राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, January 16, 2023

शाहरुख च्या पठाण’ चित्र पटाचा जगभर बोलबाला, परदेशातील ॲडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने आतापर्यंत केली कोट्यवधींची कमाई‘ सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून १० दिवस बाकी आहेत. पण त्या अधेच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी चे वारे सुठले ?


( मुंबई ) शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाकडे सध्या सगळयांचंच लक्ष लागलं आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. परदेशात या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परदेशातील ॲडव्हान्स बुकिंगमधून ‘पठाण’ चित्रपटाने मोठी कमाई करीत आहे.
पठाण’ प्रदर्शित व्हायला अजून १० दिवस बाकी आहेत. पण त्याआधीच पठाणचा दबदबा सर्वत्र दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, यूएईमध्ये या चित्रपटाची आतापर्यंत ६५ हजार डॉलर्सची ४५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर त्याचप्रमाणे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही ‘पठाण’ पाहण्यासाठी लोक प्रचंड उत्सुकता दाखवत आहेत. अमेरिकेत या चित्रपटाची आतापर्यंत ३.५ लाख डॉलरची २२ हजार ५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर ऑस्ट्रेलियात ‘पठाण’च्या पहिल्या दिवशीच्या शोजसाठी ६५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर किमतीची ३ हजारहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटाबाबत जर्मनीमध्येही प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी जर्मनीत ‘पठाण’ची ४ हजार ५०० हून अधिक तिकिटे विकली गेली. याशिवाय लोकांनी पहिल्याच वीकेंडसाठी पठाणची एकूण ९ हजार तिकिटे खरेदी केली आहेत. आत्तापर्यंत ‘पठाण’ने १५ हजार युरोंचा व्यवसाय फक्त जर्मनीतून केला आहे.                               ( M T सौजन्य )

No comments:

Post a Comment