राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, December 21, 2024

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी - संपुर्णा सावंत


*सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी - संपुर्णा सावंत*
 
नगर / प्रतिनिधी:
मस्साजोग केज बिड येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेचा जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगर कडून जाहीर निषेध करण्यात आला,तथा संबंधित आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही निवेदनाद्वारे. करण्यात आली आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत, उपाध्यक्ष शोभा भालसिंग, तालुका अध्यक्ष सुरेखाताई कडूस, सचिव वंदना नीगुट, शिलाताई शिंदे,अंमल सासे, सुरेखा सांगळे, स्वाती शेटे पाटील, राजेश्री वणी आदी उपस्थित होते. 
सदरील हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे.या हत्येमागे एक मोठी बलाढ्य शक्ती आहे. ज्यामुळे समाजातील निरपराध लोकांचा बळी जात आहे.या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर समाजाचा पोलीस यंत्रणेवरील व न्यायपालिकेवरचा विश्वास संपून जाईल असे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने तहसीलदारां मार्फत निवेदना द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================



Wednesday, December 18, 2024

पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी अधिस्वीकृती - डॉ. किरण मोघे


मन्सूरभाई शेख यांच्या हस्ते जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांचा सत्कार

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
पत्रकारांना लेखनीमुळे सन्मान मिळतो. पत्रकारांना सकस पत्रकारिता करता यावी यासाठी शासन पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देते, असे प्रतिपादन शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभागाचे प्रभारी उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी केले.
नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती, जिल्हा माहिती कार्यालय आणि सीएसआरडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सीएसआरडी संस्थेच्या सभागृहात विकास पत्रकारिता व पत्रकारांसाठीच्या विविध शासकीय योजना या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली,ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेला राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, नाशिक विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, नाशिक विभाग अधिस्वीकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, सीएसआरडीचे प्रा. विजय संसारे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार, मुक्त पत्रकार, विविध दैनिकांचे संपादक,पत्रकार, वृत्तछायाचित्रकार, पत्रकारिता महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. मोघे म्हणाले, पत्रकारांसाठी पत्रकार सन्मान निधी योजना आहे. तसेच शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून पत्रकारांना आजारपणात मदत केली जाते. विकासात्मक पत्रकारितेसाठी शासनाचे विविध पुरस्कार आहेत. केंद्र सरकारचीही पत्रकारांना मदत करणारी योजना आहे. याबाबत पत्रकारांनी सतर्क राहून योजनांचा फायदा घेणे आवश्‍यक आहे. पत्रकारांच्या एका बातमीने समाजात मोठे परिवर्तन घडते. त्यामुळे विकास पत्रकारिता आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी श्री.लंके म्हणाले की, अधिस्वीकृती व इतर योजनांची माहिती सर्व पत्रकारांना मिळावी यासाठी समिती जिल्हानिहाय कार्यशाळा घेत आहे. पत्रकारितेचा दर्जा उंचावणे व पत्रकारांच्या पाठिशी मदत उभी करणे हा समितीचा हेतू असल्याचेही श्री.ढमाले म्हणाले,
तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे म्हणाले की,
अधिस्वीकृती प्राप्त होण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.
अधिस्वीकृती समिती ही पत्रकारांच्या नेहमीच पाठीशी आहे. विजयसिंह होलम यांनी प्रास्ताविक करत कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. अनेक पत्रकारांना योजनाच माहित नसतात. त्यामुळे योजना पत्रकारांपर्यंत पोहोचविणे हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. 
 प्रा. विजय संसारे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. सॅम्युअल वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार भैरवनाथ वाकळे यांनी आभार मानले.

*विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. मोघे यांचा सत्कार*

जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी विधानसभा निवडणूक काळात पुस्तिका निर्माण करुन पत्रकारांपर्यंत जुनी राजकीय माहिती पोहोचवली याबाबत मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मन्सूर शेख, विठ्ठल लांडगे, भूषण देशमुख, महेश देशपांडे, मिलिंद देखणे, सूर्यकांत नेटके, बंडू पवार, निशांत दातीर, कुणाल जायकर, रोहित वाळके, विठ्ठल शिंदे आदींच्या हस्ते जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने मोघे यांचा सत्कार करण्यात आला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार जी.एम‌.शेख - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

स्नेहालय संचलित स्नेहजोत युनिट - २ आणि महिला रणरागिणी यांच्या संयुक्त विद्यमाने


श्रीरामपूर शहरात जागतिक
एड्स नियंत्रण सप्ताह संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
जागतिक एड्स नियंत्रण सप्ताह निमित्ताने स्नेहालय संचलित स्नेहजत युनिट - २ तसेच येथील महिला रणरागिणी यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती सप्ताह निमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये एड्स जनजागृती यासोबतच आरोग्य आणी कायदेविषयक मार्गदर्शन देखील करण्यात आले.
सदर कार्यक्रमास उद्घाटक व अध्यक्ष म्हणून डॉ. सीमा जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते व त्यांच्या हस्ते आरोग्य शिबिरात एचआयव्ही लोगो /लाल फीत लावून उद्घाटन करण्यात आले व कायदेविषयक जनजागृती व्याख्यानाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापक श्री. यशवंत कुरापटी यांनी संस्थेच्या कामकाजाची उजळणी करून संस्थेची माहिती दिली. त्यानंतर डॉ.सीमा जाधव यांनी एचआयव्ही ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गुप्त रोग होण्यामागची कारणे, लक्षणे, महिलांनी असे आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले व महिलांनी वर्षातून किमान एक वेळेस वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे याबाबत सांगितले,तसेच ॲड.शिल्पा चिंतेवार यांनी महिलांच्या संरक्षणासाठी, सबलीकरणासाठी, महिलांचे अधिकार कायदे व त्यातील तरतुदी विषयी मार्गदर्शन केले तसेच महिलांनी स्वतः कायद्याविषयी जागृत राहून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सांगितले.
 समुपदेशक राहुल भोसले यांनी आभार मानले , क्षेत्र अधिकारी आकाश जावळकर , वामन सूर्यवंशी , हर्षल हगवणे, लता बेंद्रे, वैशाली घाटे, आरती जावळकर, योगिता शिंदे, माधुरी वाघ ,इंदुबाई जावळे, लिलाबाई खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले संस्थेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक प्रसन्न धुमाळ व लॅब टेक्निशियन लक्ष्मीकांत करपे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी सहभाग नोंदविला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================



विद्यानिकेतन अकॅडमीच्या जपनीतकौर ठकराल हीने मिळवले आंतरराष्ट्रीय मानांकन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन ॲकेडमीतील इयत्ता आठवी नंबी नारायण मधील विद्यार्थिनी, जपनीत कौर सरबदीपकौर रणजीत सिंग ठकराल हिने वर्ल्ड हँडरायटिंग कॉन्टेस्ट - २०२४ मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे ! तिच्या अथक परिश्रम, समर्पण, आणि अपवादात्मक कौशल्याचे हे अद्वितीय यश आहे. या अलौकीक विजेतेपदामुळे, जपनीतकौर च्या सुंदर अक्षराचे नमुने गूगल आणि वर्ल्ड हँडरायटिंग कॉन्टेस्टच्या गूगल मुखपृष्ठावर वर्षभर प्रदर्शित केले जातील, ज्यामुळे जगभरातील लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.  
हे यश फक्त जपनीत आणि तिच्या कुटुंबासाठीच अभिमानाचे क्षण नाहीत, तर विद्यानिकेतन अकॅडमी, श्रीरामपूरसाठीही एक गौरवशाली टप्पा आहे. एका छोट्या शहरातील शाळा असूनही, आमच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर यशस्वी होण्याची क्षमता सिद्ध केली आहे. आणि सर्वांत आनंदाची बाब ही आहे की जपनीतचे यश आता लक्सर कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या आणि दिल्ली मेट्रोच्या २५ होर्डिंग्सवर देखील झळकते आहे.
    जपनीतला तिच्या या अप्रतिम यशाबद्दल विद्यानिकेतन संकुलाचे चेअरमन श्री. टी. ई . शेळके सर , व्हा. चेअरपर्सन डॉ प्रेरणा शिंदे मॅडम, खजिनदार डॉ.राजीव शिंदे सर, प्राचार्या वर्षा धामोरे मॅडम, समन्वयक श्री. अमित त्रिभुवन सर ,व सर्व शिक्षक यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या देवून तीच्या भावी यशस्वी वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

बांधकाम कामगारांची प्रकरणे तात्काळ मंजूर करा; कामगार संघटनेची मागणी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघातील बांधकाम कामगारांची नव्याने नाव नोंदणी, नोंदीत कामगारांचे नूतनीकरण, शिष्यवृत्ती, प्रसूती, भांडे संच आदी प्रकरणे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून सदरची प्रकरणे तात्काळ मंजूर करावी, अशी मागणी माजी आ.भानुदास मुरकुटे, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, अहिल्यानगरचे कामगार उप-आयुक्त रेवणनाथ धीसले यांचेकडे श्रीराम संघटीत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
               याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघातील बांधकाम कामगारांचे नूतनीकरण करणे हे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने रेशनकार्ड, शिष्यवृत्ती, महिलांचे प्रसूती अनुदान, भांड्यांचा संच वितरण आदी कामे रखडलेली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच नवीन नोंदणी बंद असल्याने अनेक कामगार या योजनेपासून वंचित राहत आहे. सदर प्रकरणे तात्काळ चालू करावी, अशी मागणी युवानेते नीरज मुरकुटे, श्रीराम संघटीत बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक गणेश छल्लारे, अध्यक्ष संदीप शेरमाळे, सागर अमोलिक, संदीप कांबळे यांनी केली आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
*समता मिडिया सर्व्हिसेस* 
*श्रीरामपूर - 9561174111*
-----------------------------------------------
=================================

Tuesday, December 17, 2024

श्रीधर भोसले ख्रिस्ती समाज पुरस्काराने सन्मानित


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर तालुक्यातील मौजे कोन्ची येथील स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीधर भोसले यांनी सामाजिक उपक्रमार्गत संपुर्ण महाराष्ट्रात ख्रिस्ती व इतर अल्पसंख्यांक समाजाचे १५१ वधू-वर मेळावे आयोजित करून असंख्य विवाह जुळवून विक्रम केल्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची विशेष दखल घेवुन श्रीरामपूरच्या ब्रदरहुड सोशल सेंटरने श्रीधर भोसले यांना बाभळेश्वरच्या बाळ येशू चर्च मधे ख्रिस्ती समाज भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, सेक्रेटरी पी. एस. निकमसर, फादर मायकल वाघमारे, फादर संजय पंडीत, वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. शैलजा ब्राम्हणे/साबळे, पिटर बारगळसर, साकुरी चे उपसरपंच सचिन बनसोडे, बाळासाहेब ब्राम्हणे, मायकल जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. निमीत्त होते,
 १५५ व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे फादर मायकल यांच्या शुभहस्ते उद्गघाटन झाल्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे, औरंगाबाद इथुन आलेल्यांची १५० हून अधिक उपस्थिती दिसून आली. बाळासाहेब ब्राम्हणे यानी प्रास्ताविक केले तर संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले.

=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Sunday, December 15, 2024

अंशकालीन निदेशकांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार - आ.ओगले


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 तालुक्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव या अंशकालीन शिक्षकांनी मान.आमदार हेमंत ओगले यांना निवेदन दिले. यावेळी श्रीरामपूर तालुका कला, क्रीडा, कार्यानुभव समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी २०११-१२ पासून आज पर्यंत अंशकालीन निदेशकांना तटपुंज्या मानधनावर कार्य करत असल्याचे सांगितले. तसेच नगरपालिका ,महानगरपालिका, जिल्हा परिषद या शाळांवर या अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती असते व त्यांना सहावी सातवी आठवी शंभर पेक्षा जास्त पट असेल तरच नियुक्ती मिळते. तर अशी अट न राहता दोन किंवा तीन शाळा एकत्रित करून ज्या शिक्षकांचा पट कमी झाला आहे. त्यांना देखील नियुक्ती देण्यात यावी. सध्याच्या मानधनात जास्त वाढ करून लवरकच कायम संवर्ग तयार करावा. आदि मागण्या मांडल्या. यावर आमदार श्री. ओगले म्हणाले की, निश्चितच या मागण्या रास्त असून सरकार याची दखल निश्चित घेईल आणि आम्ही देखील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडू आणि राज्यातील अंशकालीनिदेशकांना न्याय मिळवून देऊ असे सांगितले. याप्रसंगी अंशकालीन शिक्षक सुयोग सस्कर यांनी देखील निदेशकांच्या व्यथा मांडल्या.
यावेळी महिला तालुकाध्यक्ष पवार मॅडम, तरकासे मॅडम, यास्मिन पठाण ,राजगुरू सर, मोहसीन सर आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
सुयोग सस्कर,श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================