राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, November 21, 2025

इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशनच्या निमंत्रित सदस्यपदी प्रकाश कुलथे यांची निवड


इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशनच्या निमंत्रित सदस्यपदी प्रकाश कुलथे यांची निवड

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन, (ILNA) इलनाच्या निमंत्रित सदस्यपदी श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे यांची निवड करण्यात आली आहे.
इंडियन लँगवेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन, (ILNA) इलनाची ८१ वी वार्षिक आमसभा देशातील वृत्तपत्र मालक संपादकांच्या उपस्थितीमधे नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन याठिकाणी इलनाचे माजी अध्यक्ष तथा सोशल मिडिया असो. (SMA) चे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील डांग, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलेले केन्द्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव, इलनाचे पूर्व उपाध्यक्ष तथा सन्मार्ग मीडिया समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विवेक गुप्ता, भूषण जैन व उत्तर प्रदेश,डॉ. ललित भारद्वाज, केरळ, पी.जी. सुरेश बाबू, दिल्ली, विशाल रावत, एनसिआर, अशोक कौशिक, लखनऊ अशोक नवरतन हे पाच प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.
श्री प्रकाश पोहरे यांनी सात कार्यकारी सदस्य निवड जाहीर केली यामध्ये राममोहन रघुवंशी, भोपाल (म.प्र), कृष्णा शेवडीकर, नांदेड (महा) प्रकाश कुलथे, श्रीरामपूर, (महा) अशोक कौशिक दिल्ली, अशोक नवरत्न, लखनौ, शरद वानखेड़े, अकोला (महा), सुरेश बाबू (केरळ), सुरेंद्रकुमार शर्मा, दिल्ली आदींचा समावेश आहे.

प्रकाश कुलथे हे महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष असून वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य आधीस्वीकृती समितीचे सदस्य आहेत, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे सदस्य, श्रीरामपूर पत्रकार संघाचे सचिव, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर लाड सुवर्णकार संस्थेचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा श्रीरामपूरचे कार्याध्यक्ष अशा विविध संस्था, संघटनांवर कार्यरत आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

पालक, शिक्षक यांना मोबाईल वापरायचे धोके - तोटे काय ? याची माहिती देणे गरजेचे - सीईओ आनंद भंडारी*


जि.प.आणि ऋणानुबंध संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल डिटॉक्स इंडिया लहान मुलांच्या मोबाईल अतिवापरा विरुद्ध मोहिमेचे उदघाटन संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
समाजामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहे एका कुटुंबातील चार व्यक्ती आपल्या घरामधील एका रूममध्ये बसले असले तरी प्रत्येक जण मोबाईलचा वापर करताना दिसतो, मोबाईल च्या अतिवापरामुळे मनुष्याला शारीरिक, मानसिक, सामाजिक हानी पोहोचत आहे. भारतीय माणूस सरासरी ६ तास मोबाईल,लॅपटॉपवर असतात त्यानंतर आपला प्रत्येक वेळ सोशल मीडियावर जातो, त्याचे फायदे - तोटे पाहणे गरजेचे आहे, विद्यार्थी देखील शालेय शिक्षण घेत असताना मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे त्यामुळे आत्मविश्वास खूप कमी होत चालला आहे, तसेच अभ्यासाची प्रगती खालवली जाते आणि नको त्या गोष्टीच्या आहारी विद्यार्थी जातात, ऑनलाइन ए आयच्या वापरमुळे त्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो, खूप अनावश्यक गोष्टी मोबाईलवर पाहिले जातात त्याचा परिणाम मुलांवर गंभीर होतात, आपल्या लक्षात राहण्याचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे, पूर्वी आपण वृत्तपत्राचे वाचन करायचो, टीव्हीवर बातमी पाहायचो ,पुस्तके वाचायचो, त्यातील विषय चांगले असायचे त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढली जायची, आता आपण मोबाईल पाहत असताना त्यावेळेस वेगवेगळे विषय येतात आणि त्यातून अनावश्यक माहिती येते आपल्याला कळत देखील नाही आपण काय पाहतो, त्यामुळे आपली मेमरी कमी होते, दिवसेंदिवस विसरण्याचे प्रमाण वाढत आहे, विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर व ऋणानुबंध सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला असून पहिल्यांदा पालक - शिक्षक यांना मोबाईल वापरायचे धोके, तोटे काय आहे याची माहिती देणे गरजेचे आहे,त्याचा वापर कसा कमी करता येईल हे सांगणे गरजेचे आहे, पालकांच्या हातातील मोबाईल वापरायचे प्रमाण कमी झाल्यास विद्यार्थ्यांना देखील आपल्याला समजून सांगता येईल की मोबाईल वापरू नये त्याचे दुष्परिणाम वाईट आहे याची सुरुवात पालक आणि शिक्षकांपासून करायची असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.

अहिल्यानगर जिल्हा परिषद व ऋणानुबंध सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल डिटॉक्स इंडिया लहान मुलांच्या मोबाईल अतिवापरा विरुद्धची कार्यशाळा या कार्यक्रमाप्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या समवेत ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, मनपा प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर ज्ञानेश्वर कांबळे, अभिनव आयटीचे प्रा. मुरलीधर भुतडा, ऋणानुबंध संस्थेचे उपाध्यक्ष सारिका रघुवंशी,सचिव प्रशांत बंडगर, महेश घावटे, डॉ. खंडागळे, डॉक्टर कंगे, प्रतिभा साबळे, डॉक्टर झेंडे, सचिन परदेशी, भानुदास महानोर,मोहन परोपकारी, सोमवंशी दांपत्य, यांच्यासह ऋणानुबंधाची अनेक सदस्य तसेच सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

    यावेळी ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे म्हणाले की, आपला देश हा युवकांचा म्हणून ओळखला जात असताना मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे मुले मैदानी खेळापासून दूर गेल्यामुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे, मुलांना मोबाईल पासून कसे दूर ठेवता येईल यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि ऋणानुबंध संस्थेने पुढाकार घेत देशातील पहिला प्रयोग अहिल्यानगर जिल्ह्यातून सुरू केला आहे, या माध्यमातून पालक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्यामध्ये मोबाईलच्या अतिवापराचा दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली जाईल,मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन की ज्यामुळे मुले वापरत असलेल्या नको असलेल्या वेबसाईट, गेम्स, ब्लॉक करणे किंवा त्यांचा मोबाईल वापरण्याचा वेळ निर्धारित करणे पालकांना शक्य होणार आहे. हे मोबाईल एप्लीकेशन या मोहिमेच्या अंतर्गत अत्यंत नाममात्र शुल्क घेऊन उपलब्ध करून दिला जाणार आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचे उज्वल भविष्य असून त्यांना मोबाईल पासून कसे दूर ठेवता येईल यासाठी ऋणानुबंध संस्था काम करणार असल्याचे ते म्हणाले.
       विद्यार्थी दशेतच मुलांच्या मोबाईल अतिवापराचे भीषण वास्तव व त्यामुळे मुलांना कमी वयात शैक्षणिक, शारीरिक, मानसिक आरोग्याच्या समस्यांना बळी पडावे लागणे हे चिंताजनक स्तरावर पोहोचले आहे. या समस्येवर वेळीच उपाययोजना न केल्यास येत्या पिढ्यांमध्ये त्याचे भयंकर दुष्परिणाम होतील अशी भीती अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. मोबाईलचा अतिवापर लहान मुलांमध्ये धोकादायक पातळीवर पोहोचत असून, रिल्स, युट्युब व्हिडिओ अश्लिलता, गेमिंग याचा वाढता वापर धक्कादायक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इंटरनेट गेमिंग डिसऑर्डरला डिसीज म्हणून २०१९ सालीच मान्यता दिल्याने हा धोका अधोरेखित झाला आहे.
       अहिल्यानगर मधील ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्था व जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी विद्यार्थ्यांच्या मोबाईल अतिवापराविरुद्ध ‘डिजिटल डिटॉक्स इंडिया’ ही मोहीम छेडली आहे , मागील काही वर्षात मोबाईलच्या वापराचे व्यसनात रूपांतर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातील सर्वे मधील सर्वे केलेल्या मुलांपैकी आकडेवारी धक्कादायक आहे पौगंडावस्थेतील ३३% मुले मोबाईल व्यसनाधीन झाले आहेत. (मुले ३३.६% मुली ३२.३%). ५ ते १६ वर्ष दरम्यानच्या ६० % मुलांमध्ये तत्सम लक्षणे जाणवत आहे. ८५% पालकांना मुलांच्या या सवयी बदलणे अवघड जात आहे. एका सर्वेमध्ये असे दिसून आले आहे की ५४% माता स्वतःचे काम शांतपणे संपवण्यासाठी मुलांना मोबाईल देतात. 
           मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर मोठ्या प्रमाणावर शारीरिक परिणाम होतो. एका सर्वेनुसार सर्वे केलेल्या मुलांपैकी ३४.५.% मुलांवर मनगट आणि मानेचे विकार जडले आहेत. ५४.८% मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झालेले दिसले आहेत. चिडचिडेपणा, हिंस्रता, एकटेपणा, निद्रानाश, अस्वस्थ वाटणे इत्यादी लक्षणे लहान वयातच जाणू लागले आहेत. भारतीयांचे सरासरी रोजचा स्क्रीन टाईम ६ तास ३७ मिनिटे झाला आहे आणि हा ग्राफ दिवसेंदिवस वाढतच आहे.
      ऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने जिल्हा परिषद आहिल्या नगरच्या सहकार्याने यासाठी मोहीम उघडली असून या मोहिमे अंतर्गत संपूर्ण नगर जिल्ह्यातील ८,३८,000 विद्यार्थ्यांच्या पालकांना मुलांच्या संतुलित मोबाईल वापराबाबत वेबिनारच्या माध्यमातून जागरूक केले जाणार आहे  यासाठी यासाठी डॉ. ज्ञानेश्वर कांबळे की जे भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग चे राष्ट्रीय प्रशिक्षक व कौशल्य विकास मंत्रालयाच्या मिशन कर्मयोगी साठीचे तज्ञ मार्गदर्शक आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे.
         जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये स्वतंत्र वेबिनार आयोजित करण्यात येणार असून या वेबिनार मध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर होणारे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक परिणाम याबाबत नामवंत डॉक्टर्स, मानसोपचार तज्ञ, शिक्षण तज्ञ, समाजसेवक यांचे मार्गदर्शन तसेच यावरील विविध उपाय योजना की ज्यामध्ये योगा, मेडिटेशन, विविध ॲपचा वापर करून मुलांच्या मोबाईल वापरावर कसे बंधन घालता येईल याबाबत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
 या वेबिनार मध्ये संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती, डॉक्टर सुधा कांकरिया, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. पै रायतुरकर, जगप्रसिद्ध नेत्रतज्ञ तात्याराव लहाने, डॉ. तेजस्विनी मिस्किन, डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. उमेशचंद्र सुद्रीक या तज्ञांची मते पालकांना ऐकता येणार असल्याची माहिती ऋणानुबंध सामाजिक संस्थेने दिली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर -9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, November 20, 2025

गौसे आजम संस्थेने अनोख्या पध्दतीने साजरी केली शहीद टीपू सुल्तान जयंती

गौसे आजम संस्थेने अनोख्या पध्दतीने साजरी केली शहीद टीपू सुल्तान जयंती

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर याठिकाणी भारतचे पहले स्वतंत्रता वीर व राकेट मँन ज्यानी देशच्या स्वतंत्रतासाठी सर्वात पहले आवाज बुलंद केला "मादरे वतन" च्या स्वतंत्रासाठी युद्ध करता करता आपल्या प्राणाचे बलिदान दिले आशा महान शासक व वीर शहीद टीपू सुल्तान जयंतीच्या निमित्ताने बेलापूर येथील गौसे आजम सेवाभावी संस्थेच्या वतीने बेलापूर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील (मुले व मुली) विद्यार्थ्यांना फळे वाटप करून आगळ्या - वेगळ्या पध्दतीने शहिद टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान, मुस्ताक शेख, गांवकारी पतसंस्थेचे संचालक अजीज शेख (भैया भाई) शालेय समित अध्यक्ष तुफेल सय्यद,इ. मान्यवर उपस्थिति होते.
 गौसे आजम सेवाभावी संस्थाचे संस्थापक अली सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, तालुकाध्यक्ष सोनू शेख, बेलापुर शाखाध्यक्ष अल्कामा शाह, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद,अजीम शेख,अय्यूब शेख, आजाद सय्यद, शामिद राखी, अल्तमश तमाटकर, आरामन सय्यद, फरान सय्यद, मखदूमअली सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार अजीजभाई शेख - राहाता
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, November 19, 2025

नाजेमा नवाब यांचा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद शिक्षक पुरस्काराने सन्मान

नाजेमा नवाब यांचा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद शिक्षक पुरस्काराने सन्मान

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नेवासा तालुक्यातील सोनई येथील जिल्हा परिषद उर्दु शाळा नंबर ४ च्या शिक्षिका शेख नाजेमा नवाब ह्यांनी शाळेची सुरुवात एका मुलापासून केली. त्या शाळेत एकट्या होत्या. सोनई परिसरात एकूण १२ शाळेचा समावेश असून ५ जिल्हा परिषद शाळा आहे आणि खाजगी ७ शाळा असून इतक्या स्पर्धे मध्ये त्यांनी शाळेत मुले दाखल केली.
या वर्षी पाचवीचा वर्ग सुरू केला. त्यांनी विद्यार्थ्यांची संख्या ही शाळेत वाढवली व त्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवत असतात. सोनई येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीसाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या या सर्व शैक्षणिक व सामाजिक बाबींचा आढावा घेऊन मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदे तर्फे देण्यात येणारा भारतरत्न मौलाना अबुल कलाम आजाद शैक्षणिक पुरस्कार - २०२५ त्यांना प्रदान करण्यात आला.
भारताचे पहिले शिक्षणमंत्री व थोर स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्ताने नगर शहरात राष्ट्रीय कौमी एकता सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शेख नाजेमा नवाब यांना सर्जेपूरा येथील रहेमत सुलतान सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी अँग्लो उर्दू हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज संगमनेरचे मुख्य विश्‍वस्त अब्दुलाह हसन चौधरी,चेअरमन हाजी शेख गनी, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मखदुम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुल्हेखान, डॉ.कमर सुरुर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सलीम खान पठाण, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष भैरवनाथ वाकळे, सचिव युनूसभाई तांबटकर आदी उपस्थित होते.
त्यांच्या कामामुळे त्यांना यापुर्वीही असबाक अवॉर्ड, नारीशक्ती अवॉर्ड मिळाले आहे.
पुरस्काराला उत्तर देताना शेख नाजेमा म्हणाल्या की, कामाचे कौतुक झाल्यावर अजून जोमाने काम करायला बळ मिळते.काम करतानाही असेच समाजामधून सहकार्य मिळाल्यास भविष्यात पण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमात शिक्षकांवर सध्या वाढलेल्या अनेक कामाचे ताणतणावात देखील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा, अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून याप्रसंगी गौरव केला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर खात्यामध्ये इमारती व रस्ते देखभाल दुरुस्ती संदर्भ =- कोट्यावधी रुपयाची ठेकेदार शी संगणमंत करून बोकस बिल काढणारे कार्यकारी अभियंता श्री वर्पे दक्षतो गुण नियंत्रण मंडळ मार्फत नाशिक यांची चौकशी करा नागरिकांची मागणी मुख्य अभियंता स्तरावरून तात्काळ करा पुढील अंकी सविस्तरपणे माहिती प्रस्तुत करीत आहोत


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लवकरच नागरिकाकडून वर्पे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल होणार आहे अशी माहिती समजते पुढील आणखी सविस्तर?

Tuesday, November 18, 2025

महामानव डॉ. आंबेडकर सर्वांना प्रेरणादायी: मिलिंदकुमार साळवे


समिंद्रा फाऊंडेशनतर्फे शंभूक
वसतिगृहात दिवाळी फराळ

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सामाजिक विषमतेचे चटके सोसूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परिश्रमाच्या जोरावर अलौकिक कार्याद्वारे जगभरात स्वतः ची ओळख निर्माण करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी केले.

श्रीरामपूर येथील शंभूक विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उक्कलगांव (ता. श्रीरामपूर) येथील सदाशिव थोरात यांच्या समिंद्रा फाऊंडेशनच्या पुणे शाखेतर्फे दिवाळी फराळ व इतर साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी साळवे बोलत होते. 

राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त बबनराव तागड, सेवानिवृत्त शिक्षक रभाजी कोळगे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. सलीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

भारताचे पहिले शिक्षणमंत्री डॉ.अबूल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच रभाजी कोळगे यांच्या जन्म दिनानिमित्त त्यांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा मंत्र दिला. त्यानुसार मार्गक्रमणा करून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी बनावे असेही मिलिंदकुमार साळवे यांनी सांगितले.

बबनराव तागड व रभाजी कोळगे यांनी वसतिगृहाचे प्रमुख अशोक दिवे व समिंद्रा फाऊंडेशनचे सदाशिव थोरात यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

तालुक्यातील उक्कलगाव येथील भूमिपुत्र असलेले सदाशिव थोरात यांनी आपल्या आई समिंद्रा यांच्या नावाने सुरू केलेल्या फाऊंडेशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ व दैनंदिन वापरातील साहित्य वाटप करण्यात आले. 
वसतिगृहाचे प्रमुख अशोक दिवे यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धार्थ दिवे यांनी आभार मानले.


========================≠========
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
========================≠========

पुणे येथील गुरुकुल विश्वपिठा तर्फे श्रीरामपूर येथील डॉक्टर सलीम सिकंदर शेख यांना गुरुकुल सेवा भूषण पुरस्कार


समाजसेवा, वैद्यकीय योगदान
व लेखनकार्याचा केला गौरव

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर शहराच्या वैद्यकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करून प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केलेले बैतुशशिफा हॉस्पिटल व फाउंडेशन आणि विद्रोही सामाजिक चळवळीचे अध्यक्ष डॉ. सलीम सिकंदर शेख यांचा समाजोपयोगी कारभार पुन्हा एकदा राज्यपातळीवर चर्चेत आला आहे.
 पुणे येथील गुरुकुल विश्वपीठ, वडगांव शेरी या नामांकित संस्थेने २०२५ या वर्षाचा ‘गुरुकुल सेवा भूषण’ पुरस्कार जाहीर करताना या मानासाठी डॉ. शेख यांची निवड केली आहे.
गुरुकुल विश्वपीठाचे प्रमुख डॉ.भागवत गुरुजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

 समाजमनाला भिडणाऱ्या सेवाकार्यात सातत्य आणि जनहिताचा दृढ संकल्प या गुणांच्या आधारे हा बहुमान डॉ. शेख यांना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दीर्घकाळापासून डॉ. सलीम शेख यांनी समाजातील साध्या-सरळ नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देण्याचे काम सातत्याने केले आहे. आपत्तीच्या काळात पीडितांना मदत करणे, वैद्यकीय मदत शिबिरे घेणे, गरीबांच्या आरोग्य उपचारासाठी विनामूल्य साहाय्य उपलब्ध करून देणे, तसेच सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे—या सर्व बाबींमुळे ते जनतेमध्ये विश्वासाचं प्रतिक म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या नेतृत्वाखाली ‘बैतुशशिफा फाउंडेशन’ने अनेक रुग्णांना जीवनदान दिले आहे. गोरगरीब रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेली आर्थिक व वैद्यकीय मदत उल्लेखनीय आहे.

डॉ. शेख हे केवळ डॉक्टर किंवा सामाजिक कार्यकर्ते नाहीत, तर प्रखर लेखणीचे धनी आहेत. सामाजिक अन्याय, भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य आणि मानवी हक्क यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या लेखांमुळे अनेक प्रश्न समाजाच्या चर्चेत आले व नागरिकांमध्ये जागरूकता वाढली. त्यांच्या लिखाणात समाजातील दुर्लक्षित प्रश्नांचा वेध घेत बदलाची जाणीव घडविण्याची ताकद दिसते.
‘अल् आफक फाउंडेशन’मार्फत डॉ. शेख यांनी गरजूंना शैक्षणिक मदत, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग, शैक्षणिक साहित्याचे वाटप, करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा आयोजित केल्या. अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा थेट लाभ झाला आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने त्यांनी घेतलेली वृक्षारोपण मोहिमही शहरात विशेष चर्चेचा विषय ठरली. दरवर्षी विविध थोर संत- महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ते सामाजिक उपक्रम, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे आयोजित करीत असतात.
भाषाविकास आणि साहित्य वृद्धीसाठी त्यांनी व्याख्यानमाला, मुशायरे, कवि-संमेलनं आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. शहरातील भाषिक–सांस्कृतिक चैतन्यात त्यांच्या उपक्रमांनी मोठी भर घातली आहे.

आपल्या वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक न्यायासाठी लढा,
लेखणीद्वारे सत्य मांडण्याची क्षमता,सांस्कृतिक व भाषिक क्षेत्रातील योगदान, युवकांसाठी मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम,रक्तदान प्रोत्साहन,
या सर्व क्षेत्रांचा समन्वय साधणारे ते शहरातील दुर्मिळ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
गुरुकुल विश्वपीठ यांनी समाजसेवेतील उल्लेखनीय योगदान, नीतिमूल्यांप्रती निष्ठा आणि जनतेसाठी सातत्याने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून ६ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ‘गुरुकुल सेवा भूषण पुरस्कार’ डॉ. सलीम शेख यांना प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही समजते.

अभिनंदनाचा वर्षाव

पुरस्काराची घोषणा होताच श्रीरामपूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, प्राध्यापक, शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार तसेच शहरातील विविध संघटनांनी डॉ. शेख यांचे हार्दिक अभिनंदन केले. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तथा सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या कार्याची प्रशंसा व्यक्त केली.
डॉ. सलीम शेख यांना मिळणारा हा पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाची, लेखणीची आणि निस्वार्थ समाजसेवेची राज्यभरात झालेली दखल मानली जात आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात नवा आत्मविश्वास निर्माण होत असून, आगामी काळातही ते अशाच प्रकारे समाजाभिमुख काम करत राहतील, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================