(मुंबई) -प्रतिनिधि - वार्ता - सर्व सामान्य नागरिकांना अन्यायाची
दाद मागण्यासाठी बिंवा सेवा, सुविधांचा लाभ मिळण्यासाठी राज्यभरातील अनेक नागरिक पत्रव्यवहारासाठी मंत्रालयात येत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो. मात्र,
यापुढे टपाल घेऊन येणाख्या नागरिकांना संबंधित मंत्री किंवा विभागांकडे जाऊन पत्र देण्याऐवजी त्यांना मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच टपाल द्यावे लागणार आहे. सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही करण्यासाठी
मंत्रालयात मध्यवर्ती पाल केंद्र (सेंट्रल रजिस्ट्री यूनिट) सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक
होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई- ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, या युनिटच्या माध्यमातून पत्रांचे स्कॅनिंग होणार असून नेमके पत्र कुठल्या विभागापर्यंत पोहोचले आहे याची माहिती मिळणार आहे.शासनाचा कारभार लवकरच कागद
------------------------------------------------------------------------=====================================÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपले सरकार वेबपोर्टलवर सर्व सेवा ऑनलाईन
आपले सरकार' वेब पोर्टलच्या माध्यमातून ५११ सेवा पैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाच्या जास्तीत जास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये १२४ सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा सहज मिळाव्यात यासाठी मोबाईल अपदेखील सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांनी सांगितले.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷======================================
------------------------------------------------------------------------
विरहित करण्याचा मानस आहे. यासंदर्भात मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती पाल केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी
मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी माहिती व जनसंपर्कमहासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज आणि अधिकारी उपस्थित होते. कार्यालयांमध्ये प्राप्त होणाच्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यव यासाठी लवकरच टपाल केंद्र उभारण्यात येणार आहे.स्वीकारलेले टपाल स्कैन करून संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येईल,
याकरिता मध्यवर्ती उपाल केंद्रातीलविभागांकरिता स्वतंत्र खाते एनआयसी मार्फत तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई- ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, शासनाचा कारभार हा लवकरच कागद विरहित करण्याचा शासनाचा मानस -असल्याची माहिती सुजाता सौनिक यांनी दिली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------संपादक...राजु मिर्जा ✍️✅️🇮🇳...शब्द...रचना... संकलन... वार्ता...नाशिक...+919730595775...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment