राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, June 16, 2023

पत्रकारास मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी पत्रकार संघाची मागणी श्रीरामपूर

श्रीरामपूर - प्रतिनीधि - वार्ता -
पत्रकार संघात हळहळ व खळबळ पत्रकार म्हणून गल्लीत वावरतो याचा रोष मनात बाळगून तसेच रस्त्याच्या मधोमध उभे केलेले चार चाकी वाहन बाजूला लावण्याचे सांगितल्याने स्मशान भूमी जवळ राहणाऱ्या तिघांनी पत्रकारास लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केली,या घटनेचा महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला असून आरोपींवर आर्म ॲक्ट व पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर येथील डावखर रोड परिसरात वास्तव्यास असलेले पत्रकार सलीम बाबुभाई पठाण हे अग्नि भ्रष्टाचार टाइम्स या वर्तमानपत्राचे संपादक आहेत तथा विविध वर्तमानपत्रात मुक्त पत्रकार म्हणून ते बातम्या देण्याचे काम करीत असून ते आपल्या भागात पत्रकार म्हणून वावरत  असल्याने याचा रोष मनात बाळगून तसेच रस्त्याच्या मधोमध लावलेले चारचाकी वाहन बाजूल करावे असे म्हटल्याच्या कारणावरून काही जणांनी डावखर रोडवर वास्तव्यास असणारे पत्रकार सलिम बाबुभाई पठाण यांना मारहाण केली. या घटनेचा महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आलेला आहे. संबंधीत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत  कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना पत्रकार संघाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, सलिम पठाण हे डावखर रोड परिसर कॅनालच्या कडेला वस्तव्यास आहे. त्यांच्या घराकडे जाण्यासाठी व इतर नागरिकांसाठी कॅनॉलच्या कडेने रस्ता आहे. दि. ७ जूनच्या सायंकाळी पत्रकार श्री.पठाण आपल्या मुलासवेत कॉम्प्युटर टेबल घेऊन रिक्षाने आपल्या घरी जात होते. यावेळी सलिम अब्दुल शेख,बानो अब्दुल शेख, सुलताना मुस्ताक शेख यांच्या मालकीची गाडी ही रस्त्याच्या मध्येच लावण्यात आलेली होती. त्यामुळे पठाण यांनी भाडोत्री आणलेले (रिक्षा) वाहन पुढे जाणे शक्य नव्हते.
यावर सलिम पठाण यांनी सदरचे वाहन रस्त्याच्या बाजूस घेण्याची या तिघांनाही विनंती केली. परंतु या तिघांनीही वाहन तर बाजूला घेतलेच नाही, परंतु पठाण यांना शिवीगाळ करू लागले. तसेच" तू फार मोठा पत्रकार आहेस का ? आम्ही आत्ताच तुझी पत्रकारिता कायमची संपवितो" असे सांगून सलीम पठाण यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले असता पठाण यांनी शिवीगाळ करू नका, असे म्हटल्याचा राग आल्याने या तिघांनीही त्यांना लोखंडी रॉड तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून सलीम पठाण यांचे वर चाकूने देखील वार केला असता, पठाण यांनी हा वार हूकविला या मारहाणीत सलिम पठाण जखमी झाले असून त्यांच्यावर साखर कामगार रूग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारा दरम्यान शहर पोलिस ठाण्याच्या अंमलदारांनी जबाबही नोंदवून घेतला. परंतु यास दहा दिवस उलटूनही अद्यापही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे पोलिसांनी संबंधितावर  मारहाणीचा व आर्म ॲक्ट तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी पत्रकार संघाकडून मागणी करण्यात आली आहे.
संबंधित निवेदनाच्या प्रती पोलिस महानिरीक्षक (नाशिक), पोलिस अधिक्षक, अहमदनगर, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीरामपूर, पोलिस उपअधिक्षक श्रीरामपूर यांना पाठविण्यात आलेल्या आहेत. निवेदनावर संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*

No comments:

Post a Comment