💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
आजचे युग हॆ संगणकीय,भ्रमणभाषियआणि तंत्रप्रधान झाले आहे,अशा तंत्रात अडकून आजची मुले मूळ पुस्तकापासून दुरावत आहेत, त्यामुळे अनेक शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रश्न निर्माण झाले आहेत,त्यासाठी घरोघरी 'ग्रन्थघर 'ही संकल्पना रुजावी अशी अपेक्षा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा. डॉ. सदाशिव कदम यांनी व्यक्त केली.
श्रीरामपूरजवळील शिरसगाव खेड्यातील इंदिरानगर भागातील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी २००६ पासून सुरु केलेल्या वाचन चळवळीला संशोधकीय, प्रबोधनात्म्क आणि उगवत्या पिढीला वाचन, लेखन,चिंतनाची जोड मिळावी म्हणून सुंदर, शिस्तीशीर आणि खुले वाचनालय सुरु केले,अशा उपक्रमाचे कौतुक करताना डॉ. सदाशिव कदम बोलत होते.यावेळी स्वाध्याय परिवाराचे सदस्य, परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांचे अभ्यासक, साहित्यिक माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव, साहित्यिक सुखदेव सुकळे,महिला बचत गटाच्या सौ. मंदाकिनी उपाध्ये,मराठी ग्रामीण गेय कवितेच्या अभ्यासक, कवयित्री संगीता फासाटे, निर्मिक उपाध्ये, कु. आराध्या सैंदोरे व उपाध्ये परिवार उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.डॉ. सदाशिव कदम यांची नुकतीच रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अनेक पुस्तके, शाल, बुके देऊन उपस्थितांनी सत्कार केले.डॉ. सदाशिव कदम म्हणाले, श्रीरामपूरच्या बोरावके कॉलेजमध्ये हिंदी विभाग प्रमुख असताना कॉलेजकट्टा आणि अभ्यासिका माध्यमातून विद्यार्थी चोखंदळ वाचक होण्यासाठी उपक्रम घेतले. २००१ मध्ये ॲड, रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य टी. ई. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवशीय ग्रामीण कविसंमेलन घेतले,त्याला जिल्ह्यातून खूप प्रतिसाद मिळाला,संस्थेत असे साहित्यिक, वाचन संस्कृती जोपासणारे उपक्रम झाले तर मुले मोबाईल सोडून पुस्तक हाती घेतील. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी खेड्यात संशोधन आणि संस्कृती विकासाला पूरक ठरणारे सुंदर वाचनालय सुरु केले,हॆ भूषणावह आहे, असे डॉ. कदम यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. गागरे, सुखदेव सुकळे यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता फासाटे यांनी सूत्रचालन केले. सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))
No comments:
Post a Comment