राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, June 25, 2025

कोल्हापूर येथूने नव्याने पदार्पण झालेले श्रीरामपूर तालुका पोलीस कार्यालयात कर्तबगार पोलीस अधिकारी अरुण क. धनवडे


श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनला नव्याने प्रशासकीय सेवेत रुजू झाल्याले अधिकारी पोलिस निरक्षक  अरुण क. धनवडे यांना फूल पुष्प गुच्छा देऊन हार्दिक अभिनंदन करताना रिपाईचे सुभाष दादा त्रिभोन संपादक राजु मिर्जा व शारुख बागवान दिसत आहे

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Monday, June 23, 2025

मां जिजाऊ पुण्यतिथी निमित्त अहिल्यादेवी होळकर शाळेत मोफत वहया व पाटी वाटप


राजमाता जिजाऊ मां साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा आणि राष्ट्रनायक घडवला - शफकत सय्यद 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
जिजाऊ माँसाहेब म्हणजे प्रेरणा, शिक्षण आणि संस्कारांची मूर्ती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा आणि राष्ट्रनायक घडवला. त्यांच्या स्मृतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे ही खरोखरच स्तुत्य गोष्ट असल्याचे प्रतिपादन मुस्कान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद यांनी केले. 
नगर शहरातील सर्जेपुरा येथील मनपाची अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळा क्रमांक ११ व शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १३ मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशनच्या वतीने मोफत वहया व पाटी वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुस्कान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, जीवन फाऊंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, राजाभैय्या, अन्नुभाई, शाळेचे जबीन इनामदार, समीना खान, भाऊसाहेब चिकने, शाईस्ता शेख आदी उपस्थित होते.
मुलांना वहया व पाटी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता.
या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शफी हज उमरा टुर्स, राजकुमार गुरनानी, सुनील भंडारी, जीएसएम मोबाईल, मुबीन खान, डॉ. रेश्मा चेडे, युनूसभाई तांबटकर, सुनील तेलतुंबडे (रोझमॅन) आदी मंडळी पुढे सरसावले, त्यांचे मनापासून आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
आपल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आज जी आनंदाची आणि समाधानाची झलक दिसते आहे, ती पाहून आपल्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले असे वाटते. शिक्षण हा समाज परिवर्तनाचा महत्त्वाचा पाया आहे आणि त्या दृष्टीने हे वह्या-पाटी वाटप म्हणजे फक्त वस्तूंचं वाटप नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला आधार असल्याचे आरिफ सय्यद म्हणाले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार जबीन इनामदार यांनी मानले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, June 21, 2025

योग ही एक प्रभावशाली साधना आहे प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे की, ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधील नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते म्हणून योग ही एक प्रभावशाली साधना आहे. योगाचाअंगीकार प्रत्येकाने केला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले .
    तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित योग दिनाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर क्रीडा संचालक प्रा. डॉ. विनायक काळे ,योग प्रशिक्षिका प्रा. रुपाली उंडे हे होते.
 प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे पुढे म्हणाल्या की, योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधी बरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो . आजच्या धकाधकीच्या काळात स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण आयुष्य जगण्यासाठी तसेच जीवनशैलीमध्ये मनशांती टिकून ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग होय . त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगा करणे गरजेचे आहे. यावेळी प्रा. डॉ. विनायक काळे, प्रा. रुपाली उंडे यांनी योग विषयक मार्गदर्शन करून योगासनांची प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करुन घेतली. यावेळी प्रा. डॉ. बाबासाहेब पवार ,प्रा. विलास गायकवाड, प्रा. डॉ. अशोक माने ,प्रा.सतीश पावसे ,प्रा. सुनील विधाटे, प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. डॉ. बाळासाहेब बाचकर, प्रा.डॉ. संजय नवाळे, प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉ. विठ्ठल सदाफुले, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय नवाळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. प्रकाश देशपांडे यांनी योग दिनासाठी उपस्थित असणाऱ्यांचे आभार मानले .

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, June 20, 2025

जमात ए इस्लामी तर्फे सर्वधर्मीयांसाठी 'बकरीद उर्फ ईदुल अज्हा' मिलन कार्यक्रम संपन्न


जमात ए इस्लामी तर्फे सर्वधर्मीयांसाठी 'बकरीद उर्फ ईदुल अज्हा' मिलन कार्यक्रम संपन्न

बकरीदचा वैश्विक संदेश 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
जमाअते इस्लामी हिंद,नगर तर्फे नगर शहरातील कासमखानी मशीद याठिकाणी सर्वधर्मीय बांधवांसाठी 'बकरीद उर्फ ईदुल अज्हा' मिलन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी आपल्या प्रास्ताविक करताना डॉ. इक्राम खान यांनी सर्वधर्मीयांना बकरीदची पार्श्वभूमी व संदेश समजाऊन सांगितले व गैरसमज दूर करणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
मनोगत व्यक्त करताना डॉ. सय्यद रफीक यांनी बकरीद ही प्रेषित इब्राहीम (अ.) माता हाजरा (अ.) व पुत्र इस्माईल (अ.) यांच्या महान त्याग व बलिदाना प्रित्यर्थ साजरी केली जाते हे विषद केले. इब्राहीम (अ.) यांनी तत्कालीन अंधश्रध्दा, अनीष्ठ रूढी-परंपरा व देवा-धर्माच्या नावावर होणा-या जनसामान्यांच्या शोषणा विरूध्द सर्वस्वाने संघर्ष केल्याचे विषद केले. नियतीने त्यांना देवाधर्माच्या नावावर प्रचंड शोषणाचे केंद्र असणा-या श्रीमंत देवस्थानाचे सर्वेसर्वा असणा-या पिता आजर यांच्याच पोटी जन्माला घातले.
इब्राहीम (अ.) यांचा संघर्ष घरातूनच सुरू झाला. त्यांचे उभे जीवन त्यागाचे, कुर्बानीचे प्रतीक आहे. या संघर्षात त्यांना पत्नी सारा (अ.) हाजरा (अ.) पुतण्या लूत (अ.) व मुले अनुक्रमे इस्माईल (अ.) व इसहाक (अ.) यांनी संपूर्ण सहकार्य केल्याचे स्पष्ट केले. इसहाक (अ.) यांच्या वंशातच याकूब (इस्राइल) (अ.), यूसूफ (अ.), मूसा (अ.), मरियम (अ.) व इसा (येशू) (अ.) इ. अनेक प्रेषित जन्मले आणि इस्माईल (अ.) यांच्या वंशात २५०० वर्षांनंतर मक्का येथेच शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला असे नमूद केले.
प्रमुख पाहुणे इंजिनिअर वाजीद अलीखान यांनी आपल्या प्रमुख भाषणात बकरीदचा ४००० वर्षांपूर्वीचा इतिहास विषद केला. प्रेषित इब्राहीम (अ.) व इतर तमाम प्रेषितांचाच वारसा शेवटचे प्रेषित पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विशूध्दपणे पून्हा जोमाने चालविला व एक आदर्श नागरिक, आदर्श कुटूंब, आदर्श समाज व आदर्श राज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवल्याचे त्यांनी सप्रमाण दाखले देऊन उपस्थितांचे मार्गदर्शन केले. मक्का मशीद ही प्रेषित इब्राहीम (अ.) व इस्माईल (अ.) यांनी ४००० वर्षांपूर्वी मक्का येथे बांधली. जे आजही एकेश्वरवादाचे, समतेचे, विश्वबंधुत्वाचे व शांतीचे केंद्र आहे हे स्पष्ट करून हज्ज यात्रेसाठी त्यांच्याच स्मरणार्थ दरवर्षी जगाच्या कानाकोप-यातून मुस्लिम बांधव एकत्र येऊन समता व बंधूत्वाचे प्रत्यक्ष दर्शन घडवितात इ. अनमोल माहिती दिली.
कार्यक्रमासाठी सावित्री फातेमा स‌द्भावना मंचाचे अध्यक्ष ॲड. संभाजी बोरुडे, मराठा सेवा संघाचे विठ्ठलराव गुंजाळ, अशोक सब्बन, नवेद बिजापुरे, मुश्ताक सर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, फिरोज शेख व इतर सर्वधर्मीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुबीन खान यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. याप्रसंगी प्रश्नोत्तरासाठी ही संधी दिल्याने अनेक शंका-कुशंकांचे निरसन झाले. शेवटी जमाअतचे स्थानिक अध्यक्ष सय्यद नईम यांनी सर्वांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष म्हणजे* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ आबीद खान,अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, June 19, 2025

सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी यांचे प्रलंबित विविध प्रश्नाबाबत जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सेवा निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रश्नांची सोडवणुक पेन्शन अदालतमध्ये करण्यात यावी.
सेवानिवृत्त पात्र निवडश्रेणी व वरिष्ठ श्रेणी यांची यादी पंचायत समिती स्थरावर प्रसिध्द करण्यात येऊन हरकती नोंदवुन, फरक अदा करावा. तसेच संघटनेस प्रत्येक तालुका स्तरावरील यादी मिळावी.१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२५ अखेर सेवानिवृत्त झालेल्या, परंतु गटविमा अद्याप पर्यंत अदा न केलेल्या शिक्षकांची नावे त्रुटीसह संघटनेस द्यावीत, तसेच ज्यांचे गटविमा अदा केला आहे त्यांची यादी व रक्कम जमा केल्याचा दिनांक व नमूना नं. ११ संबंधित सेवानिवृत्त शिक्षकास मिळावा, 
सेवा निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांचा ७ व्या वेतन आयोगातील हप्ते त्वरीत अदा करण्यात यावेत,प्रा.फंड, पेन्शन विक्री व ग्रॅज्युईटीच्या रकमा सेवा निवृत्तीनंतर त्वरीत अदा कराव्यात,संगणकाची कपात केलेली रक्कम शासनाकडे मागणी करण्यात यावी व तसे मागणीचे पत्र संघटनेस द्यावे, 
सेवानिवृत्त शिक्षकांना ओळखपत्र देण्यात यावेत, सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन दरमहा १ ते ५ तारखेच्या दरम्यान करण्यात यावी, 
सेवानिवृत्त शिक्षकांसाठी पेन्शन अदालत दरमहा तालुका व जिल्हा स्तरावर नियमितपणे घेतली जात नाही. तसेच मागील अदालतीचे इतिवृत्तानुसार प्रश्नांची सोडवणुक झालेली दिसून येत नाही. तरी अदालतीमध्ये झालेल्या सर्व विषयांची सोडवणुक करण्याची मागणी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना शाखा-अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष दिलीप दहिफळे, कार्याध्यक्ष शरफुद्दीन शेख, सरचिटणीस सुनील जाधव, नेवासाचे अध्यक्ष योसेफ मकासारे, उपाध्यक्ष अशोक बडे, संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना जवळी जामखेडचे दशरथ हजारे, संचालक ज्योती क्रांतीचे विष्णू दादा हजारे, पाराजी झावरे, तुकाराम ठाणगे, मधुकर शिंदे, पांडुरंग घोडके, जगन्नाथ खामकर, ज्ञानदेव ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व विषयावर मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी चर्चाही करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर व माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे


- मुंबई - प्रतिनिधी - / वार्ता 
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर व माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई - गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, अशा पर्यायी चारही रस्त्यांच्या कामांना १५ कोटींचा निधी तातडीने देण्यात येईल. ही कामे पूर्णत्वास नेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीला सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभाग, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

*सैनिक सन्मान पंधरवाडा* *नियोजन बैठक संपन्न !*


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शासनाच्या वतीने १६ जुन ते ३० जुन सैनिक पंधरवाडा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याने श्रीरामपूर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय श्रीरामपूर याठिकाणी बैठक संपन्न झाली.
बैठकीत माजी सैनिकांनी रस्ता केस,तसेच एका आजी सैनिकाच्या घरी २१ तोळे सोन्याची धाडशी चोरी होऊन चार महिने उलटले तरी देखील त्याचा अद्यापही तपास लागलेला नाही, त्या चोरीचा योग्य तपास होऊन सेवारत सैनिकास न्याय मिळावा, फेर रद्द करणेबाबत लेखी तक्रार, सैनिक कॉलनी मधील प्लॉट शासनाच्या वतीने माजी सैनिकांना सन १९८० या काळात दिले आहेत परंतु ज्या माजी सैनिकांनी अटी शर्तीचा भंग करून परस्पर ९९ वर्षाच्या करारावर काही प्लॉट सिव्हिल लोकांना विक्री केले  आहेत आणि तेच लोक तेथे असलेल्या माजी सैनिकांना नाहक त्रास देत आहेत, त्याची शासन स्तरावरून योग्य प्रकारे चौकशी करून गरजु माजी सैनिकांना फेर वाटप करण्यात यावे, विविध प्रकारचे प्रश्न लेखी तक्रार अर्जाच्या स्वरूपात नवनियुक्त नायब तहसीलदार श्री राजेश पाऊंड यांच्याकडे दाखल केले. शासन निर्णयानुसार घरपट्टी मधील संकलीत कर माफ असुनही गेले दोन,तीन वर्षांपासून संकलीत कर हा घरपट्टी मध्ये लागुन येतो आणि विचारणा केली असता वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे असे सांगून वेळ मारुन नेली जाते, संकलीत कर व शास्ती भरु नका फक्त बाकी रक्कम भरा असे वसुली अधिकारी सांगतात व पुन्हा शास्ती लावून पट्टी आकारली जाते, सुरवातीला माजी सैनिक असल्याचा सैनिक कल्याण कार्यालयाचा दाखला सर्व माजी सैनिकांनी दिलेला असतांना दरवर्षी पुन्हा पुन्हा मागणी केली जात आहे, एकीकडे संपूर्ण देशभर सैनिकांच्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते व दुसरीकडे सैनिकांना नाहक त्रास दिला जातो, त्यामुळे याबाबत नगर परिषद प्रशासक तथा उपविभागीय (प्रांत) अधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी यावर निर्णय घेऊन माजी सैनिकांची हेळसांड थांबवावी तसेच ज्या आजी - माजी सैनिकांची कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असतील त्यांनी या सैनिक सन्मान पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत मा.तहसीलदार श्रीरामपूर यांचे नावे तक्रार अर्ज दाखल करावेत व आपल्या तक्रारीचे निरसन करून घ्यावेत असे माजी सैनिक समितीच्या वतीने मेजर कृष्णा सरदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या बैठकीस मेजर कृष्णा सरदार, राजेंद्र कांदे,श्रीमती छाया मोटे, बाळासाहेब बनकर, बाळासाहेब उंडे, वीर पिता विष्णू बडाख, वीरमाता सौ,इंदूबाई बडाख, मिनानाथ गुलदगड,संजय बनकर,शरद तांबे, मच्छिंद्र शेळके इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================