महात्मा फुलेंमुळेच स्त्री शिक्षणाचा
पाया भक्कम- केतन खोरे पाटील
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्मलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुळे आपल्या संपूर्ण भारत देशात स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम बनला असून आज सर्व क्षेत्रात महिलांची आघाडी महात्मा फुले यांच्या पुण्याईमुळे असल्याचे प्रतिपादन मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांनी महात्मा फुलेंच्या १९८ व्या जयंतीनिमित्त केले.
गुलमोहर कॉलनी येथे महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना खोरे म्हणाले की, थोर समाजसेवक, स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम रोवणारे महात्मा फुले यांच्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिलांना काम करण्याची संधी मिळाली असून देशाला क्रांतिकारी दिशा देणारे समाजसुधारक महाराष्ट्राच्या मातीत घडल्याचा अभिमान वाटतो. यावेळी माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, निवृत्त नायब तहसीलदार अनिल उनवणे, सोपान शिंदे, विलास भगत, विवेक भोईर, राहुल सागडे, तृप्ती भगत, सविता घोडेकर, मनीषा बर्डे, अनिता गोरे, रेखा होते, अनिता पाटील, वर्षा भोईर, प्रज्ञा उनवणे, समीक्षा भगत, शौर्यजा खोरे आदी उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================