- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मनोज बाळासाहेब गवळी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर सकाळी दहा वाजेच्या सुमारास येथील शिवारातील कॅनॉल च्या कडेच्या रोडवरून मयत संदीप दत्तात्रय आहेर वय २२ वर्ष राहणार भोकर या इसमाने ट्रॅक्टर क्रमांक एम एच २२ ए एम १४९३ स्वतः ताब्यात घेऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत असताना सदर चालकाच्या ताब्यामधून नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर घसरून कॅनॉलच्या पाण्यात पलटी झाले यावेळी ट्रॅक्टर पलटी होऊन सर्व चाकी वरती असल्याने तसेच चालक खाली पाण्यामध्ये पडल्याने दुखापत होऊन सदर चालकास मोठी इजा निर्माण झाली घटनेची माहिती स्थानिक नागरिक यांनी ट्रॅक्टर मालक यांना देताच मदत कार्य सुरू करून जखमी चालक यांना तात्काळ कामगार हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारापूर्वी सदर चालक संदीप दत्तात्रय आहेर व वय २२ वर्षे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्राकडून घोषित करण्यात आले यानंतर घटनेची माहिती नातेवाईक यांच्याकडून भोकर येथील दत्तात्रय आहेर मयत तरुणाची वडील यांना कळविण्यात आली यावरून श्री आहेर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे खबर देऊन घटनेची माहिती देऊन मयत संदीप यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा असून घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असून माझा मुलगा नुकताच मनोज गवळी यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामावर रुजू झाला होता यावेळी किरण आहेर अरुण आहेर किरण तुळशीराम आहेर यांच्यासमोर हाकिकत कथन केली ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने सदरचा अपघात झाले असल्याचे स्थानिक नागरिक यांच्यातून बोलले जाते पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment