रमजान मुबारक 2025,
रमजान रोजा नं. 17 वा, मंगळवार दिनांक 18-03-2025,
रोजा :- इस्लाम :आत्महत्या पाप आहेत : संयम समस्याचं समाधान.. अल्लाह वर विश्वास बाळगा!!
हजरत इब्राहिम अलै. हें म्हणतात कीं, " आपल्या पालनकर्त्या ( अल्लाह - परमेश्वर ) च्या कृपेपासून निराश,तर, तेच लोकं होत असतात, कीं, जें पदभ्रस्ट झालेले आहेत. (दिव्य कुरआन पारा नं. 14 वा, सुरह नं. 15,आ. नं. 56 वी ).
हजरत हसन बसरी रहमातुल्लाह( संत, वली), सांगतात कीं, मी पवित्र कुरआन मध्ये नऊ (9) वेळेपेक्षा जास्त ठिकाणी वाचलेले आहेत कीं, अल्लाह नें जगातील प्रत्येक श्रद्धावान मनुष्याचं ताकदीर ( नसीब ) नशिबात रोजचा झोपेपर्यंतचा शेअर -रोजी- रोटी किती प्रमाणात देणार आहेत हें लिहिलेले आहेत, एका ठिकाणी तर अल्लाह ( परमेश्वर ) राणे शपथ घेऊन सांगितलं आहेत,!
परंतु इबलीस, शैतान तुम्हाला कायम भ्रमित करीत असतोस कीं तुम्हाला गरिबी येईल, तुम्हीं कंगाल होतान अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती घालत असतो.!!!"
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सध्याला अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू आहेत, सरकारच्या नियमानुसार च चालू आहेत, काहीकाही ठिकाणी अतिरेक ही चालू आहेत, म्हणून प्रत्येक तालुक्यात हजारो कुटुंब हें विस्थापित झालेले आहेत. त्यामध्ये 20-25% कुटुंब हें अन्न पाण्यावाचून हळहळ करीत आहेत. तर त्यातील हवालदिल झालेल्या कोवळ्या मनाच्या काही लोकांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्कारला आहेत. तर काही लोकं मनानं खचून हृदय विकार झालेलं आहेत..
तसेच, 16-मार्च 2025 रविवार च्या दैनिक दिव्य मराठी वृत्त पत्रात मराठवाडा विदर्भात या वर्षी 2706 शेतकाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, व त्यामध्ये असेही म्हटले आहेत कीं, गेल्या 24 वर्षात 9961 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यापैकी सरकार नें 9832 प्रकरनात मदत केली आहेस,
तसेच,मागील काही वर्षात काही स्टार व्यक्तींनी आपल्या विविध परिस्थिती ला घाबरून आत्महत्या केलेल्या आहेत.
अल्लाह (परमेश्वर ) नें तुम्हाला रोजच्या दाना पाण्याची भाकरी ची शपथें वर हमी दिलेली आहेत, खरोखर तोच आपला पालन्हार आहेत यात शंकाच नाही म्हणून रब हाच आपल्या सर्व गोष्टीची काळजी घेणारा असतोस म्हणून आपलं एक कर्तव्य असतं कीं आपण जेथे जेथे मजुरी करतो, नौकरी करतो, काम ध्यानंदा करतो, व्यवसाय, व्यापारी व्यापार करतात त्या प्रत्येक ठिकाणी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, प्रत्येक कामाच्या ठिकाणी शांततेत आपल्याला कामाची गरज आहेत म्हणून मन लावून प्रामाणिक राहून काम करणे गरजेचं आहेत.
पवित्र कुरआन मध्ये म्हटले आहेत कीं, " आम्ही जेंव्हा अजान(हाक मारून )देवून बोलावलं जाईल त्यावेळी सर्व काम आटोपून लवकर या व नमाज अदा करून नंतर आप आपल्या रोजी रोटी साठी इतर ठिकाणी जाऊन तलाश ( शोधा )करा "
या साठी प्रामाणिक पण आपल्या रोजी रोटी साठी ठीक ठिकाणी रोजी साठी फिरणं हें आपलं कार्य च आहेत. प्रत्येकांच्या नसीबात जेवढा शेर लिहिले आहेत ते तुम्हाला जगातील कोणत्याही कोपऱ्यात भेटणारंच आहेत.. हा परमेश्व(अल्लाह ) चा वादा आहेत.. म्हणून परमेश्वर अल्लाह जगात कोणालाही उपाशी झोपवणार नाहीं..
एक प्रसिद्ध म्हण प्रचिलीत आहेत कीं, " खुदा भुका उठाता है..! मगर भुका सूलाता नाहीं ".
काही ठिकाणी लोकं या परिस्थितीत प्रतिष्ठतेचा अर्थात इंग्रजी मध्ये स्टेटस म्हणतात किंवा "इगो "किंवा "मी " चा प्रश्न उपस्थित करतात..
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात कीं " तु इजज्जू मनातशः - तु जिलल्लू मनातशः.. बे.. दिल खैर "
आरे बाबांनो.. तुम्हीं काय हा ना हाक विचार करतात कीं. आमची प्रतिशष्ठा - पत - लायकी - लयास जाईल किंवा कमी कमी पणा येतील लोकं काय म्हणतील? वगैरे वगैरे.. आरे बाबांनो समाजात जगात मान मार्तंब आम्ही विचार केला तर कोणालाही मोठं करू शकतो किंवा मान मार्तंब सन्मान वाढवू शकतो किंवा कोणालाही आम्ही दरिद्री करू शकतो किंवा इज्जत घालवू शकतो...!
म्हणून शैतानी वृत्तीच्या नेगेटिव्ह मानसिकता असलेल्या लोकांच्या नादी लागू नका.
संकट आलेलं आहेत, परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहेत..अडचणीत सापडला आहात, कधी कधी या परिस्थिती ही आपल्या परीक्षाचा काळ ही समजावून स्वतःला च लागते, अडचणीतुन कधी ना कधी मार्ग सापडत असतो, तो पण मार्ग अल्लाह एखाद्या फॅरिसत्या रूपी माणसांना पाठवून मार्गदर्शन करण्यासाठी पाठ्वतच असतात.
परमेश्वर अल्लाह नें कुठेतरी आपल्या दाण्या पाण्याची व्यवस्था तर जरूर नक्कीच केली असेलच. म्हणून जरा धीराने घेऊन, स्वतःला सावरून संयम बाळगून वैफलै ग्रस्त न होता, धीर न सोडता, संयम ठेवणं गरजेचं असतं. सहन करा सहनशीलते मुळे कितीही डोंगरा एवढ्या संकटाना मोठया कौशल्याने यशस्वी होतो. कधी कधी या समस्या मध्ये घरात लहान मुलं, म्हातारे वा कोणी कर्ता पुरुष किंवा स्त्री ही जास्त आजारी पडण्याची शक्यता असतं, म्हणून या सर्व समस्या, अडचणी, संकताट विचलित किंवा गंगारून जातोय, त्या वेळी काय करावं व काय नाहीं, समजत च नाहीं. अशा वेळा हें सर्व सहनशीलते पलीकडे जातं म्हणून काही काही लोकं चूकीच्या मार्गाने जातात, कोणी गुन्हेगारी कडे तर कोणी चोरी वेगवेगळ्या वळणावर जातात तर कोणी सहन करून सन्मार्ग वर राहून च त्या परिस्थितीला तोंड देत असतात.तेच लोकं सदाचारी आहेत असतात.
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह जवळ जवळ सत्तर ( 70) पेक्षा जास्त ठिकाणी वारंवार सांगतात कीं, " इन नल लाह महा सबेरीन " अर्थातच :- अल्लाह ( परमेश्वर ) संयम ( सहनशीलता ) बाळगणाऱ्या लोकांन बरोबर कायमच असतो ".
कुठल्याही बिकट- आणीबाणीच्या - अडचणीच्या - संकटाच्या - युद्ध जन्य परिस्थितीत - अशा वेळी संयम, धीर ठेवून सहशील राहून थंड विचार करून अल्लाह वर पूर्ण श्रद्धां ठेवून काम करतात हेच लोकं खरंच सत्वशील व अल्लाह चे भय बाळगनारे आहेत. ( पवित्र कुरआन सुरह 02, सुरह अल - बकराह आ. नं 0177).
सध्या रमजानुल मुबारक चे रोजे चालू आहेत रोजे हें खरोखर च संयम शिकवते..
अल्लाह जवळ वारंवार याचना दुवा करून, कारण समस्या, अडचणी, परस्थिती, संकट, आर्थिक परिस्थिती, रोजी कमी जास्त करणारा सर्व तोच आहेत कारण आपल्या परीक्षा बघण्यासाठी..परुंतु आपल्या सर्व परिस्थिती सुव्यस्थीत चांगलीच करणारा ही तोच परमेश्वर अल्लाह असतो ...
कारण जगातील सर्व मानव जिवजंतू ची काळजी करणारा पालनहार, पालनपोषण करणारे अल्लाह च आहेत...
🌷त्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी कृपया आपला स्वतःला कमी लेखू नका व स्वतःच भलं बुर करून घेऊ नका.. शेवटी तुमच्या घरात खूप लहान लहान मुलं, म्हातारं आई वडील, चुलते, अजून बरेच तुमच्या वर अवलंबून राहणारे आहेत... शेवटी अल्लाह वर श्रद्धा ठेवा... अल्लाह ला आत्महत्या करणारे पसंत नाहीं म्हणजेच नाहीं...
आत्महत्या हें पाप आहेत.. संयम राखा.. थोडयाच दिवसांत परस्थिती बदलणार आहेत...
(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांना ही फायदा होईल... प्रतिक्रिया जरूर नोंदवा )
=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर जिल्हा :- अहमदनगर
मोबाईल :- 🌹🙏9271640014🙏🌹
-----------------------------------------------
=================================