार्ग मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण दिले जावे त्याने मूलांमधील क्रोध , द्वेश, राग, विभत्स विचारांना सात्विक विचाराकडे वळवण्यास मदत होईल...
=================================
-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
समिक्षा चंद्रकांत चव्हाण
तारळे जि.सातारा
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================