राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, September 6, 2025

उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी जात असलेल्या जड वाहनामुळे व्यंकटेश नगर परिसरातील रस्ता खचला


नागरीकांची नगर परिषदेला
रस्ता दुरुस्तीची मागणी

- वरुड - प्रतिनिधी -/ वार्ता -
वरुड शहरातील व्यंकटेश नगर भागात नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे काम सध्या सुरू असून, त्या अनुषंगाने बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू आहे. या वाहनांमुळे परिसरातील मुख्य रस्ता मोठया प्रमाणात खचला आहे , त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
व्यंकटेश नगर ही एक शांत वसाहत असून, येथे दररोज शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक आणि सर्वसामान्य रहिवासी यांची सतत वर्दळ असते. अशा ठिकाणी बांधकामासाठी आलेल्या ट्रक व डंपर सारख्या जड वाहनांनी रस्त्याचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत नगर परिषद प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदाराने (कॉन्ट्रॅक्टर) यांनी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. "सरकारी कामासाठी रस्ता वापरणे समजण्यासारखे आहे, पण रत्यांच्या क्षमते पेक्षा जड वाहणा द्ववारे बिल्डींग मटेरियलची वाहतुक होत असल्या मुळे परिसराती रस्ता खराब झाला हा रस्ता दुरूस्त करण्याची जबाबदारी घेणे हे संबंधित ठेकेदाराचे कर्तव्य आहे," असे मत परिसरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

*रस्त्याच्या खचण्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढण्याची शक्यता असून, शाळकरी मुलांसाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. स्थानिक नगरपरिषद व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित ठेकेदाराला त्वरित दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. - प्रा. सुरेंद्र सिनकर, व्यंकटेश नगर - वरुड*


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर -9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, August 31, 2025

सुनील साळवे समाजसेवेचे परीस- अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे रेड क्रॉसचे वतीने साळवेंचा सत्कार


 - शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
येथील डी.डी.काचोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशासकीय इमारत याठिकाणी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे म्हणाले सुनील साळवे लोखंडाचे सोने करणारे परीस आहेत.परीस जसे आपल्या सहवासाने लोखंडाचे सोने करतो त्याच प्रकारे सुनील साळवे त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते त्यांच्या सारखेच तयार करतात.त्यांचा जनसंपर्क व लोकसंग्रह खूप मोठा आहे त्यांच्यातील चांगुलपणामुळे व गुणांमुळेच इतका मोठा परिवार त्यांनी जोडला असल्याचे सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षण विभाग, उच्च व माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा 'गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार' सुनील साळवे यांना प्रदान करण्यात आला त्यानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे वतीने साळवेंचा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचे शुभहस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अध्यक्ष मनोगतामधून सोमनाथ वाकचौरे यांनी सुनील साळवे यांच्याबद्दल वरील गौरवद्गार काढले.
      मनोगत व्यक्त करताना प्रांत अधिकारी किरण सावंत म्हणाले की,इंडियन रेड क्रॉस सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करत असताना सुनील साळवे यांनी रेड क्रॉसचे माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे केलीत.निराधार, गोरगरीब,आदिवासी, दिंन दुबळ्यापर्यंत रेड क्रॉसचा मदतीचा हात पोहोचवला. तेव्हा सुनील साळवे म्हणजे समाजसेवेचा मानबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.

   प्रमुख अतिथी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी,प्रा. टी. इ.शेळके, जाकीर सय्यद, डॉ.बाबुराव उपाध्ये,सुकदेव सुकळे प्रा. बारगळ, सतीश कुंकुलोळ , मेजर कृष्णा सरदार व्यावसायिक सुगर आदी मान्यवर उपस्थित होते..
    प्रांताधिकारी किरण सावंत यांचे हस्ते श्री व सौ.सुनील साळवे यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
       स्वागत प्रवीणकुमार साळवे यांनी तर प्रास्ताविकामध्ये भरत कुंकुलोळ यांनी सुनील साळवे चौफेर व अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
          प्रमुख अतिथी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी सांगितले सुनील साळवे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आलेख उंचीवर नेणारा आहे.त्यांचे काम आजच्या पिढीला दिशादर्शक असल्याचे सांगून इतरांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले
        यावेळी शोभा शेंडगे, गणेश पिंगळे, डॉ.संजय दुशिंग यांनी मनोगत व्यक्त करताना सुनिल साळवेंच्या कार्याची प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या.
       
         यावेळी डी.डी काचोळे विद्यालय, शा. ज.पाटणी विद्यालय,भास्करराव गलांडे विद्यालय अशोकनगर, त्रिदल माजी सैनिक संघटना,गणेश विद्यालय गणेशनगर,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, नूतन विद्यालय वावी, डावखर कन्या विद्यालय श्रीरामपूर, श्रीरामपूर तालुका मुख्याध्यापक संघ आदी विविध विद्यालये ,संस्था,संघटनांचे वतीने सुनील साळवे यांचा सत्कार करण्यात आला.
           सत्काराला उत्तर देताना सुनील साळवे यांनी शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात काम करणासाठी सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी,अधिकारी सभासद यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
       कार्यक्रमासाठी भरत कुंकुलोळ,प्रवीण साळवे,गणेश थोरात,केशव धायगुडे, अवधूत कुलकर्णी,संजय दुशिंग,विनीत कुंकुलोळ, बदर शेख,पोपटराव शेळके, सुरेश वाघुले,सचिन चंदन,सुरजनं,साहेबराव रक्ते, सुखदेव शेरे,बाळासाहेब पाटोळे,राजू केदारी, अरुण कटारे,श्रावण भोसले,विश्वास भोसले, शोभा शेंडगे,पुष्पाताई शिंदे,सविता साळुंके,माया चाबुकस्वार, सुवर्णा बोधक,स्वाती पुरे, निर्मला लांडगे आदींनी परिश्रम घेतले
       कार्यक्रमास रेड क्रॉस सोसायटी आजीव सभासद,डी.डी.कचोळे विद्यालय, शा . ज. पाटणी विद्यालय स्टाफ ,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
       सुत्रसंचलन नानासाहेब मुठे यांनी तर आभार अवधूत कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर तालुक्यातील विविध संस्थांची पदाधिकारी समाजातील प्रसिद्ध उद्योजक व व्यावसायिक तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

भटक्या विमुक्त समाजाच्या विकासासाठी कृती कार्यक्रमाची गरज : डॉ.आबासाहेब उमाप


- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय समाजव्यवस्थेत भटका विमुक्त समाज वंचित व उपेक्षित जीवन जगत आलेला आहे.अज्ञान, दारिद्र्य,अंधश्रद्धा, व्यसनाधीनता व गुन्हेगारीचा शिक्का सामाजिक व्यवस्थेने कपाळी मारल्यामुळे भटक्या विमुक्त समाजाची प्रगती खुंटली होती. अशा उपेक्षित समाजाच्या विकासासाठी कृती कार्यक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. आबासाहेब उमाप यांनी केले.
                येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी साहित्यिक डॉ.आबासाहेब उमाप मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष इंजि. रमेश इंजे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
   डॉ.आबासाहेब उमाप पुढे म्हणाले की, "आजही भटका विमुक्त समाज हा उपेक्षेचे संघर्षशील जीवन जगत आहे. फाटक्या पालात राहणाऱ्या रानोमाळ दऱ्या - खोऱ्यात भटकणाऱ्या व झोपडपट्ट्यांच्या दलदलीत फसलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस असे कार्य केले पाहिजे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्येही भटका विमुक्त समाज हा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व प्रकारच्या भौतिक प्रगतीपासून वंचित आहे. मूलभूत मानवी अधिकार व मूलभूत मानवी गरजा या समाजाला प्राप्त करून देण्यासाठी ज्यांना स्वातंत्र्याची फळे मिळाली आहेत. अशा सक्षम समाज घटकांनी या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढे आले पाहिजे." असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        " महामानवांचे सामाजिक परिवर्तनाचे विचार प्रत्येक व्यक्तीने प्रत्यक्ष कृतीमध्ये आणल्याशिवाय सामाजिक परिवर्तन गतिमान होणार नाही." अशी माहिती रमेश इंजे यांनी दिली.

       शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी वास्तव परिस्थितीवर पहाडी आवाजात पोवाडा सादर करून वातावरण निर्मिती केली. 
बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले.
          सदरच्या कार्यक्रमास थेरो दिंपकर,धम्मबांधव उत्सव समितीचे कोषाध्यक्ष विकास तोडकर व परिवार, साहित्यिक सुदर्शन इंगळे, काष्ट्राईबचे अध्यक्ष मारुती भोसले,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वामन मस्के, मुरलीधर खरात, नवनाथ लोंढे, अंकुश धाइंजे, विलास कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे मंगेश डावरे, माजी प्राचार्य रमेश जाधव, पतसंस्थेचे चेअरमन अशोक भोसले,अमर गायकवाड, मधुकर आठवले, जिवने संपूर्ण परिवार, दयानंद बनसोडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

*माझ्या वाढदिवसानिमित्त*

प्रिय मित्रमंडळी पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक, साहित्यिक, नातेवाईक आणि आप्तेष्ट आपण प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवर, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच विविध प्रसारमाध्यमांतून माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनःपूर्वक ऋणी आहे.

आपण शुभेच्छांद्वारे व्यक्त केलेले आपुलकीचे शब्द, स्नेह, प्रेम आणि आशीर्वाद हे माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत. हा स्नेहबंध असाच दृढ राहील, अशी मनापासून अपेक्षा आहे.

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
<^>
++++++++++++++++++++++++++++++++++
आपला 
*शौकतभाई शेख*
संस्थापक अध्यक्ष ✍️✅🇮🇳...
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
भ्रमणध्वनी: 9561174111
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
<^>
++++++++++++++++++++++++++++++++++

Friday, August 29, 2025

रामशेठ ठाकूर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक - चंद्रकांत दळवी


मुलांच्या वसतिगृहासाठी रामशेठ ठाकूर यांचेकडून ५० लाखाची देणगी जाहीर 

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
सातारा - "कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वावलंबी शिक्षणाचा धडा घेऊन व प्राचार्य बापूसाहेब उनउने यांच्या संस्काराचा आदर्श गिरवत स्वकर्तृत्वाने शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात यशस्वी झालेल्या रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले आहे.
सातारा शहरातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागांतर्गत थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व प्राचार्य बापूसाहेब उनउने यांचे नातू श्री.अमोल उनउने व सौ. मीनल उनउने यांनी दिलेल्या देणगीमधून मा. रामशेठ ठाकूर अभ्यासिका, प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने स्मृती दालन व मराठी भाषा प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संपन्न झाला. मराठी विभागाला दिलेल्या देणगीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व अमोल उनउने व सौ. मीनल उनउने तसेच कॉन्ट्रॅक्टर पांडुरंग मासाळ व आर्किटेक्चर पुरुषोत्तम पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला.      
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
               रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, जी. के. बापू, सौ. मंगलताई पाटील इत्यादी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
             विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की " छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थी जीवनामध्ये कमवा शिका योजनेत कष्ट करून स्वावलंबी शिक्षण घेत ज्ञानसाधना केली. प्राचार्य बापूसाहेब उनउने तपस्वी प्राचार्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांना रामशेठ ठाकूर यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली आहे. तसेच प्राचार्य बापूसाहेब उनउने यांचे नातू श्री.अमोल उनउने यांनी आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभागाला विशेष देणगी देऊन आपल्या आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या देणगीदारांचे सामाजिक कार्य आजच्या युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायक आहे." असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
         कार्यक्रमात ॲड.भगीरथ शिंदे, कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डी ए माने व सौ. मीनल उनउने यांनी आपल्या मनोगतातून प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने यांच्या आठवणींना आत्मिक उजाळा दिला.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या नावडकर यांनी केले तर डॉ. आबासाहेब उमाप यांनी आभार व्यक्त केले.      
           कार्यक्रमासाठी उपप्राचार्य रामराजे माने देशमुख, डॉ. सविता मेनकुदळे, डॉ. राजेंद्र तांबिले, डॉ. संदीप किर्दत, डॉ. वर्षा माने, डॉ. महादेव चिंदे, डॉ. राज चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील डॉ. संजय सरगडे, प्रा. प्रियंका कुंभार, प्रा. श्रीकांत भोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
सौ.मिनल उनउने - सातारा 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, August 28, 2025

मोटार वाहन (RTO) विभागाचेअंमलबजावणी अधिकारी ? छे, छे. हे तर रस्त्यावरील देवदूतच !’


'मागे एकदा, मी ‘मोटार वाहन विभागाचे अंमलबजावणी अधिकारी ? छे, छे. हे तर रस्त्यावरील देवदूतच !’ नावाची पोस्ट लिहिली होती. ती कितपत व्हायरल झाली याची माहिती नाही मात्र विभागातील अधिकाऱ्यांच्या ‘नोबेल वर्क’ ची बऱ्याच जणांना माहिती झाली. 


रस्त्यावर मोटार वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्या अपघातात गंभीर किंवा किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींशी ज्या विभागांचा प्रत्यक्ष संबंध असतो किंवा येतो ते विभाग अश्याप्रसंगी माणुसकी किंवा मानवता धर्माचे पालन अभावानेच पालन करताना आढळून येतात. 
त्यांच्यादृष्टीने त्यांचे कर्तव्य हे तांत्रिक बाब असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते. 
परंतु, मोटार वाहन विभाग (RTO) हा एकमेव असा विभाग आहे, ज्याचा अपघातातील फक्त अपघातग्रस्त वाहनाच्या यांत्रिक तपासणी पुरता असलेला संबंध विसरून विभागातील अधिकारी केवळ 'मानवता धर्म' व माणुसकीस जागून आपल्या कक्षेबाहेरील काम करत जखमी व्यक्तींना मदत करतात, त्यांचे प्राण वाचण्यास महत्त्वाची भुमिका पार पाडतात. 
अश्यावेळी स्वतःची पदरमोड करून, खिश्यास तोशीस लागली तरी ते मागेपुढे पाहात नाहीत. याचे प्रत्यय प्रत्येक्षात बघावयास मिळाले, सोमवार दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीरामपूर - बाभळेश्वर रस्त्यावर श्रीरामपूर पासून ७ ते ८ किमी अंतरावर दुपारी जवळपास पावणे बारा ते बारा वाजण्याच्या दरम्यान वाहनांचा अपघात घडला होता. अपघातग्रस्त वाहनांतील तीन व्यक्ती रस्त्यावर पडलेल्या होत्या. त्यापैकी दोन जणांना अतिरक्तस्त्राव होत होता. त्यांच्या जीवन - मरणाचा प्रश्न होता. रस्त्यावर अंमलबजावणी कामावर निघालेल्या मोटार वाहन विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नजरेस त्या अपघातग्रस्त व्यक्ती पडल्या. मात्र इंटरसेप्टर वाहनांत बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी अडचण येत होती. परंतु, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी दुसरे वाहन थांबवून त्यात ताडपत्री अंथरून सदरील अपघातग्रस्त तीन्ही जखमींना नजीकच्या प्रवरा रुग्णालयात तातडीने दाखल केले. 
सामान्यतः स्रिया या स्स्वभावाने मृदु व संवेदनशील असल्याने कित्येक जणींना जखम, रक्तस्त्राव पाहून भोवळ येते. 
परंतु, आरटीओ विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक कु.निकीता पानसरे 
या भगिनी अधिकारी यांनी धीरेदात्तपणे जखमींना उचलण्यास मागेपुढे पाहिले नाही. हे करीत असताना त्यांच्या हाताला व गणवेशास लागलेल्या जखमी व्यक्तींच्या रक्ताच्या डागांची देखील त्यांनी पर्वा केली नाही. 
यासोबतच बरोबर असलेले मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील यांना काही कारणास्तव अंमलबजावणी पथकात काम करण्यास मागील सहा महिन्यांपासून मज्जाव करण्यात आला होता. परंतु,अंमलबजावणी पथकात काम करण्याची संधी प्राप्त होताच यंत्रवत, भावनाशून्य व केवळ कर्तव्यभावनेने काम करण्यापेक्षा आपल्या अंगी असलेल्या माणुसकीच्या वृत्तीचे अपघातग्रस्तांना संकटसमयी मदतीतून त्यांनी माणूसकीचे दर्शन घडवले.
मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, सहायक मोटार वाहन निरीक्षक निकीता पानसरे,सागर आढाव यांच्या चांगल्या कामाची नक्कीच नोंद होईल.आपल्या पुण्यकर्माच्या गाठोड्याचे वजन नक्कीच वाढेल यात शंका नाही.

*रूक्मिणीकांत कळमणकर* 
मोटार वाहन निरीक्षक (सेवानिवृत्त)


=================================
-----------------------------------------------
*संकलन:*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================



पैगंबर जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले शाळेत रक्तगट तपासणी शिबिर संपन्न



प्रेषितांनी मानवजातीला दया,करुणा,समानता आणि सेवाभावचा संदेश दिला - एजाज तांबोली 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद मुस्तफा (स.) पैगंबर यांनी मानवजातीला दिलेला संदेश म्हणजे दया, करुणा, समानता आणि सेवाभाव. त्या शिकवणीला अनुसरून आपण आज समाजासाठी उपयुक्त असा रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केला आहे.
रक्तदान हे जीवनदान आहे. पण त्यासाठी सर्वात पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणजे आपला रक्तगट माहित असणे. आपला रक्तगट माहिती असेल तर आपत्कालीन परिस्थितीत आपण त्वरित मदत करू शकतो, तसेच दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यास धावून जाऊ शकतो. हा उपक्रम म्हणजे केवळ तपासणी नाही, तर सेवाभावाची एक सुरुवात असल्याचे प्रतिपादन अल करम हॉस्पिटलचे एजाज तांबोली यांनी केले.
अल करम हॉस्पिटलच्या वतीने हजरत मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त नगर शहरातील मुकुंदनगर याठिकाणी असलेल्या सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डाॅ. अब्दुस सलाम सर,फरीदा भाभी, गौसिया तांबोळी, अल करम हॉस्पिटलचे एजाज तांबोली, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, शिक्षक शेख फरजाना दिलावर, शेख अस्लम पटेल, शेख शाहिन, शेख हिना, पठाण फरहान उज़मा , शेख यास्मीन व शेख सुलताना आदी उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला पैगंबर यांच्या जीवनातील एक मोठा संदेश आठवतो "सर्वोत्तम मनुष्य तो आहे जो दुसऱ्यांच्या कामी येतो."
आपण सर्वजण जर ही शिकवण आपल्या जीवनात उतरवली तर समाजात एकोपा, आरोग्य आणि बंधुभाव नक्कीच वृद्धिंगत होईल.असे आबीद दुल्हे खान यांनी मनोगत व्यक्त करताना नमुद केले.
मुख्याध्यापक नौशाद सय्यद यांनी आयोजकांचे, डॉक्टरांचे आणि या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानत. अल्लाह ताआला आपल्याला अशा समाजोपयोगी कार्यात नेहमी यश देओ आणि पैगंबर यांच्या शिकवणी नुसार चालण्याची तौफीक देवो ही दुआ केली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - नगर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================