राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, December 14, 2025

महायुती सरकारमध्ये पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर विश्वनेते आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी


महायुती सरकारमध्ये पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर विश्वनेते आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य गोसेवा आयोगाची स्थापना तसेच गोमातेला 'राज्यमाता'चा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याचे भाग्य मला लाभले. तब्बल ३५ वर्षांनंतरची ही दीर्घकालीन मागणी पूर्ण करता आली, याचे विशेष समाधान आहे.

राज्यातील पहिल्या गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आयोगामार्फत अतिशय उत्कृष्ट आणि परिणामकारक काम सुरू असून आयोगाचा दुसरा वार्षिक अहवाल माझ्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी आयोगाच्या कार्याची दखल घेत त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोगाचे सदस्य श्री. सुनील सूर्यवंशी आणि श्री. मनीष वर्मा उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

गीत रामायणकार, थोर कवी, लेखक, साहित्यिक व गीतकार ग.दि. माडगूळकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !


गीत रामायणकार, थोर कवी, लेखक, साहित्यिक व गीतकार ग.दि. माडगूळकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

मराठी साहित्य, काव्य आणि गीतरचनेला लोकभावनेची गोडी देणाऱ्या गदिमांच्या शब्दांनी मराठी मनाला संस्कार, श्रद्धा आणि संस्कृतीचे बळ दिले. त्यांच्या अजरामर साहित्यकृती आणि गीतरामायणातून उमटलेली भावनाशीलता आजही पिढ्या‌न्पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे,!!! रेशीमबाग, नागपूर...

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग संघ कार्यालयास भेट देऊन संघाचे संस्थापक तथा पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

राष्ट्रसेवा, संघटनशक्ती आणि समाजजागृतीचा मंत्र देणाऱ्या डॉ. हेडगेवार यांच्या विचारांनी देशभरात स्वयंसेवेची प्रेरणा निर्माण केली. त्यांच्या कार्यातून घडलेली राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी आजही मार्गदर्शक ठरत आहे.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



मानवी कल्यानासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करणं प्रत्येकाचे कर्तव्य आहेत "

''' डॉ सलीम सिकंदर शेख
06 डिसेंबर 2025 रोजी पुणे, गुरुकुल सेवा भूषण पुरस्कार सोहळा गुरुकुल विश्वपीठ वडगांव शेरी पुणे येथील गुरुकुल विश्वपिठाचे कुलगुरू ईश्वरप्रिय डॉक्टर अजयचंद्र भागवत गुरुजी यांनी आयोजित केलेल्या गुरुकुल सेवा भूषण पुरस्कार ला विविध स्थरातील सामाजिक काम करणार्यांना विविध पुरस्काराणे सन्मानीत करण्यात आलं होतं..श्रीरामपूर चे प्रसिद्ध समाजसेवक डॉ सलीम सिकंदर शेख, डॉ. नितीन वाघमारे, श्री मनोहर कोलते, विजय शिवले, मिस पूर्णिमा गदीया जी, सौं लता शिंदे, सौं. निर्मला अय्यर, प्रशांत कदम व्यक्तींना सन्मान व पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.. त्याच प्रमाणे गुरुकुल विश्व पिठाचे कुलगुरू डॉ भागवत गुरुजी चा वाढदिवस ही होता, त्यांना तेथे जमलेल्या गुरुजींच्या विविध स्थरातील भक्त व विद्यार्थी नीं गुरुजींना उदंड आयुष्य च्या निरोगी शुभेच्छा ही दिल्या. तेथील वातावरण गुरुकुल मय अध्यात्मिक वातावरणात हा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला, त्या सोहळ्यात श्रीरामपूर व पुणे शहरातील असंख्य बंधू बघीनी हजर होतें श्रीरामपूर हुन इंजिनीर राजू पठाण, राजू सिकंदर शेख, ताज भाई पठाण, पुणे येथील जमात चे फरझाना बाजी, रेहाना शेख, समाजसेवक फरहान शेख, मोंटू खान, सुफियान शेख व असंख्य प्रामुख्याने उपस्थिती होतें..सत्काराला उत्तर देतांना आपल्या भाषणात डॉक्टर सलीम शेख यांनी सांगितले की.... "मनाव कल्यानासाठी सर्वांनी आप आपल्या परीने कमीत कमी काहीतरी आपल्या कडून प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहेत.."

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

लेखक डॉक्टर सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर.
, मोबाईल नं. 9271640014👍
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Thursday, December 11, 2025

महायुती सरकारच्या मागील कार्यकाळात खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत घेतलेला निर्णय अत्यंत ऐतिहासिक


- नागपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळ्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शेतकरी शिष्टमंडळासह राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेतली. महायुती सरकारच्या मागील कार्यकाळात खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत घेतलेला निर्णय अत्यंत ऐतिहासिक ठरला असून दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या, ज्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला.

तथापि, काही मुद्दे अद्याप प्रलंबित असल्याने ते यावेळी सविस्तर मांडले. यावेळी श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत या प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयासाठी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणार ! महत्त्वपूर्ण बैठक ना, राधाकृष्ण विखे पाटील


- नागपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या सिंचन सुविधांसाठी आवश्यक असलेल्या उपसा सिंचन योजनेबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष लक्षात घेऊन चौंडी येथे आयोजित मंत्रीमंडळ बैठकीत महायुती सरकारने कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व भौतिक सुविधा आणि पायाभूत संरचना निर्धारित कालावधीत उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नांची गती वाढविण्यात आली आहे. निर्णय प्रक्रियेची अंमलबजावणी वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने होऊन कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुढील कार्यवाही करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. या बैठकीस कृषी मंत्री श्री. दत्तात्रय भरणे तसेच जलसंपदा विभागाच्या कुकडी लाभक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत कयाधूशाखा कालवा आणि तळनी शाखा कालव्यांच्या दुरुस्तीसाठीदुरुस्तीकरिता तयार करण्यात आलेल्या आराखड्याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.मंत्री, ना. राधाकृष्ण विखे पाटील


- नागपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत कयाधू शाखा कालवा आणि तळनी शाखा कालव्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात विधानभवनातील दालनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी वितरीका व कालव्यांच्या दुरुस्तीकरिता तयार करण्यात आलेल्या आराखड्याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.


यासोबतच आवश्यक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बैठकीदरम्यान दिले. या बैठकीस आमदार श्री. बाबुराव कदम कोहळीकर, जलसंपदा विभागाचे डॉ. संजय बेलसरे, तसेच गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष तिरयनवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




Tuesday, December 9, 2025

मंत्री ना, राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृष्णा खोरे पूर नियंत्रण प्रकल्पांतर्गत कामांचा आढावा !


कृष्णा खोरे पूर नियंत्रण प्रकल्पाच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, आतापर्यंत झालेली प्रगती आणि पुढील टप्प्यात करावयाची कामे यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

यासोबतच नाबार्डच्या सहकार्याने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रक्रियेचेही परीक्षण करण्यात आले. जलसंपत्तीचा योग्य वापर, प्रलंबित कामांची गती आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. दीपक कपूर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


शेडगाव येथील लहानगा श्रीराज फड याच्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून तो गंभीर जखमी झाला होता. खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्वरित प्रतिकारामुळे श्रीराजचा जीव वाचला

शेडगाव येथील लहानगा श्रीराज फड याच्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून तो गंभीर जखमी झाला होता. या भीषण प्रसंगात श्रीराजच्या आईने आणि आजीने दाखवलेले अद्भुत धैर्य खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्वरित प्रतिकारामुळे श्रीराजचा जीव वाचला, हा त्यांच्या साहसाचा मोठा पुरावा आहे.


दवाखान्यातील उपचारानंतर श्रीराज आता सुखरूप घरी परतला असून, आज त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच, श्रीराजच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पुढील काळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वन विभागाकडून मदतीचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी श्रीराज लवकर पूर्णपणे ठणठणीत बरा व्हावा, ही सदिच्छा व्यक्त केली. तसेच, याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


श्री म्हसोबा महाराजांच्या पारंपरिक यात्रोत्सवाचा प्रारंभ लोणी बुद्रुक


- लोणी - प्रतिनिधी -/ वार्ता -
आपल्या लोणी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांचा पारंपरिक यात्रोत्सव आजपासून मोठ्या भक्तिभावाने सुरू झाला. या पवित्र उत्सवाच्या प्रारंभी सपत्निक उपस्थित राहून श्री म्हसोबा महाराजांची महाआरती केली तसेच, श्रींचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेतले. यासोबतच लोणी बुद्रुकसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

श्री महाभिषेकाने यात्रेची सुरुवात करण्यात आली असून, लोणीतील ग्रामस्थ एकजुटीने हा उत्सव दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा करतात. संपूर्ण राज्यातून येणारे भाविक येथे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबासाठी श्रींच्या चरणी मंगलकामना व्यक्त करतात.



=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================






मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या श्रीमंत राजकुमारी मृणालीराजे आणि श्रीमंत पृथ्वीराज देशमुख यांचे चि. श्रीमंत रविराज यांचा विवाह समारंभ संपन्न होत आहे.


- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
माझे सहकारी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या श्रीमंत राजकुमारी मृणालीराजे आणि श्रीमंत पृथ्वीराज देशमुख यांचे चि. श्रीमंत रविराज यांचा विवाह समारंभ संपन्न होत आहे.

या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच, नववधू-वरांस भावी वैवाहिक जीवनात सुख, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्य लाभो, ही प्रार्थना आई अंबाबाईच्या चरणी केली.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Wednesday, December 3, 2025

नागपूर हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान होणार -

- मुंबई - प्रतिनिधी - वार्ता -
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज विधानसभेचे अध्यक्ष मा.श्री. राहुलजी नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत अधिवेशनातील कामकाजाचे स्वरूप, प्रस्तावित विषय आणि पुढील प्रक्रिया याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत दि. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत नागपूर अधिवेशन घेण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच, अधिवेशनातील सर्व महत्त्वाचे विषय सुरळीतरीत्या पार पडावेत, यासाठी आवश्यक नियोजनावरही यावेळी शिक्कामोर्तब करण्यात आले.

या बैठकीस मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार तसेच कामकाज सल्लागार समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Tuesday, December 2, 2025

शिर्डीत भाजपा-महायुतीच्या समर्थनार्थ जनसागर...शिर्डी उमाटलं


शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस असून, यानिमित्ताने भाजपा-महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ शहरातून भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीने संपूर्ण शिर्डी शहर उत्साहाने दुमदुमून गेले.



शिर्डीकरांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देऊन भाजपा-महायुतीवर विश्वास दाखवला आहे. यंदाच्या निवडणुकीतही शिर्डीकरांचा भरभरून प्रतिसाद पाहून प्रचंड महाविजयाचा संकल्प अधिक दृढ झाला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे.

शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महायुती कटिबद्ध असून, यावेळी उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Monday, December 1, 2025

श्रीरामपूरमध्ये उबाठा गटाचा मोठा राजकीय धक्का डॉ. महेश शिरसागर यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश


श्रीरामपूर (प्रतिनिधी) वार्ता – तालुक्यातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी महत्त्वपूर्ण राजकीय घटना काल घडली. उबाठा गटाचे उत्तर महाराष्ट्रातील शिव आरोग्य सेना प्रमुख म्हणून ओळख असलेले आणि सामाजिक उपक्रमांमुळे तालुक्यात विशेष लोकप्रियता मिळवलेले डॉ. महेश शिरसागर यांनी काल भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला हा प्रवेश सोहळा केवळ मोठ्या उत्साहातच नाही, तर भविष्यातील राजकीय ध्रुवीकरणाचे संकेत देणारा ठरला.

 श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नामदार विखे पाटील हे श्रीरामपूर दौऱ्यावर असताना हा पक्ष प्रवेश करण्यात आला डॉ. महेश शिरसागर यांनी शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून तालुक्यात रुग्णसेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, सामाजिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय सेवा हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य नेहमीच चर्चेत राहिले. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यावेळी बोलताना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “श्रीरामपूरचा विकास, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांमध्ये हा प्रवेश निर्णायक ठरेल. युवकांना नेतृत्व मिळावे आणि सामाजिक कार्याला दिशा मिळावी, या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. भाजपच्या माध्यमातून श्रीरामपूरचा विकास अधिक वेगाने होईल.”

दरम्यान डॉ. शिरसागर यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “ही केवळ राजकीय पायरी नाही तर समाजसेवेच्या कार्याला नवा आयाम देण्याचे पाऊल आहे. जनतेच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूनेच मी प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात विविध चर्चांना चांगलीच उधाण आले आहे. आगामी निवडणुका, नगरपालिकेतील सत्ताकारण आणि विविध गट-तटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिरसागर यांचे पक्षप्रवेश हे प्रस्थापित राजकीय घटकांसाठी धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर लगेचच शहरात चर्चा वाढली असून, “श्रीरामपूर आता नव्या राजकीय पर्वाकडे वाटचाल करत आहे,” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकीय वातावरणात बदलाचे संकेत देणाऱ्या या घटनाक्रमामुळे श्रीरामपूरचे राजकारण अधिक रंगतदार आणि स्पर्धात्मक होणार हे निश्चित!

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================