राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, May 30, 2023

महिलेने घेतला चावा, राष्ट्रवादी शहराध्यक्षाना जबर मारहाण चाळीसगाव पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल ?

चाळीसगाव -  प्रतिनिधि - वार्ता -
शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या जय गजानन हॉटेल समोर, हॉटेल खाली करण्याच्या कारणावरुन चाळीसगाव न.पा.चे माजी उपनगराध्यक्ष तथाराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शाम छगनराव देशमुख यांनामहिलासह पुरुषांनी जबर मारहाण केली. तसेच एकामहिलेने त्यांच्या हाताला चावा घेतला. यात त्यांना गंभीरदुखापत झाली असून सध्या ते धुळे येथे उपचार घेतआहे. हि घटना दि, २६ रोजी घडली असून याप्रकरणीचाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव पोलीस स्टेशनला शाम छगनराव देशमुख (५६) धंदा - हटेल रा. वाल्मिकनगर चाळीसगाव. यांनी दिलेल्या जाबबनूसार,दि. २६/०५/२०२३ रोजी रात्री ०९ वा. ते १० वाजेच्या सुमारास शाम देशमुख हे हॉटेल जय गजानन नास्ता सेंटर येथे असतांना. त्याठिकाणी योगिता मिस्तरी, अनिता मिस्तरी, सौरभ परदेशी, मनोज परदेशी, निलुबाई परदेशी, बाळु परदेशी सर्व रा. भडगाव रोड गायत्री कम्पलेक्सच्या जवळ चाळीसगाव जि. जळगाव, अशांनी येवुन सांगितले की 'तु हटेल खाली कर, नाही तर तुला आम्ही मारुन टाकू' अशी धमकी दिली. तर सौरभ परदेशी यांनी त्याचे हातातील काहीतरी तिक्ष्ण हत्याराने शाम देशमुख यांच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत करत, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
योगिता मिस्तरी, अनिता मिस्तरी, यांनी लाकडी दांडक्याने डाव्या बाजुला जबड्याला पाठीवर, कमरेवर डाव्या पायाचे गुडघ्याखाली लाकडी दांडक्यानी मारहाण केली व निलुबाई परदेशी हिने शाम देशमुख यांच्या उजव्या हाताचे मनगटाजवळ चावुन घेतले आहे. तसेच मनोज परदेशी, बाळु परदेशी यांनी वाईट साईट शिविगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. डोक्यातुन जास्त रक्तस्त्राव होवु लागल्यामुळे तेथे उपस्थित लोकांनी भांडण सोडवा सोडव केली. व शाम देशमुख यांना तात्काळ चाळीसगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले ग्राम रुग्णालय येथे औषधोपचाराकामी दाखल केले.
शाम देशमुख यांना जास्त त्रास होवु लागल्यामुळे पुढील उपचारासाठी धुळे हिरे मेडीकल कलेज येथे दाखल केले. तेथुन अधिक उपचारासाठी साई रुग्णालय धुळे येथे दाखल करण्यात आले असून सध्या ते उपचार घेत आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला शाम देशमुख यांच्या फिर्यादीवरून योगिता मिस्तरी, अनिता मिस्तरी, सौरभ परदेशी, मनोज परदेशी, निलुबाई परदेशी, बाळु परदेशी यांचेविरुध्द भादवी कलम ३०७, १४३,१४४,१४७,१४८, १४९,३२४, ३२३, ५०४, ५०६,१३५ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
----------------------------------------------------=================================== : - सह, संपादक...रंजित बतरा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
===================================
-----------------------------------------------------





साक्षात्कारी संत काशिनाथ महाराजांचेचरित्र जीवनदायी =डॉ. बाबुराव उपाध्ये ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
चंद्रपूर जिल्ह्यातील उसगांव येथील साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज हॆ श्रद्धा आणि सबुरीचे आदर्श होते.त्यांनी पंचक्रोशीतील भयग्रस्त समाजाला भयमुक्त केले.डोळस भक्ती सांगितली, अशा थोर संतांचे चरित्र सुखदेव विश्वनाथ सुकळे यांनी लिहिले, ते सर्व समाजाला जीवनदायी असल्याचे मत वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील बोरावकेनगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे संत काशिनाथ महाराज यांच्या  १६८ व्या जयंतीनिमित्त सुखदेव सुकळे लिखित 'साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज :अवतारकार्य 'या पुस्तकावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते.प्रारंभी संत काशिनाथ महाराज यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. संयोजक व विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी पुस्तक परिचय करून दिला.मान्यवरांचा सत्कार केला.यावेळी प्रा. शिवाजीराव बारगळ, सुयोग बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले, सिकंदर शेख आदी उपस्थित होते. डॉ. उपाध्ये यांनी सद्गुणी जीवनतत्व आणि सेवाशील लोककल्याण कर्तृत्व असणारे व्यक्तिमत्व हॆ संतच होय. संत काशिनाथ महाराज यांचा जन्म १८५५ साली झाला. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील उसगांव ह्या गावाची जीवनभर सेवा केली. गावाला सतत आग लागत असे,त्यातून गाव सुरक्षित केले. दुःख, समस्या, लोकजाणिवा त्यांनी लक्षात घेतल्या. १९२० ला त्यांनी गावातच समाधी घेतली. गावाचे पवित्र तीर्थक्षेत्र सर्वत्र लोकप्रिय आहे, अशा संतांचे चरित्र जीवनाला प्रेरणादायी आहे आहे, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य शेळके यांनी संत व समाज यांचे महत्व सांगितले.प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी उपक्रमाचे कौतुक करून आभार मानले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

कष्टकरी श्रमिकांचा ज्येष्ठ सहकारी: कॉ. मार्शलभाऊ संसारे ?



( क्रांतिकारी ) विचारांचा कोणताही वारसा नसतांना स्वतःच्या हिमतीवर आणि भि. र. बावके यांच्या सहकार्याने शेतकरी, कष्टकरी आणि तमाम नाही रे वर्गाचा आधारवड बनलेला आमचा कॉम्रेड २२ वर्षांपूर्वी शांत झाला.
 या बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या नंतर चळवळीतील एकही दिवस असा गेला नसेल की त्यांची आठवण कोणी काढली नसेल. कष्टकरी श्रमिक आणि शेतमजूर यांच्यासाठी उभे आयुष्यपणाला लावून लढणारा क्रांतिकारी कॉम्रेड म्हणजे कॉ. मार्शल भाऊ संसारे.... मार्शल भाऊ चा आवाज ऐकला की तमाम शेतकरी, कष्टकरी एकजुटीने त्यांच्या हाकेला ओ देत, पाहिजे त्या ठिकाणी हजर राहात आणि त्यांच्या लढ्याला बळ देत.
हा लढा मुळातच कष्टकरी,श्रमिक आणि शेतमजुरांसाठी असल्याने त्यासाठी वेगळ्या अवतनांची गरज त्यांना पडत नसे. आणि म्हणूनच त्यांनी उभे केलेले अनेक लढे,चळवळी,आंदोलने यशस्वी झालेले दिसून येतात. आज सुखा समाधानने शेती कसत असलेल्या शेतमजुरांना त्यांची आठवण निश्चितच येतं असेल. ज्या शेतामध्ये पूर्वीची पिढी मजूर म्हणून राबली,त्या शेतात आज त्यांच्या कुटुंबातील मुलं स्वतःची म्हणून शेती करत आहेत. हा लढा यशस्वी होण्यासाठी कॉम्रेड भि.र. बावके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलन या सर्वांनी केलें.त्यांचेच फळ म्हणुन किमान कसण्यासाठी तरी जमीन त्यांना अधिग्रहित झाली आहे.
          कॉम्रेड मार्शल संसारे म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. चळवळीतील अनेकांना घरी बोलावून आहे ती चटणी भाकर खाऊ घालुन विचारांचे चार शब्द पेरीत राहाणारा हा माणूस....तसा लवकरच गेला. त्यामुळे चळवळी सोबतच कुटुंबीयांचा आधारवड संपला.
        रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आता फारच कमी लोक राहिलेले असुन अशावेळी कॉ मार्शल भाऊ संसारे यांची आठवण कार्यकर्ते नेहमीच काढत असतात. काहीं दिवसापूर्वी ॲड. सुभाष लांडे पाटील, ॲड. बंशी सातपुते आणि ॲड. सुधीर टोकेकर नगर वरून येऊन गळनिंब ता. श्रीरामपूर येथील आजारी असणाऱ्या राष्ट्रपती पदक प्राप्त कॉ. पांडुरंग शिंदे यांना भेटायला निघाले होतें. सायंकाळ पाच नंतरची वेळ असल्याने त्यांनी मला संपर्क केला आणि मी पण त्यांच्यात सामिल झालो. प्रवास सुरू झाला.आम्हीं सर्व एकत्रपणे या भागात मा.श्री.अरुण कडू पाटील हे जेव्हां खासदारकी साठी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार होतें त्यावेळीं फिरलेलो होतो. तेंव्हा मुक्कामी श्रीरामपूर येथील चटई च्या असणाऱ्या लाल बावटा कामगार युनियन च्या कार्यालयांत असत. त्या ठिकाणी कॉ.मार्शल भाऊ संसारे असत.आणि नियोजनाचा महत्वाचा भाग ते सांभाळत असत. कोणत्या गावात कोणत्या कार्यकर्त्याला भेटायचं याची यादीच ते तयार करून देत. त्यावेळचे त्यांचें सहकारी कोल्हार येथील कॉ. एल. पी. दातिर, कॉ. भीमाशंकर पानसरे, कॉ पांडुरंग शिंदे, कॉ. श्रीधर आदिक सर्वच माणसं आपला विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असत. स्वत:चा कोणताही विचार न करता केवळ संघटना, पक्ष, विचार प्रणाली याचाच विचार ती मंडळी करत असत.प्रचाराच्या फेरीत अनेकदा सायंकाळच्या वेळी देवळाली प्रवरा येथील संसारे वस्तीवर आंबी स्टोअर वर जात असत. कॉ मार्शल भाऊ संसारे घरी आल्यावर सर्वांची जेवणाची व्यवस्था करायला सांगत. ऐनवेळी घरच्यांची विशेषता: बाईंची धावपळ होई. पण कधी त्यांनी कुरकुर केली नाहीं. त्यांचं घर म्हणजेच शेतकरी,कष्टकरी चळवळीच केंद्रच जणु. कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या या आठवणी जागृत झाल्या आणि येताना त्या वस्तीवर भेट द्यायचं ठरलं पण उशीर झाल्याने ते शक्य झालं नाही. असो.
          आता त्यांचे चिरंजीव कॉम्रेड शरद संसारे शेतमजूर, कष्टकरी,श्रमिकांच्या चळवळीमध्ये कार्यरत आहेत. या नाही रे वर्गाला आधार देण्याचं काम ते आता करत आहेत. 
 आज धावपळीच्या युगामध्ये
दुसऱ्यांना देण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही आणि दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचेही कष्ट कोणी घेत नाही, अशावेळी कॉ. मार्शल भाऊ संसारे यांच्या विचाराची ज्योत पेटती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कॉ. मार्शल भाऊ संसारे यांना लाल सलाम!
*सुनील गोसावी,*
संस्थापक, सचिव,
*शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य*

[[[समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर]]]

कान्हेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश खरात, तर व्हा.चेअरमनपदी सौ.विमल खरात यांची एकमताने निवड ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या ताब्यातील कान्हेगाव विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी गणेश खरात यांची तर व्हा.चेअरमन पदी सौ.विमल खरात यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी आर.के. जाधव यांचे अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी बैठक बोलविण्यात आली होती.
चेअरमनपदाची सूचना बाबा चौधरी यांनी मांडली त्यास अनुमोदक म्हणून सर्जेराव खरात यांनी अनुमोदन दिले. तर व्हा.चेअरमन पदाची सूचना सुनिल गिरी यांनी मांडली त्यास सौ.जयश्री सुनिल खरात यांनी अनुमोदन दिले. सदर मिटींग खेळीमेळीत पार पडली. निवडणूक अधिकारी यांनी वरील निवड जाहिर केल्यानंतर गुलालाची उधळण करण्यात आली.
           नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे व अशोक कारखाना संचालक मंडळाने अभिनंदन केले. सदर निवडीकरीता रावसाहेब खरात, गिताराम खरात, सुनील खरात, सुनिल गिरी, विशाल खरात, बाबा चौधरी, सर्जेराव खरात, वसंत अप्पा खरात, सोन्याबापु खरात, प्रकाश चौधरी, भिमराज खरात, उत्तमराव खरात, शिवाजी थोरात, जनार्दन खरात, विकास खरात, अशोक गि. खरात, प्रदिप खरात, अनिल खरात, ऋषी खरात, सुधाकर खरात, अशोक नाना खरात, ज्ञानदेव पावसे, विलास तुपे, संदीप खरात, भरत खरात, मनोज खरात, शिवाजी खरात, महेश खरात, राजेंद्र खरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

शिव तिर्थात राज ठाकरें सोबत तेंच्या भेटीवर फडणवीसांच काही विनोदी गप्पा रंगले / जेणे करुन स्पष्टीकरण ?

मुंबई - प्रतिनिधि - विशेष - वार्ता - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
यांनी सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. काल रात्री अचानक उशीरा ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.राजकीय काही विनोद गप्पा होत राहिल्याने हशा चा पिक उभरला 
मात्र "अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थावर गेलो होतो," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'बऱ्याच दिवसांपासून आमचे ठरले होते, एक दिवस गप्पा मारायला बसु आणि त्याचा मुहूर्त काल लागला. आम्ही गप्पा मारल्या. या भेटीत राजकीय गोष्टी सोडुन गप्पा मारायच्या असेही फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे वेगळी भुमिक घेताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात आगामी मुंबई महानगरपलिकेची निवडणूक तसेच मनसे आणि भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, राज ठाकरेंनी भाजपच्या काही भूमिकांना विरोध दर्शवला आहे.
तसेच, नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी भाजपवरही टीका केली होती. ज्यांना वाटतं कोणीही आपला पराभव करु शकत नाही, त्यांन या निकालातून धडा घ्यावा, असे राज ठाकरे म्हणाले होते. आता दोन्ही नेत्यांच्या भेटीवरुन अनेक अर्थ काढले जात असून, या पार्श्वभूमीवर फडणवीस राज ठाकरे यांच्यातील भेटीला महत्त्व कक्षा च आहे.

-------------------------------------------------------------------
==================================
: - राजु मिर्जा...शब्द...🖊️✅️🇮🇳...रचना...संकलन वार्ता...
==================================
-------------------------------------------------------------------






















शेतीची कामे लवकर उरका, या वर्षी भरपूर पाऊस येणार- पंजाबराव डखकांद्याचे भाव वाढणार, उष्णता वाढणार तीतका पाऊस व गारपिट वाढणार, झाडे लावून पृथ्वीचे तापमान कमी करण्याचे आवाहन ?

  भोकर - प्रतिनिधि - उत्त -
 यावर्षी भरपूर पाऊस होणार त्या बरोबर कांद्याचे भाव हि वाढणार आहे, तुमच्याकडे शेतीची कामे उरकण्यासाठी केवळ आठ दिवस बाकी आहेत, कामाचा उरक करा. दि.८ जून रोजी राज्यात मान्सून दाखल होणार आहे, दि.२७ व २८ जूनच्या दरम्यान खरीपाची पेरणी सुरू होणार, जास्त पावसामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतात चर खोदावे लागणार आहेत, तर दि. २६ आक्टेाबरला थंडीचे आगमण होणार आहे. जेव्हढी उष्णता व तापमान वाढेल तीतका पाऊस वाढणार आहे त्याच बरोबर गारपीट ही वाढत आहे. जोराचा पाऊस व गारपिट टाळायची असेल तर झाडे लावा, जीतके झाडे जास्त तीतका रिमझिम पाऊस येणार, ऊन तापल्यामुळे पाऊस जास्त येतोय, पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी झाडे लावा म्हणजे तापमान कमी होईल असे आवाहन प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे.  
श्रीरामपूर तालुक्यातील खोकरफाटा येथील लक्ष्मी लॉन्स येथे आयोजीत शेतकरी सुखी तर जग सुखी या हे या घोष वाक्याचा आधार घेत ‘समृद्ध शेतकरी सन्मान सोहळा’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधक्षिक तथा जिल्हा कृषीअधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय तंत्र अधिकारी पांडूरंग साळवे, नेवासा येथील कृषी अधिकारी बाळासाहेब कासार, श्रीरामपूरचे गुण नियंत्रण निरीक्षक अजीतानंद पावसे, संभाजी बिग्रेडचे शिवाजी पवार आदिंसह मान्यवर व्यासपिठावर उपस्थीत होते.
कुणी काहीही सांगत असेल की यावर्षी भरपूर पाऊस पडणार नाही असे काही जण म्हणत आहेत पण ते योग्य नाही कारण मी सांगतो यावर्षी भरपूर पाऊस पडणार आहे . दि. २८ मे ते दि.१ जून पाऊस होणार आहे त्याच बरोबर दि. ४ जून ते दि.७ जून मान्सुनपुर्व पाऊस होवून सर्वत्र पाणीच पाणी होणार आहे. तर दि. ८ जूनला मान्सून दाखल होणार आहे. गेल्या वर्षी पावसाने दिशा बदलल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. शक्यतो पुर्वेकडून येणारा म्हणजेच परतीच्या पावसाचा अहमदनगर जिल्ह्याला जास्त फायदा होतो. येत्या दि.२० सप्टेबर रोजी विशाखापट्टनम मध्ये वादळ तयार होवून कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून तो पाऊस संगमनेर पर्यंत चांगला होईल. जुलै, ऑगष्ट, सप्टेबर व आक्टोबर मध्ये चांगला पाऊस होईल तर दि. २६ आक्टेबरपासून थंडी सुरू होईल. 
या भागात झाडांची संख्या कमी असल्यामुळे त्याच बरोबर सर्वत्र सुरू असलेले प्रदुषण यामुळे उष्णतेत व तापमानात वाढ होत असल्याने त्या प्रमाणात पावसाची वाढ होणार आहे. त्यामुळे बर्‍याचदा पिकांचे नुकसान होत आहे. ते थांबवायचे असेल तर झाडे लावावे लागणार आहेत. या वाढत्या तापमानामुळे गारपीटीचे ही प्रमाणा वाढते आहे. गारपीट थांबवायची असेल तर तापमान कमी करावे लागेल. दर वर्षी दि.२२ फेब्रुवारी ते दि.१० मार्च च्या दरम्यान गारपिट होते. हि गारपिट शक्यतो खडक, डोंगर व खडकाळ जमीन असलेल्या भागात जास्त प्रमाणात गारपीट होते. तसेच कालवा, नदीच्या परीसरातील एक कीमीच्या परीघात जास्त गारपिट होते. काळ्या जमीनीत शक्यतो गारपिट होत नाही, झाली तर प्रमाण कमी असते. वाढत्या तापमानामुळे भविष्यात जास्त प्रमाणात पाऊस होईल पण त्यामुळे शेतीचे गणीत बदलत आहे. त्यासाठी य जमीनीचा निचरा करण्यासाठी आता आपल्याला शेतात चर काढावे लागणार आहे. त्यद्वारे शेतीत जास्त झालेले पाणी बाहेर काढून द्यावे लागणार आहे. चर व नाल काढल्या नाही तर पिके खराब होतील. 
निसर्ग आपल्याला पावसाचे संकेत देत असतो, झाडे, प्राणी, पक्षी आपल्याला पाऊसाचे प्रमाण सांगत असतात त्यासाठी निसर्गाचे निरीक्षण करावे लागते. दिवस मावळतीला जात असताना पश्चीमेकडे आभाळ लाल झाले तर तीन दिवसात पाऊस येतो. लाईटजवळ जासत प्रमाणात पाकुळ्या जमा झाल्यावर तीन दिवसात पाऊस होतोच. लींबाच्या झाडाला लीबोळ्या लागल्या की पाऊ होतो. गावरान आंबा एक वर्षाचा पाऊस सांगतो. ज्या वर्षी गावरान आंबे भरपूर पिकतील त्यावर्षी दुष्काळ पडतो तर ज्या वर्षी गावरान आंब्यांना फुलोरा येणार नाही, आंबे पिकणार नाही त्यावर्षी पाऊस भरपूर होतो. दर वर्षी दि.१५ मे ते दि.३० मेच्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस होतो.
तांब्याच्या धातुकडे विज जास्त प्रमाणात आकर्षीत होते म्हणून शक्यतो तांब्याचे कडे हातात घालू नये, विजेेच्या कडकडाट सुरू झाला की झाडाखाली उभे राहु नका, लींब, नारळ व आंबा या झाडांवर तसेच हिरव्या झाडांवर विज पडण्याचे प्रमाण जास्त असते. डोंगर, नदीकाठ, ओढे, नाले, तलाव व स्वीमींग टँक परीसरात विजेचा धोका जास्त प्रमाणात असतो. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पायात चप्पल, बुट पायात असणे गरजेचे आहे. अशा वेळी मोबाईलचे इंटरनेट बंद करून ठेवावे.त्याच बरोबर अशा वेळी शक्यतो, खड्ड्यात बसावे व बसताना खाली वाळलेले गवत कींवा लाकुड असावे म्हणजे जमीनीशी आपला संपर्क तुटलेला असावा.
बदलत्या वातावरणानुसार शेतकर्‍यांनी आता हवामानावर आधारीत शेती करावी, निसर्गाच्या विरोधात जावून शेती करू नये. तसेच यावर्षी कांद्याचे भावात वाढ होणार असल्याचा अंदाज ही यावेळी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सांगीतले. या वेळी आयोजकांचे वतीने कृषी व कृषीशी संलग्ण असलेल्या उद्योग व्यावसायात यशस्वी झालेल्या अनेक शेतकर्‍यांना, व्यावसायीकांना व समुहांना सन्मानचिन्ह देवून सन्माणीत करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व गटविककास अधिकारी प्रविण सिनारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शासनाच्या विविध योजनांची माहीती दिली. 
यावेळी भोकर येथे सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर शिंदे व रेणुका हर्बलचे मच्छींद्र पटारे मित्र मंडळाचे वतीने व खोकर सोसायटी येथे अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव कोल्हे आदिंनी ठिकठिकाणी पंजाबराव डख यांचा सत्कार केला. यावेळी लक्ष्मीमाता मिल्कचे बाबासाहेब चिडे, अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, मोहनराव काळे, ज्ञानेश्वर उंडे, गणेशखिंड देवस्थानचे सचीव बजरंग दरंदले, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार आदिंसह फर्टीलायझर संघटनेचे पदाधिकारी, शहर व तालुक्यातील फर्टीलायझर व्यावसायीकांसह नेवासा व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर उंडे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले.

*फोटो ओळी*
खोकरफाटा येथे आयोजीत समृद्ध शेतकरी सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थीतांना मार्गदर्शन करत हवामान अंदाज वर्तविताना पंजाबराव डख हे दिसत आहेत.
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*

Monday, May 29, 2023

नागरीकांनी शासन आपल्या दारी संकल्पनेचालाभ घ्यावा - तेजल सोनवणे ?

*नागरीकांनी शासन आपल्या दारी संकल्पनेचा लाभ घ्यावा - तेजल सोनवणे*

भोकरला ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत केवळ ११ अर्ज दाखल, ४५ अभा कार्डची नोंदणी

भोकर - प्रतिनिधी - समाचार -
सरकारने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेत सरकारकडून नागरीकांचे सरकारी कामे गावीच पुर्ण व्हावेत यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. याच करीता सरकारने ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’ अंतर्गत शासन आपल्या दारी हि संकल्पना राबवत आहे. या माध्यमातून जनतेच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी यात सहभाग नोंदवत लाभ घ्यावा असे आवाहन कामगार तलाठी तेजल सोनवणे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील जिल्हा परीषद शाळा प्रांगणात आयोजीत ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, पशु वैद्यकीय अधिकारी दिलीप कोकणे, आारोग्य विभागााचे डॉ.अभिजीत ढाकणे, कृषी सहाय्यक रूपाली काळे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सेतू कार्यालयाचे विजय जाजू व सुजीत मोटकर, माजी उपसरपंच महेश पटारे, भागवतराव पटारे, सेनेचे दत्तात्रय पटारे, नामदेव चव्हाण, पत्रकार चंद्रकांत झुरंगे आदि प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसुली विभाग, ग्रामपंचायत संदर्भातील विविध योजनांची माहीती संबधीत विभाग प्रमुख यांनी नागरीकांना दिली. या वेळी येथील नागरीकांकडून केवळ ११ अर्ज दाखल झाले, त्यात उत्पन्न दाखले ५, नॉनक्रीमीलेयर १, दुबार रेशनकार्ड १, रेशनकार्डमध्ये नाव समावेश करणे १, नवीन रेशनकार्ड करीता १, अन्नधान्य सुरू करण्यासाठी १, फळबाग मागणी अर्ज १ या प्रमाणे ११ अर्ज दाखल झाले तर आरोग्य विभागाचेवतीने ४५ हेल्थ कार्ड (अभा कार्ड) साठीची नोंदणी करण्यात आली.
यावेळी मनिष शिंदे, सोमनाथ पंडीत, बाबुराव अमोलीक, शैलेश दंडवते, कचरू वाकडे, दिपक गायकवाड, सखाराम आबुज, बनिचंद आहीरे, सुभाष सुरूसे, सोमनाथ पंडीत, कैलास लोखंडे, कल्पना बेरड, चंद्रकला चव्हाण, सुमन व्यावहारे, अलका ढाले, निर्मला चांदेकर, सुनिता कांगुणे, मिना बर्डे, शोभा लोखंडे, निर्मला अमोलीक, मिरा वाघुंबरे, भारती शेळके, मोहीनीबाई कपाटे, मंगलबाई पाचरव, सिमाबाई पंजाबी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
*फोटो ओळी*
भोकर येथे शासन आपल्या दारी अंतर्गत अर्ज दाखल करताना महिला नागरीक समवेत उपस्थीत सेवकवृंद दिसत आहे.

[[[ समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर ]]]

*जग सुंदर आहे पण भारत सत्यम*,*शिवम,सुंदरम आहे = हरिश्चन्द्र करडे ?

श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
विदेश प्रवास म्हणजे जगाची जवळून ओळख करून घेणे होय.आम्ही युरोपचा प्रवास केला, अनेक देश पाहिले जगाची सुंदरता मनात भरली तरीही आपला भारतदेश हाच जीवन समाधान देणारा सत्यम, शिवम, सुंदरमचा प्रत्यय देतो,असे विचार अहमदनगर येथील हरिश्चन्द्र करडे यांनी व्यक्त केले. 
 येथील शेळके परिवार, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान यांच्यातर्फे नुकताच युरोप प्रवास करून आलेल्या हरिश्चन्द्र करडे व सौ. शकुंतला करडे यांचा सत्कार आणि प्रवास अनुभवकथन कार्यक्रमात श्री करडे बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य टी. ई. शेळके, जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,सुखदेव सुकळे, डॉ. अमित करडे, डॉ. सौ. मीनाक्षी करडे, श्रीमती सुशीला नाचण आदी उपस्थित होते. युरोपमधील विविध देश पाहणारे श्री व सौ. करडे यांचा शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
श्री करडे म्हणाले,
महाराष्ट्रातील मराठी बोलणारे, पंजाबमधील काही ओळखीच्या प्रवाशामुळे १३ दिवसाचा प्रवासदौरा मनाला समाधान देणारा वाटला. मायभूमीची ओढ कायम मनात असते,आपल्या भूमीचा प्रेमजिव्हाळा उत्कटच वाटतो. इंग्लड, बेल्जीयम, ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, स्वीझर्लन्ड, इटली, नेदरलँड, व्हॅटिकेनसीटी, ब्रुसेल आदी ठिकाणी भेट देताना जगाने खूप भौतिक प्रगती केल्याचे जाणवले. विज्ञान आणि मानवी बुद्धीचा आविष्कार दिसला तरीही भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्ये मनात उंचच आहेत. व्याही प्राचार्य शेळके,डॉ. उपाध्ये, सुखदेव सुकळे यांनी केलेले सत्कार म्हणजे पुन्हा आनंदप्रवास घडला असे गौरवोद्गार श्री करडे यांनी काढले.डॉ. अमित करडे, डॉ. सौ. मीनाक्षी करडे यांनीही आनंद व्यक्त केला. प्राचार्य शेळके, डॉ. उपाध्ये, सुकळेसर यांनी करडे परिवाराच्या विदेश प्रवासाचे अभिनंदन केले. सौ. शकुंतला करडे यांनी आभार मानले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

काम प्रलंबित ठेऊन रखड पट्टी करणारे ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट मध्ये टाकणार नामदार विखे ?

संगमनेर - प्रतिनिधि - वार्ता -
निळवंडे पाठ बंधारे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची कामे ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच काम वेळेत न राखड पट्टी करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे सुतोवाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची पाहणी केली. संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर, निळवंडे, कौठे कमळेश्वर, गोगलगाव, आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द, बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ, वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अडचणी समजून घेतल्या. महसूल जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
बहुतांशी गावात कालव्यांची कामे घेतलेल्या ठेकेदारांनी अर्धवट केली आहेत. अनेक ठिकाणी कामे अद्यापही सुरू नाहीत. या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने मुदतवाढ घेतली तरीही कामाची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आले. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून प्रलंबित काम वेळेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने निर्णय करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
अनेक ठेकेदारांनी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून घेतलेली कामे पूर्ण करत नसल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याबाबत मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करून अशा ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांना कामाकरिता मुदतवाढ का देता? असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
या प्रकल्पात ठेकेदार अडथळे निर्माण करणार असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबत निर्णय करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी विभागाने नियोजन करावे, कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होणार असल्याने कालव्यांची कामे वेगाने
पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.निमगावजाळी येथील कालव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात झालेला विलंब आणि दिसून आलेल्या निष्काळजीपणाची मंत्री विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

----------------------------------------------------
===================================
: - सह संपादक रंजित बतरा...शब्द...रचना...संकलन वार्ता...✍️ ✅️ 🇮🇳...
===================================
----------------------------------------------------

Sunday, May 28, 2023

गुंड प्रवृत्तीचा पोलिसांनी बंदोबस्त करावा : मनसे ची मागणी. शिर्डीत पॉलिसी करणाऱ्यांची दहशत ?

शिर्डी - प्रतिनिधि - वार्ता - शिर्डी शहरातील खंडोबा चौकात गुंड प्रवृत्तीचे पॉलीशी करणारे काही तरुण युवक मोठी दहशत करत आहे. येणारे साईभक्तांना व स्थानिक नागरिकांना मारहाण करत आहे. खंडोबा चौकात राजरोजपणे मारहाण करणे व दहशत करण्याचा प्रकार सुरू असून याविषयी शिर्डी पोलिस स्टेशनला अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. पोलिसांनी या गुंडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिर्डी शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, साईभक्तांना पॉलिशवाल्या गुंडांकडून वातावरण सातत्याने त्रास देण्याचे काम सुरू असल्यामुळे साई भक्तांमध्ये भीतीचे झाले आहे. निर्माण पोलिसांनी या पॉलिशवाल्यां गुंडाचा बंदोबस्त केला नाही. तर मनसे स्टाईलने यांचा बंदोबस्त करू व होणाऱ्या परिणामास शिर्डी पोलीस स्टेशन जबाबदार राहील. मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते म्हणाले की, १ मे रोजी कैलास भुजबळ यांना मारहाण झाली तर २० मे रोजी किरण गुलदगड याला मारहाण झाली. २५ मे रोजी साईभक्तांना मारहाण झाली असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. असे असताना पोलीस या घटनेकडे गांभीर्याने विचार करत नाही यावेळी कैलास भुजबळ, संपत हतांगळे, प्रशांत ठोंबरे, रावसाहेब देशमुख, दामोदर ऊमाप, राहुल देशमुख, ज्ञानेश्वर जगदाळे, भिमा गाजरे, सागर जगताप, कुणाल सांबारे, सचिन देशमुख, किरण गुलदगड आदी मनसे सैनिक व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

श्रीरामपूर तालुका केमिस्ट एन्ड ड्रगिस्ट असोसिएशन वसंत लुक (जर्मन) हॉस्पिटल, श्रीरामपूरयांच्या संयुक्त विद्यमाने ?

:- रविंद्र गुलाटी  E. C. केमिस्ट एसोसिएशन 

संत लूक हॉस्पिटल
 (जर्मन हॉस्पिटल) व श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 29/5 /2023 मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच संत लूक हॉस्पिटलमध्ये
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत वेगवेगळ्या मोफत उपचार तसेच हॉस्पिटल मध्ये डायलेसिस सुविधा उपलब्ध आहे तरी रुग्णांनी
जास्तीत जास्त लाभ घ्यावा 
*दिनांक 29/05 /2023
*ठिकाण संत लूक हॉस्पिटल श्रीरामपूर 
*वेळ सकाळी 9 ते दुपारी 1
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपला
 रवींद्र गुलाटी🙏
(E.C. केमिस्ट असोसिएशन )
अध्यक्ष कै.ओमप्रकाश गुलाटी फाउंडेशन अहमदनगर
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
🙏
* येथे आयोजन केले असून, सर्व गरजुंनी शिबीराचा लाभ घ्यावा.*

* हॉस्पिटलचे वैशिष्टे *
* लहान मुलांचा विभाग *
* जनरल मेडिसिन विभाग *
* जनरल सर्जरी विभाग *
* स्त्रियांसाठी विभाग *
* डेंटल विभाग *
 * फिजीयो थेरेपी विभाग *
 * डायलेसिस विभाग *
* आपले नम्र *
 श्री. शशांक रासकर सचिव, सेंट्रल झोन केमिस्ट असो.
श्री. जालिंदर भवार
अध्यक्ष श्री. रविंद्र गुलाटी अध्यक्ष, गुलाटी ट्रस्ट
श्री. आनंद कोठारी
खजिनदार
श्री. बाळासाहेब ढेरंगे
सदस्य, अहमदनगर केमिस्ट असो.
श्री. सुजीत राऊत सचिव
श्री. संदिप टुपके
श्री. उदय बधे
श्री. प्रशांत कोठारी
श्री. माधव आसने
श्री. कोविल खेमनर
श्री. कैलास चायल
श्री. प्रदिप डावखर
अश्फाक शेख
श्री. रविंद्र चौधरी
श्री. प्रशांत उचित श्री. ओमप्रकाश नारंग
श्री. दिपक उघडे
श्री. शशिकांत गौड
रियाज पोपटिया
संत लूक (जर्मन) हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत वेगवेगळे उपचार तरी रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.
🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ ✅️ 🇮🇳...

: - टीप. प्रभावशैली ( Web ) पाहण्या साठी Zoom,s चा वापर करा, / संपादक...



लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर ज्यो गायकवाड संविधान रत्न पुरस्काराने सन्मानित श्रीरामपूर ?

( श्रीरामपूर ) - प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्याचे भूमिपुत्र असलेले फादर ज्यो गायकवाड गेल्या अनेक वर्षांपासून धर्मगुरू म्हणून येशू संघात कार्य करीत आहेत. ते मराठीचे गाढे अभ्यासक असून निरोप्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ख्रिस्ती मासिकाचे ते अनेक वर्ष संपादक राहिलेले आहेत.
ते ख्रिस्ती अस्मिता साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व प्रगत पदवीधर संघटनेचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे उत्तम साहित्यिक म्हणूनही त्यांना सर्वत्र ओळखले जाते. सध्या ते येशू संघा अंतर्गत अहमदनगर सह बीड जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट सुपिरियर म्हणूनही काम पाहत आहेत.
फादर ज्यो यांनी धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांच्या सेवा कार्यात त्यांनी अनेक दीन-दुबळे, कष्टकरी व गरजूंची सर्वतोपरी सेवा केलेली आहे. "करशील जे गरीबांसाठी होईल ते माझ्यासाठी" या प्रभू येशूच्या शिकवणुकीप्रमाणे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मिशन कार्य केलेले आहे. संविधानास अभिप्रेत असलेले हे कार्य फादर ज्यो यांच्या हातून घडल्याने नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी या दिल्ली येथील संस्थेने याची दखल घेतली व २७ मे २०२३ रोजी दिल्ली येथे संपन्न झालेल्या मायनॉरिटी राष्ट्रीय अधिवेशनात दिल्लीचे आर्च बिशप अनिल कुटो, खासदार इम्तियाज जलील, खासदार कृष्णा व खासदार गौतम यांच्या हस्ते संविधान रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 पुरस्कार प्राप्त फादर ज्यो यांच्यावर धार्मिक, सामाजिक, राजकीय व साहित्य क्षेत्रातील सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*


नव्या संसद भवनाचे आज होत आहे लोकार्पण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन ?

( नवी दिल्ली ) - न्यूज - एजन्सी - वृत्तसंस्था वैविध्याने नटलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातून मागवलेल्या साहित्याने भारताची नवीन संसद नटली आहे. त्यात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. इमारतीत वापरण्यात आलेले अस्सल सागवान नागपूरहून मागवण्यात आले आहे तर अशोक चिन्हासाठी लागणारे साहित्य छत्रपती संभाजीनगरहून मागवले गेले आहे. संसद भवनातील सारे फर्निचर महाराष्ट्राच्या राजधानीत तयार करण्यात आले आहे.
नवीन संसद भवनाची उभारणी करताना 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उक्तीनुसार कामांची विभागणी केली गेली. समग्र देशाचा या संसद भवनात सहभाग असायला हवा या हेतूने ठरवून देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्य मागवले गेले. अगदी बांबूपासून ते दगडी कोरीव जाळ्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ज्या भागाचे वैशिष्ट्य आहे तेथून तयार 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नवी दिल्ली : संसद भवनाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या भव्य-दिव्य आणि देखण्या वास्तूचे छायाचित्र. (फोटो :पीटीआय)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
करून मागवण्यात आली.
नवीन संसद भवनात देशाची वैविध्यपूर्ण संस्कृतीची झलक बघायला मिळणार आहे. जणू काही
साऱ्या देशाने मिळून ही इमारत उभारली आहे. तीन वर्षांच्या या बांधकामात देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्य मागवण्यात आले आहे....

*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*
संसदेच्या नव्या वास्तूचे स्वप्न नरसिंह राव सरकारमध्ये असताना पाहिले होते. आराखडाही तयार केला होता. पण ते पुढे बराच काळ सत्तेत असूनही पूर्ण करू शकलो नाही. मोदींनी ते पूर्ण करून दाखविले, त्याचे स्वागतच व्हायला हवे. -गुलाम नबी आझाद, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष
*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*
> कोणत्या राज्यातून काय आले<

• नागपूर : बांधकामासाठी लागणारे सर्व सागवान

• औरंगाबाद 
 : अशोक चिन्हाचे साहित्य

• मुंबई : या इमारतीतील सारे फर्निचर तयार झाले

• त्रिपुरा : फरशीसाठीचे बांबू

मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : शानदार गालिचे

• सरमथुरा (राजस्थान) : लाल-पांढरे वाळूचे दगड

• उदयपूर : भगवा-हिरवा दगड

• लाखा (अजमेर) : लाल ग्रॅनाईट • अंबाजी : पांढरा संगमरवर

• दमण-दीव : फॉल्स सिलिंगसाठी स्टीलचे सांगाडे

• राजनगर (राजस्थान), नोएडा : दगडी जाळीचे काम

इंदूर (मध्य प्रदेश) : अशोक चक्र

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी १२ वाजता संसदेवी नवीन वास्तू देशाला समर्पित करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात यावेळी उपस्थित राहतील.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

२१ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. २५ राजकीय पक्ष या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
होणार आहे. सकाळी महात्मा गांधीच्या पुतळ्या जवळ काही धार्मिक विधी केले जातील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष दोन सत्रांत उद्घाटन सोहळा राज्यसभेचे सभापती सहभागी होतील,
या पक्षांचा बहिष्कार शिवसेना उद्धव ठाकरे) काँग्रेस :राष्ट्रवादी कॉग्रेस, डीएमके, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, भाकप, आमुमो, सीपीआय (एम), आरजेडी, एआयएमआयएम, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फ्रेन्स : आदी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करताना मदुराई मठातील साधू.
{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}
Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२८ मे) देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात पंतप्रधान मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनख उपस्थित नव्हते, त्यामुळे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी नवीन संसदेत
 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचा संदेश वाचून दाखवला. द्रौपदी मुर्मू यांचा संदेश वाचताना हरिवंश सिंह म्हणाले, नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा हा प्रसंग भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा भारताच्या उत्तरेकडील बिंदूपासून दक्षिणेकडील बिंदूपर्यंत आणि पूर्व सीमेपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत विविधतेत राहणाऱ्या सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा आणि अतुलनीय आनंदाचा प्रसंग आहे. भारतीय संसदेला आपल्या मनात विशेष स्थान आहे. संसद ही आपल्या समृद्ध लोकशाही परंपरांचा प्रकाश स्तंभ आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचे भाषण वाचून दाखवताना हरिवंश सिंह म्हणाले, २.५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन आधुनिक संसदेची उभारणी झाली, ही आनंदाची बाब आहे. हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार. भारतीय लोकशाहीच्या अभूतपूर्व विकास प्रवासाच्या या महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाबद्दल आणि अभिमानास्पद क्षणाबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन करताना मला खूप आनंद होत आहे. ही नवीन संसद भविष्यातही आपल्या विकासाची साक्षीदार असेल.
----------------------------------------------------
===================================
: - राजु मिर्जा... 🖊️✅️🇮🇳...(+919730595775)...
===================================
----------------------------------------------------


























Thursday, May 25, 2023

सोशल मिडियानेटवर्किंग कर्तबगारी अजब यारी चोरी झालेला ट्रॅक्टर गजब आला दारी ?



( दहिवड  ) - प्रतिनिधी - वार्ता -

सोशल मिडिया नेट वर्किंग हे आजच्या युगात संवादाचे सर्वात मोठे माध्यम असून माणसाच्या दैनंदिन जीवनाचा तो एक अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. सोशल मिडीयाचा वॉट्सअप टुईटर फेसबुक इंसटोग्राम वेबणार ट्यूब पोर्टलर असे अनेक निरनिराळ्या प्रकारचा प्रभावी वापर केला तर तो अनेकदा फायद्याचा ठरतो. याचा प्रभावी वापर करून एका शेतकऱ्याने आपला चोरीला गेलेला ट्रॅक्टर पुन्हा मिळवण्यात यश मिळवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील उमराणे येथील दर्शन कांदा आडतसमोर एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह (एमएच 41डी 2984) दि. २२ में रोजी उमराणे येथून
चोरट्यांनी पळवला होता.
ट्रॅक्टर मालक सुभाष आहिरे (सुराणे ता. सटाणा) यांनी व परिसरातील नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता चिंचवे येथील जिओ पेट्रोल पंपावर चोरट्यानी ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरले हे पेट्रोलपंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.
हे फुटेज सोशल मिडियावर झळकताच चोरट्याना याबाबत भनक लागली. ट्रॅक्टर नाशिकच्या पुढे विल्होळी शिवारात रात्रीच्या सुमारास सोडून चोरटे फरार झाले. परिसरातील काही तरुणांनी ट्रॅक्टर मालकास कळविले असता ट्रॅक्टर मालकाने देवळा पोलीसाच्या मार्गदर्शनातून त्या परिसरातून ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतली.
देवळा येथे पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर जमा केले असून पोलीस इनस्पेक्टर समीर बारवकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित समाधान चिंधा ठाकरे (झाडी) व निलेश नानाजी देवरे (महालपाटणे) यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत.


-----------------------------------------------------
====================================
सह : संपादक,रंजित  बतरा ✍️✅️🇮🇳...शब्द...रचना...संकलन...वार्ता...
====================================------------------------------------------------------