राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, April 23, 2025

बेलापूर बु - ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिनाताई साळवी यांची बिनविरोध निवड


बेलापूर बु ll ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिनाताई साळवी यांची बिनविरोध निवड

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बेलापूर बु ll ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा. व माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.यांचे नेतृत्वाखालील तसेच जि.परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखालील गावकरी मंडळाच्या मिनाताई अरविंद साळवी यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच स्वाती अमोलिक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणुक अधिकारी व्हि.एस.गवारी (मंडलाधिकारी) यांचे अध्यक्षतेखाली,तलाठी व्हि.एच.खेमनर व ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक संपन्न झाली.सरपंच पदासाठी गावकरी मंडळाच्या मिनाताई साळवी यांचा एकमेव अर्ज आला.विरोधी सुधीर नवले,रविन्द्र खटोड व भरत साळुंके यांचे नेतृत्वाखालील जनता विकास आघाडीने निवडणुकीतून माघार घेतली. बैठकीस गावकरी मंडळाच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंंच प्रियंका कु-हे, सदस्य अभिषेक खंडागळे, मुश्ताक शेख, तबसुम बागवान, चंद्रकांत नवले, वैभव कु-हे, उज्वला कुताळ, सुशिलाबाई पवार उपस्थित होते.
तर सुधीर नवले, भरत साळुंके, रविंद्र खटोड यांचे नेतृत्वाखालील जनता विकास आघाडीचे सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे मिनाताई साळवी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. निवडीनंतर झालेल्या आभार सभेत जि.परिषद सदस्य शरद नवले म्हणाले की, गावकरी मंडळाने सरपंच पदाबाबत जो शब्द दिला आहे तो पाळला आहे. यापुढील काळात प्रवरा घाट विकास पर्यटन केन्द्र, गाव अंतर्गत रस्ते, सेंन्द्रिय खत प्रकल्प, बाराशे घरकुलांचे संकुल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केन्द्र आदी प्रश्न मार्गी लावायचे आहेत. आजच्या बिनविरोध निवडीने विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत.गावकरी मंडळात फूट पडावी यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या विरोधकांना गावकरी मंडळाने ऐक्यातून चपराक दिल्याचे श्री.नवले म्हणाले. बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की, विरोधकांनी बेताल आरोप केले त्याला आम्ही कामातून उत्तर दिले. विरोधकांच्या वीस वर्षात झाली नाहित इतकी विकास कामे गावकरी मंडळाने चार वर्षात करुन दाखविली. १२६ कोटीची ऐतिहासिक पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारे, साठवण तलाव, घरकुल, क्रिडा संकुल, सर्वधर्मिय स्मशानभुमी, सेंद्रिय खत प्रकल्पासाठी ४३ एकर मोफत जमिन आदि ठळक कामे झालित. या वाटचालीत पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा. माजी खा. डाॕ.सुजय विखे पा., जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा. यांचे बहुमुल्य सहकार्य लाभल्याबद्दल श्री. खंडागळे यांनी धन्यवाद व्यक्त केले. याप्रसंगी रणजीत श्रीगोड , जालिंदर कु-हे, माजी सरपंच स्वाती अमोलिक , भाऊसाहेब कुताळ, प्रफुल्ल डावरे, रावसाहेब अमोलिक , मोहसीन सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी गावकरी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, April 22, 2025

महात्मा गांधी विद्यालयात सायकलचे वाटप


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयात बाभळेश्वर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे सहाय्यक विभागीय अधिकारी यशपाल भिकनराव पाटील यांच्या वतीने विद्यालयातील इयत्ता पाचवी या वर्गातील विद्यार्थी सुजल देवेंद्र दळे यास सायकल भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले तर प्राचार्य विनायकराव मेथवडे यांनी आपल्या मनोगतातून पाटील यांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, अनिल जाधव, नरेंद्र ठाकरे, वर्गशिक्षिका कुदळ, रमेश निकाळे, राजू गावित, बाबासाहेब अंत्रे, अनिल गोलवड, सविता दळे आदी जण उपस्थित होते. शेवटी संजय ठाकरे यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, April 20, 2025

सर्व धर्म समभाव अशा विचाराने काम करणाऱ्या सेवकाचा सन्मान - विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ


- नागपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील उरुळी कांचन अशा छोट्याशा गावात राहुन देखील राज्यभर रांजले गांजले उपेक्षित आणी दुर्लक्षितांचे ज्वलंत प्रश्नांसाठी आहोरात परिश्रम घेत असलेले तथा आपल्या जीवन संघर्षातून पुढे येऊन हजारो कुटुंबांना कंलकीत जीवनातून मुक्त करणारे ज्येष्ठ आदिवासी समाजसेवक नामदेवराव भोसले यांचे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल डॉ. दिलीप पाटील - भुजबळ विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र तथा सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकडून प्रशंसा पत्र देत त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील - भुजबळ म्हणाले की,संर्घश मय जिवनातून काम करणा-या समाजसेवकाचा सन्मान करताना अत्यंत आनंद होत आहेत,कोणी जन्मजात गुन्हेगार नस्तो या विचाराने काम करणारे व 
दुसऱ्याचे दुःख आपले दुःख समजून अत्यंत दैनिय परिस्थितीतून काम करणारे नामदेव हे भारत देशातील विविध राज्यांमध्ये जावून वंचित घटकांचे प्रश्न सोडवतात या कामामुळे लाखो पिढीतांच्या चेहेऱ्यावर हासू आनणारे व त्यांनी आजवर हजारो कुटुबांना गुन्हेगारी जीवनातुन बाहेर काढले आहे,त्यांचे कार्याची दखल राज्य शासनाने घेतली तर वागवे ठरणार नाही.तसे समाजसेवक नामदेव भोसले यांना सन्मानित करताना मनी अत्यंत आनंद होत आहे,सर्व धर्म समभाव अशा विचाराने काम करणाऱ्या सेवकाचा हा सन्मान असल्याचे पोलीस महानिरीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ म्हणाले.
नामदेव हे आदिवासी व पारधी समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना गुन्हेगारीच्या कलंकित जीवनातून मुक्त करुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहर्निश सेवा करत उल्लेखनीय योगदान देत आहेत, यास्तव नागपूर परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी व आमंलदार यांच्या वतीने आपले मनपुर्वक अभिनंदन.तसेच आपल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने देखील आपल्याला आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. आपण भविष्यातही अशा प्रकारे उच्चश्रेणीचे सामाजिक कामकाज कराल, पिढीतांची सेवा करत दिन दुबळ्यांची सेवा कराल आणि आपल्या समाजसेवेप्रती सदैव कटिबद्ध रहाल अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी प्रशंसा पत्र बहाल करताना नामदेवराव भोसले यांच्या भावी कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या.
तसेच महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र पोलीस सदैव आपल्यासारख्या निर्पेक्ष समाजसेवकाच्या पाठीशी आहे असे नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डाॅ. दिलीप पाटील - भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले. समाजसुधारक नामदेव ज्ञानदेव भोसले यांची परिस्थिती मी अत्यंत जवळून पाहिली आहे, ते अत्यंत अवस्थेत देखील, निरपेक्ष आणी निस्वार्थपणे कामे करत आहेत,या कामांमुळे हजारो गरीब कुटुंबांना गुन्हेगारीच्या जीवनातून मुक्त करण्यात त्यांना यश आले आहे व त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे म्हणून नामदेव भोसले यांचा सन्मान पोलीस महानिरीक्षक कार्यालय नागपूर परीक्षेत्र यांच्या वतीन पोलीस महानिरीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते शाल श्रीफल व सन्मान पत्र देऊन करण्यात आला.या वेळी नामदेव भोसले, बाबा भोसले,सुनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Saturday, April 19, 2025

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त होणार - निरीक्षक ऍड.संदीप पाटील


निरीक्षक ऍड.संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथे काँग्रेसची जिल्हा आढावा बैठक संपन्न 

- नंदुरबार - प्रतिनिधी -/ वार्ता -
विधानसभा व लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच काँग्रेसची जिल्हा आढावा बैठक नंदुरबार येथे काँग्रेस जिल्हा निरीक्षक ऍड. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
    यावेळी बोलताना ते म्हणाले की, मरगळ झटकत सामंजस्य ठेवले तर नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही , कारण कॉंग्रेस हा १४० वर्षांची परंपरा असलेला पक्ष आहे,नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची सध्या झालेली अवस्था आणी आलेली काहीशी मरगळ दुरुस्त करुन कॉंग्रेस पक्षाला अधीक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पक्ष बांधणीसाठी व संघटनासाठी वेळ दिला पाहिजे तसेच जनसंपर्क अजून वाढवला तर पुन्हा एकदा जिल्हा काँग्रेसमय होण्यासाठी मोठा मदतगार ठरेल.याकरीता आपापसातील मतभेद बाजूला ठेवा आणि पक्षकार्य हेच डोळ्यासमोर ध्येय ठेवून कामे करा असाही कानमंत्र श्री.पाटील यांनी यावेळी दिला.
    नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचे भरपूर मतदार आहेत हे लोकसभेच्या निकालाने दाखवून दिले आहे, फक्त एक सक्षम नेतृत्वाची गरज नंदुरबारला आहे , ग्रामीण,शहरी भागात बुत रचना मजबूत करणे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे,आणि विरोधी पक्षातील मातब्बरांना धक्का देऊन स्वतःची जागा निर्माण करत विजयाचा आत्मविश्वास ठेवा असे मत राजेंद्र गावित यांनी मांडले.
    काँग्रेस पक्षात असूनही इतर पक्षांच्या कार्यक्रमाला काही कार्यकर्ते,नेते हजेरी लावतात मग ते काँग्रेसचे एकनिष्ठ कसे ?, जो पक्षासाठी काम करेल अशाच लोकांना यापुढे जबाबदारीची पदे दिली जावीत असे मत कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी व्यक्त केले.
    जे काँग्रेसला सोडून गेलेत त्यांचा विचार सोडा व पक्ष मजबुतीसाठी संघटित व्हा आजच्या आढावा बैठकीचे कार्यकर्त्यांची संख्या पाहून नवचैतन्य निर्माण झाले असे मत सुहास नाईक यांनी व्यक्त केले.
 काँग्रेसच्या या आढावा बैठकीत ऍड. सदिप पाटील निरिक्षक नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी, राजेंद्रकुमार गावित, दिलीप नाईक,,
सुहास नाईक, देवाजी चौधरी, पंडित मरोठ,एजाज बागवान, खान मॅडम,राजेंद्र पाटील. विविध सेलचे पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
हाजी एजाजभाई बागवान - नंदुरबार 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

माऊली वृद्धाश्रमात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर परिसरातील नेवासा रोड रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० रविवार ते २७ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.   
  सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलिन सदगुरु नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज, महंत ह भ प रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह भ प आचार्य डॉ शुभम महाराज कांडेकर यांच्या अधिपत्याखाली ह भ प शरद महाराज राजवाळ, ह भ प सुधाकर महाराज लोंढे, ह भ प तुकाराम महाराज कदम, ह भ प प्रभाकर महाराज कावले, ह भ प योगेश महाराज होन, ह भ प महंत सेवानाथ महाराज, ह भ प प्रा. आदिनाथ जोशी तसेच दिनांक २७ रोजी सकाळी १० ते १२ वा काल्याचे किर्तन ह भ प डॉ. शुभम महाराज कांडेकर यांचे होणार आहे या कार्यक्रमासाठी गोरक्षनाथ भजनी मंडळ, चौंडेश्वरी भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ, कुलस्वामिनी संगीत विद्यालय, गीता स्वाध्याय परिवार मार्केट यार्ड, त्रिमूर्ती भजनी मंडळ, श्रीराम महिला भजनी मंडळ, नामदेव भजनी मंडळ, पाताळ हनुमान भजनी मंडळ अशोकनगर निपाणी वडगाव मातापुर शिरजगांव तुळजाभवानी मंडळ साई भजनी मंडळ आदी सदर कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत या कालावधीत पहाटे काकडा आरती व आठ ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी भजन व चार ते सहा जाहीर हरी किर्तन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम या कालावधीत संपन्न होणार आहेत तरी पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमाचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली आश्रम अध्यक्ष सुभाष वाघुंडे श्री अरुण विसपुते सौ कल्पना वाघुंडे सौ वंदना विसपुते नितीन शेरकर वाघुंडे गौरी वाघुंडे तसेच भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, April 18, 2025

उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा - युनूस तांबटकर


उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी
 भाषा - युनूस तांबटकर

नगर / प्रतिनिधी:
उर्दू ही आपल्या मनाचं प्रतिबिंब व्यक्त करणारी भाषा आहे. मने जोडून प्रेम वृद्धिंगत करणारी ही भाषा सर्व भारतीयांचा मानबिंदू आहे.भाषेच्या प्रगतीसाठी सर्वांनी झटून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विशेषता उर्दू भाषिक शिक्षण संस्था मधून उर्दू भाषा प्रगतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे कार्य प्रशंसनिय आहे. सलग १९ वर्षे उर्दू सप्ताह साजरा करणे सोपी गोष्ट नाही. जिल्हा उर्दू साहित्य परिषद सातत्याने भाषेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे ही अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले. अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित उर्दू सप्ताह समारंभात ते अध्यक्षिय भाषणात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, उपाध्यक्ष के.के. खान, इमाम सय्यद,सचिव आबिद दूल्हे खान, सहसचिव डॉ.कमर सुरूर, सदस्या नर्गिस इनामदार, अनीस शेख, मुन्नवर हुसेन आदि उपस्थित होते.
तांबटकर पुढे म्हणाले की उर्दू भाषेने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. आज आपल्या देशात ही भाषा परकिय म्हणून गणली जात आहे ही दुर्दैवी बाब आहे. उर्दू माध्यमातून शिक्षणाच्या उच्च सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी उर्दू सप्ताह मागची भूमिका विशद केली. गेली १९ वर्षे देशांमध्ये उर्दू सप्ताह साजरा करणारा अहमदनगर हा एकमेव जिल्हा आहे असे सांगून या उर्दू सप्ताह मध्ये जिल्ह्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला,त्या सर्वांना प्रशस्तीपत्रे उर्दू साहित्य परिषदे मार्फत देण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील सप्ताहात सहभागी सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना सन्मानचिन्ह देखील देण्यात आले आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ.कमर सुरूर,प्र. मुख्याध्यापक मुनव्वर हुसेन यांनीही मनोगत व्यक्त केले.
उर्दू साहित्य परिषदे तर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांना उर्दू भाषेतील बोर्ड यावेळी प्रदान करण्यात आले. यासाठी उपाध्यक्ष के. के. खान यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद इमाम व फैयाज शेख यांनी केले. आभार आबिद खान यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बदर शेख आणि शेख साजिद कुरेशी, जुनेद, हनीफ शेख, नर्गीस इनामदार, समीना शेख, शाकीर शेख, सलीम शेख आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह,विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच शाळांना बोर्ड वाटप करण्यात आले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ .नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, April 17, 2025

ख्रिस्त - नाकारलेलादगड कोनशिला झाला


एखादी गोष्ट सत्य आहे, शाश्वत आहे हे माहीत असताना सुद्धा ती जाणीवपूर्वक न स्वीकारणे म्हणजे नाकारणे होय. शीर्षकातील जो दुसरा शब्द आपल्याला खुणावतो तो म्हणजे "कोनशिला".
प्रत्येक दगडाच्या नशिबी कोनशिला होण्याचं भाग्य नसतं. मग असा कोणता दगड असतो की, ज्याला कोनशिला असे संबोधले जाते. पूर्वीच्या काळी दगडी बांधकाम जास्त प्रमाणात केले जायचे. बांधकामासाठी भरीव आणि आकारबद्ध दगड वापरला जात असे. एखाद्या इमारतीचे बांधकाम करीत असताना हजारो दगडं लागत असली तरी, बांधकामाच्या सुरुवातीला जो दगड प्रथम ठेवला जायचा त्याला मानाचे स्थान असायचे. हा तोच दगड जो बांधकामाची संरचना निश्चित करतो म्हणून त्याला कोनशिला असे संबोधले जाते.
कोनशिला हा शब्द इतरही काही संदर्भांसाठी वापरला जातो. पूर्वी ऐतिहासिक बांधकाम पूर्ण झाल्यावर ते काम कोणाच्या राजवटीत व केव्हा पूर्ण झाले त्याची संक्षिप्त माहिती एका भरीव दगडावरती कोरीत असत त्याला कोनशिला म्हणून ओळखले जाई. तो शब्द आजही प्रचलित आहे. आजही घर वजा शासकीय व इतर बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याची तारीख, वास्तूविशारद, उद्घाटक यांसह इतर माहिती ज्या दगडावरती कोरली जाते त्याला कोनशिला अथवा बहुधा चर्चिला जाणारा शब्द "शिलालेख" या नावाने ओळखले जाते.
बांधणाऱ्या गवंड्याने जर एखादा दगड नाकारला असेल आणि तोच दगड जर वास्तुविशारदाने प्राधान्य क्रमाने निवडला असेल तर हा नाकारलेला दगडच कोनशिला ठरतो. नाकारलेल्या दगडाने कोनशिला ठरावं यासारखी अद्वितीय गोष्ट नाही.
अगदी या उदाहरणाप्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत घडल्याचे आपल्याला पवित्र शास्त्रात पहावयास मिळते.
शास्त्रात (१ पेत्र - ०२:०४) मध्ये सांगितल्याप्रमाणे मानव मुक्तीसाठी स्वर्गीय पित्याने त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती पाठविला ज्याला जिवंत धोंडा असे संबोधले आहे. देवाची ही यथार्थ व बहुमोल निवड मात्र जगाला समजली नाही आणि कळत नकळत ख्रिस्त या जगाकडून नाकारला गेला. 
ख्रिस्ताच्या बाबतीत लोक अनभिज्ञ होते असे नाही कारण ; त्याच्या जन्मावेळी रानातील मेंढपाळ आणि मार्गस्थ तीन राजांना (ज्ञानी लोकांना) "तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे" ही शुभवार्ता कळविण्यात आली होती. याच ज्ञानी लोकांकडून हेरोद राजाला देखील ही माहिती मिळाली होती. 
मत्तयकृत शुभवर्तमान (०३:१७) नुसार आकाशातून वाणी झाली होती की, “हा माझा पुत्र आहे, ज्याच्यावर मी प्रेम करतो; त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सुद्धा (मत्तय - ०३:११) अन्वये सांगितले होते की, "मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्‍चात्तापासाठी करतो खरा ; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही ; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे." ख्रिस्त आगमनाचे असे एक ना अनेक दाखले आपणांस नव्या व जुन्या करारात सुद्धा पहावयास मिळतात.
ख्रिस्ताचे मानवरूप धारण करून येणे केवळ एक प्रक्रिया नव्हती, तर ती दैवी योजना होती. त्याचे येणे म्हणजे एक मिशन होते. मानव मुक्तीचे उद्दिष्ट उरी बाळगून तो आला होता. 
ख्रिस्त जन्माच्या अगोदरचा शास्त्रभाग म्हणजे जुना करार अभ्यासल्यास आपल्या लक्षात येते की, परमेश्वर पित्याने निर्मिलेल्या प्रथम स्त्री आणि पुरुष अर्थात आदाम व हवा यांनी केलेल्या पापामुळे मूळ पापाचा डाग मानवाला मिळाला आणि मानवजात मृत्यूची धनी झाली होती.
अशातच ख्रिस्त येण्याअगोदर स्वैराचार, कर्मकांड, धर्मपंडिताद्वारे समाजाची दिशाभूल तसेच देवाचे अस्तित्व नाकारून तत्कालीन राजांद्वारे स्वामीत्व प्रस्थापित करणारी भूमिका अशी एकूण सामाजिक परिस्थिती होती. या देवराज्याच्या संकल्पनेत न बसणाऱ्या गोष्टी होत्या. यापासून मानवाला दूर करणे आवश्यक होते. सन्मार्ग सन्मती व सत्संगाचा अवलंब होणे गरजेचे होते. प्रेम, दया, क्षमा, शांती या मनुष्य जन्मास स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या गोष्टींची मानवाच्या अंत:करणात पेरणी करणे महत्त्वाचे होते. 
यासाठीच की काय, स्वतःच्या पापांचे स्मरण करणे, पश्चातापी अंत:करणाने देवापुढे ती पापे कबूल करून, पापमुक्तीची याचना करणे व पुन्हा तेच ते पाप न करण्याचा निर्धार करणे, हा सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी मानवाच्या अंधकारमय आयुष्यात ख्रिस्त नावाचा तेजस्वी तारा अवतरला. आपल्या साडे तेहतीस वर्षाच्या आयुष्यात तो लोककल्याणासाठी झटला. त्याने जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेले. तो उत्तम गुरु असल्याने त्याने लोकांना दाखले देऊन सत्य समजावून सांगितले. देवराज्याची घोषणा केली. लोक माझ्याकडे येतील ही आशा न बाळगता तो लोकांपर्यंत पोहोचला. लोक भेटतील तिथे अगदी नदीच्या किनाऱ्यावर, डोंगराच्या माथ्यावर, बाजारात, मंदिराच्या ओट्यावर जमेल तिथे त्याने लोकांना उपदेश केला. पित्याचा अचूक संदेश या माध्यमातून त्याने जगापर्यंत पोहचवला. त्याच्या येण्यापूर्वी लोक मोशेच्या नियमशास्त्रानुसार जीवन जगत होते. यहूदी लोकांना आणि धर्मपंडितांना असे वाटले की, हा मोशेचे नियमशास्त्र बदलायला आला आहे. पण ख्रिस्त म्हणतो " मी मोशेचे नियमशास्त्र बदलण्यास नव्हे तर ते पूर्ण करण्यास आलो आहे." परंतू हे लोकांच्या ध्यानी आले नाही. त्यांनी सोयीस्करपणे ख्रिस्त नाकारला. 
तत्कालीन राज व्यवस्थेला, धर्मपंडितांना, शास्त्री-पुरुषींना देखील ख्रिस्ताची ही गोष्ट खटकली. ख्रिस्ताच्या सत्य सांगण्याने आपले अस्तित्व धोक्यात येईल ही भीती त्यांना वाटू लागली. त्यांनी त्याच्यावर दोषारोपपत्र ठेवून कपटाने त्याला पकडले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला. ज्या राजाच्या दरबारात हा खटला सुरू होता त्या पिलात राजाला ख्रिस्तात काहीच दोष दिसेना.
मग तो हात धुवून मोकळा झाला आणि ख्रिस्ताला त्याने लोकांच्या हवाली केले. जनसमुदायाने त्याला क्रूसावर खिळा ही मागणी लावून धरली. वाढत्या जनसमुदायाच्या दबावाने जी शिक्षा चोर लुटारूंना दिली जायची ती वधस्तंभाची शिक्षा त्याला देण्यात आली. त्याच्या शिरावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला. तो रक्तबंबाळ झाला. त्याला चाबकाचे फटके मारण्यात आले. लोक त्याच्या तोंडावर थुंकले. शक्तीहीन झालेला ख्रिस्त खांद्यावरती क्रूस घेऊन कालवारी टेकडीचा मार्ग चालला. तो कन्हला, विव्हळला पण कुणाला त्याची दया आली नाही. हातीपायी खिळे ठोकून त्याला क्रुसावर टांगण्यात आले.
त्याचे येणे होईपर्यंत लोक पापमुक्तीसाठी परंपरेनुसार कोंकराचा बळी देत असत मात्र ; स्वर्गीय पित्याचे निष्पाप कोंकरू मानवाचे तारण व्हावे म्हणून कर्तव्याची जाणीव ठेवून, पित्याच्या आदेशान्वये वधस्तंभी निपचित पडले होते. 
थोड्यावेळासाठी असत्य सत्यावर हसलेही असेल पण ; असत्याचा हा असुरी आनंद फार काळ टिकणारा नव्हता. कारण तिसऱ्या दिवशी मृत्युंजयी ख्रिस्त मरणातून उठणार होता नव्हे; तो पुनरुत्थित प्रभू उठला. पुनरुत्थानानंतर ४० दिवसांच्या जगीक यात्रेदरम्यान तो मारिया मग्दालिन व आपल्या १२ शिष्यांसह अनेकांना भेटला. चाळीसाव्या दिवशी तो सर्वांसमक्ष स्वर्गात घेतला गेला. 
त्याच्या पुनरुत्थानाने मृत्यूनंतरही जीवन आहे हे जगाला कळाले. ख्रिस्त सांगत आलेल्या सार्वकालिक जीवनाची प्रचिती आली. त्याच्या निष्पाप रक्ताने आपली पापातून मुक्तता झाली हे जगाला समजले. त्याच्या निरपराध रक्ताचे मोल कळाले. चोर - दरोडेखोरांना शिक्षा देण्यासाठी वापरला जाणारा शापित क्रूस (वधस्तंभ) ख्रिस्ताच्या स्पर्शाने पावन झाला. क्रूस विजयाचे निशाण ठरले.
दरम्यान त्या निरपराध कोंकराला आरोप प्रत्यारोप, न्याय निवाडा, अवहेलना व निर्दोष मरण यातून जाणे भाग पडले. जगाने त्याला नाकारले परंतू स्वर्गीय पित्याचा हा प्रिय पुत्र स्वर्गात त्याच्या उजवीकडे बसला आहे. तो न्यायाच्या दिनी मेघारूढ होऊन पुन्हा येईल. त्याने दिलेल्या पुनरुत्थनाच्या आशेने उभ्या जगाने ख्रिस्त स्वीकारला.
 अशा तऱ्हेने जगाने नाकारलेला पण देवाने निवडलेला तारणदुर्गाचा दगड (ख्रिस्त) कोनशिला झाला.
प्रसंगानुरूप या गीताच्या
 ओळी मला प्रकर्षाने आठवतात...
"हरेक धोंडा घडवू ऐसा,
 कोनशिला तो व्हावा !
बांधणारा हा जरी नाकारी, 
मान्य प्रभुला व्हावा !
विश्वासाचा घालून पाया,
 करू मंदिर महान !
धोंडे शोधू चला रे, छान छान छान !!!

=================================
-----------------------------------------------
*लेखन*
रवि त्रिभूवन (सर) ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9623280978 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
  *प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================