राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, June 24, 2023

शिक्षण पद्धतीतील बदलाव काळाची गरज

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 ( राहता ) - प्रतिनिधि - वार्ता -
शिक्षणामध्ये प्रामुख्याने शिक्षक, विद्यार्थी याचबरोबर समाजाचाही प्रामुख्याने सहभाग असतो. कुटुंब, मित्रमंडळी, परिसर यावर शिक्षण अवलंबून असते. समाज परिवर्तन काळानुरूप बदलत असते त्यानुसार शिक्षण पद्धती ही बदलणे आवश्यक आहे. समाज नवनवीन संकल्पना, विविध प्रकारांचे परिवर्तन व त्यांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याचा स्वीकार समाज करत असतो. थोडक्यात जुन्याचा विसर व नव्याचा स्वीकार समाज करत असतो. त्यानुसारच शिक्षण बदलणे आवश्यक आहे.
फार पूर्वीच्या शिक्षणाचा विचार केला तर भारतात प्रामुख्याने दोनच संस्था कार्यरत होत्या एक म्हणजे संस्कृत पाठशाला आणि मदरसा.याद्वारे शिक्षण दिले जात असे त्यामध्ये मुलींनी शक्यतो शिक्षण दिले जात नव्हते. कालांतराने त्यात अनेक प्रकारचे बदल घडत गेले. अनेक भाषांचा उपयोग होऊन ज्ञानार्जन होऊ लागले. प्रांतनिहाय शिक्षण पद्धती निर्माण झाली. त्यानंतर इंग्रज भारतात आले त्यांनीही त्याच पद्धतीने व त्यांच्या साम्राज्यास पूरक होईल अशी शिक्षण पद्धती निर्माण केली. त्यानुसारच अध्ययन व अध्यापन होऊ लागले. इंग्रजांच्या काळातही अनेक शिक्षण तज्ज्ञ होऊन गेले, परंतु इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्यास पूरक होईल अशाच शिक्षण तज्ज्ञांच्या मताचा स्वीकार केला व इतर मात्र दुर्लक्षित केले त्यामुळे शिक्षण तज्ज्ञाचे मत कितीही दर्जेदार असले तरी त्यास ते मान्यता देत नसत.
  स्वातंत्रोत्तर काळात मात्र त्यात अनेक बदल झाले. त्यामध्ये प्रामुख्याने देशास पूरक स्वातंत्र्योत्तर उदयन्मुख भारतीय समाजाला ज्या शिक्षण पद्धतीचा उपयोग होईल अशा शिक्षण पद्धतीचा विचार प्रामुख्याने करण्यात आला.अशाच शिक्षण तज्ज्ञांच्या विचारांना प्राधान्य देण्यात आला. दर दहा वर्षांनी शिक्षण पद्धतीत बदल करण्यात आले. दिवसेंदिवस समाजाच्या गरजा वाढत चालल्या, सामाजिक गरजांचा विचार करता पूर्वीच्या शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षणातील बदल कुच कामी ठरले. त्यांची शिक्षण पद्धती व सामाजिक गरजा यात तफावत होऊ लागली. अशा वेळेस शिक्षण पद्धतीत बदल होण्याची आवश्यकता भासू लागली.
    जशी जशी समाजाची गरज वाढत चालली त्याप्रमाणे नवीनविन शिक्षणतज्ज्ञांनी नवनवीन शिक्षण पद्धतीचा शोध लावला व त्यांच्या मताचा स्वीकार समाजांनी केला. 1997 पासून अमलात आणलेली क्षमताधिष्टीत अध्ययन अध्यापन पद्धतीचा विचार शिक्षणास प्रामुख्याने करण्यात आला. अशा प्रकारे या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांच्या भविष्याकालीन शिक्षणाचा विचार करण्यात आला.सध्याच्या विचार करता वाढती लोकसंख्या , स्त्री- पुरुष असमानता, बेरोजगारी, दुष्काळ व इतर समस्या यावर उपाय योजना करणाऱ्या व त्यादृष्टीने भविष्यकालीन भारतीय नागरिक घडविणाऱ्या शिक्षण पद्धतीचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो.अशा प्रकारे बदलत्या सामाजिक गरजानुसार शिक्षणात बदल होणे ही काळाची गरज होऊन बसली.


श्रीमती देशमुख भारती दिगंबर
 प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्डे पाटोळे, क्लास भगवतीपुर
 ता. राहता जि.अहमदनगर
मोबा : 9423462015
-------------------------------

((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

बैंकिंग अर्थसहाय्यातून व्यावसायिक वृद्धीसाठीयोग्य कागदपत्रे आवश्यक - इंजि.मोहसिन शेखमुस्लिम कॉ.ऑफ बैंकेच्यावतीने काकर समाज बांधवांना बैंकिंग मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - समाचार -

येथील मुस्लिम काॅ.ऑप. बैंक च्या वतीने मुस्लिम काकर समाज बांधवांना निमंत्रित करून बैंकिंग क्षेत्राविषयी मार्गदर्शनपर एका छोटेखानी कार्यक्रमा चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या वेळी बँकेचे मॅनेजर शकील कुरेशी यांनी बँकेच्या सर्व कार्यशैली विषयक सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक इब्राहिम शेख होते. समता कॉम्प्युटर इंस्टीटयूट चे संचालक इंजि.मोहसीन शौकत शेख यांनी सांगितले की,काकर समाज हा पुर्वीपासूनच सुयोग्य पद्धतीचा व्यावसायिक समाज आहे, आपल्या परिश्रमाद्वारे
विविध व्यावसायातून या समाजाने स्वतःला प्रगत केले आहे, सुव्यावसायिक समाज असल्याकारणाने बैंकिंग क्षेत्राकडे वळल्यास अधिक सक्षमपणाने प्रगती शक्य आहे,याकरीता लागणारे आवश्यक कागदपत्रे शॉप एक्ट वैगरे असे सर्व उपयोगी कागदपत्रांविषयी त्यांनी यावेळी अचुक माहिती दिली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकर समाजाचे जिल्हाध्यक्ष इकबाल ईस्माईल काकर सर यांनी यशस्विरित्या केले. 
यावेळी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनाइजेशन अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष अन्वर तांबोळी यांचा सत्कार मुस्लिम बैंक व काकर समाजाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मुश्ताक तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,काकर समाज हा व्यापार व शिक्षणावर लक्ष्य केंद्रित करणारा असा समाज आहे,या समाजाने बैंकिंग क्षेत्रात देखील पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी युवक नेतृत्व कार्याध्यक्ष जावेद काकर, खजिनदार शरीफ काकर,हाफिज इरफ़ान काकर, करीम काकर,युनूस काकर,जुनेद काकर, रशीद काकर, अफसर काकर, खलील काकर, रहीम काकर, नजिर काकर, फारूक काकर सर, साबीर काकर, हुसैन काकर, जाफर काकर, रऊफ काकर, फिरोज काकर,अयाज काकर, शकील काकर, शाहरुख काकर, गुलाम साहब आदी उपस्थित होते.

((( वृत्तसंकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर -9561174111



चिखली- भोरसा भोरशी येथे ढगफुटी ने शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी - प्रशांत पाटील !

चिखली -  प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्यातील भोरसा भोरशी येथे दि २३ जूनच्या रात्री अचानक ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेतजमिनिंचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सर्वत्र शेतजमीनी पेरणीसाठी पूर्णपणे तयार झालेल्या असतांना अचानक भोरसा भोरशी, पाटोदा,
 पेनसावंगी,नायगांव शेतशिवारात मुसळधार पाऊस पडून शेतातील बंधारे,नाले, वळणं, विहरी, शेतरस्ते,बांध फुटून शेतजमिनी पूर्णपणे खरडून गेल्या असून पेरणी योग्य तयार करून ठेवलेल्या शेतीतील माती पूर्णपणे वाहून गेल्याने शेतात फक्त दगड धोंडेच उरले असल्याने परत शेत जमिनी तयार करणे त्वरित तरी शक्य नसल्याने शासनाने तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अशी मागणी रयत पक्षाचे प्रवक्ते प्रशांत ढोरे - पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

((( वृत्तसंकलन )))
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111




महा.ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने दिपक साठे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

नॉर्दन ब्रॅंच येथील लोयोला दिव्यवाणी येथे महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने श्री.दिपक साठे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
श्री.साठे यांच्या सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने त्यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिपक साठे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष पास्टर राजेश कर्डक हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून फा.अनिल चक्रनारायण लोयोला दिव्यवाणी, हे होते. महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले,पा.अण्णासाहेब अमोलीक, प्रताप देवरे - संस्थापक बौध्द सेवा संघ, अविनाश काळे राज्य विश्वस्त, दिपक कदम जिल्हाध्यक्ष, भाऊसाहेब तोरणे प्रसिध्दी प्रमुख, प्रकाश निकाळे तालुका संघटक, विशाल पंडित संघटक, अजितकुमार सुडगे तालुका संघटक इ. या प्रसंगी उपस्थित होते.
 सुरवातीस फा.अनिल चक्रनारायण यांनी प्रार्थना करून आपले मनोगत व्यक्त केले. प्रताप देवरे यांनी संघटनेच्या कार्याची स्तुती केली तर पा.अण्णासाहेब अमोलीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात समाज बांधणीसाठी संघटनेचे काम गौरवास्पद आहे असे मत पा.राजेश कर्डक यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी सत्कारमूर्ती दिपक साठे यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख विषद करून, सामजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कशा पध्दतीने कार्य केले जाते याविषयीचा आढावा दिला.
 यावेळी रवि बोर्डे, विश्वरंजन मकासरे,पा.योगेश ठोकळ, अलिशा अमोलिक, इसाकभाई पटेल, क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य युवा तालुकाध्यक्ष लहू भाऊ खंडागळे, सुरेश ठुबे, विलास पठारे, अक्षय ठुबे, सुनील उबाळे सर, राजू भोसले सर, अपंग संघटेनेचे संजय साळवे सर, तसेच उत्तम गायकवाड येशू संघीय कॅटेकिस्ट शिबिराचे सभासद, कांबळे, सखाहारी बोर्डे, रवि योगेश बार्से, विशाल साळवे, सुनील बोर्डे संतोष गायकवाड मेरीदास आढाव इ.उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाऊसाहेब तोरणे यांनी केले तर आभार दिपक कदम यांनी मानले.

((( वृत्तसंकलन )))
 समता न्यूज नेटवर्क 
श्रीरामपूर - 9561174111

खा गोविंदराव आदिक पतसंस्थेचा कारभार सभासदाभिमुख : अविनाश आदिक

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बी.आर.चेडे - शिरसगांव

खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था पतसंस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अशोकनगर विद्यालयात संपन्न झाली.प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सर्वेसर्वा अविनाश आदिक ,श्रीरामपूर नगरपरिषदेच्या प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक व सहसचिव ॲड.जयंत चौधरी इ.मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी खा.गोविंदरावजी आदिक व सरस्वतीमाता यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब बनकर होते.त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले.संस्थेचे सचिव अविनाश आदिक यांनी पतसंस्थेच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त करून पतसंस्थेने कमी व्याजदरात राष्टीयकृत बॅकेकडुन भागभांडवल उभे करून ते सभासदांना वाटप केल्यास जास्त नफा मिळेल ही अपेक्षा व्यक्त केली.तसेच मा. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी पतसंस्थेचे सभासद संख्या कमी होत आहे त्याचप्रणात नफा कमी होतो याकडे सर्वांचे लक्ष वेधुन पतसंस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.
सभा अध्यक्ष सूचना संजय शिंदे यांनी तर अनुमोदन बाळासाहेब वमने यांनी दिले.सुत्रसंचालन विष्णू राऊत यांनी तर खर्च व अंदाजपत्रक मंजुरी वाचन व आभार व्हाईस चेअरमन अशोक कटारे यांनी मानले.श्रध्दांजली ठरावाचे वाचन सुभाष काळे प्रोसिडिंग व वार्षिक ताळेबंद वाचन मॅनेजर संतोष दांडगे,नफा वाटणी वाचन सौ.मंदाकिनी खाजेकर, लेखापरीक्षण अहवाल वाचन संदिप बोरुडे, दोष दुरूस्ती वाचन बाळासाहेब वमने, संचालक मंडळ येणे कर्ज वाचन मुदस्सीर सय्यद, लेखापरीक्षक नियुक्ती वाचन विजय थोरात,बॅक कर्ज उचल वाचन शामराव तऱ्हाळ तर पोटनियम दुरूस्ती नवनाथ बर्डे यांनी केले.
यावेळी संचालक सुभाष पटारे, संगीता घोडे तसेच संस्थेच्या सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. खेळीमेळीच्या वातावरणात पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

((( वृत्तसंकलन )))
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

Friday, June 23, 2023

तोतया सैन्य अधिकारी रॉ RAW ऑफिसर असल्याचं भासविणारा स्थानिक गुन्हे शाखा, (LCB) च्या विळाख्यात अहमदनगर /आणि सदन कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्स, पुणे यांची संयुक्त कारवाई....

(अहमदनगर ) - प्रतिनिधि - वार्ता -

या विषय अंतरगत सविस्तर माहिती असे की दिनांक 22/06/2023 रोजी राकेश ओला,पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांना ZIRO पोलीस मार्फत माहिती मिळाली की, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी येथील समर्थ शाळेजवळ एक लाल रंगाचा टी शर्ट, निळे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला व सॅक असलेला इसम भारतीय सैन्य दलात, इंटेलिजन्स विभागात (RAW) अधिकारी असल्याचे भासवुन बनावट ओळखपत्र, चिन्ह व कागदपत्रे वापरत आहे. आता गेल्यास मिळून येईल. अहमदनगर जिल्हा तसेच लगतचा औरंगाबाद व पुणे जिल्हा सैन्य दलाचे दृष्टीने अतिशय महत्वाचे व संवेदनशील ठिकाणे असल्याने अशा प्रकारे कोणी सैन्य दलातील इंटेलिजन्स विभागाचे बनावट ओळखपत्राचा वापर करुन संबंधित सैन्य विभागाचे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करुन अनुचित प्रकार किंवा घातपात करण्याची
 शक्यता देखील नाकारता येत नाही.
वरील प्रमाणे घटना निदर्शनास आल्यानंतर राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभाग पुणे येथील अधिकारी व पंचाना बरोबर घेवुन नमुद बातमीतील संशयीत इसमाची खात्री करुन कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेश दिले.

नमुद आदेशा प्रमाणे पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विजय ठोंबरे, संतोष खैरे, पोकॉ/आकाश काळे व अमृत आढाव तसेच सदन कमान मिलिट्री इंटेलिजेन्स, पुणे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन यांना कारवाई करणे बाबत नियोजन करुन मार्गदर्शन केले.
पथकातील अधिकारी व अंमलदार
यांनी दिनांक 22/06/23 रोजी 22.00 वाचे सुमारास बातमीतील नमुद ठिकाणी प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी येथील समर्थ शाळे जवळ जावुन वेशांतर करुन सापळा लावुन थांबलेले असताना एक लाल रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला व सॅक घेतलेला इसम दिसला. पथकाची खात्री होवुन संशयीतास पकडण्याचे तयारीत असताना त्यास पोलीस पथकाची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला. लागलीच पथकाने संशयीताचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) संतोष आत्माराम राठोड, वय 35, रा. दिवटे, ता. शेवगांव, जिल्हा अहमदनगर असे सांगितले. त्यास सैन्यदलामध्ये कोठे नोकरीस आहे अशी विचारणा केली असता त्याने इंटेलिजन्स विभागात (RAW) अधिकारी म्हणुन नोकरीस असल्याचे सांगितले व तसे ओळखपत्र दाखविले. संशयीत इसमाने हजर केलेले ओळखपत्र व कागदपत्रांची पथकातील पोलीस अधिकारी व मिलिट्री इंटेलिजन्स अधिकारी यांनी पडताळणी करता सदर कागदपत्रे ही बनावट असल्याची खात्री झाल्याने त्यांचेकडे अधिक विचारपूस करता त्याने मी सैन दलात अधिकारी असल्याचे भासवुन नोकरीचे आमिष दाखविण्यासाठी ओळखपत्र व कागदपत्रे तयार केल्याची माहिती दिली. ताब्यातील संशयीत इसमाबाबत सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स, पुणे पथकाचे अधिकारी यांनी त्यांचे विभागात चौकशी करुन खात्री केली असता नमुद इसम हा कोठेही सैन्यदलात सेवेत नसल्याची माहिती दिल्याने त्याची पंचा समक्ष अंगझडती घेतली.
त्याच्या अंगझडतीत स्वत:चा फोटो, राजमुद्रा असलेले ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, इतर बनावट कागदपत्रे व विवो कंपनीचा मोबाईल फोन असा 10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल कब्जात मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द पोना/सचिन दत्तात्रय अडबल ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 908/2023 भादविक 465, 468, 170, 171 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
------------------------------------------------
=================================

कार्य,संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
=================================------------------------------------------------

*कवी विनोद अष्टुळ यांचा* *सहकार शिबिरात गौरव*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 लोणावळा - प्रतिनिधि - वार्ता -

साक्षर सक्षम सहकार अभियान यशस्वीपणे राबवणारे सापॅक्ट प्रा. लि.ने सत्तांतर की स्थित्यंतर या विषयावरील संचालक प्रशिक्षण शिबिर बेसिलिका हॉटेल लोणावळा येथे आयोजित केले होते.या शिबिराचे उदघाटन मान्यवरनांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाले.दोन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात संचालक सत्तांतर की स्थित्यंतर, ग्रोथ प्लॅन, फायनान्शियल डीसीप्लिन, पतसंस्था रन का बिल्ड. सी.ई.ओ. रिपोर्टींग आणि संचालक एकजूट अशा विषयावर प्रशिक्षक संदीप पाटील सर यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी महाराष्ट्रातील नामांकित पतसंस्थांचे चेअरमन व संचालक मोठ्या संख्येने हजर होते. पतसंस्थांची स्थिती, प्रगती, शिस्त आणि जबाबदारी अशा गोष्टी सकारात्मक कृतीने पार पाडण्याचे तंत्र उत्साही वातावरणात सर्वांना लाभले. येथेच साक्षर सक्षम सहकार अभियान यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक संचालक विनोद अष्टुळ यांना सापॅक्ट चे कार्यकारी अधिकारी संदीप पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 
याप्रसंगी विविध पतसंस्थांचे पदाधिकारी आणि भागीरथी पतसंस्थेचे चेअरमन प्रदीपशेठ गोगावले, शिवाजी डोंबे, गोरख शिंदे, संदीप डोंबाळे इ.संचालक उपस्थितीत होते. शेवटी अनुभवी संचालकांनी आपले मनोगत वक्त केले.नंतर प्रशिक्षणार्थी संचालकांचे सापॅक्ट प्रा. लि.समूहानेच्यावतीने आभार मानण्यात आले.

*वृत्तसंकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111