राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, December 11, 2024

ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीचा तीसरे वार्षिक म्युझिकल उत्सव संपन्न

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
संगीतला भाषा नसते, परंतु ते आपण जेव्हा मन लावून ऐकतो तेव्हा प्रत्येकाला ते भावत असते. सुख-दु:खात मनाला प्रसन्नत्ता लाभते. ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमी आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत परिक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देत आहे. यातून संगीत संस्कृतीचे आदान-प्रदान होत असल्याने त्या माध्यमातून देश-विदेशातील संगीत जाणून घेण्याची संधी मिळते. ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यश कौतुकास्पद असेच आहे असे विद्यार्थ्यांच्या पालकांना व नगरकरांना वाटते. 
नगरमधील ग्रेस म्युझिकल अ‍ॅकॅडमीच्या तीसरे वार्षिक उत्सव संपन्न झाले. या म्युझिकल उत्सवाचे प्रमुख
पाहुणे म्हणून सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सिस्टर करुणा शेंडे, ऑग्जिलियम कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सिस्टर निलिमा रॉड्रिग्ज,सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापिका नाँदिता डिसोझा, ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर, ग्रेस फाउंडेशनचे सेक्रेटरी लिओ पंडीत आदि उपस्थित होते.
आपल्या प्रास्तविकात पिटर पंडित म्हणाले, ग्रेस म्युझिक अ‍ॅकॅडमी ही अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अ‍ॅकॅडमी आहे जी लंडन येथील ट्रिनिटी कॉलेजशी संलग्न आहे. अ‍ॅकॅडमीचे तीसरे वार्षिक म्युझिकल उत्सवात आंतरराष्ट्रीय संगीत परिक्षेतील २७ यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रिनिटी कॉलेज लंडनचे सर्टिफिकीट देऊन सन्मानित करण्यात आले. तर ५० विद्यार्थ्यांना अ‍ॅकॅडमीचे सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अ‍ॅकॅडमीत शिकलेल्या कलेचे उपस्थितांसमोर उत्कृष्टपणे सादरीकरण केले. मराठी-हिंदी-इंग्रजी गीतांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. 
सूत्रसंचालन विणा दिघे यांनी केले. तर आभार सौ.सोनाली पंडित यांनी मानले. 


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, December 7, 2024

रद्दी विक्रीबाबत दरपत्रक पाठवण्याचे जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन


*रद्दी विक्रीबाबत दरपत्रक पाठवण्याचे*
*जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन*

अहिल्यानगर जि.मा.का.वृत्तसेवा:
अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयात असलेली जुनी दैनिक वृत्तपत्र व जुने साप्ताहिक यांची दरपत्रक मागवून विक्री करावयाची आहे. यासाठी स्थानिक रद्दी विक्रेत्यांनी हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर (कार्यालयीन सुटीचे दिवस वगळुन) जिल्हा माहिती अधिकारी, अहिल्यानगर या नावाने आपले दरपत्रक या कार्यालयास दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारीत,१ ला मजला, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडीरोड, अहिल्यानगर या पत्त्यावर बंद पाकीटातुन पाठवावे. पाकीटावर रद्दीसाठीचे दरपत्रक असा स्पष्ट उल्लेख करावा. या कार्यालयास प्राप्त होणारी दरपत्रके दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता उघडण्यात येतील. 
 दरपत्रके स्विकारणे अथवा नाकारण्याचा संपुर्ण अधिकार या कार्यालयाने राखुन ठेवला आहे. 

=================================
-----------------------------------------------
*समता*✍️✅🇮🇳
मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


गुरूदेव डॉ.काटेस्वामीजी नागरी सह.पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 शहरातील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन दिनदर्शिकाचे प्रकाशन श्रीरामपूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. व्ही.एन. ताके पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध महाले हे होते तर प्रतिथयश लेखापरीक्षक डी. बी. मोरगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी व भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नूतन दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ऍड. ताके म्हणाले की, संस्थेने सतरा वर्षांच्या वाटचालीत सभासद हिताचा कारभार केलेला असून सभासद व ठेवीदारांचे हित जपलेले आहे तसेच समाजातील गरजूंना व दुर्बल घटकांना कर्जरूपाने अर्थ पुरवठा करून अडचणीच्या काळात आधार दिलेला असून आत्मनिर्भर केलेले आहे तसेच वेळोवेळी सामाजिक बांधिलकीही जपलेली आहे व त्यामुळेच संस्था प्रगतीपथावर आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी डी. बी.मोरगे यांनीही आपल्या भाषणात परमपूज्य गुरूदेव महाराजांचे दिनदर्शिकामध्ये छापलेले विचार युवा पिढीला दिशादर्शक ठरतील असे मत व्यक्त केले. शेवटी अनिरुद्ध महाले यांचे अध्यक्षीय भाषण झाले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत लखोटिया यांनी केले. याप्रसंगी लोन कमिटी चेअरमन कल्पेश चोथाणी , संचालक बी .एन. पवार, बापूसाहेब गायकवाड, माऊली शेळके, मॅनेजर गिरीजा टंकसाळे, ब्रांच मॅनेजर दीपक दवंगे, निर्मला येवले, भाऊसाहेब लगे, सचिन मुठे,अभिषेक कुसळकर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

सामाजिक परिवर्तन घडविणारे डॉ.आंबेडकर हे खर्‍या अर्थाने युगप्रवर्तक; माजी आ.मुरकुटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच लोकशाहीचे मजबुतीकरण झाले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे आणि सामाजिक परिवर्तन घडविणारे डॉ.आंबेडकर हे खर्‍या अर्थाने युगप्रवर्तक होते, असे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
          लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी आ.श्री.मुरकुटे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, श्रीमती रमाबाई धिवर, युवा नेते नीरज मुरकुटे, अमोल कोलते, कैलास भागवत, ज्ञानदेव वर्पे, बाळासाहेब शिंदे, सर्वज्ञ मुरकुटे, सार्थक चौधरी, पंकज देवकर आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, December 6, 2024

संगमनेर कारखाना व आरटीओच्या संयुक्त विद्यमाने विशेष रस्ता सुरक्षा


रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर

- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
गळीत हंगाम सुरक्षित आणि अपघात मुक्त पार पाडण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना लि. अमृतनगर संगमनेर येथे विशेष रस्ता सुरक्षा सत्राचे आयोजन करण्यात आले होते,
या सत्रात ऊस वाहतुकीशी संबंधित सुरक्षा विषयी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आणि आवश्यक निर्देश वाहन चालकांना देण्यात आले. कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना ऊस वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा उपाय राबवण्याची निर्देश दिले गेले. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यात आले. वाहनांवर मागील बाजूस लाल रंगाची आणि समोरील बाजूस पांढऱ्या रंगाची रिफ्लेक्टर पट्टी बसविण्याचे निर्देश देण्यात आले. या पट्ट्या ऊस किंवा पाचटामुळे झाकल्या जाणार नाहीत त्याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली. काही वाहनांवर प्रत्यक्ष कार्यालयाकडून रिप्लेक्टर पट्ट्या लावून या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नादृष्ट वाहने रस्त्यावर असल्यास ती तात्काळ बाजूला हटवावी किंवा रात्री ती स्पष्ट दिसतील अशी व्यवस्था करावी अशी सूचना करण्यात आली या मार्गदर्शन १७ मध्ये कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुरक्षारक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. हा उपक्रम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राणी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आला.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार राजेश जेधे - संगमनेर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

लोयोला सदन चर्चच्या वतीनेमहामानवास विनम्र अभिवादन



लोयोला सदन चर्चच्या वतीने
महामानवास विनम्र अभिवादन 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह.फा. प्रकाश भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली लोयोला सदन चर्चच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कमलाकर पंडित, रवि त्रिभुवन, अविनाश काळे, विजय त्रिभुवन, सुरेश ठुबे, ललित गायकवाड, प्रतिक गायकवाड,चरण त्रिभूवन, संतोष मोकळ व इतर मान्यवर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अय्युब पठाण यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार


अय्युब पठाण यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार*

- पैठण - प्रतिनिधी -/ वार्ता -
बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील भारत संग्राम आयोजित स्वर्गीय मधुकर खंडारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठवाड्यातील प्रसिध्द लेखक तथा कवी अय्युब पठाण लोहगावकर हे मागील ३५ वर्षापासून मराठी साहित्य क्षेत्रात मराठीमध्ये साहित्य लेखन करून साहित्य क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. आणि अय्युब पठाण यांनी १३ पुस्तकांचे दर्जेदार लेखन करून समाजामध्ये आणि बालकांमध्ये प्रबोधनात्मक जनजागृती केली आहे. म्हणून या कार्याची दखल घेऊन सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील भारत संग्रामचे मुख्य आयोजक सचिन खंडारे यांनी एक उत्कृष्ट साहित्यिक म्हणून अय्युब पठाण लोहगावकर यांना साहित्य क्षेत्रातील २०२४ चा अत्यंत सन्मानाचा उत्कृष्ट साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अय्युब पठाण यांची उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी निवड करून त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. पठाण यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================