राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, April 29, 2023

बृज भूषण यांच्या विरोधात कुस्ती पट्टू आंदोलन कायम करणार दिल्ली पोलीस FIR दाखल करण्याचे तयारीत ?

(नवी दिल्ली) - न्यूज- एजन्सी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेले बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सर्वोच्च न्यायालयात दिल्ली पोलिसांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे याबाबतची माहिती सादर केली. पोलिसांनी उचललेल्या पावलांबावचे मोठे पोस्टर्स कुस्तीपटूंनी आंदोलन स्थळावर ठळकपणे दिसेल, असे उभारले आहे. मात्र तरीही कुस्तीपटू
आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. सात महिला कुस्तीपटूंनी आपल्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपावरून नुकतीच सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली आहे. न्या. चंद्रचूड व न्या. नरसिंहा यांच्या खंडपीठाने गत सुनावणीत दिल्ली सरकारसोबत पोलिसांना नोटीस पाठवली होती. प्रकरण गंभीर असूनही सिंग यांच्याविरोधात एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल खंडपीठाने त्यावेळी उपस्थित केला होता. त्यानुसार दिल्ली पोलिसांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यासाठी पाऊल टाकल्याची माहिती खंडपीठास दिली गेली. खंडपीठाने अल्पवयीन असलेल्या
याचिकाकर्तीला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले. सॉलिसिटर जनरल यांनी खंडपीठाला सांगितले की,आरोप दखलपात्र गुन्हा दर्शवत असल्याने पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कुस्तीपटूच्या बाजूने हजर झाले आणि त्यांनी सीलबंद लिफाफ्यात प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर ठेवले. यामध्ये अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांना धमकीचे आकलन करण्याचे आणि अल्पवयीनला पुरेशी सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश देतो. ५ मे रोजीच्या पुढील सुनावणीला प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.
भाजपचे खासदार असलेल्या सिंग यांना सर्व प्रकारच्या पदावरून हटवण्यात येईपर्यंत आपण आंदोलन कायम ठेवणार असल्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे. विजयाच्या दिशेने पहिली वाटचाल सुरू आहे. मात्र तरीही विरोध कायम राहणार, असे साक्षी मलिक म्हणाली. पोलिसानी
दाखल केलेल्या तक्रारीवर विश्वास नाही. निरीक्षण करणार आणि त्यानंत आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेणार. त्यांना तुरुंगात पाहायचे आहे. तसेच त्यांना सर्व पदावरून हटवण्याची गरज आहे, अन्यथा तपास प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असे विनेश फोगाट म्हणते.
-----------------------------------------------------========================================================================
सा : राज प्रसारित...कार्यकारी...संपादक भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन... वार्ता...
-----------------------------------------------------========================================================================
























उच्च न्यायालया मार्फत राज ठाकरे विरोधातील समन्स दिल्ली कडून रद्द ?

(नवी दिल्ली) - न्यूज - एजन्सी - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या कथित प्रक्षोभक भाषणाबद्दल बोकारो न्यायालयाने बजावलेले समन्स दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केले. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. आपल्या देशात श्रद्धा आणि धर्माचे पालन करणे अधिक लवचिक आहे.एखाद्या व्यक्तीच्या विचारांमुळे धार्मिक भावनांना ठेच पोहचत नाही. धार्मिक भावना इतक्या
नाजूक असू शकत नाहीत. त्यामुळे ठाकरेंच्या भाषणाला चिथावणी मानता येणार नाही, असे निरीक्षण न्या. जसमीत सिंग यांनी नोंदवले. भारताची एकता ही विविध धर्म
श्रद्धा आणि भाषेच्या सहअस्तित्त्वात दडलेली आहे.
शतकानुशतके टिकून राहतील, असे धर्म व श्रद्धा मानवासारख्या नाजूक नाहीत, असे सांगत न्यायाधीशांनी ठाकरे यांच्या विरोधातील समन्सला केराची टोपली दाखवली. याचवेळी = भादंविच्या विविध कलमान्वे खून, दंगल आणि द्वेषपूर्ण भाषणाबद्दल ठाकरे यांना धनबाद न्यायालयाने बजावलेले समन्ससुद्धा न्या. जसमीत सिंग यांनी रद्द केले.
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-==========================================================================कार्यकारी,संपादक...✍️✅️🇮🇳...भगवंत सिंघ प्रितम सिंग बत्रा...
==========================================================================-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-






























Friday, April 28, 2023

नगर पालिकेने कच्चा रस्ता दुरुस्त केला ! अन् अवकाळी पावसाने तो वाहून नेला !!रस्त्यासोबत खालच्या पाटाच्या पुलावरील कठडे लावण्याचा तात्काळ बंदोबस्त करा- अजहर शेख ABS

श्रीरामपूर प्रतिनिधी:(अजहर शेख )
येथील गोंधवणी रोडवरील मॅरेज हॉल समोरील दुभागून इदगाहकडे जाणाऱ्या खालच्या रस्त्यात्याची गत अनेक वर्षांपासून दैना झाली होती, या रस्त्यावर येणाऱ्या - जाणाऱ्या पादचारी आणि वाहन चालकांसमवेत परिसरात राहणाऱ्या नागरीकांना देखील मोठा त्रास सहन करणे भाग पडत होते, नगर पालिकेचे लक्ष वेधण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते अजहर शेख (ABS)
यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत आंदोलने केली कारण हा रस्ता संजयनगर,इदगाह परिसर, रामनगर,मिल्लतनगर, फातेमा हौसिंग सोसायटी जि.प.कर्मचारी सोसायटी आदि ठिकाणी जाण्या- येण्याकरीता हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र हा रस्ता जणू नगर पालिकेने कायमचाच दुर्लक्षत केल्याने सदरील परिसरातील नागरिकांनी कमालीचा त्रास सहन करणे भाग पडत आहे,श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील गोंधवणी रोड पुलाजवळील प्रभाग १ व १२ कडे जाणारा सुमारे १०० मीटर पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावेत अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अँड अँटी करप्शन ब्युरोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजहर शेख (ABS) यांनी श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकारी यांना दिनांक ०८/०२/२०२२ रोजी दिलेल्या निवेदनात केली होती.तथा नगर पालिकेचे लक्ष वेधण्याकरीता
दि.२६ ऑगस्ट २०२२ रोजी सदरील रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलनही छेडण्यात आले होते.सोबत सदरील निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनाही पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली होती.त्याची दखल घेत नगर पालिकेने खडी,मुरुम टाकून कच्चा रस्ता बनविला मात्र यावर डांबरीकरण किंवा कॉंक्रीटीकरणास नगर पालिकेला मुहूर्त काही सापडेनासे झाले आहे, तोपर्यंत हा रस्ता आवकाळी पावसाने पुर्णतः वाहुन न गेल्यास मिळवली असेच म्हणावे तथा समजावे लागेल, कारण आज (दि.२८/०४/२०२३ रोजी दुपारी) झालेल्या थोडक्याशा आवकाळी पावसात हा रस्ता वाहुन गेल्याने रस्त्यावर पुन्हा जैसे थे खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहे (मग या रस्त्याची क्वालिटी काय असणार हा संशोधनाचा भागच ठरत आहे.) यामुळे समस्त नागरीकांना पुन्हा मोठा मनस्ताप सहन करणे भाग पडू लागले आहे.
शिवाय जयभोले चौकात सदरील रस्त्यामुळे उंचवटा निर्माण झाल्याने पावसाचे पाणी नेहरुनगरमधील रहिवासियांच्या घरात शिरणार आहे,याकरीता याठिकाणी निर्माण झालेल्या लवनाचा वेळीच योग्य बंदोबस्त करण्यात यावा तसेच सदरील रस्ता बनविल्याने पाटाच्या खालच्या पुलावरील कठडे नाहिसे झाल्याने संभव्य अपघातांची दाट शक्यता निर्माण झाली आहे, याठिकाणी तात्काळ कठडे बसविण्यात यावेत पुन्हा पुर्वीसारखे उग्र आंदोलन छेडण्याची वेळ येवू देवू नये.
किंवा नसेल जमत तर यामुळे घडणाऱ्या संभाव्य अपघाताची जबाबदारी तरी नगर पालिकेने घ्यावी असेही अजहर शेख (ABS) यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

*अजहर शेख यांची संतप्त प्रतिक्रिया*

शासकीय,निमशासकीय अधिकारी,कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत की मालक हेच समजून येत नाही, नुसते आश्वासनावर आश्वासने देणे हेच यांचे काम होऊन बसले आहे. जसे यांनी विकासकामे केली तर जनतेवर मोठे उपकार होणार आहे,संबधित ठेकेदार देखील नेहमी कॉलवर आश्वासनच देत आहे, आठ दिवस, दहा दिवस थांबावेत म्हणून, यामुळे जनतेचे प्रश्न पूर्णपणे सुटत नाही, या रस्त्याप्रकरणी अजहर शेख यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतः दखल घेवून आयएएस अधिकारी डॉ. सोनिया सेटी यांच्या विभागात सदरील प्रकरण पुढे फॉरवर्ड केलेले आहे, तरीही संबंधित मुख्याधिकारी व नगरपालिकेचे कर्मचारी आणि ठेकेदार दिवसागणिक नुसते आश्वासनच देत आहे याला काय म्हणावे ? हजारो लोकांसाठी एक युवा सामाजिक कार्यकर्त्याला छोट्याश्या रस्त्यासाठी कित्येक महिने संघर्ष करावा लागतोय तरीही नगर पालिका प्रशासक, मुख्याधिकारी आणि संबंधित ठेकेदार सदरील कामांसाठी टाळाटाळ करत आहे, वर्क ऑर्डर निघून पडली आहे तरीही कामे मात्र पूर्णपणे होत नाही ही मोठी शोकांतिका असल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील अजहर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीसोबत बोलताना व्यक्त केली.

*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर*








Wednesday, April 26, 2023

राज्यपालांचा नाशिक, अहमदनगर दौरा रद्द होण्याचे नेमके कारण समजू शकले नाही ?

 (मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता महाराष्ट्रात सध्या  राजकीय उलाढालींच्या चर्चा असतानाच राज्यपाल रमेश बैस यांचा २६ व २७ रोजीचा नाशिक आणि अहमदनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या राज्यपालांचा दौरा असा अचानक रद्द झाल्याने राजकीस तर्कविर्तकांना उधाण असेही लावण्यात येते काल राहुरी परिसरात हवामान चे वारे वादाळाने भराड ल्याने अनेक ठिकाणावर पाऊस व सुसाट वाऱ्यामुळे निरनिराळ्या ठिकाणवार झाडें पडली अस्थांना निदर्शनास घेतले  प्रशासकीय सूत्रकडनं राज्यपालच्या यंत्रनेला कळवले असून बहुतेक दौरा रद्द करण्याचे कारण असु शकतात असा ही अंदाज व्यक्त करण्यात येते आहे.
नाशिकसह अहमदनगरमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीतअनेक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा दौरा का रद्द झाला? याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही. राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपाल बैस नाशिकला येत असल्याने प्रशासनाने दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली होती. त्यात त्र्यंबकेश्वर येथे पहिने गावाला भेट देत राज्यपालांकडून हे गाव दत्तक घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याशिवाय कालिदास कलामंदिर येथे नाशिक
एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव सांगता समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. तसेच अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी, नेवासा तालुक्यातील देवगड आणि राहुरीच्या महात्मा फुले विद्यापिठाला भेट देणार होते. मात्र, त्यांचा नाशिक आणि अहमदनगर दौरा अचानक रद्द झाला असून, ते राजभवन मुंबईत उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यानंतर राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आले असून, राजभवनाकडे येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींकडे माध्यमांचे लक्ष लागलेआहे.
------------------------------------------------------------------------=====================================
राजप्रसारित...संपादक...✍️✅️🇮🇳...
=====================================------------------------------------------------------------------------









Tuesday, April 25, 2023

राज्यपाल रमेश बैस दोन दिवस नगर जिल्हा दौऱ्यावर शिर्डी, देवगड, कृषी विद्यापिठ राहुरी येथे देणार भेट ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता - राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे 26 व 27 एप्रिल नगर जिल्हा येथे दौऱ्यावरयेत असून.या दोन दिवशीय दौऱ्यात राज्यपाल शिर्डी, नेवासा तालुक्यातील देवगड आणि राहुरीच्या महात्मा फुले विद्यापिठाला भेट देण्यात आहेत.
राज्यपाल बैस हे बुधवार (दि. 26) सायंकाळी 4.45 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, नाशिक येथून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे प्रयाण करत सायंकाळी 5.20 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड, शिर्डी येथे आगमन होणार आहे. त्यानंतर शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे आगमन व राखीव असून दरम्यान श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे शेज आरतीस उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर गुरुवार (दि.27) रोजी सकाळी श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने देवगड (ता. नेवासा) श्री दत्त मंदिर संस्थान देवगड येथे पोहचणार आहे. त्यानंतर दुपारी 12.25 वाजता देवगड येथून हेलिकॉप्टरने महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे प्रयाण. दुपारी 1 आगमानानंतर दुपारी 3 ते 4.30 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथिल कार्यक्रमासाठी राखीव असून त्यांनतर पुन्हा हेलिकॉप्टरने प्रयाण करुन मुंबईकडे रवाना होणार आहेत.
-----------------------------------------------------====================================सा : राज प्रसारित...संपादक...✍️✅️🇮🇳...
====================================
-----------------------------------------------------












सोन साखळी चोरनारे श्रीरामपूर चे दोघ जेरबंद नगरच्या चोरीच गुना कबूल साडे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता - नगर शहरासह श्रीरामपूर येथील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारे दोघे सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धर दाबोचले व जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून साडे पाच तोळे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा चार लाख 31 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्या आला.
प्रफुल्ल अशोक जाधव (वय 24 रा. निपाणीवडगाव ता. श्रीरामपूर), विष्णु दत्तात्रय गवारे (वय 25 रा. अशोकनगर ता. श्रीरामपूर) असे जेरबंद केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर श्रीरामपूर शहर, राहुरी, कोतवाली, तोफखाना, सिलेगाव (जिल्हा. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यातील दोन, कोतवाली पोलीस ठाण्यातील एक व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील एक अशा चार दाखल गुन्ह्यांची कबुली दिली आहे. दरम्यान, त्यांचे साथीदार कुणाल जाधव व मनोज जामदार पसार झाले आहेत. त्यांचाही शोध (LCB)कडूनघेतला जात आहे.
राधिकाबाई शंकर दंडवते - राहणार सावेडी - या सावेडी उपनगरातून रस्त्याने पायी घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजारांचा सोन्याचा सर बळजबरीने चोरून नेला होता. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या सोन साखळी चोरीच्या वाढत्या घटनाबाबत कारवाई करण्याच आदेश दिले आहेत.q
त्यानुसार निरीक्षक आहेर यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबत पथक रवाना केले. पथकाने माहिती घेतली असता कुणाल जाधव व मनोज जामदार यांनी नगर शहर व श्रीरामपूर परिसरात सोन साखळी चोरी करून चोरी केलेले महिलांचे गळ्यातील सोन्याची दागिने प्रफुल्ल जाधव व विष्णु गवारे यांचेकडे आहेत व ते विक्री करण्यासाठी अशोकनगरहुन श्रीरामपूरकडे येणार आहे. अशी माहिती त्यांना मिळाली
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार भाऊसाहेब काळे, मनोहर शेजवळ, विजय वेठेकर, मनोहर गोसावी, विजय ठोंबरे, सचिन आडबल, शंकर चौधरी, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, मेघराज कोल्हे, आकाश काळे, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने सापळा रचून प्रफुल्ल जाधव व विष्णु गवारे यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. व इतर दोघांचा शोध घेतला असता मात्र ते मिळून आले नाही.पुढील तपास चालु आहे.
------------------------------------------------------------------------=====================================÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
कार्यकारी,संपादक...भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द ✍️✅️🇮🇳रचना संकलन वार्ता...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
=====================================------------------------------------------------------------------------

















Sunday, April 23, 2023

अवैध वाळू वाहतु श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यात पोलीस सांनी केली कारवाई 33 लाख 70 हजाराचा मुद्देमाल हस्तगत ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यात चालू असल्येल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून या कारवाईत चार ट्रॅक्टर, तीन ट्रॉली, एक ढंपरसह सहा ब्रास वाळू असा 33 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर सात जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अर्शद शेख, (रा. खानापूर, ता. श्रीरामपूर), सुनिल मोरे, सर्फराज अजगर अली सय्यद, बाळासाहेब जाधव, कलिम पठाण सर्व राहणार (भामाठाण) यांच्यावर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून तीन ट्रॅक्टर, तीन टॅली, एक मोबाईल व दोन ब्रास वाळू असा 18 लाख 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर दुसरी कारवाई शेवगाव तालुक्यातील करण्यात आली.
त्यामध्ये लक्ष्मण श्यामराव शिंदे, तुकाराम मच्छिंद्र विखे, (दोघे रा. सोनविहीर, ता. शेवगांव) यांच्याकडून एक विनानंबरचा ढंपर व चार ब्रास वाळू असा 10 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिरजगाव येथे एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. असा एकूण 33 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकास दिल्या. पथकातील मनोहर गोसावी, संदीप दरंदले, सचिन आडबल, विशाल गवांदे, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, मयुर गायकवाड, सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे व संभाजी कोतकर यांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून अवैधरित्या वाळू चोरी करणाऱ्यांना ताब्यात घेवून 33 लाख 70 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आले आहे.













Saturday, April 22, 2023

ईद - ऊल - फित्र अर्थात रमजान ईद...सलीमखान पठाण ?

*ईद - ऊल - फित्र अर्थात रमजान ईद*

*✍️✅️🇮🇳सलीमखान पठाण*
             श्रीरामपूर
     *9226408082*
गेले महिनाभर अत्यंत भक्तिभावाने पालन केल्या गेलेल्या रमजान महिन्याची सांगता आज शव्वाल महिन्याच्या एक तारखेस रमजान ईद साजरी करून होत आहे.जगभरातील मुस्लीम बांधव त्यांचा सर्वात मोठा सण ईद ऊल फित्र किंवा रमजान ईद आज साजरी करीत आहेत.भौगोलिक कारणामुळे जगाच्या काही भागात ती कालही साजरी करण्यात आली.रमजान महिन्यात अल्लाहच्या आदेशाने व प्रेषित हजरत पैगंबर यांच्या सांगण्यानुसार महिनाभर प्रार्थना,रोजा, नमाज,तरावीह,जकात, सदका आदिचं पालन करुन सर्वांनी अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व आदेशांची पूर्ति म्हणून अल्लाह कडून मिळणाऱ्या ईनाम प्राप्तीचा दिवस म्हणून ईद साजरी केली जाते. ईद म्हणजे आनंद किंवा खुशी.आजच्या दिवशी सर्वजण सकाळी नवे कपडे परिधान करून ईदगाह मध्ये जातात. तेथे खुल्या आकाशात प्रार्थना करून अल्लाह
तआलाचे आभार व्यक्त करतात.मोठया शहरातून मशिदीमध्ये ईदची नमाज आदा केली जाते.समस्त मानवांच्या कल्याणासाठी दुआ मागतात. नमाज आदा केल्यानंतर
एकमेकांना शुभेच्छा देतात.घरी येऊन क्षिरखुर्मा खातात. लहान मुलांचा आनंद तर विचारायला नको.ईदी च्या मिळालेल्या रकमेतून त्यांचा आनंद ओसंडत असतो.
ईदचा सण हा आनंदाचा असल्याने सर्व धर्मिय बांधव शुभेच्छा देऊन या आनंदात सहभागी होतात.
आज ईदचा आनंद साजरा करतांना परमेश्वराकडे एवढेच मागणे आहे कि*या अल्लाह* आमच्या देशात व राज्यात सुख, समृद्धी,शांतता,प्रगती व एकता नांदू दे, सर्वांची प्रगती होऊ दे. अन्याय, अत्याचार,जुलूम, जबरदस्तीचा खातमा होऊ दे.न्याय,समता, बंधुता यांची भरभराट होऊ दे. बेकारी, बेरोजगारी नष्ट करून रोजी रोटीचे प्रश्न सुटू दे. आमीन.
ज्यांनी अत्यंत कडक उन्हाळयामध्ये उष्णतेचा त्रास सहन करून केवळ अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी त्याच्या आदेशानुसार महिनाभराचे रोजे पूर्ण केले त्यांना ईद मुबारक. तरावीहची नमाज नियमितपणे आदा केली त्यांना ईद मुबारक. रमजान महिन्याचे पालन करताना हजरत पैगंबरांनी प्रत्यक्ष आचरणातून घालून दिलेल्या आदेशाप्रमाणे पूर्ण महिना इबादत रोजा,नमाज,तिलावत यामध्ये व्यतीत केला अशा सर्वांना ईद मुबारक.लहान लहान बालकांनी सुद्धा अत्यंत श्रद्धेने रोजे केले त्यांनाही ईद मुबारक.
आजचा दिवस खूप आनंदाचा आहे.मागील दोन वर्ष कोरोनाच्या जागतिक संकटामुळे आपण ईद साजरी करू शकलो नव्हतो. अल्लाहच्या कृपेने यावर्षी ते संकट कमी झालं.सर्वांनी मनोभावे प्रार्थना केली आणि म्हणून प्रथमत: त्या परम पवित्र परमेश्वराचे आभार. ज्याने यावर्षी आपल्याला ईद ची खुशी प्रदान केली. आजचा दिवस हा मागचे सर्व काही विसरून नव्या आनंदाने नव्या जीवनाची सुरुवात करण्याचा दिवस आहे. झालेल्या चुका माफ करुन पुन्हा त्या न करण्याचा निश्चय करण्याचा दिवस आहे. समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन प्रत्येकाला आनंद कसा उपभोगता येईल यासाठी उपाययोजना करून सर्वांना आनंदात सहभागी करून घेण्याचा हा दिवस आहे. ईद साजरी करताना आपल्या देशातील सर्व देश बांधवांना रमजान ईद पवित्र पर्वाच्या शुभेच्छा .
आज ईदगाह आणि मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करतांना जगातील समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी दुआ मागितली जाणार आहे.सर्वांना मुबारकबाद देतांना क्षीरखुर्मा चा आस्वाद घेतला जाणार आहे. हा आस्वाद घेताना आपापसातील बंधुभाव आणि स्नेह वृद्धिंगत होणार आहे. हाताची पाच बोटे सारखी नाहीत. त्यामुळे सर्वांचे सुविचार एक सारखे नाहीत. परंतु आज सर्व काही विसरून एकमेकांना अत्यंत प्रेमाने दिलखुलासपणे आपण ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना ईद मुबारक !
गेली सवीस वर्षे दैनिक सार्वमतसह राज्यातील विविध वर्तमान पत्रातून रमजान महिन्यात माझे लेख प्रसिद्ध झालेले आहेत.या लेखमालेचे सर्व स्तरातील  वाचकांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले.नेहमीप्रमाणे उत्तम प्रतिसाद दिला. बहुमोल प्रतिक्रिया दिल्या. त्या सर्वांना धन्यवाद.यावर्षी सोशल माध्यमातून राज्य, देश नव्हे तर जगभरामध्ये ही लेखमाला पोहोचली. अनेक वाचकांनी स्वयंस्फूर्तीने हे लेख आपल्या मित्रांना फॉरवर्ड केले. सर्वांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.त्याबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार.
पुढील काळामध्ये मागील सव्वीस वर्षातील सर्व लेखांचे पुस्तक तयार करावं अशी अनेक मित्रांनी इच्छा व्यक्त केली आहे.पुस्तक रुपाने वाचकांशी संवाद कायम राहील.आज पर्यंत वाचकांनी दिलेल्या बहुमोल प्रतिसादामुळे ही लेखमाला रौप्यमहोत्सवी वर्ष गाठू शकली याबद्दल निश्चित मला आनंद आहे. एखाद्या वर्तमान पत्रातील लेखमालेने रौप्य महोत्सव साजरा करावा ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे. हे भाग्य मला प्राप्त झाले. त्याबद्दल सर्व वाचकांचे व ही लेखमाला प्रसिद्ध होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
रमजान महिन्याची सांगता होताना अल्लाहची रहमत, बरकत आपल्या सर्वांवर व आपल्या देशावर सतत होत राहो हीच अल्लाहकडे प्रार्थना. मनापासून आभार. शुक्रिया .. शुक्रिया .. अलविदा .. अलविदा ..
*(समाप्त)*🌹🥀🌺🌷🌸 ♥️
-----------------------------------



Friday, April 21, 2023

सरकारी वकिलांना 'जुनी पेन्शन' लागू महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधि करणाचे (मॅट) ?

(मुंबई) - प्रतिनिधी - वार्ता - भरतीसाठी काढलेल्या जाहिरातीत अतिरिक्त सरकारी वकिलांचे पद कायमस्वरूपी असेल व निवृत्तिवेतन योजना लागू होईल, असे स्पष्ट नमूद करूनही तसे करण्यास नकार देणाऱ्या सरकारला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) चांगलाच कायंद्याचा नियम समोर आला दिनांक १३ वकिलांची नियुक्ती ३१ ऑक्टोबर २००५ नंतर होऊनही त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश राज्य सरकारला स्पष्ट पणे दिले
अर्जदार वकिलांच्या नियुक्तीचे आदेश 21 एप्रिल 2006 रोजी देण्यात आले. त्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर करण्यात आल्याने त्यांना नवी पेन्शन योजना लागू करण्यात आली. त्यास विरोध करत 13 वकिलांनी सरकारकडे निवेदन केले. आपली नियुक्ती 21 एप्रिल 2006 रोजी करण्यात आली असली तरी भरती प्रक्रिया आणि मुलाखत 4 जानेवारी 2005 ते 1 नोव्हेंबर 2005 या दरम्यान झाली, असे निवेदनात नमूद केले. परंतु, 20 सप्टेंबर 2021 रोजी गृहविभागाने त्यांना जुनी पेन्शन योजना लागू कयायाम नकार दिला याविरोधा
----------------------------------------------------------------------===================================÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
कापलेले सर्व पैसे परत द्या

जाहिरातीवर संबंधित पदे कायमस्वरूपी आहेत आणि त्यांना सेवानिवृत्ती योजना लागू होईल, असे सरकारने जाहिरातीत म्हटले आहे. त्यामुळे दिलेले आश्वासन सरकार फिरवू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने १३ वकिलांना नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश दिले. आतापर्यंत नव्या पेन्शन योजनेअंतर्गत वेतनातून कापलेले सर्व पैसे परत करण्याचेही आदेश मॅटने दिले.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
=====================================
----------------------------------------------------------------------
वकिलांनी मॅटमध्ये धाव घेतली.
सरकारने जाहिरात देताना संबंधित पदे ही कायमस्वरूपी व सेवानिवृत् योजना लागू करण्यात येईल, असं स्पष्ट नमूद केले आहे. हे लाभ नसते त कदाचित उमेदवारांनी परीक्षा दिल नसती, असा युक्तिवाद अर्जदारांचं वकील माधव थोरात यांनी केला त्यावर केवळ भरती प्रक्रिया अंतिम मुदतीच्या आधी झाली म्हणून जुर्न पेन्शन लागू करून घेणे, हा अर्जदारांच अधिकार नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी निदर्शनास केले.












Wednesday, April 19, 2023

CRPC कलम 149 अन्वये नोटीस प्रति,सर्व सोशल मिडीया दिनेश आहेर पोलीस निऱीक्षक सायबर क्राईम अहमदनगर ?

सायबर.पोलीस क्राईम कलम 149 अन्वये नोटीस......

(अहमदनगर) दिनेश आहेर पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर मला CRPC कलम 149 अन्वये मिळालेल्या अधिकारान्वये आपणास नोटीस देण्यात येते की, दिनांक 22/04/2023 रोजी अहमदनगर जिल्हा हददीमध्ये रमजान ईद, अक्षय्य तृतीया उत्सव साजरा होणार आहे.
तरी सदरचे उत्सव शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याचे दृष्टीकोनातुन सोशल मिडीया जसे की ,What'sApp, Facebook, Instagram, Twitter इत्यादी माध्यमातून आक्षेपार्ह मजकुर टाकणाऱ्यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे समाज कंटकाकडुन सोशल मिडियाचे माध्यमातुन चुकिचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातुन दोन समाजात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीसांचा सोशल मिडियावर वॉच राहणार असून अफवा पसरविणाऱ्या
विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अहमदनगर शहर व अहमदनगर जिल्हयात गेल्या काही दिवसांमध्ये उत्सव प्रसंगी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे उद्देशाने आक्षेपार्ह संदेश / छायाचित्र / अफवा चुकीची समज करुन देणारे बातम्या प्रसारित करुन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असुन अशा समाजकंटकाविरुध्द पोलीस प्रशासनाचे वतीने कायदेशीर कारवाई देखील यापुर्वी करण्यात आलेली आहे.दि.22/04/2023 रोजी चे रमजान ईद, अक्षय्य तृतीया उत्सव शांततेत व सुव्यस्थेत पार पाडण्याचे दृष्टिकोनातुन आपण आपले ग्रुपचे ॲडमिन असल्या कारणाने WhatsApp ला Only Admin Can Send Massage असे सेटिंग करुन आपले ग्रुप वरुन
कोणत्याही प्रकारची अफवा किंवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकुर प्रसारित होणार
नाही याची आपण  अँडमीन ग्रुप मिन या नात्याने खबरदारी घ्यावी.अहमदनगर शहर व जिल्हयात सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेत बाधा निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणांस व संबंधित व्यक्तीस मेसेज प्रसारित करणारा जबाबदार धरण्यात येवुन संबधिताविरुध्द प्रचलित कायदयानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. व सदरची नोटीस आपणांविरुध्द मा. न्यायालयात पुरावा म्हणुन सादर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदरची नोटीस आज दिनांक 18/04/2023 रोजी माझ्या सही व शिक्क्यानिशी जारी केली.

Polic Cyber Station agar
                   (दिनेश आहेर)
                 पोलीस निरीक्षक
              सायबर पोलीस स्टेशन,
                        अहमदनगर