राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 7, 2025

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोणी दौर्‍यावर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ


- लोणी - प्रतिनिधी -/ वार्ता -

द्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी सहकार पंढरी सज्ज झाली असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परिवाराने जय्यत तयारी केली होती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आणि लोणी बुद्रूक गावातील ग्रामस्थांनी उभारलेल्या पद्म स्मृती या स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी लोणी गावही भगवेमय झाले आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह दुसर्‍यांदा लोणीमध्ये यआले होते असून यापूर्वी सहकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचे सहकार पंढरीत आगमन झाले होते. मंत्री विखे पाटील यांनी बाजारतळावर उभारलेल्या भव्य सभा मंडपाची पाहणी करून, तयारीचा आढावा घेतला. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना तसेच पद्म स्मृतीस्थळ आणि सभास्थळाचे भव्य नियोजन करण्यात आले होते आज रविवारी सकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गेले होते आहेत. कारखान्याच्या नूतन प्रकल्पाचा शुभारंभ करून ते लोणी बुद्रूक गावामध्ये येतील. बसस्थानकाजवळील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून समोरच उभारलेल्या सभास्थळी पोहोचले होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्‍या या कार्यक्रमला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

कोपरगाव :- साखर उद्योगात नव्या युगाची सुरुवात झाली असून उसाच्या टाकाऊ पदार्थांपासून सीएनजी निर्मितीची क्रांतिकारी प्रक्रिया आता सुरू झाली आहे. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना ठरला आहे, जिथे ऊस प्रक्रियेतील वाया जाणार्‍या पदार्थांपासून थेट कॉम्प्रेस बायोगॅस (सीएनजी) व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युल निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी व शेतकरी सहकार मेळाव्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह ययेऊन गेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित होते


=================================

-----------------------------------------------

:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...

Mobile +919730595775...

-----------------------------------------------

=================================


Saturday, October 4, 2025

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास नगर जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा


ना.अजीतदादा पवार यांच्याकडे 
राम रहीम प्रतिष्ठानची मागणी 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार नगर जिल्ह्यातील पारनेर दौऱ्यावर आले असताना राम - रहीम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख (मेजर) यांनी त्यांची भेट घेऊन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास अहमदनगर जिल्ह्याकरीता निधी उपलब्ध करून द्यावा मागणी केली. 
यावेळी पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मा. जिल्हा परिषद सदस्य व भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, दिलीप दाते, नियाज राजे, रियाज राजे, किरण कुबडे, इमरान शेख, आवेज राजे, रेहान राजे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून देतो, माझ्याकडून व्यत्यय उशिर होणार नाही असे लगेच आदेशच दिला. 
प्रत्येक समाजाच्या कामासाठी तळमळीने, जात धर्माच्या पलिकडे जाऊन समाजसेवा व मानवता हाच खरा धर्म माणुन काम करणारे व झटणारे असे समाजसेवक माजी सैनिक रफिक शेख (मेजर) यांनी अजीत पवार यांना निवेदन देऊन माहिती दिली की, सैनिकांना सन १९७१ मध्ये सिलीगची जागा वाटप झाली होती. त्या जागेला ५५ वर्षे झाली तरी ताबा माजी सैनिकांचा नाही. त्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. दादांनी जिल्हाधिकारी यांना आमच्या समोरच हे काम तात्काळ करून द्या असा आदेश दिला असल्याचे राम रहीम सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष रफीक मेजर यांनी सांगितले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

कॉंग्रेस सेवा दलतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन


- नंदुरबार - प्रतिनिधी -/ वार्ता -
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार कॉंग्रेस सेवा दलतर्फे
हाट दरवाजा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, माजी जि.प. उपाध्यक्ष सुहास नाईक, कॉंग्रेस सेवा दल चे जिल्हाध्यक्ष एजाजभाई बागवान, किसान कॉंग्रेस विभागाचे सचिव देवाजी चौधरी, कॉंग्रेस सेवा दल चे सरचिटणीस नासीर बागवान, ऋषिका गावीत, सदा जनसेवा फाऊंडेशनचे राज्य उपाध्यक्ष ऍड.मजहर शेख, कॉंग्रेस स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तू पवार, मनियार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नासिर मन्यार, कॉंग्रेस सेवा दल चे सदस्य अजीम बागवान, संजय शिंपी आदी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने गुलाब पुष्प देऊन हिंदू बांधवांना विजया दशमी च्या शुभेच्छा

- नंदुरबार - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशन आणि सदा जनसेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देवून 
विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
इस्लाम धर्माचे आखरी नबी हजरत मोहम्मद पैगंबर साहब हे सर्व जगाचे आदर्श होते. त्यांनी शांतीचा संदेश दिलेला आहे. सर्व धर्मियांचा आदर व सन्मान करावा, अश्या त्यांच्या शिकवणीमुळे विजयादशमी (दसरा) या सणानिमित्त सामाजिक कार्यकर्ते एजाजभाई बागवान यांच्या नेतृत्वाखाली येथील नेहरु चौकातील दत्त मंदिरात हिंदू बांधवांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या. 
यावेळी नंदुरबार तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष देवाजी चौधरी, गुजर नाभिक समाजाचे विभागीय अध्यक्ष दत्तू पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे, डॉ.सुनिल गावीत, जयदिप कुमार, पंकज सिंग, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंपी, श्रावण तडवी आदी उपस्थित होते.
यावेळी इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाजभाई बागवान आपल्या मनोगतात म्हणाले की, आमच्या संस्थेचा उद्देश संपूर्ण भारतात राष्ट्रीय एकात्मता व बंधुता तसेच सर्व धर्माचा आदर सन्मान व सर्व सणात सर्वांनी सहभागी होवून सर्वांना शुभेच्छा देणे हा आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदा जनसेवा फाऊंडशनचे राज्य उपाध्यक्ष ऍड.मजहर शेख, नंदुरबार बागवान समाजाचे सचिव नासीर इब्राहीम बागवान, मन्यार समाजाचे उपाध्यक्ष अब्दुल नासीर, ऑल इंडीया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे शहर उपाध्यक्ष अजीम बागवान, अशपाक शाह, जिल्हा संघटक छन्नू शाह पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे सचिव दानिश बागवान यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात जागतिक माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा !

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ समाचार -
दिनांक २८ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात जागतिक माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी नागरिकांना शासन व सार्वजनिक यंत्रणाकडून माहिती मिळवण्याचा अधिकार हा लोकशाहीतील मूलभूत हक्क आहे याची जाणीव करून देणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे, या दिवसाचे औचित्य साधून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्यावतीने माहिती अधिकार कार्यशाळा, परिसंवाद, जनजागृती मोहीम व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .या प्रसंगी शासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि भ्रष्टाचार विरोधी लढ्यात माहिती अधिकाराचे योगदान अधोरेखित करण्यात आले.
 युनेस्कोच्या पुढाराकारातून सन २०१५ मध्ये या दिवसाला जागतिक मान्यता मिळाली तर सन २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने याला अधिकृत आंतरराष्ट्रीय दिवसाचा दर्जा दिला भारतामध्ये माहिती अधिकार कायदा २००५ लागू झाल्यानंतर नागरिकांना शासन निर्णय, योजना निधीचा वापर आणि विविध शासकीय कामकाजाबाबत माहिती मागण्याचा कायदेशीर मार्ग खुला झाला या कायद्यामुळे अनेक गैरव्यवहार उघडकीस आले असून नागरिकांचा शासनावर विश्वास अधिकृत झाला आहे लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकाराचा सजगपणे वापर करावा असे परिसंवादामध्ये ऍडवोकेट सौ.पंधारे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना केले.
याप्रसंगी माजी सैनिक संघर्ष समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मेजर कृष्णा सरदार म्हणाले की,अनेक ठिकाणी या कायद्याचा गैरवापर केला जातो आहे त्याविषयी शासन व प्रशासनाने उपाय योजना केल्या पाहिजेत आणि कार्यालयामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचारी हे देखील माहिती अधिकाराबाबत अनभिज्ञ आहेत त्यामुळे असे परिसंवाद आणि कार्यशाळा सातत्याने घेतल्या गेल्या पाहिजेत म्हणजे अधिकारी कर्मचारी यांच्यामधील माहिती अधिकाराची भीती नाहीशी होऊ शकते,

 मेजर संग्रामजीत यादव म्हणाले की २५% लोकांचे घर हे माहिती अधिकाराच्या अर्जावर चालतात, यावर कुठेतरी बंधन घातली गेली पाहिजे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमास सर्वश्री डीवायएसपी जयदत्त भवंर, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, माजी सैनिक संघर्ष समितीचे मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब बनकर , संग्रामजीत यादव ,अशोक कायगुडे, संपत लगड , बाळासाहेब भागडे ,रमेश माळी, शरद तांबे ,मीनानाथ गुलदगड ,भगीरथ पवार , सतिश सांडभोर , माजी पोलीस संघटनेचे अध्यक्ष संजय भोंडवे, गोरक्षनाथ साबदे, आर जी शिंदे, श्री. पठाण, श्री.भोसले इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर- 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, October 2, 2025

नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध


श्रीरामपूर,नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळावा या उद्देशाने एसएमबिटी हॉस्पिटल, जय मातादी मित्र मंडळ व जय मातादी फाउंडेशन, एकता महिला मंच श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे..
SMBT हॉस्पिटल इगतपुरी/ नाशिक येथील तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांना तपासणार आहेत.
हा उपक्रम महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णांसाठी मोफत असून, सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुला आहे.
शिबिरासाठी नोंदणी शनिवार 4 ऑक्टोबर 2025 शिबिराच्या दिवशी वेळ सकाळी 9 ते 3 जय मातादी सांस्कृतिक भवन, आदर्श नगर, दत्त मंदिरासमोर, दशमेश नगर, श्रीरामपूर येथेच होईल
कृपया आपल्या कुटुंबातील तसेच परिसरातील/ शेजारील गरजू रुग्णांना ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींना माहितीस्तव समाजसेवा हेतू कळवावे हीच विनंती
धन्यवाद🙏

=================================
-----------------------------------------------

[10/3, 9:45 AM] रवींद्र गुलाटी 🙏:-

-----------------------------------------------
=================================

Tuesday, September 30, 2025

नवरात्रीच्या शुभ पर्वावर स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये " जल्लोषात गरबा नाईट महोत्सव" संपन्न


- वरुड -  (जि.अमरावती) - प्रतिनिधी -/ वार्ता -
कै.राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्था संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स वरुड या शाळेमध्ये नुकताच नवरात्रीच्या शुभ पर्वावर " गरबा नाईट महोत्सव" उत्साहामध्ये संपन्न झाला.
या कार्यक्रमाला वरुड वासियांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.स्कूल ऑफ स्कॉलर्स वरुड ही शाळा दरवर्षीच नवरात्रीच्या शुभपर्वावर " गरबा नाईट" चे आयोजन करत असते. यावर्षी सुद्धा पालकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये आणि सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे निनाद गव्हाळ तसेच परीक्षक म्हणून प्रिती महात्मे या लाभल्या होत्या तसेच पी.टी.ए.मेंबर्स अंशुमन मानकर स्पाॅंसर्स दैनिक वरुड केसरी वृत्तपत्र समृह.श्री पवन गांधी,अवनी यावलकर, डॉ.रवि निळकंठराव यावलकर, श्री. नरेश गोडबोले, श्री. सागर मालपे या सर्व पाहुण्यांच्या हस्ते दुर्गा मातेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनीत कुमार दुबे यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश आपल्या प्रास्ताविकातून पाहुण्यांपुढे ठेवला सोबतच आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार व्यक्त करुन नवरात्री उत्सवाच्या उपस्थितांना तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणी शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांना हृदयस्पर्शी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळेचे संगीत शिक्षक सचिन चौधरी,अर्पणा भागवतकर, स्वाती निकम त्याचप्रमाणे रितुल देशमुख, सात्विक चौधरी, वंश सातव,ओम पटेल,ओम खेरडे,नैतिक काळे, यांनी दुर्गामातेच्या आरती सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर इयत्ता नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर गरबा नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.त्यानंतर आलेल्या सर्व "गरबा प्रेमी" आणि सहभागी इच्छूक यांचा क्रमानुसार गरबा घेण्यात आला. प्रत्येक गृप ला १५ मिनिटे देण्यात आली होती त्यामधून परीक्षकांनी परिक्षण करुन शालेय विद्यार्थ्यांच्या गृप मधून इयत्ता दहावी 'अ' च्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट नृत्य म्हणून रोख पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर खुल्या गटामधून कोमल मेंघानी प्रथम तर निकिता खुटाटे द्वितीय तसेच मोना अनासाने यांना तृतीय क्रमांक देण्यात आला.त्याचप्रमाणे प्रज्ञा मानेकर,प्रिया मेघांनी, श्री. गणेश जाधव,मनिषा वानखडे यांना प्रमुख पाहुण्यांचा हस्ते उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन स्वाती निकम,अर्पणा भागवतकर यांनी केले. या कार्यक्रमाची संकल्पना ही शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनीतकुमार दुबे तसेच उपमुख्याध्यापिका रिया तिडके यांची होती परंतु त्या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचे काम शाळेचे प्रशासन अधिकारी सुशील उघडे, शैक्षणिक समन्वयक रुपाली काळे, अकाऊंट अमोल कोल्हे, कलाशिक्षक कपिल तरार, मयूर पळसकर,संगीत विभाग, संगणक विभाग, क्रीडा विभाग ॲडमिशन काॅन्सिलर गौरी नेरकर तसेच सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, स्टुडंट्स काऊन्सिल मेंबर्स यांनी केले. यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला व वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


,<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर ✍️✅🇮🇳
 (वरुड जि. अमरावती)

,<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷


,<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111

,<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷