राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, August 30, 2024

छ.शिवाजी कॉलेजमध्ये पाली भाषा कार्यशाळेचे उदघाटन कार्यक्रम संपन्न


- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ भाषा मंडळ तसेच छ. शिवाजी कॉलेजमधील मराठी विभाग व मुंबई येथील पाली भाषा रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने 'पालीभाषा मूलभूत ज्ञान परिचय' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे यांच्या उद्घाटनपर भाषणाने झाले.
 यावेळी मुंबई येथील पाली भाषा रिसर्च इन्स्टिट्यूटचे पाली भाषेचे अभ्यासक अरविंद भंडारे आणि विलास ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी भूषविले. 
 कार्यक्रमाचा प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.
 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. अनिल वावरे म्हणाले की," भगवान बुद्धाने सत्ता, संपत्तीचा त्याग करून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य खर्च केले. त्यांचे अनमोल असे ज्ञान पाली भाषेमध्ये उपलब्ध आहे. आजच्या स्पर्धेच्या जगात काही प्राचीन भाषा लुप्त होऊ पाहत आहेत. पालीसारख्या भाषेचे महत्त्व ओळखून ह्या भाषा संवर्धित करून त्यातील ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे." असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. 
       कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, " छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. ह्या महाविद्यालयाने घडवलेले काही विद्यार्थी आज महाराष्ट्रात, देशात आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहे. पाली भाषेच्या अभ्यासातून भगवान बुद्धाचे मानवी कल्याणाचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल म्हणून विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ह्या भाषेचा सखोल अभ्यास करावा."असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
       सदर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात आबासाहेब उमाप यांनी आभार व्यक्त केले तर प्रा.डॉ.विद्या नावाडकर यांनी सूत्रसंचालन केले.
    कार्यक्रमासाठी प्र. प्राचार्य डॉ.बी. एस.चव्हाण, उपप्राचार्या प्रा.डॉ.रोशनआरा शेख, उपप्राचार्य प्रा.डॉ. रामराजे माने-देशमुख,प्रा. डॉ .शिवाजी पाटील,प्रा.डॉ. राज चव्हाण प्रा. डॉ.केशव पवार, प्रा. डॉ. प्रदीप शिंदे विविध अधीविभागातील प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पाली भाषेचे संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, विद्यार्थिनी , साहित्यिक, बुद्ध तत्वज्ञान अभ्यासक,आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विद्यानिकेतन इंग्लिश मे. स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,स्टेट बोर्डमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात इ.पहिली ते पाचवीतील विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांनी श्रीकृष्ण प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जन्माष्टमीचे महत्व विशद केले. 
      दरम्यान इ. दुसरी व तिसरीतील विद्यार्थ्यांनी गवळण सादर केली. तर इ. दुसरीतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जन्मपर नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच संगीत शिक्षक दिपक वाघ यांनी कृष्णलिलेवर आधारित गीत गायन सादर केले. यावेळी इ.नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी थरावर थर चढवत 'गोविंदा आला रे आला' या गीतावर फेर धरत दहीहंडी फोडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षिका ज्योती खंडागळे, सुप्रिया बाबरस, शुभांगी चौधरी, कोमल पारखे, राजश्री तासकर, इम्रान सय्यद, अजय आव्हाड, मयूर जाधव यांनी कठोर परिश्रम घेतले.
      यावेळी विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, व्हा.चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन कु.ध्रुवी जोलापरा व कु.स्वरा परदेशी यांनी केले, तर आभार ज्योती खंडागळे यांनी मानले. 


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
 शंकर बाहूले (सर) ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

गजानन कुंडलवाल यांची पंजाब नॅशनल बँकेत वरिष्ठ अधिकारी पदी नियुक्ती


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील रहिवासी व राज्य परिवहन महामंडळ श्रीरामपूर आगाराचे सेवानिवृत्त वाहतुक नियंत्रक श्री.अरविंद कुंडलवाल व जि.प.सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती मीना कुंडलवाल यांचे चिरंजीव श्री.गजानन कुंडलवाल यांनी मोठ्या जिद्द,चिकाटी आणी मेहनतीच्या बळावर बी,ई, मेकॅनिक,एम बी ए पदवी धारण करुन,बँकेची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्यांची पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेच्या सर्कल कार्यालयात वरिष्ठ सर्कल अधिकारी या पदावर नियुक्ती झाली असल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

             स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्यानंतर त्यांनी हरीयाणा राज्यातील पंचकुला या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकत आपले बैंकींग ट्रेनिंग पुर्ण केले. या ट्रेनिंग मध्ये देखील त्यांनी चांगल्या प्रकारचे यश संपादन केल्याने त्यांची पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेंच्या सर्कल ऑफिसमध्ये वरिष्ठ मार्केटिंग ऑफिसर म्हणून नुकतीच निवड झाली आहे.
अतिशय संघर्षमय जीवनातून कुंडलवाल या दांपत्याने आपल्या चार मुली व एक मुलास उच्चशिक्षित व उच्च विद्याविभुषित केले.शिक्षण हे खरोखरच वाघिणीचे दुध आहे हे यानिमित्ताने त्यांच्या पाचही लेकरांनी दाखवून दिले असल्याचे यावेळी त्यांच्या सत्काराप्रसंगी मेजर कृष्णा सरदार व उत्तमराव दाभाडे यांनी त्यांचे मोठे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष उत्तमराव दाभाडे, आजी माजी सैनिक संघर्ष समिती चे मेजर कृष्णा सरदार, यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करून पुढील भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या,
यासमयी पुढे शुभेच्छा संदेशपर बोलताना मेजर कृष्णा सरदार म्हणाले की, शिक्षण ही अशी धनसंपत्ती आहे की तिला कोणीही चोरून घेऊ शकत नाही, म्हणून आपण उच्च शिक्षण घेतले पाहिजे, सामाजिक दुखण्यावर उच्च शिक्षण हेच एकमेव औषध आहे, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश दूर नाही असेही ते म्हणाले.
याप्रसंगी मेजर संग्रामजीत यादव,दादासाहेब शेजुळ, श्रीराम ट्रेडर्सचे सर्वेसर्वा रामचंद्र सुगुर, दत्तात्रय शिरसाठ, अशोकराव मंडोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 सत्काराच्या उत्तराखातर गजानन कुंडलवाल आपल्या मनोगतात म्हणाले की,मला अनेक कंपनीमध्ये कॉल आले, परंतु माझे स्वप्न वरिष्ठ अधिकारी बनवण्याचेच होते आणि हे सर्व काही माझे माता - पिता, गुरुजन सोबत माझी मेहनत आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळेच शक्य होऊ शकले असल्याचे ते म्हणाले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Thursday, August 29, 2024

"सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...💐💐💐


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शौकत भाई शेख यांचा आज ५६ वा वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांच्या कार्यांविषय हा थोडासा आलेख....!
आज शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते "शौकतभाई शेख" यांचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्म बुधवार दि.३० ऑगस्ट १९६७ रोजी झालेला असून आज ते आपल्या वयाची ५६ वर्ष पुर्ण करुन ५७ व्या वर्षात पदार्पण करत आहे,
त्यांनी १९८४ साली आपल्या वयाच्या १६ व्या वर्षीच पत्रकारीतेत पाऊल टाकले,
१९८५ / ८६ साली एका साप्ताहिकाचे सहसंपादक पद भुषविले,१९८९ साली राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद यांच्या साप्ताहिक भडकत्या ज्वाला चे अस्तगांव परिसर प्रतिनिधीत्व केले, १९९२ साली प्रथमच ते दक्ष पोलिस समाचार या साप्ताहिकाचे संपादक झाले, पुढे दैनिक विजयसत्ता,साप्ताहिक प्रशासक, साप्ताहिक पद्मश्री,असे विविध वर्तमानपत्राचे त्यांनी संपादन केले आहे,आणी सन २०१० साली प्रथमच शिर्डी शहरातून त्यांनी दैनिक साईसंध्या नामक सायं दैनिकाची सुरुवात केली.
सध्या दै.साईलिला टाईम्स, दैनिक विदर्भ सत्यजित, दैनिक जलभूमी, दैनिक नगरशाही, साप्ताहिक भवानीमाता, साप्ताहिक समतादूत, मोहसिन ऐ मिल्लत, वृक्ष संवर्धन, वृत्त नगरी, साप्ताहिक शिर्डी एक्सप्रेस, खरे सव्वाशेर,साई गंगा,आदी अनेक वर्तमानपत्रात मार्गदर्शक संपादक म्हणून त्यांना मानाचं स्थान दिले जात आहे ही त्यांच्या ४० वर्षाच्या पत्रकारीतेतील कार्याची पावतीच होय,
असे आजवर त्यांनी विविध प्रसार माध्यमातून सामाजाभिमुख पत्रकारिता केली आहे,तसेच त्यांच्या समता फाऊंडेशन आणि इतरही विविध सामाजिक सेवाभावी संस्था, संघटनेच्या माध्यमातून ते अनेक समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबवत असतात, स्वाभिमानी संपादक सेवा संघ या त्यांच्या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून अनेक नवोदित पत्रकार,संपादकांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व लाभत आहेत,
त्यांचा नेहमीचा शांत आणी हस्तमुख स्वभाव,यासोबतच सातत्याने बोलण्यातून आपलेपण जाणवत असल्याने जो कोणी त्यांच्या संपर्कात आला तो कायमचा त्यांचाच झाला, असे त्यांचे निर्पेक्ष आणी परोपकारी व्यक्तीमत्व असल्याने राज्यभरात त्यांनी शैक्षणिक , साहित्यिक,सांस्कृतिक, पत्रकारीता क्षेत्रासह शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय क्षेत्रात देखील मोठा मित्र परीवार जोडला आहे. अशा या दिलदार मित्राच्या वाढदिवसा निमित्ताने आमच्या त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷



*-डॉ.सलिम शेख*💐💐💐
बैतूश्शिफा हॉस्पिटल
आणि मित्र परीवार,श्रीरामपूर
{<^>}<^>{<^>}<^>{<^>}<^>}<^>{<^>}<^>{<^>}
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

कै.ओमप्रकाश गुलाटी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य वाटप


- जामखेड - प्रतिनिधी -/ वार्ता -
आपल्या सामाजिक कार्यात श्रीरामपूर शहर व तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. ओमप्रकाशजी गुलाटी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जामखेड येथील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी जामखेड तालुका केमिस्ट ऍंड ड्रगिस्ट एसोसिएशन व कै. ओमप्रकाश गुलाटी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना १० खुर्च्या, वह्या,पेन,पेंसिल, बिस्किट, चॉकलेट तथा अन्य शालेयपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले‌. याप्रसंगी जामखेड तालुका केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट एसोसिएशन व ओमप्रकाश गुलाटी ट्रस्ट चे सन्मानिय सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


सा.बां. (उत्तर) विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषी भ्रष्ट अभियंत्यांचे त्वरित निलंबन करावे


उपोषणकर्त्यांची मागणी 
उपोषणाचा १० वा दिवस 

- नाशिक - प्रतिनिधी -/ वार्ता -
सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग नाशिक येथे कार्यरत कार्यकारी अभियंता राहुल के.पाटील तसेच त्यांच्या अखत्यारीत येणारे उपविभागीय अभियंता १) एस.ए पवार, २) यू.पी कुमावत, ३) व्ही.पी. बाविस्कर, ४) यु.एल देसले, ५) एच.ए.पाटील, ६) जे.एम वाघ तसेच शाखा अभियंता १) व्ही. व्ही.घुगे, २)डी.एस. साळी, ३) एम. एच. जाधव, ४) आर आर सावंत व इतर यांच्या नियंत्रणाखाली आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कोट्यावधी रुपयाची कामे करण्यात आलेली आहे, या कार्यक्रमांतर्गत रस्त्याची देखभाल दुरुस्तीची कामे, शासकीय इमारतींची देखभाल दुरुस्ती,आदिवासी पाड्यांपर्यंत पोहोच रस्ते तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक या कार्यालयाकडे प्राप्त झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ नाशिक या कार्यालयाच्या अधिपत्याखाली सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभाग नाशिक कार्यरत असून या विभागीय कार्यालयांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांचे कागदपत्रे पूर्ण दाखवलेल्या विकास कामांत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणी गैरकारभार झालेला आहे, या विभागामार्फत केलेल्या प्रत्येक विकासकामांत संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने झालेल्या गैरकारभाराची सखोल चौकशी केल्यास प्रचंड प्रमाणात झालेला भ्रष्टाचार प्रथमदर्शनीच बाहेर येईल, करीता सदरील प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबधित अभियंत्यांचे त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी दिनांक २०/०८/२०२४ पासून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे, या उपोषणाचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते अनंत पटेकर हे असून या उपोषणात सूर्यकांत भालेराव नाशिक,गणेश पवार राहुरी, संदीप पवार अहमदनगर, मुकेश शिरसाठ कल्याण, अभिषेक सोनवणे घाटकोपर श्रीमती लीना अहिर मुंबई सचिन जाधव,प्रमोद वाघमारे भरत जाधव रवींद्र पाटील तसेच असंख्य अन्य महिला कार्यकर्त्या इत्यादी सहभागी झालेले आहेत,जोपर्यंत सदरील प्रकरणी चौकशी होऊन भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे अनंत पटेकर यांनी सांगितले आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

डॉ खंडू रघुनाथ माळवे यांना जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने सन्मानित


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे ज्येष्ठ साहित्यिक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त खंडू माळवे उर्फ डॉ.खं.र.माळवे - खरमा यांना या अगोदर सलग चौथ्यांदा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. याही वर्षी जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दैनिक प्रहार संपादक सुकृत खांडेकर यांचेहस्ते नुकताच देण्यात आला. ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा पश्चिम येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भूषविले कार्यक्रम उदघाटन प्रसिध्द साहित्यिक पत्रकार डॉ. खं.र. माळवे- यांचेहस्ते करण्यात आले, स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे यांनी आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी पद्मश्री डॉ. डी. जी. यादव, डॉ. रेसिक एंजल्स, दै. प्रहार चे संपादक डॉ. सुकृत खांडेकर, भानुदास केसरे, प्रमोद महाडिक, रामकृष्ण कोळवणकर, राजेश कांबळे, डॉ. गॅन्सी अल्बुकर्क यांची भाषणे झाली. यावेळी निवोदित कविंच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात साहित्यिक, संपादकीय वैद्यकीय कला नाट्य नवोदित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना, पुरस्कार देवून गौरवण्यात आले, 
या कार्यक्रमांकाचे आयोजन नॅशनल लायब्ररी पी बी ई सोसायटी नाईट कॉलेज वर्ल्ड व्हिजन संस्था यांनी केले होते. तर, प्रा. नागेश हुलवळे सर लेखक रमेश पाटील, प्रमोद सुर्यवंशी, योगेश हरणे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले, शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे ✍️✅🇮🇳...शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


देशभक्तीपर समूह गायन स्पर्धेत सेंट झेवियर्स प्रथम


- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
शहरातील इंडियन रेड क्रॉस सोसायटी आयोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. स्पर्धेत शहरासह ग्रामीण भागातील अनेक संघांनी आपला सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेत शास्त्रीय संगीतावर आधारलेले सुमधुर देशभक्तीपर गीत गायन सादर करून सेंट झेवियर्स शाळेने प्रथम क्रमांक (विभागून) मिळविला. प्रशासकीय इमारत सभागृहात आयोजित बक्षिस वितरण कार्यक्रमात प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, डॉ. सुहास बर्दपुरकर, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते इकबाल मदनानी, नगरपालिका शिक्षण विस्तार अधिकारी संजीवन दिवे, उद्योजक संदीप शहा, सचिव सुनील साळवे, भरत कुंकलोळ व मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत स्नेहा दळवी, आलिशा कसबे, सारा दळवी, भूमिका कोळगे, आदिती भोसले, महिमा भालेराव व सई तोडमल या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विजयी संघाचे शाळेचे प्राचार्य फा.विक्रम शिनगारे व शाळेचे व्यवस्थापक फा. प्रकाश भालेराव यांनी विशेष अभिनंदन केले. या संघास संगीत शिक्षक प्रतीक फुलपगार व शालेय गायन मंडळ समन्वयक रवी त्रिभुवन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
रवि त्रिभुवन (सर) ✍️✅🇮🇳...श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्री शारदा इंग्लिश रेडियम स्कूलमध्ये चौथे राज्यस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


- कोपरगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
सोमैया विद्या विहार संचलित येथील श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे म्हणून हिंदी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिनांक १३ व १४ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भव्य हिंदी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले जाते.
या ही वर्षी या स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी या स्पर्धेमध्ये विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. प्रथम पारितोषिक रोख रक्कम ५०००/स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,
द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ३००० /स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र,
  तृतीय पारितोषिक रोख रक्कम २००० /स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र,तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुढील ७ संघास
 प्रत्येकी १०००/रुपयाचे पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल.
तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल 
ही स्पर्धा फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता ८ ते १० चे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेचे विषय व अधिक माहितीसाठी श्री तुरकणे,श्री नन्नवरे,सौ होन,सौ जोरी तसेच शाळेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार दिपक कदम - ✍️✅🇮🇳...श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

स्वामी विवेकानंद विद्यालय विद्यार्थ्यांचा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा


- वजीर शेख - पाथर्डी -/ वार्ता -
निंबोडी स्वामी विवेकानंद विद्यालय येथे गोकुळाष्टमीचे निमित्ताने विद्यालयात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहात दहीहंडी फोडली.
         शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या ठिकाणी संस्थाचालक संस्थेच्या सचिव माननीय श्रीमती बडे मनीषा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या सचिव मनीषा बडे/ पालवे मॅडम ने विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना भगवान श्रीकृष्ण सारखे जगावे. अशा पद्धतीने मार्गदर्शन केले .तसेच भगवान श्रीकृष्णाचे चरित्र समोर ठेवून त्यांच्या जीवनातील विविध दाखले देऊन विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे दिले. प्राथमिकचे मुख्याध्यापिका सुवर्ण बारावेकर मॅडम व पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका छाया सरोदे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
       माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम यांच्या नियोजनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला सातवी , आठवी, नववी ,दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी दोन थराचा मनोरा तयार केला होता . तसेच दहीहंडी फोडण्यासाठी श्रीकृष्ण ची वेशभूषा इयत्ता चौथी मधील हर्ष महाडिक या विद्यार्थ्याने केली होती . श्रीकृष्ण बनून हर्षने दहीहंडी फोडली .तर राधेची वेशभूषा इयत्ता तिसरी मधील दिव्या बोरुडे या विद्यार्थिनीने केली होती .सोबतच विद्यालयातील सर्वच मुली वेशभूषा करून आल्या होत्या .तसेच मुलांनीही पारंपारिक वेशभूषा केली होती.
        विद्यालयातील पूर्व प्राथमिकचे चिमुकले बालगोपाल राधाकृष्ण बनले होते. कार्यक्रमाच्या दरम्यान दहीहंडीचे वेगवेगळे गाणे वाजवण्यात आले यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी गाण्यांचा आनंद लुटला .
         सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडीतील काल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. काल्याच्या प्रसादामध्ये जसे वेगवेगळे पदार्थ एकत्र करून त्या प्रसादाची चव वाढवतात. त्याचप्रमाणे विद्यालयात देखील वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी येतात व विद्यालयात आल्यानंतर सगळे एकमेकांमध्ये मिसळून जातात. या मुलांमध्ये भेदभाव राहत नाही .
          या अशा कार्यक्रमांमधूनच विद्यार्थ्यांवरती संस्कार केले जातात .विद्यालयामध्ये वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात .त्यामधून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी करत असतात .सर्वांच्या सहयोगाने कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पाडले जातात.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्री संत सेना महाराज आणि संत परंपरा


 प्रांतात श्री संत सेनाजी महाराजांचा जन्मदिवसच 'जयंती उत्सव' म्हणून साजरा करण्यात येतो. तर, महाराष्ट्रात मात्र संत परंपरेनुसार संतश्रेष्ठ संत सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावी महिला भगिनींसह नाभिक समाज बांधव विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी करतात.
श्री. संत सेना महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन समाज जागृतीसाठी समर्पित केले होते. त्या काळी समाज जादूटोणा, मंत्रतंत्र आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला होता. बाबा बुवांच्या भोंदूगिरीमुळे समाजाचे शोषण आणि फसवणूक होत होती. मुळातच अशिक्षित आणि अडाणी असलेला बहुजन समाज, या प्रकारांना बळी पडत होता. त्यातच समाजामध्ये जातीय भेधभाव,अस्पृश्यता, उच्च - नीचता अशा वर्णव्यवस्थेच्या उतरंडीतून समाजात जातीय दरी निर्माण झाली होती. माणूस माणसाला जवळ करत नव्हता ! त्यामुळे माणुसकीचा अर्थच हरवला होता. अनेक जाचक रूढी - परंपरा, रितीरिवाजांनी जणू माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारला होता. त्यामुळे समाजात नैराश्य, उद्दीग्नता, उदासीनता आली होती. सामाजिक अन्याय - अत्याचाराने समाजमन दुःखी आणि कष्टी झाले होते. अशा या परिस्थितीत समाजमनाला खऱ्या अर्थाने मानसिक आधाराची नित्तांत गरज होती. मानवता, समता, आणि सामाजिक एकता समाजमनात रुजविण्याची गरज ओळखून श्री संत सेना महाराज आणि तत्कालीन संतांनी धार्मिकतेचा आधार घेऊन कथा, कीर्तन, भजन, भारूड, दोहे अशा विविध माध्यमातून समाज मनाला आधार देत, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक विशद करून अंधश्रद्धामुक्त करण्यासाठी समाजाला जागृत करण्याचे महान कार्य केले.
अंधश्रद्धा, जातीयवाद, उच्च - नीचता, आणि भेदाभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड होय. ही कीड नाहीशी करून, समाजात समता आणि समानता रुजविण्यासाठी संतांनी आपल्या संत साहित्यातून आणि प्रबोधनातुन जगाला मानवतेचा संदेश देण्याचे महान कार्य केल. ईश्वर जर जगाचा आणि सृष्टीचा निर्माता आहे, तर आपण सर्व त्याचीच लेकरं आहोत. त्यामुळे परमेश्वराला सगळे समानच आहेत. म्हणूनच देवाकडे जातीय भेदाभेद, उच्च-नीचता, गरीब-श्रीमंत असा भेद असणारच कसा ? धर्मांधांनी, धर्माच्या ठेकेदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि अस्तित्वासाठी, अनिष्ट रूढी - परंपरांसह जाती-जातींमध्ये भेदभाव, द्वोष पसरवून समाज मन दूषित करून परमेश्वरापासून मानवाला दूर करीत मंदिर प्रवेशासह ईश्वरभक्तीचा मार्गही बंद केला होता.
महाराष्ट्रात संतांचे विचार, कार्य आणि समाजप्रबोधनातून जनमानसाच्या मनाचा ठाव घेत तळागाळात पोहोचले. अनिष्ट आणि अन्यायकारक समाजविरोधी घटनांचा व घटकांचा संतसाहित्यातून परखडपणे विरोध करून वास्तव विचार जगासमोर मांडल्याने, सामाजिक दरी कमी होऊ लागली होती.
पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त म्हणजेच 'वारकरी' हे दिंडीतून अनेकविध जाती, पंथांच्या लोकासमवेत, हजारोच्या संख्येने पांडुरंग भक्तीत तल्लीन होतात, जातीय भेदाभेदीच्या भिंती तोडून स्पृश्य अस्पृश्यतेला मूठमाती देऊन, पांडुरंगाच्या दर्शनासाठी समूहाने एकत्रितपणे आजतागायत सहभागी होत आहेत. भक्ती रसात न्हालेल्या. या ‘दिंडी सोहळ्यात' जातपात, उच्चनीचता विसरून 'माणसातच ईश्वर आहे' या भावनेने गळाभेटी घेतात, एकमेकांच्या चरणी लागतात. हेच खरं संतांच्या कार्याचे प्रत्यक्ष उदाहरण होय. असे निश्चितपणे म्हणता येईल. संत साहित्याने लोकांच्या मनात नवा विचार आणि प्रकाश निर्माण केला होता. 'वैदिक धर्मापेक्षा मानवतेचा धर्म हा अधिक महत्त्वाचा आहे,' असा संदेश समाज मनापर्यंत पोहोचविण्यात संत यशस्वी झाले.
श्री. संत सेना महाराज हे संत परंपरेतील वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ असे महान संत होते. देशाततील अनेक प्रांतात वर्षानुवर्ष भ्रमण केल्याने तेथील समाज व्यवस्था आणि सामाजिकस्थिती याचा अभ्यास श्री संत सेनाजी यांचा झाला होता. अनुभवसिद्ध अभ्यासातून संत कालीन समाज व्यवस्थेतील अन्यायग्रस्त समाजाला आधार आणि दिशा मिळावी, त्याचे जीवन सुखी समाधानी आणि आनंदी व्हावे, यास्तव जनजागृती करून त्या दृष्टीने त्यांनी अविरतपणे समाज प्रबोधनाचे कार्य केले.

श्री. संत सेना महाराज यांचे गुरु रामानंदाचार्य यांनी विविध प्रांतातील जाती-समूहांचे शिष्यांना बरोबर घेऊन समाज जागृतीचा ध्वज उभारला होता. खरे तर हे बंडच होते. वैदिक परंपरेने धर्म आणि धर्माचं कार्य याची मक्तेदारी काही ठराविक लोकांकडे दिली होती. त्यांच्याशिवाय इतरांना धार्मिक नेतृत्व करता येणार नाही, असा दंडक होता. रामानंदाचार्यांनी हा दंडक मोडीत काढून अनंतानंद, सूरसुरानंद, सुखानंद, नरहरीयानंद, योगानंद, रोहिदास, पापा, तुळशीदास, कबीर, भावानंद, सेनाजी, धना, रामदास, पद्मावती आदी अशा एकूण चौदा शिष्यांना उपदेश देऊन जगाचा उद्धार करण्यासाठी पाठविले.
महाराष्ट्रात संत परंपरेनुसार संतांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते. श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी म्हणजे त्यांचा स्मृतिदिन, हा महाराष्ट्रात सर्वत्र विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी वर्षानुवर्ष नित्यनियमाने आयोजित करण्यात येतो. यानिमित्ताने अबाल वृद्धांसह महिला भगिनी व बांधव एकत्रित जमतात. याप्रसंगी कथा कीर्तनकार यांच्याद्वारे श्री संत सेना महाराज यांचे आचार, विचार, शिकवण आणि त्यांच्या कार्याची माहिती मिळते

या कार्यक्रमाचे औचित्य साधुन समाजातील अंधश्रद्धा, अनिष्टरूढी-परंपरा, आणि सामाजिक दृष्ट्या हानिकारक असलेले रितीरिवाज नष्ट करण्यासह अखिल नाभिक समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय विकास साधण्यासाठी सामाजिक वैचारिक एकता निर्माण करणे ही काळाची गरज ओळखून नाभिक समाज धुरीनांनी व कार्यकर्त्यांनी सामाजिक ऐक्य साधण्यासाठी श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सामाजिक ऐक्याचा संकल्प कल्यास श्री संत सेना महाराज यांना अभिप्रेत असलेल्या कार्याची उभारणी होईल. अशा या पवित्र कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील समाजबांधवांनी पुढाकार घेऊन समाज जागृती करावी.


=================================
-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
अंकुश भगवानराव बिडवे +९१९९६०१९८७३५
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Wednesday, August 28, 2024

अशोक पॉलिटेक्निक व फार्मसीमध्ये दहिहंडी मोठ्या उत्साहात साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील तालुक्यातील अशोकनगर येथे अशोक पॉलिटेक्निक व अशोक फार्मसी महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोपालकाला व दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव तर अध्यक्षस्थानी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे उपस्थित होत्या. प्रसंगी अशोक बँकेचे चेअरमन ॲड. सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, गोरे कॉम्प्युटर्सचे संचालक चंद्रशेखर गोरे, पोलीस कॉ. प्रविण कांबळे, पो.कॉ. वसीम इनामदार, पो. कॉ. रुबिना शेख पो.ना. किरण टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. जाधव यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करतांनी सांगीतले की, दहीहंडी फोडताना गोविंदांना दुखापत होण्याची शक्यता असते. दहीहंडीमध्ये मानवी मनोरे तयार करून हंडी फोडण्यासाठी उंच थर रचले जातात. यामुळे गोविंदांच्या पायाला, खांद्याला दुखापत किंवा डोक्याला दुखापत होऊ शकते. अशावेळी डोक्याला, पायाला किंवा मनगटाला कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सोमनाथ जाधव यांनी केले.
अशोक पॉलिटेक्निक व फार्मसीमध्ये या उपक्रमाचे श्री. जाधव यांनी कौतुक करून गोपाळकालाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यभरात सर्वच ठिकाणी हा सण जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी गोविंदा पथक खुप उत्साही असतात. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाची लगबग सुरू असते. गोविंदा पथक एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी सम्भाल ब्रीजवाला...' च्या घोषणांनी संपुर्ण परिसर दुमदुमून गेला. रेवती शिंदे व रसिका कुमावत यांनी राधा-कृष्णची वेशभूषा परिधान केलेली होती.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दहीहंडी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये मुलांनी चार थराचा व मुलींनीही तीन थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडली. मुलांच्या दहीहंडी मध्ये केमिकल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेने पटकाविला. तर मुलींमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेने प्रथम व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेने द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
दहीहंडी कार्यक्रमासाठी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे, फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते, कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन कोळसे, विभाग प्रमुख महेश नवपुते, विशाल घोगरे, मयूर पांडागळे, रामेश्वर पवार आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.अरुण कडू यांनी केले तर आभार प्रा. मोहितकुमार गायकवाड यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर ±९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


अशोक पॉलिटेक्निक व फार्मसीमध्ये दहिहंडी मोठ्या उत्साहात साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील तालुक्यातील अशोकनगर येथे अशोक पॉलिटेक्निक व अशोक फार्मसी महाविद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोपालकाला व दहीहंडीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव तर अध्यक्षस्थानी अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे उपस्थित होत्या. प्रसंगी अशोक बँकेचे चेअरमन ॲड. सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, गोरे कॉम्प्युटर्सचे संचालक चंद्रशेखर गोरे, पोलीस कॉ. प्रविण कांबळे, पो.कॉ. वसीम इनामदार, पो. कॉ. रुबिना शेख पो.ना. किरण टेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. जाधव यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करतांनी सांगीतले की, दहीहंडी फोडताना गोविंदांना दुखापत होण्याची शक्यता असते. दहीहंडीमध्ये मानवी मनोरे तयार करून हंडी फोडण्यासाठी उंच थर रचले जातात. यामुळे गोविंदांच्या पायाला, खांद्याला दुखापत किंवा डोक्याला दुखापत होऊ शकते. अशावेळी डोक्याला, पायाला किंवा मनगटाला कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सोमनाथ जाधव यांनी केले.
अशोक पॉलिटेक्निक व फार्मसीमध्ये या उपक्रमाचे श्री. जाधव यांनी कौतुक करून गोपाळकालाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यभरात सर्वच ठिकाणी हा सण जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी गोविंदा पथक खुप उत्साही असतात. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाची लगबग सुरू असते. गोविंदा पथक एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी सम्भाल ब्रीजवाला...' च्या घोषणांनी संपुर्ण परिसर दुमदुमून गेला. रेवती शिंदे व रसिका कुमावत यांनी राधा-कृष्णची वेशभूषा परिधान केलेली होती.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित दहीहंडी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये मुलांनी चार थराचा व मुलींनीही तीन थरांचा मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडली. मुलांच्या दहीहंडी मध्ये केमिकल इंजिनिअरिंग शाखेच्या विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेने पटकाविला. तर मुलींमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेने प्रथम व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेने द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
दहीहंडी कार्यक्रमासाठी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापू शिंदे, फार्मसीचे प्राचार्य प्रसाद कोते, कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन कोळसे, विभाग प्रमुख महेश नवपुते, विशाल घोगरे, मयूर पांडागळे, रामेश्वर पवार आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.अरुण कडू यांनी केले तर आभार प्रा. मोहितकुमार गायकवाड यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर ±९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================