( नाशिक प्रतिनिधी )
सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा गैर प्रकार पळसन येथे आदिवासी विकास विभागातर्फे चालवल्या जाणार्या शासकीय आश्रमशाळा पळसन येथे संगणक प्रयोग शाळेचे इमारतीचे वनबंंधु कल्याण योजने मार्फत 4.99 कोटी लाख रुपये नवीन इमारत बांधकामासाठी मंजूर झाले असुन या इमारतीतचे संबंधित बाधकामात वापरण्यात येणारेसाहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत आहे. बांधकामात वापरली जाणारी वाळू ऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडर वापरली जात आहे. या शासकीय आश्रमशाळेत परिसरातील आदिवासी विद्यार्थी 600 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणून बांधकामावर परिसरातील नागरिकाचे लक्ष लागले आहे हे बांधकाम चालू असताना आदिवासी विकास विभागाचे व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान खात्याचे अधिकारी तर एकदाही ढुंकूनही पाहिले नाही. अधिकारी आणि ठेकेदार याचे साटे लोटे झाले की काय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांचे दरवर्षी प्रमाणे यंदाही ही पडक्या इमारतीत शिक्षण घ्यावे लागेल कि काय असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे चालू हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत गैर प्रकार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.या इमारतीत वापरण्यात येणारी वाळू ऐवजी दगडांपासून तयार केलेली पावडरीत तसेच बांधकामात मोठ्या प्रमाणात दगडगोट्याचा वापरत असल्याची तक्रार परिसरात नागरिकांकडून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष चौधरी यांच्याकडे केली. गावित यांनी पळसन येथे बांधकामावर भेट दिली असता तेथे त्याना अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम आढळून आले त्यांनी तात्काळ काम थांबवले शासकीय आश्रमशाळा पळसन येथे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या बांधकामावर अत्यंत निकृष्ट दर्जाची वाळू (रेती) असुन बांधकामावर पाणी कमी प्रमाणात फवारणी केली जात आहे. नागरिकांनी माझ्याकडे तोंडी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने भेट दिली असता सत्य जाणुन घेण्यासाठी बांधकामावर भेट दिली असता त्यात तथ्य आढळून आल्याने विभागामार्फत व क्वालिटी कंटोल विभागामार्फत तपासनी करून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई ठेकेदार व अधिकार्यांवर करण्यात यावी.
सुभाष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य.शासकीय आश्रमशाळा पळसन येथे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या बांधकामावर अत्यंत निकृष्ट दर्जाची वाळू (रेती) असुन बांधकामावर पाणी तफावत करण्यात येत आहे. नागरिकांनी माझ्याकडे तोंडी तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने भेट दिली असता सत्य जाणुन घेण्यासाठी बांधकामावर भेट देऊन पाहणी केली सांगितले.
No comments:
Post a Comment