मुंबई - प्रतिनिधि - विषेश वार्ता -
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज त्याच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कारण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत शिवसेना भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली आहे. एरवी सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले, जे घडले आहे ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी आणि अजित पवार आम्ही तिघे मिळुन महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ. यातून महाराष्ट्रात आम्ही एक नवीन विकासाचा अध्याय लिहु. अतिशय प्रगल्भ, पुरोगामी सरकार विकास देणार सरकार आम्ही देऊ, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
====================================
-----------------------------------------------------
: - राजु मिर्जा शब्द...🖊️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...+919730595775
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment