राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, February 4, 2023

मुंबई : अतिरिक्त अधिकारी मुख्ये सचिवसह मंत्रालयात सनदी झाले ?

    ( मुंबई ) - वार्ता - भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९२ च्या तुकडीतील सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पदोन्नती मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या संदर्भातील आदेश जारी केले.
विभागाचे मिलिंद म्हैसकर,
राजशिष्टाचार विभागाच्या मनीषा
आर्थिक विकास महामंडळाचे
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये वित्त विभागाचे ओम प्रकाश गुप्ता, नियोजन विभागाचे राजगोपाल देवरा, राज्य उत्पादन शुल्क पाटणकर- म्हैसकर, महात्मा फुले व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सीमा व्यास यांचा समावेश आहे. पदोन्नती मिळण्यापूर्वी हे अधिकारी प्रधान सचिव पदावर कार्यरत होते. १९९२ च्या तुकडीतील सनदी
अधिकाऱ्यांची अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पदोन्नती अडली असून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी सनदी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गेल्या महिन्यात भेटून केली होती. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्वतः त्यासाठी पुढाकार घेतला होता. आता १९९३ च्या तुकडीतील तीन सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पदोन्नती द्यावी अशी मागणी आहे. त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता करण्यात येणार आहे.



पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी.टी.तृतीयपंथीयांसाठी देशातला विशेष कक्ष रुग्णालयात कार्यान्वित ?

( मुंबई ) - वार्ता - तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. 'सबका साथ, सबका विकास' संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मंबईतील जी. टी.
रुग्णालयात कार्यानि  तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. 'सबका साथ, सबका विकास' संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मंबईतील जी. टी.
रुग्णालयात कार्यानि  वैद्यकीय शिक्षण शिक्षण
आतापर्यंत राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयात भरती होत असताना केस पेपरवर महिला किंवा पुरुष असे दोनच रकाने असायचे आता तृतीयपंथी हा नवीन रकाना असणार असल्याचे या कार्यक्रमादरम्यान प्रस्ताविकात डॉ. सापळे यांनी सांगितले. 
आणि कामा हॉस्पीटल येथेही विशेष कक्ष सुरु करण्यात येईल. जे.जे.रुग्णालयात आजपासून व्यसनोपचार केंद्र सुरु करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी उपचार, समुपदेशन तसेच पुनर्वसनाची गरज असते. आजपासून हे व्यसनोपचार केंद्र कार्यान्वित झाले असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
राज्यातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येणार आहे. सध्या 13 जिल्ह्यांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात सक्षम वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करणे यावर भर असणार असल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
कमी वेळात अत्यंत मेहनतीने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी हा विशेष कक्ष सुरु केल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना मंत्री श्री. महाजन म्हणाले की, तृतीयपंथीयांच्या अनेक वैद्यकीय समस्या होत्या, या समस्या सोडवून या घटकाला चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या दृष्टीकोनातून 30 खाटांचा विशेष कक्ष आजपासून जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. आतापर्यंत तृतीयपंथीयाना पुरुष किंवा महिला कक्षात भरती करायचे हा प्रश्न असायचा, मात्र आता हा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या विशेष कक्षात तृतीयपंथीयांवर शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार केले जाणार आहे.
ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये संलग्नित गोकुळदास तेजपाल रुग्णालय येथे तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष आणि व्यसनोपचार केंद्राचे ई उद्घाटन आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सर. ज. जी. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, डॉ. भालचंद्र चिखलकर, गौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्षाबाबतच्या मार्गदर्शन सूचना पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.



Friday, February 3, 2023

विधीमंडळ आणि मंत्रालयात वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्षपदी महेश पवार तर कार्यवाहीपदी प्रविण पुरो ?

( मुंबई ) - वार्ता - मंत्रालय आणि विधिमंडळ वर्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी मुंबई लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी 'टीव्ही ९'चे पत्रकार महेश पवार (५८ मते) तर कार्यवाह पदी 'रायगड टुडे'चे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्ष पदी 'भास्कर'चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते) यांची निवड करण्यात आली. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुकीत १५९ सदस्यांनी मतदान केले. अध्यक्ष पदासाठी प्रमोद डोईफोडे आणि राजा अदाटे यांच्यात लढत झाली. प्रमोद डोईफोडे हे ७८ मतांनी विजयी झाले. कोषाध्यक्ष पदी 'भास्कर'चे पत्रकार विनोद यादव हे ६७ मतांनी निवडून आले. कार्यकारीणीवर 'इंडियन एक्स्प्रेस' चे पत्रकार अलोक देशपांडे (७१मते), 'लोकमत' चे पत्रकार मनोज मोघे (६८मते), 'लोकशाही' कमलाकर वाणी (६१ मते), दै. 'सांज महानगरी' चे पत्रकार खंडूराज गायकवाड (५९ मते), 'डेक्कन क्रॉनिकल'चे भगवान परब (५८ मते) निवडून आले. दर दोन वर्षांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक होते. प्रमोद डोईफोडे यांनी यापूर्वी उपाध्यक्ष, कार्यवाह म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. जेष्ठ पत्रकार राजन पारकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम प्रक्रिया राबविलेली आहे 


भूमी अभिलेख अधिकारी 50 हजार ची लाच घेताना ( अँन्टी करप्शन ब्युरो ) लाच लुचपत पथकाने ने पकडले ?



( नाशिक ) - वार्ता - पोलीसनामा ऑनलाइन – शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची चूक दुरुस्त करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक (Superintendent of Land Records) महेशकुमार महादेव शिंदे (Mahesh  आणि लिपिक अमोल भीमराव महाजन यांना 50 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने ही  मंगळवारी (दि.31 जानेवारी) शिंदे यांच्या कार्यालयीन दालनात कारवाई दाखल केली.
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची चूक दुरुस्त करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाचा अधीक्षक (Superintendent of Land Records) महेशकुमार महादेव शिंदे आणि लिपिक अमोल भीमराव महाजन  यांना 50 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. नाशिक एसीबीच्या  पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि.31 जानेवारी) शिंदे यांच्या कार्यालयीन दालनात केली.
याबाबत तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) लेखी तक्रार केली आहे. तक्रारादार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेत जमिनीचा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना 12 मध्ये लिखाण प्रमादाची चूक झाली होती. ही चूक दुरुस्तीचे आदेश देण्यासाठी महेशकुमार शिंदे यांनी 1 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती एक लाख रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पथकाने पडताळणी केली. त्यावेळी भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 80 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 1 लाख रुपये लाच मागतिली. त्यापैकी 50 हजार रुपये लाच घेताना शिंदे यांना त्यांच्या दालनात रंगेहात पकडण्यात आले. तर लिपीक अमोल महाजन याने तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहित केले. दोघांविरुद्ध बुधवारी (दि.1 फेब्रुवारी) सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक गायत्री जाधव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर 
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे 
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीच्या पथकाने कारवाई केली.


Wednesday, February 1, 2023

अर्थसंकल्पातून आकड्यांचा संख्या वारी मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची फक्त जुमलेबाजी नेहमीप्रमाणे तेच ते असल्याची टीपणी श्री छगन श्रभुजबळ कडून ?


( मुंबई ) - ANI - News - Ajancy - सेवा (Nashik) केंद्रीय अर्थमंत्री (Centre) निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी मोदी सरकारच्या (Narendra Modi) कार्यकाळातील नववा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. तो आगामी लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ जुमला आहे. यंदाचा  तेच ते अर्थसंकल्प हा फक्त आकड्यांचा धूर आहे. त्यातून सर्वसामान्यांच्या हाताला काहीच लागणार नाही, अशी टिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. (Ordinery class people nothing get from centre`s this budget)
श्री. भुजबळ म्हणाले, मागील काही वर्षात अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांचे नेमके काय परिणाम कारक प्रगतीशील घडलं याचं उत्तर अनुत्तरीत आहे. मोदी सरकारकडून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे जुमलेबाजी कायम आहे.
एकीकडे देशाचा अर्थसंकल्प मांडला जात असतांना नुकताच इंडियन बर्ग या संस्थेने अदानी समुहाबाबत संशोधनात्मक विश्लेषण केले आहे. त्यानंतर लगेचच अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली. या अदानी समूहाला एलआयसी सारख्या शासकीय संस्थांनी अर्थसहाय केलं आहे. शासकीय उपक्रमांनी खाजगी उद्योगांना सहाय केल्यामुळे हे खाजगी उद्योग डुबले तर या शासकीय संस्थाचे मोठं नुकसान होणार आहे. चुकीचे निर्णय घेतले तर ज्याप्रमाणे दिवाळखोरीमुळे श्रीलंकेची परिस्थिती झाली त्याप्रमाणे आपली परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केवळ अर्थसंकल्पाचे रक्कम फुगवून दाखवत येणार नाही.





Tuesday, January 31, 2023

खडी ने भरल्याले ढम्पर अवैध वाहतूक करीत अस्थांना गौण खनिजासह १० लाखांचा मुद्देमाल जप्त राहुरी ?



 ( राहुरी ) - वार्ता - अवैध गौण खनिजासह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे पोलिस पथकाने (दि. २२) जानेवारी रोजी अवैध खड़ी वाहत असलेल्या ढंपरवर कारवाई केली. १० लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(दि. २२) जानेवारी रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या आदेशानुसार पो. ह. जानकीराम खेमनर, पो. ना. अविनाश सिताराम दुधाडे, रामनाथ सानप यांनी राहुरी तालुक्यातील ताहाराबाद रोडवर गडधे आखाडा परिसरात ढंपर (क्र. एम एच १६ सी सी १७७४) याच्यामध्ये शासनाच्या
मालकीची खडी चोरून नेताना कारवाई केली. पोलिस पथकाने ढंपर चालकाकडे खडी वाहतूकीचा परवानाबाबत विचारणा केली असता, कोणताही परवाना नसल्याचे दिसले. पोलिस पथकाने १० लाख रूपयांचा ढंपर व १५ हजार रुपए किमतीची ३ ब्रास खडी असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पो. ना. अविनाश दुधाडे यांच्या फिर्यादीवरून ढंपर चालक सचिन कोळेकर (रा. राहुरी बुद्रुक, ता. राहुरी) याच्याविरोधात गुन्हा रजि नं. ८४ / २०२३ भादंवि कलम ३७९ पर्यावरण संरक्षण अधिनियम १५, ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरदार अमरिंदर सिंह यांची बहुतेक महाराष्ट्राच्या राज्येपाल पदी नियुक्ती होण्याची शक्यता ?

( नवि दिल्ली ) - ANI News Ejancy - विशेष वार्ता - राज्यात २०१९ साली महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून ते सत्तांतर होऊन शिंदे - फडणवीस सरकारची प्रतिष्ठापना होईपर्यंत कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी राज्यपाल पदावरुन पायउतार होऊ शकतात. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात भगतसिंह कोश्यारी यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. मला आयुष्यातील उर्वरित काळ मनन आणि चिंतन करण्यात घालवायचा आहे. त्यामुळे मला राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती.                                     पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्याराज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.                               
 कारण त्यांचा राजकीय ज्ञान फार अनुभवी असल्यामुळे केंद्रीय राजकारणात चळवळ असल्याने महाराष्ट्र च्या राज्येपाल पदी त्यांचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे 
तशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरुन आपल्याला पदमुक्त करण्यात यावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यानंतर आता जर कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यास पुढचे राज्यपाल कोण याबाबत चर्चा सुरु झाली. यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची राज्यपालपदी नियुक्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. मात्र याची पुष्टी कुणाकडूनही झालेली नाही आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून आलेल्या या बड्या नेत्याचे राजकीय पुनवर्सन करण्याचा हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे. भाजपा नेत्या सुमित्रा महाजन या राज्याच्या नव्या राज्यपाल होणार असल्याची माहिती आली होती. परंतु त्यांचे नाव मागे पडले आहे. आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं नाव समोर आले आहे.