राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, August 31, 2025

सुनील साळवे समाजसेवेचे परीस- अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे रेड क्रॉसचे वतीने साळवेंचा सत्कार


 - शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
येथील डी.डी.काचोळे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशासकीय इमारत याठिकाणी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे म्हणाले सुनील साळवे लोखंडाचे सोने करणारे परीस आहेत.परीस जसे आपल्या सहवासाने लोखंडाचे सोने करतो त्याच प्रकारे सुनील साळवे त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते त्यांच्या सारखेच तयार करतात.त्यांचा जनसंपर्क व लोकसंग्रह खूप मोठा आहे त्यांच्यातील चांगुलपणामुळे व गुणांमुळेच इतका मोठा परिवार त्यांनी जोडला असल्याचे सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षण विभाग, उच्च व माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा 'गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार' सुनील साळवे यांना प्रदान करण्यात आला त्यानिमित्त इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे वतीने साळवेंचा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांचे शुभहस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अध्यक्ष मनोगतामधून सोमनाथ वाकचौरे यांनी सुनील साळवे यांच्याबद्दल वरील गौरवद्गार काढले.
      मनोगत व्यक्त करताना प्रांत अधिकारी किरण सावंत म्हणाले की,इंडियन रेड क्रॉस सोसायटीमध्ये अध्यक्ष म्हणून काम करत असताना सुनील साळवे यांनी रेड क्रॉसचे माध्यमातून अनेक समाजपयोगी कामे केलीत.निराधार, गोरगरीब,आदिवासी, दिंन दुबळ्यापर्यंत रेड क्रॉसचा मदतीचा हात पोहोचवला. तेव्हा सुनील साळवे म्हणजे समाजसेवेचा मानबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले.

   प्रमुख अतिथी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी,प्रा. टी. इ.शेळके, जाकीर सय्यद, डॉ.बाबुराव उपाध्ये,सुकदेव सुकळे प्रा. बारगळ, सतीश कुंकुलोळ , मेजर कृष्णा सरदार व्यावसायिक सुगर आदी मान्यवर उपस्थित होते..
    प्रांताधिकारी किरण सावंत यांचे हस्ते श्री व सौ.सुनील साळवे यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
       स्वागत प्रवीणकुमार साळवे यांनी तर प्रास्ताविकामध्ये भरत कुंकुलोळ यांनी सुनील साळवे चौफेर व अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याचे सांगत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
          प्रमुख अतिथी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी सांगितले सुनील साळवे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आलेख उंचीवर नेणारा आहे.त्यांचे काम आजच्या पिढीला दिशादर्शक असल्याचे सांगून इतरांनी प्रेरणा घेण्याचे आवाहन केले
        यावेळी शोभा शेंडगे, गणेश पिंगळे, डॉ.संजय दुशिंग यांनी मनोगत व्यक्त करताना सुनिल साळवेंच्या कार्याची प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या.
       
         यावेळी डी.डी काचोळे विद्यालय, शा. ज.पाटणी विद्यालय,भास्करराव गलांडे विद्यालय अशोकनगर, त्रिदल माजी सैनिक संघटना,गणेश विद्यालय गणेशनगर,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, नूतन विद्यालय वावी, डावखर कन्या विद्यालय श्रीरामपूर, श्रीरामपूर तालुका मुख्याध्यापक संघ आदी विविध विद्यालये ,संस्था,संघटनांचे वतीने सुनील साळवे यांचा सत्कार करण्यात आला.
           सत्काराला उत्तर देताना सुनील साळवे यांनी शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात काम करणासाठी सहकार्य करणारे सर्व पदाधिकारी,अधिकारी सभासद यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
       कार्यक्रमासाठी भरत कुंकुलोळ,प्रवीण साळवे,गणेश थोरात,केशव धायगुडे, अवधूत कुलकर्णी,संजय दुशिंग,विनीत कुंकुलोळ, बदर शेख,पोपटराव शेळके, सुरेश वाघुले,सचिन चंदन,सुरजनं,साहेबराव रक्ते, सुखदेव शेरे,बाळासाहेब पाटोळे,राजू केदारी, अरुण कटारे,श्रावण भोसले,विश्वास भोसले, शोभा शेंडगे,पुष्पाताई शिंदे,सविता साळुंके,माया चाबुकस्वार, सुवर्णा बोधक,स्वाती पुरे, निर्मला लांडगे आदींनी परिश्रम घेतले
       कार्यक्रमास रेड क्रॉस सोसायटी आजीव सभासद,डी.डी.कचोळे विद्यालय, शा . ज. पाटणी विद्यालय स्टाफ ,विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
       सुत्रसंचलन नानासाहेब मुठे यांनी तर आभार अवधूत कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर तालुक्यातील विविध संस्थांची पदाधिकारी समाजातील प्रसिद्ध उद्योजक व व्यावसायिक तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

भटक्या विमुक्त समाजाच्या विकासासाठी कृती कार्यक्रमाची गरज : डॉ.आबासाहेब उमाप


- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय समाजव्यवस्थेत भटका विमुक्त समाज वंचित व उपेक्षित जीवन जगत आलेला आहे.अज्ञान, दारिद्र्य,अंधश्रद्धा, व्यसनाधीनता व गुन्हेगारीचा शिक्का सामाजिक व्यवस्थेने कपाळी मारल्यामुळे भटक्या विमुक्त समाजाची प्रगती खुंटली होती. अशा उपेक्षित समाजाच्या विकासासाठी कृती कार्यक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. आबासाहेब उमाप यांनी केले.
                येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी साहित्यिक डॉ.आबासाहेब उमाप मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष इंजि. रमेश इंजे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
   डॉ.आबासाहेब उमाप पुढे म्हणाले की, "आजही भटका विमुक्त समाज हा उपेक्षेचे संघर्षशील जीवन जगत आहे. फाटक्या पालात राहणाऱ्या रानोमाळ दऱ्या - खोऱ्यात भटकणाऱ्या व झोपडपट्ट्यांच्या दलदलीत फसलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस असे कार्य केले पाहिजे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्येही भटका विमुक्त समाज हा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा सर्व प्रकारच्या भौतिक प्रगतीपासून वंचित आहे. मूलभूत मानवी अधिकार व मूलभूत मानवी गरजा या समाजाला प्राप्त करून देण्यासाठी ज्यांना स्वातंत्र्याची फळे मिळाली आहेत. अशा सक्षम समाज घटकांनी या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढे आले पाहिजे." असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
        " महामानवांचे सामाजिक परिवर्तनाचे विचार प्रत्येक व्यक्तीने प्रत्यक्ष कृतीमध्ये आणल्याशिवाय सामाजिक परिवर्तन गतिमान होणार नाही." अशी माहिती रमेश इंजे यांनी दिली.

       शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी वास्तव परिस्थितीवर पहाडी आवाजात पोवाडा सादर करून वातावरण निर्मिती केली. 
बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले.
          सदरच्या कार्यक्रमास थेरो दिंपकर,धम्मबांधव उत्सव समितीचे कोषाध्यक्ष विकास तोडकर व परिवार, साहित्यिक सुदर्शन इंगळे, काष्ट्राईबचे अध्यक्ष मारुती भोसले,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वामन मस्के, मुरलीधर खरात, नवनाथ लोंढे, अंकुश धाइंजे, विलास कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे मंगेश डावरे, माजी प्राचार्य रमेश जाधव, पतसंस्थेचे चेअरमन अशोक भोसले,अमर गायकवाड, मधुकर आठवले, जिवने संपूर्ण परिवार, दयानंद बनसोडे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

*माझ्या वाढदिवसानिमित्त*

प्रिय मित्रमंडळी पत्रकार, संपादक, सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक, साहित्यिक, नातेवाईक आणि आप्तेष्ट आपण प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवर, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच विविध प्रसारमाध्यमांतून माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनःपूर्वक ऋणी आहे.

आपण शुभेच्छांद्वारे व्यक्त केलेले आपुलकीचे शब्द, स्नेह, प्रेम आणि आशीर्वाद हे माझ्यासाठी अमूल्य ठेवा आहेत. हा स्नेहबंध असाच दृढ राहील, अशी मनापासून अपेक्षा आहे.

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
<^>
++++++++++++++++++++++++++++++++++
आपला 
*शौकतभाई शेख*
संस्थापक अध्यक्ष ✍️✅🇮🇳...
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
भ्रमणध्वनी: 9561174111
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
<^>
++++++++++++++++++++++++++++++++++

Friday, August 29, 2025

रामशेठ ठाकूर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायक - चंद्रकांत दळवी


मुलांच्या वसतिगृहासाठी रामशेठ ठाकूर यांचेकडून ५० लाखाची देणगी जाहीर 

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
सातारा - "कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वावलंबी शिक्षणाचा धडा घेऊन व प्राचार्य बापूसाहेब उनउने यांच्या संस्काराचा आदर्श गिरवत स्वकर्तृत्वाने शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात यशस्वी झालेल्या रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी केले आहे.
सातारा शहरातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागांतर्गत थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व प्राचार्य बापूसाहेब उनउने यांचे नातू श्री.अमोल उनउने व सौ. मीनल उनउने यांनी दिलेल्या देणगीमधून मा. रामशेठ ठाकूर अभ्यासिका, प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने स्मृती दालन व मराठी भाषा प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संपन्न झाला. मराठी विभागाला दिलेल्या देणगीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर व अमोल उनउने व सौ. मीनल उनउने तसेच कॉन्ट्रॅक्टर पांडुरंग मासाळ व आर्किटेक्चर पुरुषोत्तम पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला.      
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
               रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, जी. के. बापू, सौ. मंगलताई पाटील इत्यादी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
             विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत दळवी पुढे म्हणाले की " छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थी जीवनामध्ये कमवा शिका योजनेत कष्ट करून स्वावलंबी शिक्षण घेत ज्ञानसाधना केली. प्राचार्य बापूसाहेब उनउने तपस्वी प्राचार्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांना रामशेठ ठाकूर यांनी सढळ हाताने आर्थिक मदत केली आहे. तसेच प्राचार्य बापूसाहेब उनउने यांचे नातू श्री.अमोल उनउने यांनी आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मराठी विभागाला विशेष देणगी देऊन आपल्या आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या देणगीदारांचे सामाजिक कार्य आजच्या युवा पिढीला निश्चितच प्रेरणादायक आहे." असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
         कार्यक्रमात ॲड.भगीरथ शिंदे, कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डी ए माने व सौ. मीनल उनउने यांनी आपल्या मनोगतातून प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने यांच्या आठवणींना आत्मिक उजाळा दिला.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्या नावडकर यांनी केले तर डॉ. आबासाहेब उमाप यांनी आभार व्यक्त केले.      
           कार्यक्रमासाठी उपप्राचार्य रामराजे माने देशमुख, डॉ. सविता मेनकुदळे, डॉ. राजेंद्र तांबिले, डॉ. संदीप किर्दत, डॉ. वर्षा माने, डॉ. महादेव चिंदे, डॉ. राज चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील डॉ. संजय सरगडे, प्रा. प्रियंका कुंभार, प्रा. श्रीकांत भोकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
सौ.मिनल उनउने - सातारा 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, August 28, 2025

मोटार वाहन (RTO) विभागाचेअंमलबजावणी अधिकारी ? छे, छे. हे तर रस्त्यावरील देवदूतच !’


'मागे एकदा, मी ‘मोटार वाहन विभागाचे अंमलबजावणी अधिकारी ? छे, छे. हे तर रस्त्यावरील देवदूतच !’ नावाची पोस्ट लिहिली होती. ती कितपत व्हायरल झाली याची माहिती नाही मात्र विभागातील अधिकाऱ्यांच्या ‘नोबेल वर्क’ ची बऱ्याच जणांना माहिती झाली. 


रस्त्यावर मोटार वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्या अपघातात गंभीर किंवा किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तींशी ज्या विभागांचा प्रत्यक्ष संबंध असतो किंवा येतो ते विभाग अश्याप्रसंगी माणुसकी किंवा मानवता धर्माचे पालन अभावानेच पालन करताना आढळून येतात. 
त्यांच्यादृष्टीने त्यांचे कर्तव्य हे तांत्रिक बाब असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसून येते. 
परंतु, मोटार वाहन विभाग (RTO) हा एकमेव असा विभाग आहे, ज्याचा अपघातातील फक्त अपघातग्रस्त वाहनाच्या यांत्रिक तपासणी पुरता असलेला संबंध विसरून विभागातील अधिकारी केवळ 'मानवता धर्म' व माणुसकीस जागून आपल्या कक्षेबाहेरील काम करत जखमी व्यक्तींना मदत करतात, त्यांचे प्राण वाचण्यास महत्त्वाची भुमिका पार पाडतात. 
अश्यावेळी स्वतःची पदरमोड करून, खिश्यास तोशीस लागली तरी ते मागेपुढे पाहात नाहीत. याचे प्रत्यय प्रत्येक्षात बघावयास मिळाले, सोमवार दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीरामपूर - बाभळेश्वर रस्त्यावर श्रीरामपूर पासून ७ ते ८ किमी अंतरावर दुपारी जवळपास पावणे बारा ते बारा वाजण्याच्या दरम्यान वाहनांचा अपघात घडला होता. अपघातग्रस्त वाहनांतील तीन व्यक्ती रस्त्यावर पडलेल्या होत्या. त्यापैकी दोन जणांना अतिरक्तस्त्राव होत होता. त्यांच्या जीवन - मरणाचा प्रश्न होता. रस्त्यावर अंमलबजावणी कामावर निघालेल्या मोटार वाहन विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नजरेस त्या अपघातग्रस्त व्यक्ती पडल्या. मात्र इंटरसेप्टर वाहनांत बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीमुळे जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी अडचण येत होती. परंतु, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी दुसरे वाहन थांबवून त्यात ताडपत्री अंथरून सदरील अपघातग्रस्त तीन्ही जखमींना नजीकच्या प्रवरा रुग्णालयात तातडीने दाखल केले. 
सामान्यतः स्रिया या स्स्वभावाने मृदु व संवेदनशील असल्याने कित्येक जणींना जखम, रक्तस्त्राव पाहून भोवळ येते. 
परंतु, आरटीओ विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक कु.निकीता पानसरे 
या भगिनी अधिकारी यांनी धीरेदात्तपणे जखमींना उचलण्यास मागेपुढे पाहिले नाही. हे करीत असताना त्यांच्या हाताला व गणवेशास लागलेल्या जखमी व्यक्तींच्या रक्ताच्या डागांची देखील त्यांनी पर्वा केली नाही. 
यासोबतच बरोबर असलेले मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील यांना काही कारणास्तव अंमलबजावणी पथकात काम करण्यास मागील सहा महिन्यांपासून मज्जाव करण्यात आला होता. परंतु,अंमलबजावणी पथकात काम करण्याची संधी प्राप्त होताच यंत्रवत, भावनाशून्य व केवळ कर्तव्यभावनेने काम करण्यापेक्षा आपल्या अंगी असलेल्या माणुसकीच्या वृत्तीचे अपघातग्रस्तांना संकटसमयी मदतीतून त्यांनी माणूसकीचे दर्शन घडवले.
मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, सहायक मोटार वाहन निरीक्षक निकीता पानसरे,सागर आढाव यांच्या चांगल्या कामाची नक्कीच नोंद होईल.आपल्या पुण्यकर्माच्या गाठोड्याचे वजन नक्कीच वाढेल यात शंका नाही.

*रूक्मिणीकांत कळमणकर* 
मोटार वाहन निरीक्षक (सेवानिवृत्त)


=================================
-----------------------------------------------
*संकलन:*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================



पैगंबर जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले शाळेत रक्तगट तपासणी शिबिर संपन्न



प्रेषितांनी मानवजातीला दया,करुणा,समानता आणि सेवाभावचा संदेश दिला - एजाज तांबोली 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद मुस्तफा (स.) पैगंबर यांनी मानवजातीला दिलेला संदेश म्हणजे दया, करुणा, समानता आणि सेवाभाव. त्या शिकवणीला अनुसरून आपण आज समाजासाठी उपयुक्त असा रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केला आहे.
रक्तदान हे जीवनदान आहे. पण त्यासाठी सर्वात पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणजे आपला रक्तगट माहित असणे. आपला रक्तगट माहिती असेल तर आपत्कालीन परिस्थितीत आपण त्वरित मदत करू शकतो, तसेच दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यास धावून जाऊ शकतो. हा उपक्रम म्हणजे केवळ तपासणी नाही, तर सेवाभावाची एक सुरुवात असल्याचे प्रतिपादन अल करम हॉस्पिटलचे एजाज तांबोली यांनी केले.
अल करम हॉस्पिटलच्या वतीने हजरत मुहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त नगर शहरातील मुकुंदनगर याठिकाणी असलेल्या सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा.डाॅ. अब्दुस सलाम सर,फरीदा भाभी, गौसिया तांबोळी, अल करम हॉस्पिटलचे एजाज तांबोली, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, शिक्षक शेख फरजाना दिलावर, शेख अस्लम पटेल, शेख शाहिन, शेख हिना, पठाण फरहान उज़मा , शेख यास्मीन व शेख सुलताना आदी उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला पैगंबर यांच्या जीवनातील एक मोठा संदेश आठवतो "सर्वोत्तम मनुष्य तो आहे जो दुसऱ्यांच्या कामी येतो."
आपण सर्वजण जर ही शिकवण आपल्या जीवनात उतरवली तर समाजात एकोपा, आरोग्य आणि बंधुभाव नक्कीच वृद्धिंगत होईल.असे आबीद दुल्हे खान यांनी मनोगत व्यक्त करताना नमुद केले.
मुख्याध्यापक नौशाद सय्यद यांनी आयोजकांचे, डॉक्टरांचे आणि या शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानत. अल्लाह ताआला आपल्याला अशा समाजोपयोगी कार्यात नेहमी यश देओ आणि पैगंबर यांच्या शिकवणी नुसार चालण्याची तौफीक देवो ही दुआ केली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - नगर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

मोर्शी हद्दीत जुगार अड्ड्यावर धाडधाडीत २० लाखांचा मुद्देमाल जप्त


- मोर्शी - प्रतिनिधी -/ वार्ता -
पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी
मोर्शी (जि.अमरावती) हद्दीतील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. 
या धाडीत पोलिसांनी १६ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून अंदाजे २० लाख ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

२४ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, प्रशांत वाघमारे यांच्या शेतातील - घरात जुगार सुरू आहे, या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून प्रशांत सुभाष वाघमारे (४०), प्रफुल्ल प्रकाश दारोकार (३२), जितेंद्र बाळासाहेब सदाफळे (४२), अमोल रामदास वाघमारे (४०), शहीद खाँ छोटे खाँ (५५), जितेंद्र प्रकाश डेहनकर (३६) अंकुश राजेंद्र दारोकार (३३), शेख सलीम शेख इस्माईल (४२), मंगेश प्रल्हाद सदाफळे (४०), आशीष जानराव कोरडे (४७), सौरभ प्रल्हाद गहुकर (३४), महादेव सिताराम पानसे (४५) सर्व रा.हिवरखेड, विलास सुभाष मालवे (४२) रा. टेंभुरखेडा वरूड, धनराज केदारनाथ टिकस (४८) रा. लक्ष्मीनगर वरूड, धर्मेंद्र एकनाथ गोंडाणे (४९) रा. रिंगरोड वरूड, किशोर मोतीराम भगत (५२) रा. रिंगरोड वरूड यांना ताब्यात घेण्यात आले, तर ऋषिकेश वैराळे .रा. हिवरखेड हा फरार आहे. यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी २ लाख ४२ हजार ६५० रुपये, जुगाराचे साहित्य किंमत ७०० रु, १७ मोबाईल १ लाख ७० हजार रुपये व दोन दुचाकी किंमत १ लाख ४० हजार रूपये तसेच हुन्डाई कार किंमत अंदाजे १५ लाख रूपये असा एकूण २० लाख ५३ हजार ३५० रूपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा प्रमुख पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोउपनि सागर हटवार, पोलिस अंमलदार बळवंत दाभणे, रवींद्र बावणे, पंकज फाटे, चालंक पोकॉ प्रशिक वानखडे यांच्या पथकाने पार पाडली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर ✍️✅🇮🇳...
 (वरुड जि.अमरावती)
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, August 27, 2025

न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्याची तायक्वांदो स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
रयत शिक्षण संस्थेच्या राहाता तालुक्यातील कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ (कला) महाविद्यालातील तीन विद्यार्थ्यांची तायक्वांदो या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड झाली. प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर या ठिकाणी नुकत्याच तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला यामध्ये कोल्हार येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील १४ वर्ष वयोगट प्रेम संदीप कोरडे द्वितीय, १७ वर्षे वयोगट शौर्य संदीप कोरडे - प्रथम, आयुष्य संदीप मेनगर - प्रथम, १९ वर्षे वयोगट सोहम सतीश कानडे - प्रथम, या तीन विद्यार्थ्यांनी यश संपादन करून तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची निवड जिल्हास्तरावर होणाऱ्या तायक्वांदो स्पर्धेसाठी करण्यात आली या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक दीपक मगर, शुभम पवार, विलास गभाले यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य अंकुशराज जामदार, उपप्राचार्य सिताराम बोरुडे, पर्यवेक्षिका श्रीमती संजीवनी आंधळे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.अरुण कडू पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. अॕड. सुरेन्द्र खर्डे पाटील,जनरल बॉडी सदस्य मा.रावसाहेब म्हस्के पाटील, सदस्य सर्वश्री अजीत मोरे, श्री बी.के.खर्डे, पा.श्री संतोष थेटे पा., योगेश कोळपकर, पांडूरंग देवकर पाटील, संजय शिंगवी, विभागीय अधिकारी बोडखे साहेब. सहाय्यक विभागीय अधिकारी नाईकवाडी साहेब, तोरणे साहेब तसेच सर्व शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजमोहम्मद शेख - कोल्हार 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, August 25, 2025

पत्रकार बाळासाहेब आगे यांना धमकी देणाऱ्याचा शोध सुरु - पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे


पत्रकार बाळासाहेब आगे यांना धमकाविणाऱ्यावर कठोर कारवाईचे नगर शहर पत्रकारांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दै.जयबाबाचे संपादक बाळासाहेब शंकरराव आगे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकारी व नगर शहरातील पत्रकारांनी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देऊन केली. दरम्यान या आरोपीबाबत हा गुन्हेगार वृत्तीचाच असून त्याला पकडण्यासाठी पोलिस शोध घेत आहेत या आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.  


श्रीरामपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दै. जयबाबाचे संपादक बाळासाहेब शंकरराव आगे यांना विरोधात बातमी प्रकाशित केल्याच्या कारणावरुन एकाने सोशल मिडीयावर जीवे मारण्याची धमकी दिली. त्या पार्श्वभूमीवर नगर येथे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, संजयकुमार पाठक, अन्सार सय्य्द, गिरीष रासकर, अमित आवारी, प्रल्हाद एडके, प्रसाद शिंदे, आदील शेख, रविंद्र कदम, गोरख शिंदे, नावेद शेख यांच्यासह पत्रकारांनी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देऊन आरोपीवर कारवाईची मागणी केली. 
निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत नशेच्या इंजेक्शनसह महिला अटक झाल्याची बातमी व श्रीरामपुर येथील पोलिस उपाधिक्षक यांचा माहिती देेणारा व्हिडिओ प्रकाशीत केला. त्यात गणेश मुंडे याचे नाव आले. त्यानंतर सबंधित व्यक्तीने श्रीरामपुर (जि.अहिल्यानगर) येथून प्रकाशीत होणाऱ्या दैनिक जयबाबा या दैनिकात चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आगे यांना इन्टाग्रामवरुन धमकी देत हे वृत्त डिलीट कर अन्यथा तुला डीलीट करुन टाकील असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

 सबंधित व्यक्तीपासून आगे यांना तसेच पत्रकारांना धोका आहे. सामाजिक स्थितीवर लेखन करणाऱ्या तसेच पोलिसांनी दिलेली माहीती प्रकाशीत केली म्हणून जर मारुन टाकण्याची धमकी येत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांनी सबंधित व्यक्तीला तातडीने अटक करुन त्याच्यावर कठोर कारवाई करावी व बाळासाहेब आगे यांना संरक्षण द्यावे. आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. गुन्हे अन्वेषन विभागालाही त्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याला लवकर पकडले जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आश्वासित केले.

=================================
-----------------------------------------------
  *वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
 पत्रकार आदिल रियाज शेख अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, August 23, 2025

मुळा धरणातून नदीपात्रात दिड हजार क्यूसेस विसर्ग


- जावेद शेख - राहुरी -/ वार्ता -
अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहीनी समजले जाणारे २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात आज २५ हजार दशलक्ष घनफूट (९६ टक्के) पाणी जमा झाले असल्याने धरणाच्या सांडव्यातून दिड हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. नदीपात्रात होत असलेल्या विसर्गाने नदीकाठच्या जनतेला दक्षतेचा इशारा दिला आहे. 

      आज दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मुळा धरणातील एकूण पाणीसाठा २५ हजार  दलघफु इतका होत आहे.  मुळा धरणाच्या जलाशय परिचालन सूची (ROS) नुसार पाणीसाठा २४ हजार ८८५  दलघफु इतका नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मुळा धरणातून मुळा नदीपात्रामध्ये १ हजार ५०० क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यांत येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुळा धरणातून नदीपात्रामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  
    मुळा नदीकाठच्या गावांना या प्रकटनाद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तू, वाहने, पशुधन, शेती अवजारे व इतर मनुष्य उपयोगी संसाधने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावीत. नदीपात्रात प्रवेश करु नये. कुठलीही जीवित वा वित्त हानी होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. असे आवाहन मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*  
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111              
----------------------------------------------- 
=================================

Friday, August 22, 2025

अल करम हॉस्पिटलतर्फे मोफत सर्वरोग निदान शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अहिल्यानगर शहरातील अल करम हॉस्पिटलच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोफत सर्वरोग निदान उपचार व औषधासह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील सर्वसामान्य रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला रुग्ण व नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी तौफिक तांबोली, शेरअली शेख, एजाज तांबोली तसेच नामवंत डॉक्टर्स डॉ.जहीर मुजावर, डॉ. जैनब पटेल, डॉ. नजमा जहीर, डॉ. अशपाक पटेल, शाहनवाज तांबोली आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आरोग्य सेवेला सामाजिक जबाबदारीची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.
शिबिरात विविध आजारांवर तपासण्या व सल्ला रुग्णांना देण्यात आला. विशेषतः हर्निया, अपेंडिक्स, कॅथलॅब तपासणी, एन्जिओप्लास्टी, किडनी स्टोन, डायबेटीस, हृदयविकार, प्रोस्टेट सर्जरी, रक्तदाब, सांधेदुखी, पाठदुखी तसेच व्यंधत्व निवारण यांसारख्या गंभीर आजारांची सविस्तर तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टर्सनी रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन करत औषधेही मोफत उपलब्ध करून दिली.
तसेच सामान्य तपासण्यांमध्ये ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, ईसीजी, एक्स-रे या सेवा पूर्णपणे विनामूल्य देण्यात आल्या. या सेवा सुविधांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
या उपक्रमाद्वारे अल करम हॉस्पिटलने रुग्णसेवा हाच सर्वोत्तम धर्म असल्याचा संदेश दिला. हॉस्पिटलचे डाॅ. जहीर मुजावर यांनी सांगितले की, “आजच्या काळात आरोग्याची समस्या ही सर्वांत गंभीर समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत समाजातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. येत्या काळातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल.”
शिबिरातील डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधून योग्य आहार, व्यायाम, जीवनशैलीत बदल व आजारांपासून बचाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याबरोबरच जनजागृतीतही भर पडली.
या शिबिरामुळे अनेक रुग्णांना योग्य निदान व तत्काळ उपचार मिळाल्याने समाधान व्यक्त झाले. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातून आलेल्या रुग्णांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले.
समारोपप्रसंगी डॉ.अशपाक पटेल म्हणाले की,अशा सामाजिक वैद्यकीय शिबिरांमुळे गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळतो असे ते म्हणाले. यासोबतच वर्षभर असे विविध प्रकारचे आरोग्य शिबिरे आयोजित करत राहण्याचे मानसही यावेळी त्यांनी व्यक्त केले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
 *वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, August 21, 2025

सदैव निर्पेक्ष तथा आदर्शवत कामगीरीत्यावर परोपकारी असे कर्तृत्वही छान !म्हणूनच सुनील साळवे यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मान !!


मुख्याध्यापक सुनील साळवे (सर) आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
माध्यमिक शिक्षण विभाग व माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचे वतीने उत्कृष्ठ प्रशासक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे येथील डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील प्रभाकर साळवे (सर) यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे.

     अहिल्यानगर येथे अमर ज्योत मंगल कार्यालयात शिक्षण विभागाचे उपसंचालक गणपत मोरे यांच्या शुभहस्ते व जिल्हा माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांचे प्रमुख उपस्थितीत सुनील साळवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
        
       सुनील साळवे ३२ वर्षापासून रयत शिक्षण संस्थेच्या सेवेत आहेत. मालुंजा, कोल्हार, वडाळा महादेव, गणेशनगर, पुणतांबा येथे शिक्षक म्हणून त्यांनी उत्तमरीत्या सेवा बजावली आहे, तर श्रीरामपूर याठिकाणी उपशिक्षक व मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्षापासून ते कार्यरत आहे.
             शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, आरोग्य, कला, क्रीडा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल श्री.सुनील साळवे यांचा मुंबई येथे राजभवनात तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते तर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचे हस्ते सन्मान झालेला आहे.
         रोटरी क्लब श्रीरामपूर, रांजणखोल ग्रामपंचायत, मानवी कल्याण पुरस्कार मुंबई, भारत सरकार युवा क्रीडा मंत्रालयाचा नेहरू युवापुरस्कार,इंडियन अचिवर्स अवॉर्ड यांसह विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांनी श्री.साळवे यांचा सन्मान केलेला आहे.
          श्री.सुनील साळवे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्य करणाऱ्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव आहेत तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती,युवक बिरादरी भारत,आदी महत्त्वाच्या संस्थांवर जिल्हा पदाधिकारी म्हणून काम करत आहेत.
              रयत शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक काम करताना त्यांना रयत च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांचे मोलाचे पाठबळ व सहकार्य मिळाले. त्यांच्यामुळेच विद्यालयाची गुणात्मक वाढ भौतिक विकास सुरू आहे. शैक्षणिक कार्य करताना मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन मिळाले असल्याची प्रतिक्रिया सुनील साळवे यांनी यावेळी दिली.
          सुनील साळवे यांचे पुरस्काराचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, तालुका गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, श्रीरामपूर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजीवन दिवे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर , सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सेक्रेटरी मिथुन डोंगरे, प्राचार्य प्रवीण बडदे, प्राचार्य संजय कांबळे, प्राचार्य मुकुंद पोंधे, मुख्याध्यापिका सोनाली पैठणे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जाकीर सय्यद, सचिव सुनील म्हसे, पीडीएफचे तालुकाध्यक्ष रवींद्र औताडे, दत्तात्रय कांबळे, श्रीराम कुंभार, नितीन जाधव, डी.डी. काचोळे विद्यालयाचा सर्व स्टाफ व रेड क्रॉस संघटनेचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Wednesday, August 20, 2025

महाराष्ट्र ब्राम्हण सभेच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुखपदी सौ. धनश्रीताई उत्पात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र ब्राम्हण सभा ही खूप जुनी तथा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली ही संस्था आहे,
देशभरात ह्या संस्थेचे काम चालते संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल व्यास तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मयुरेश अरगडे, कार्याध्यक्ष चैतन्य जोशी, महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई घटवाई तसेच सर्व सर्व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यां तसेच स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या विश्वस्त सौ. धनश्रीताई उत्पात यांची महाराष्ट्र ब्राम्हण सभेच्या 
महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली.
 सौ.धनश्रीताई उत्पात ह्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात संघटन बांधणी करून ह्या संस्थेचा विस्तार करतील व संस्थेच्या माध्यमातून ब्राम्हण समाजाच्या अडीअडचणी सोडवत समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहतील ही अपेक्षा ठेवत ही मोठी जबाबदारी संस्थेने त्याच्यावर सोपवली आहे‌
सौ धनश्रीताई उत्पात यांच्या या निवडीमुळे ब्राम्हण समाजामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे कारण सौ. उत्पात यांच्या सारखे निर्भीड पदाधिकारी संस्थेने निवडला आहे की जो सर्वसामान्य ब्राम्हण समाजाच्या व्यथा, समस्या ह्या सरकार पर्यंत पोहचवून समाजाला योग्य दिशा दाखवत समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न सौ. धनश्रीताई ह्या करतील अशी अशा व्यक्त करत ब्राम्हण समाजाला पुढे नेत समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगारीच्या संधी उपलब्ध करून देऊन एक भक्कम नेतृत्व करत समाजाला पुढे नेण्याचं काम सौ.धनश्रीताई ह्या महाराष्ट्र ब्राम्हण समाजाच्या वतीने करतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या पुढील कार्यास स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक मुख्य महासचिव कमलेश शेवाळे त्याच बरोबर विश्वस्त उमेश काशीकर, संगीताताई बोराडे, प्रशांत निकम, सविता तावरे, संचालक रवींद्र करंगुटकर विशाल बोराडे, वैशाली कांबळे, संदिप जाधव, संदिप वाघमारे, श्रीकांत देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार कमलेश (देवा) शेवाळे 
चांदा ता.नेवासा जि. अहिल्यानगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शिर्डीच्या शाबेरा सय्यद यांचा भारत समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव


धर्मवीर छञपती संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र आयोजित सन्मान महाराष्ट्राच्या तेजस्वी कर्तुत्वाचा..साईनगरीत सोहळा संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारत मातेच्या कणखर माती जन्मलेल्या कर्तुत्ववान व्यक्तींचा व समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा शिर्डी येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित श्री साईबाबांजीच्या पुण्यनगरीत खासदार भाऊसाहेब वाकचौरे सुप्रसिद्ध सिने अभिनेते विजय पटवर्धन सुप्रसिद्ध उद्योजिका मोनिका फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला या कार्यक्रमात शिर्डीच्या ज्येष्ठ नागरिक उद्योजिका व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या श्रीमती साबेरा करीम सय्यद यांना भारत समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले 
सावेरा करीम सय्यद ह्या महिलांना नेहमीच सांगतात की महिलांचे आयुष्य हे फक्त चूल व मूल ऐत पर्यंत मर्यादित न राहता स्त्रीच्या जातीने शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक स्वावलंबनाचे धडे घेतले पाहिजे आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्या स्वतः प्रथम एक उत्तम व्यावसायिक असून मुस्लिम समाजातील असूनही त्यांनी आपल्या प्रगल्भ विचारसरणीने प्रथम आपल्या मुलीस एमएमएस एमएसडब्ल्यू एमबीए पीएचडी एलएलबी एल एल एम इथपर्यंत सुशिक्षित करून तिला स्वतःच्या पायावर आर्थिक सक्षम बनवून त्यानंतर समाजातील सर्वसामान्य महिलांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न करून अनेक रोजगार मिळवून दिले त्यांना झाशीची राणी महिला सामाजिक प्रतिष्ठान सारख्या संस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सामाजिक कौटुंबिक क्षेत्राचे धडे नेहमीच देत असतात व वेळोवेळी सर्वसामान्य महिलांच्या मदतीसाठी तत्पर असतात त्या नेहमी सांगतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्यामुळे स्त्रियांनी शिकले पाहिजे मुस्लिम समाजातील असूनही त्यांचे मराठी भाषेवर विशेष प्रेम व प्रभुत्व आहे त्यामुळे त्यांना सर्व समाजातील महिलांना काम करण्याची उभारी देण्यास मदत मिळू शकले या त्यांच्या कार्याची पावती म्हणूनच की काय त्यांना भारत समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे..त्यांना मिळालेल्या सर्व समाजातील तळागाळातील लोकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
 पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेसb💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, August 19, 2025

चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीयकार्याध्यक्षपदी शिवाजी साळवे


वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने समाजाला पुढे नेणे ही काळाची गरज - माजीमंत्री बबनराव घोलप 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
समाजाला जोडून पुढे घेऊन जाणे हीच खरी समाजसेवा आहे. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने समाजाला पुढे नेणे ही काळाची गरज आहे. समाजाचा विकास हा सर्वांचा एकमेव उद्देश असला पाहिजे आणि त्यासाठी एकच दिशा ठरवून काम करणे आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले.
नगर शहरातील हॉटेल पॅराडाईज येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात घोलप बोलत होते. हॉटेल पॅराडाईज येथे झालेल्या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कांबळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य अध्यक्ष माधवराव गायकवाड, राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे, राष्ट्रीय सचिव दत्तात्रेय गोतीसे, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र बुंदिले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, राज्य सचिव अनिल कानडे, महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य शोभाताई कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, माणिकराव नवसुपे, युवक राज्य कार्यकारणी सदस्य कैलासराव गांगर्डे, चंद्रकांत नेटके, विठ्ठलराव जयकर, बाबासाहेब लोहकरे, रोहिदास उदमले, रामकिसन साळवे मेजर, प्रा. संजय कानडे, पोपट बोरुडे आदींसह महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे घोलप म्हणाले की, वैचारिक वादाने समाजाचे नुकसान न करता विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे. महासंघाच्या वतीने राज्य सरकारकडे संत रविदास विश्‍वविद्यापीठ स्थापन करावे, कोरोनामुळे डबघाईला आलेल्या चर्मकार व्यावसायिकांची कर्जमाफी करावी, बार्टी प्रमाणे संत रविदास रिसर्च सेंटर स्थापन व्हावे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर चर्मकार विकास महामंडळाला नियम लागू करावेत आणि संत रविदास महाराज जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. तसेच मंत्रीपदाच्या काळात समाजासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद केली असून, हा पॅटर्न देशभर राबविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माजी आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले की, सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले शिवाजी साळवे यांच्या माध्यमातून एक जबाबदार कार्यकर्ता महासंघाशी जोडला गेला आहे. त्यांनी ग्रामीण भागात समाज बांधवांना एकत्र आणत अनेक प्रश्‍न सोडविले आहेत. शेवटच्या घटकांना आधार देऊन पीच परवाने मिळवून दिले, कर्ज प्रकरणे मंजूर होण्यासाठी पाठपुरावा केला. हे सर्व काम गाजावाजा न करता प्रामाणिकपणे केले आहे, त्यामुळे समाजाच्या चळवळीला नवी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
या मेळाव्यात चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय चर्मकार महासंघात प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी साळवे यांची राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली. साळवे म्हणाले की, आजपर्यंत मी समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी संघर्ष करत आलो आहे. शेवटच्या घटकाला न्याय मिळावा, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, शिक्षणाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्न राहिला आहे. महासंघात सामील होताना माझ्या खांद्यावर अधिक मोठी जबाबदारी आली आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी निष्ठेने काम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्याच्या प्रारंभी संत रविदास महाराजांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक राजेंद्र बुंदिले यांनी करुन संघटनेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. मेळाव्याचे आयोजन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे व माणिकराव नवसुपे यांनी केले होते. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस  ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल तर्फे सायकली, शिवणयंत्रे, वेंडिंग मशिन्स व इंसीनरेटरचे वाटप


शौकतभाई शेख - जेष्ठ संपादक -/ श्रीरामपूर -
 रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने अहिल्यानगर येथील बडीसाजन हॉलमध्ये समाजोपयोगी सेवा प्रकल्प राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ११ सायकली, ११ शिवणयंत्रे, ११ वेंडिंग मशिन्स व ११ इंसीनरेटर यांचे वितरण करण्यात आले. 
या प्रकल्पामुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळाली.
क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुनील कटारिया यांनी प्रास्ताविक केले.
सहायक प्रांतपाल मधुरा झावरे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हा फर्स्ट लेडी रोटेरियन संगीता लातूरे यांनी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.  
मुख्य अतिथी जिल्हा प्रांतपाल रोटेरियन सुधीर लातूरे यांनी क्लबच्या उपक्रमांचे कौतुक करून सर्व रोटरी क्लब्स व दात्यांनी रोटरी फाउंडेशनसाठी उदारतेने दान द्यावे असे आवाहन केले.
या प्रकल्पासाठी सी.बी. छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, रिसन्स इंडस्ट्रीज एमआयडीसी अहिल्यानगर, रमेश फिरोदिया चॅरिटेबल ट्रस्ट अहिल्यानगर, संगिता चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, आर. एन.धाडीवाल कल्याणी नगर पुणे या संस्थांचे व व्यक्तींचे मोलाचे योगदान लाभले.
हा उपक्रम क्लबच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला.
तसेच या कार्यक्रमात अवयव दान जनजागृती अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा समन्वयक सतीश अहिरे यांनी सर्वांना अवयव दान संबंधित शपथ दिली.
या सोहळ्यास जिल्हा प्रांतपाल रो. सुधीर लातुरे तसेच जिल्हा फर्स्ट लेडी सौ. संगीता लातुरे, सहायक प्रांतपाल रो. मधुरा झावरे, क्लबचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शिरीष रायते, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाॅमिनी रो. क्षितिज झावरे, पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. प्रमोद पारीख, सहाय्यक प्रांतपाल रो.ईश्वर बोरा सर्व जिल्हा संचालक, विविध क्लबचे अध्यक्ष, सचिव, रो. डॉ. श्रीकृष्ण जोशी , रो.नरेंद्रभाई चोरडिया, रो.मनीष बोरा, रो.प्रसन्न खाजगीवाले, रो. अमर गुरप (सचिव), रो. सुजाता कटारिया, रो. श्रेया खाजगीवाले, रो. हरीश नय्यर, रो. हितेश गुप्ता, रो. निलेश शाह, रो. चेतन अमरापूरकर, रो.राजेश परदेशी,रो. सुनील मुथा,रो. संजय मुनोत,रो. वसंत मुनोत रो. विनोद भंडारी, रो.डॉ दिलीप बागल, रो.डॉ उज्वला शिरसाठ,क्लबचे अॅनस अ‍ॅनेट्स व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच विविध शाळा आणि संस्थांचे अनेक पदाधिकारी व लाभार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन क्लबचे सचिव रोटेरियन अमर गुरप यांनी मानले.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचा हा उपक्रम "सेवा हेच सर्वोच्च" या ब्रीदाचा उत्तम प्रत्यय देणारा ठरला. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

एसएमपी इंटरियर डिझाईन असोसिएट ऑफिसचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नगर शहरातील एसएमपी इंटरियर डिझाईन असोसिएट ऑफिसचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले. या व्यवसायात तब्बल आठ वर्षांपासून कार्यरत असलेले संचालक सईद पठाण यांनी आतापर्यंत अनेक बंगले, फ्लॅट्स, हॉटेल्स, मंगल कार्यालये तसेच विविध वास्तूंचे आकर्षक डिझाईन करून यश मिळवले आहे.
सदरील उद्घाटन सोहळा सईद पठाण यांच्या मातोश्रींच्या शुभहस्ते रिबीन कापून संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सईद पठाण यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कोतवाली पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री.दराडे, उपजिल्हाधिकारी सय्यद वसीम, हाजी करीमशेठ हुंडेकरी, एन.आर. लाॅनचे हाजी नजीर अहमद, न्यू मॉडर्न कन्सट्रक्शनचे इकबाल सय्यद, केअर एन क्युअर हॉस्पिटलचे डॉ. सईद शेख , कॉन्ट्रॅक्टर चांद शेख, अब्दुल सलाम भाई,सय्यद परवेज, मदरसा आलमगीरचे हाफीज हाजी रियाज, कॉन्ट्रॅक्टर उस्मान इनामदार, कॉन्ट्रॅक्टर रफिक भाई, फिरोज जहागीरदार, कवीजंग लॉनचे वसीम भाई, हाजी मिर्झा,अर्शद भाई, मतीन भाई तसेच या सोहळ्यास बांधकाम क्षेत्रातील इंजिनीयर, आर्किटेक्ट, कांन्ट्रॅक्टर, डॉक्टर, नगरसेवक, पत्रकार व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी केअर एन क्युअर हॉस्पिटलचे डॉ. सईद शेख म्हणाले की, आजच्या युगात इंटेरियर डिझाईन ही केवळ सजावट नसून ती जीवनशैली बदलणारी संकल्पना ठरते. सईद पठाण यांनी या क्षेत्रात केलेले काम प्रेरणादायी असून पुढेही समाजाला उत्कृष्ट सेवा मिळेल याची खात्री आहे असे नमुद केले. उपस्थितांचे मतीन भाई व अर्शद भाई यांनी आभार मानले. आणि समाजास उत्तम व दर्जेदार डिझाईन सेवा पुरविण्याचा संकल्प व्यक्त केला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीदखान - अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, August 18, 2025

माजी सैनिक संघर्ष समितीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील आजी माजी सैनिक संघर्ष समितीचा प्रथम वर्धापन दिन बेलापूर रोड येथील काळे लॉन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी समितीच्या पुढील प्रगती साठी सर्वधर्म समभाव,एकदुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी होणे बाबतीत, सद्ध्या अनेक पतसंस्था डबघाईस निघून अनेक सैनिकांची आर्थिक फसवणूक होत आहे अशा अनेक बातम्या पेपरला छापून येत आहेत त्यामुळे ठेव ठेवतांना नॅशनल बँकेत ठेवावी अशा प्रकारे अनेक विषयावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी तालुक्यातील माजी सैनिकांना सातत्याने सेतूच्या माध्यमातून मोफत सेवा देणारे शिवतीर्थ सेतूचे सर्वेसर्वा प्रविण पैठणकर यांचा व संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास यांचा प्रकट दिनानिमित्त समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. 
समितीच्या वर्धापनदिनानिमित्त मेजर सुधाकर हरदास यांच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते,याप्रसंगी मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब बनकर , बाळासाहेब भागडे, विलास खर्डे, बाळासाहेब लोखंडे अशोक कायगुडे, चांगदेव धाकतोडे ,सुजित शेलार, राम पुजारी, राजेंद्र आढाव, पंढरीनाथ पुजारी भगीरथ पवार, अशोक साबळे, सुनील गवळी संजय बनकर सुनील भालेराव पार्वताबाई देसाई , वसंत देसाई,रामधन बिलवाल, शरद तांबे ,माधव ढवळे , कैलास गोरे ,गणेश सोडणार, सचिन पवार , रमेश माळी, ज्ञानदेव पुजारी , काळे कॅशियर स्टेट बँक इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

माजी सैनिक संघर्ष समितीच्यावतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा


श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आजी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने शहरातील शहीद स्मारकाजवळ साजरा करण्यात आला, याप्रसंगी माजी सैनिक विधवा पत्नी श्रीमती पार्वताबाई देसाई यांच्या हस्ते शहीद स्मारकास रीथ (पुष्पचक्र) वाहून स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांना व स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या सैनिकांनी स्वातंत्र अबाधित राखण्यासाठी भारत देशाच्या सीमा रेषेच रक्षण करत असतांना प्राण अर्पण केले त्यांना सलामी दिली व संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले, 
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मेजर सुधाकर हरदास व मेजर बाळासाहेब बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आठवण करून दिली, तिरंग्याचा सन्मान म्हणजे आपल्या देशाच्या सन्मानाचे रक्षण करणे होय, तिरंगा म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नाही तर आपल्या इतिहासाची संस्कृतीची आणि ऐक्याची ओळख आहे हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही यासाठी स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान,त्याग आणि संघर्ष यांमुळेच आपण हा दिवस साजरा करत आहोत त्यामुळे तरुणाईने देशाच्या प्रगतीसाठी सतत योगदान दिले पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर कृष्णा सरदार यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष मेजर बाळासाहेब भागडे यांनी केले. कार्यक्रमास मेजर सुधाकर हरदास, अशोक कायगुडे, चांगदेव धाकतोडे, सुनील गवळी,बाळासाहेब बनकर, राजेंद्र आढाव, विलास खर्डे, बाळासाहेब लोखंडे, अशोक साबळे, सुनील गवळी, संजय बनकर,भगिरथ पवार , पंढरीनाथ पुजारी,राम पुजारी, काळे स्टेट बँकेचे कॅशियर शरद,तांबे सुजित शेलार, सुनील भालेराव, माधव ढवळे, कैलास गोरे, गणेश सोडणार, सचिन पवार, रमेश माळी, ज्ञानदेव पुजारी, वसंत देसाई ,रामधन बिलवाल, इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतले तर उद्याचा भारत नक्कीच उज्ज्वल होईल - शरफुद्दीन सर


मखदूम सोसायटीतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देऊन मिळवून दिला आहे.
या दिवशी आपण फक्त ध्वजवंदन करून थांबायचे नाही, तर देशासाठी कर्तव्यभावनेने जगण्याची शपथ घ्यायची आहे. शिक्षण हेच खरे शस्त्र आहे. आज मखदूम सोसायटीच्या वतीने मुलांना वह्या वाटप करून ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे.
आजच्या पिढीने प्रामाणिकपणे शिक्षण घेतले, मेहनत केली, तर उद्याचा भारत नक्कीच उज्ज्वल होईल. आपण सर्वजण मिळून समाजात ऐक्य, प्रेम, बंधुता आणि प्रगतीचे आदर्श निर्माण करूया, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शरफुद्दीन शेख यांनी केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मखदूम सोसायटीच्या वतीने केडगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सल्लागार शरफुद्दीन सर, सचिव आबीद दूल्हे खान, शिक्षिका आसमा बाजी, आयशा सुलताना आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी प्रसिद्ध कवयित्री डाॅ. कमर सुरुर, शरफुद्दीन शेख, शफी हज टूर्स अँड ट्रॅव्हल्स, राजकुमार गुरुनानी, डाॅ.दमन काशीद, युनुसभाई तांबटकर, वसंत पारधे, तन्नु महाराज, सुनील भंडारी, दिनेश मंजरतकर आदींचे सहकार्य लाभले.
या वेळी आबीद खान यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे संस्कार जोपासण्यासाठी मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन आसमा बाजी यांनी केले. आभार आयेशा सुलताना यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, August 17, 2025

वरुड येथील श्री संत नगाजी महाराज समाज भवनात कढई व प्रसाद वाटप कार्यक्रम संपन्न

नाभिक समाजाच्या वतीने आ.चंदुभाऊ यावलकर, माजी खासदार रामदास तडस व डॉ. निलेश बेलसरे यांचा सत्कार

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
वरुड (जि.अमरावती) येथील संत नगाजी महाराज समाज भवन याठिकाणी श्रावण मासाच्या निमित्ताने कढई व प्रसादाचे आयोजन मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले. 
या प्रसंगी नाभिक समाजाच्या वतीने वरुड- मोर्शी मतदारसंघाचे आमदार उमेश ऊर्फ चंदुभाऊ यावलकर, वर्धा मतदार संघाचे माजी खासदार रामदास तडस यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रामुख्याने उपस्थित मध्ये नगरसेवक डॉ.निलेश बेलसरे यांना देखील गौरव चिन्ह देवून गौरविण्यात आले .

या वेळी मान्यवरांसोबतच नाभिक समाजातील अनेक महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
महिला नाभिक संघटनेच्या कार्यकर्त्या बहिणींनी आमदार उमेश यावलकर व माजी खासदार तडस यांना राखी बांधून पवित्र बंधु- भगिनीचे नाते दृढ केले.

सत्कारानंतर आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “मी माझ्या बहिणींना प्रत्येक सुख- दुःखात मदत करीत असतो आणि करीत राहीन. समाजाचा विश्वास हेच माझे खरे बळ आहे असेही ते म्हणाले.
या सोहळ्यादरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांनी नाभिक समाजाच्या एकत्रित कार्याची प्रशंसा केली. भाविक व समाज बांधवांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत कार्यक्रमाला यशस्वीतेची परंपरा लाभली. 
या वेळी नाभिक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्णा शिरूळकर, युवा अध्यक्ष रितेश धानोरकर, पत्रकार प्रविण सावरकर, संत नगाजी महाराज चॅरिटेबल टूस्ट चे अध्यक्ष रमेश माथुरकर, रमेश आसोलकर, वासुदेव धानोरकर, सुधाकर धानोरकर, राजेश मिसळकर, विजय राऊत,  दिपक पापडकर, शुभम साखरकर, मंगेश येवतकर, निलेश साखरकर, प्रविण ससनकर, नारायण द्रवेकर, गणेश सिरस्कर, उमेश शिराळकर, मनोज कावलकर, गुडू सुर्यवंशी, शैलेश जाधव, प्रविण पापडकर तसेच नाभिक महिला संघटनेच्या अध्यक्षा वर्षा तळखंडकर, सचिव निलम सावरकर, शोभा शिरूळकर, पुनम बाभुळकर, सौ. निभोरकर यांची उपस्थिती लाभली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Friday, August 15, 2025

डि.पॉल स्टेट बोर्ड स्कूलमध्येस्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी संचलित डि पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये नुकताच देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
    प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर कृष्णा दलपत सरदार सुभेदार होते. यावेळी झेंडावंदन झाल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. 
व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. तसेच सेंटलूक हॉस्पिटलच्या विद्यमान व्यवस्थापिका सि.फ्रँकलिन रामा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  

         दरम्यान इ.पाचवीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांची फलक सजावट स्पर्धा घेण्यात आली. प्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका मालन मोहन, माधुरी महाडीक यांनी कठोर परिश्रम घेतले.
    यावेळी कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक फादर सिजो, प्रशासक फा.फ्रँको, प्राचार्या सिस्टर ब्लेसा, समन्वयक सि. रेन्नी,सचिव मॉली कुथूर, वरिष्ठ लिपिक रवी लोंढे, गणेश पवार, विकास वाघमारे, संदीप निबे, सोनल झांजरी, अनिता पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय खेमनर यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

प्राईडचा वटवृक्ष दिवसेंदिवस असाचबहरत राहावा - दिपालीताई ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती व प्राईडच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे आणी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेर्डापूर - वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड ॲकेडमी इंग्लिश मेडीयम स्कूल ॲन्ड ज्युनि. मध्ये आज प्राईड ॲकेडमीमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 
 भारतीय युवक कॉग्रेसच्या सचिव तसेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. दिपालीताई ससाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष लकी शेठी, अशोकनगर येथील डॉ. सारिकाताई कुंदे, भेर्डापूर च्या डॉ. माया कवडे, सौ. त्रिवेणी गोसावी आदी मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करत देशभक्तीपर गाण्यावर मुलांनी कवायत प्रकार सादर केले. विद्यार्थ्यांनी पथ संचलन करून ध्वजाला सलामी दिली. लहान मुलांनी देशभक्तीपर भाषणे केली.  
 मी १० वर्षापूर्वी पाहिलेला प्राईडचा हा वटवृक्ष बहरला आहे. या वृक्षाला शाखा आल्या आहेत. दिवसेंदिवस हा वटवृक्ष असाच बहरत राहावो यातून आयपीएस, इंजिनिअर, मोठे अधिकारी घडतील याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन दिपालीताई ससाणे यांनी केले .
यावेळी डॉ.कुंदे म्हणाल्या की ग्रामीण भागात डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्यामुळे दिले जाणारे आदर्शवादी व दर्जेदार शिक्षणाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती ही वाखाणण्याजोगी आहे.  
तसेच लकी सेठी यांनी शाळेच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

 शाळा स्तरावर झालेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते बॅजेस वितरण करून त्यांचा शपथग्रहण विधी पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थीनी अदिती हापसे व तेजल निर्मळ यांनी केले. शाळेचे क्रीडा शिक्षक प्रदीप गोराणे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या प्रीती गोटे व सर्व शिक्षक तसेच कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, August 14, 2025

भाजपा श्रीरामपूर तालुका सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी संदीप आसने


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर तालुका भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी संदीप आसने यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे यांनी श्रीरामपूर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. 
या कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, १० चिटणीस, १ कोषाध्यक्ष, ३० कार्यकारीणी सदस्य, २४ इतर आघाड्यांसह ६९ कायम निमंत्रीत सदस्य असे एकूण १५० जणांचा समावेश करण्यात आला असून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न यावेळी तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे यांनी केला आहे.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहर अध्यक्ष जितेंद्र छाजेड आदिनी अभिनंदन केले.
भारतीय जनता पक्षाने सोपवलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने पार पाडून भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण हे समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण करणार असल्याचे नूतन सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष संदीप आसने यांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, August 12, 2025

शिर्डी संस्थानचे मा.विश्वस्त प्रतापनाना भोसले यांची लंडन येथील डॉ.आंबेडकर स्मारकाला भेट


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूरचे मूळ रहिवासी व सध्या अमेरिकास्थित असलेले उद्योजक तथा शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त प्रतापनाना भोसले यांनी लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला नुकतेच सपत्नीक भेट दिली.
       यावेळी अनुभवकथनात त्यांनी सांगितले की,राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी ५५ वर्षापासून चालू असलेल्या लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ताब्यात घेण्याच्या लढ्याला यश मिळवून दिले.
गेल्या ५५ वर्षापासून हे स्मारक राज्य सरकारच्या ताब्यात मिळावे यासाठी प्रयत्न चालू होते अखेरीस देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मनावर घेत राजकीय ताकद लावून हे स्मारक राज्य सरकारच्या ताब्यात आणले आहे.यामुळे घटनाकारांची किर्ती सातासमुद्रापारही महाराष्ट्रातील जनतेला पाहता येणार आहे. 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे शक्य झाले असे कौतुकास्पद गौरवोद्गार शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त व अमेरिकास्थित उद्योजक श्री.प्रतापनाना भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.

महात्मा गांधी विद्यालयात वृक्षारोपण


अजीजभाई शेख - राहाता - प्रतिनिधी -/ वार्ता - 
तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पंचायत समिती राहाता यांच्या वतीने अमृत वृक्ष योजने अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. 
पंचायत समितीचे बाभळेश्वर येथील केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर यांनी नुकतीच विद्यालय भेट दिली. त्यावेळी शासनाच्या अमृत वृक्ष योजनेअंतर्गत विद्यालयात केंद्रप्रमुख कानिफनाथ कोळेकर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक मेथवडे यांच्या हस्ते बदाम, लिंब, आवळा, चिंच, पिंपळ, वड आदी ३० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बाभळेश्वर प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तात्रय कोरडे, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, डॉ. शरद दुधाट, नरेंद्र ठाकरे, संजय ठाकरे, संपतराव बगाड, रवींद्रनाथ मेढे, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

ॲड.जहागीरदार यांची नोटरी असो.च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सत्कार


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता - 
महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी ऍड. हाफीज जहागीरदार यांची निवड झाली, ही निवड केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नाही, तर आपल्या कार्यतत्परतेची, प्रामाणिकपणाची आणि कायदा क्षेत्रातील योगदानाची पावती आहे.
नोटरी पब्लिक म्हणून त्यांनी अनेक वर्षे समाजाला प्रामाणिक, पारदर्शक आणि जनतेच्या हिताचे कार्य दिले आहे. कायदा हे केवळ पुस्तकांतील नियम नाही, तर न्यायाची भावना प्रत्यक्ष कृतीत उतरवणे, हे आपण आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.असे प्रतिपादन इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे उपाध्यक्ष इंजि.इकबाल सय्यद यांनी केले.
महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड शेख हाफिज एन.जहागीरदार नोटरी पब्लिक यांची निवड झाल्याबद्दल नगर शहरातील इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या पी.ए. इनामदार स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तथा सोसायटी पदाधिकाऱ्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इंजिनियर सय्यद इकबाल, आर्किटेक्ट विकार काजी, पत्रकार आबिद खान,अ‍ॅड. अरकान जहागीरदार आदी उपस्थित होते.
यावेळी आर्कि. विकार काझी म्हणाले की,आज आपल्या यशाचा सन्मान करताना, आपल्यासारख्या व्यक्तीमुळे समाजात विश्वास, शिस्त आणि न्यायाची भावना अधिक बळकट होते, हे आम्ही खात्रीने सांगू शकतो. आपल्या कार्यामुळे केवळ कायद्याचा आदर वाढत नाही, तर तरुण पिढीलाही प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची प्रेरणा मिळते असे नमुद केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ .नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, August 11, 2025

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल तर्फे रिमांड होम मध्ये रक्षाबंधन संपन्न


रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल 
तर्फे रिमांड होम मध्ये रक्षाबंधन संपन्न 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे” या उक्तीप्रमाणे आणि रोटरीचे घोषवाक्य Service Above Self सर्व्हिस अबाऊ सेल्फ यानुसार रोटरी क्लबच्या सदस्यांनी दातृत्वाचे सुंदर उदाहरण घडवले.
कार्यक्रमासाठी रो.मनोज चंगेडिया गहू गोणी ५, तेल डबा १, मुलींसाठी कॉस्मेटिक्स, मेंहदी कोन व इतर साहित्य, रो.निवृत्ती झिने खाऊ साहित्य, रो. विनोद बोरा सफरचंद पेटी, रो.राजेश परदेशी राख्या, रो. हरीश पेमदाणी एक तेल डब्याचे योगदान दिले. सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून आपली सेवा दिली.
यावेळी पीडीजी रो. शिरीष रायते सर, रो. ईश्वर बोरा, रो. विनोद बोरा, रो.निवृत्ती झिने, रो. मनोज चंगेडिया, रो. राजेश परदेशी, रो. संजय मुनोत, रो. अजय गांधी, रो. विजय जुंदरे, रो. अमृत कटारिया, रो. नरेंद्र चोरडिया, रो. सुजाता कटारिया, रो. मनीष बोरा, अँन्स नीलम परदेशी, साजरी परदेशी,रिमांड होम संस्थेचे
सचिव फातिमा मॅडम सर्व शिक्षक व मदतनीस विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरुन बोलताना रो.सुनील कटारिया यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.व म्हणाले की,हा सण फक्त भाऊ बहिणीच्या नात्याचा नाही,तर प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या वचनाचा उत्सव आहे. राखी ही फक्त दोऱ्याची गाठ नसून, मनांना जोडणारी भावनिक नाळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, शिक्षणाला प्राधान्य द्या, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा.जशी राखी जबाबदारीची जाणीव करून देते, तशीच तुम्हीही समाजात आपले स्थान निर्माण करा. रोटरी क्लब नेहमीच तुमच्या पाठीशी आहे.असे सांगितले.
मनोगत व्यक्त करतांना पीडीजी रो. शिरीष रायते सर म्हणाले की हा उपक्रम गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ रोटरी सेंट्रल सातत्याने राबवत आहे.
फातिमा मॅडम यांनी रिमांड होम संस्थेच्या वतीने रोटरी क्लबच्या सातत्यपूर्ण मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. रो.ईश्वर बोरा यांनी सर्वांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
 *वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, August 7, 2025

नोटरी असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड.शेख हाफिज एन.जहागीरदार


नोटरी असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी 
अ‍ॅड.शेख हाफिज एन.जहागीरदार

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन चे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी नोटरी पब्लीक अ‍ॅड. शेख हाफिज एन. जहागीरदार यांची नुकतीच महाराष्ट्राचे अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद सिकंदर अली, कार्याध्यक्ष अ‍ॅड. यशवंतराव खराडे, अ‍ॅड. प्रविण एच. नलावडे यांनी निवड केली असून तसे पत्र दिले आहे.
भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांचे विधी व न्याय विभागामार्फत नोटरी कायदा १९५६ मधील कलम ४ (१) प्रमाणे वकिलांमधून नोटरी यांची नियुक्ती केलेली आहे. महाराष्ट्रात अनेक नोटरी कार्यरत असुन वेगवेळ्या शासकीय कार्यालयात लागणारे प्रतिज्ञानापत्रे, करारनामे, अधिकारपत्र, मृत्युपत्र भाषांतर, सांक्षकण तसेच न्यायालयात दाखल करावयाचे प्रतिज्ञापत्रे करण्याचे काम नोटरी करतात, सदर कामे करताना नोटरी यांना त्यांचा परवाना नुतनिकरण, शासकिय स्थरावर व पोलिसांत दाखल होणारे गुन्हे व इतर अडचणीचे निवारण करणे करीता महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनची सुमारे २२ वर्षापुर्वी स्थापना झालेली आहे व सदर संस्था ही नोटरींचे न्याय हक्का करीता संघर्ष करीत आहे व त्याकरीता वेळोवेळी नोटरीं करीता मार्गदर्शन शिबिरे, मेळावे, चर्चासत्राचे आयोजन करीत आहे. दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड, पुणे येथे महाराष्ट्रातील नोटरींची ५ व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यांत आलेले आहे.
सदर परिषदे मध्ये सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती तसेच केंद्रीय कायदा मंत्री व विधि विभातील अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महाराष्ट्र उत्कृष्ट विधी तज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सदर परिषदेस जिल्ह्यातील सर्व नोटरी यांनी उपस्थित राहाण्याचे आव्हान केलेले आहे.
अ‍ॅड. शेख हाफिज एन जहागीरदार हे सन १९९६ पासुन जिल्हा न्यायालयात वकील व्यवसाय करीत आहे. सन २००७ मध्ये भारत सरकारचे विधि व न्याय विभागाने त्यांची नोटरी पब्लीक म्हणुन नियुक्ती केलेली आहे. अ‍ॅड. हाफिज जहागीरदार यांना सामाजिक चळवळीचा चांगला अनुभव आहे, त्यांनी विद्यार्थीदशे पासुन विद्यार्थी संघटना एन. एस. यु.आय चे शहर उपाध्यक्ष, विद्यार्थी कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे, तसेच विधी व्यवसाय करीत असताना अहमदनगर शहर वकिल संघटनेचे सचिव व लॉयर्स को-ऑप सोसायटीचे व्हा. चेअरमन म्हणुन पद भुषविलेले आहे. सध्या लॉयर्स को-ऑप सोसायटीचे संचालक, अमन व इन्साफ फौन्डेशनचे सचिव व हजरत पिर सरकार शाहा शरीफ दर्गाचे विश्वास्त म्हणून काम पाहात आहे अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन अ‍ॅक्ट चे मागणी करीता झालेल्या अंदोलनात देखील त्यांचा सक्रिय सहभाग होता. अ‍ॅड. हाफिज जहागीरदार यांना सामाजिक चळवळीचा दांडगा अनुभव असल्यानेच त्यांची महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यांत आली असुन त्यांचे निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनेला बळकटी मिळणार आहे. 
अ‍ॅड. हाफिज जहागीरदार यांचे निवडी मुळे जिल्ह्यातील विधी व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार गुलामकादर ✍️✅🇮🇳...
 जहागीरदार / उर्फ जी.एम.
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस  💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, August 6, 2025

पुणे मनसे विद्यार्थी सेनेचा श्वास आणि अमितसाहेब ठाकरे ह्यांचा विश्वास श्री. महेश भोईबार यांनी केल्या अनेक विद्यार्थ्यांना मोफत शालेय पिशव्या (Bag's) वाटप.


महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन
पुणे मनसे विद्यार्थी सेनेचा श्वास आणि अमितसाहेब ठाकरे ह्यांचा विश्वास श्री. महेश भोईबार यांनी केल्या अनेक विद्यार्थ्यांना मोफत शालेय पिशव्या (Bag's) वाटप.



सदर सुंदर अशा कार्यक्रमाला दस्तुरखुद्द महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तसेच पक्षाचे नेते श्री. अमित साहेब ठाकरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची अजूनच शोभा वाढविली.


उत्तम अशा दर्जाच्या बॅग मिळाल्याने अनेक चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले होते तसेच श्री. महेश भोईबार यांनी हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे पुणे शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून खूप कौतुक होत आहे.

🌹🥀🌺🌸🌷🪷❤️✅🇮🇳

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
श्री. महेश भोईबार...✍️
संपर्क क्रमांक - ८९८९१८२७२७
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google नेटवर्क...💐
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================