राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, February 9, 2023

गोंधवणी पुलाजवळील रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा : अजहर शेख ?

( श्रीरामपूर ) - आजहर शेख - यांची मागणी गोंधवणी पुलाजवळील रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा : अजहर शेख (एबीएस)
श्रीरामपूर : (इम्रान शेख प्रतिनिधी) शहरातील वाढती रहदारीमुळे रस्ते वारंवार खराब होणे, ड्रेनेज फुटणे, पावसाळ्यात पाणी साचणे इत्यादी समस्या उद्भवत असतात. श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील गोंधवणी रोड पुलाजवळील प्रभाग १ व १२ कडे जाणारा सुमारे १०० मीटर पर्यंतचा मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावेत, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अँड अँटी करप्शन ब्युरोचे महाराष्ट्र अध्यक्ष अजहर शेख यांनी केली आहे.   
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी सदर ठिकाणी झाडे लावा आंदोलन करून श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आलेले होते. तरी देखील अद्याप पर्यंत कोणतेही काम झालेले नाही. परिसरातील नागरिकांची वारंवार तक्रार येत असून मुख्य रस्ता असल्याने सतत रहदारी व वर्दळ सुरु राहते. तसेच कायम त्याठिकाणी रस्ता खराब होत असल्याने अपघात घडणे, पावसाळ्यात पाणी साचणे, पाटाचे पाणी पाझरणे इत्यादी समस्या उद्भवत आहे. सध्या त्याठिकाणी गटाराचे काम चालू झाल्याने आणखी रस्ता फुटत चाललेला आहे.
 सदरचा रस्ता फक्त १०० मीटर पर्यंत असल्याने प्रशासन नेहमी दुर्लक्ष करीत आहे. याबाबत वारंवार लेखी व तोंडी निवेदन देण्यात आलेले आहे. तरी या कामामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेता अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे यासाठी लेखी निवेदन देखील पाठविण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी काहीही अपघात घडल्यास किंवा येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम सुरु न केल्यास राज्य सरकारच्या विरोधात नागरीकासमवेत रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा अजहर शेख यांनी दिला आहे. 
यावेळी निवेदन देताना अल्तमश शेख, सौरभ जाधव, फैजान बागवान, नरेंद्र लोंढे, मोईज पठाण, सामाजिक कार्यकर्ते तौफिक शेख, राष्ट्रीय मानवाधिकारचे जिल्हाध्यक्ष जमीर पिंजारी, नोमान शेख, धीरज पवार, फरदीन शेख, बिलाल काकर, फरदीन शेख, प्रशांत मिसाळ, वैभव शेळके आदि उपस्थित होते.

Wednesday, February 8, 2023

NHAI भर्ती 2023: पोस्ट, पात्रता आणि इतर महत्त्वाचे विषय : तपासा भरती करता माहिती ?


( नवि दिल्ली ) - प्रतिनिधी - NHAI भर्ती 2023: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण () प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक-वित्त आणि लेखा व्यवस्थापक – महामार्ग देखभाल, व्यवस्थापक-HR आणि प्रशासन, सहाय्यक व्यवस्थापक- प्रशासन, उपव्यवस्थापक-वाणिज्यिक आणि कंत्राटी आणि लेखापाल पदांसाठी पात्र उमेदवार शोधत आहे. . इच्छुक उमेदवारांनी नोकरीच्या वर्णनाचे पुनरावलोकन करावे आणि अधिकृत अधिसूचनेमध्ये प्रदान केलेल्या दुव्याचा वापर करून अर्ज करावा. विविध पदांसाठी एकूण 10 जागा रिक्त आहेत.
अधिसूचनेनुसार, हायवेज/रोड सेक्टर कंपनीमध्ये BE/B.Tech सिव्हिल, किमान 3 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2023 (संध्याकाळी 06.00 पर्यंत) आहे. उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी नोकरीच्या पोस्टसाठी अर्ज करण्याची विनंती केली जाते. विहित वेळ/तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही
NHAI भर्ती 2023: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण () प्रकल्प व्यवस्थापक, व्यवस्थापक-वित्त आणि लेखा व्यवस्थापक – महामार्ग देखभाल, व्यवस्थापक-HR आणि प्रशासन, सहाय्यक व्यवस्थापक- प्रशासन, उपव्यवस्थापक-वाणिज्यिक आणि कंत्राटी आणि लेखापाल पदांसाठी पात्र उमेदवार शोधत आहे. . इच्छुक उमेदवारांनी नोकरीच्या वर्णनाचे पुनरावलोकन करावे
आणि अधिकृत अधिसूचनेमध्ये प्लेल्या दुव्याचा वापर करून अर्ज करावा. विविध पदांसाठी एकूण 10 जागा रिक्त आहेत.अधिसूचनेनुसार, हायवेज/रोड सेक्टर कंपनीमध्ये BE/B.Tech सिव्हिल, किमान 3 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2023 (संध्याकाळी 06.00 पर्यंत) आहे. उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी नोकरीच्या पोस्टसाठी अर्ज करण्याची विनंती केली जाते. विहित वेळ/तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही      तसेच हे पण वाचा
THDCIL भर्ती 2023: चेक पोस्ट, पात्रता आणि इतर महत्त्वपूर्ण तपशील                                           NHAI भरती 2023 साठी वेतन

NHAI भर्ती 2023 साठी पगारानंतरचे तपशील खाली दिले आहेत:

1. प्रकल्प व्यवस्थापक: निवडलेल्या उमेदवाराला पे बँड-15600-39100 ग्रेड पे-6600 वर नियुक्त केले जाईल.

2. व्यवस्थापक-वित्त आणि खाती: निवडलेल्या उमेदवाराला पे बँड-15600-39100 ग्रेड पे-6600 वर नियुक्त केले जाईल.

3. व्यवस्थापक – महामार्ग देखभाल: दिलेल्या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला पे बँड-15600-39100 ग्रेड पे-6600 दिले जाईल.

4. व्यवस्थापक-HR आणि प्रशासन: दिलेल्या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला पे बँड-15600-39100 ग्रेड पे-6600 मध्ये नियुक्त केले जाईल.

5. सहाय्यक व्यवस्थापक- प्रशासन: निवडलेल्या उमेदवाराला पे बँड-9300-34800 ग्रेड पे-4800 वर नियुक्त केले जाईल.

6. उपव्यवस्थापक-व्यावसायिक आणि करार: निवडलेल्या उमेदवाराला पे बँड-9300-34800 ग्रेड पे-5400 वर नियुक्त केले जाईल.

7. अकाउंटंट: निवडलेल्या उमेदवाराला पे बँड-5200-20200 ग्रेड पे-2800 वर नियुक्त केले जाईल.

तसेच वाचा

PPSC भर्ती 2023: पगार रु. 215900, चेक पोस्ट, पात्रता आणि इतर तपशील

NHAI भरती 2023 साठी वयोमर्यादा:
NHAI भरती 2023 साठी वयोमर्यादा खाली नमूद केली
आहे.

व्स्थपक-वित्त आणि लेखा, व्यवस्थापक – महामार्ग देखभाल, व्यवस्थापक-एचआर आणि प्रशासन, सहाय्यक व्यवस्थापक- प्रशासन आणि उपव्यवस्थापक-व्यावसायिक आणि कराराच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे.

2. प्रकल्प व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे.

3. लेखापाल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

NHAI भर्ती 2023 साठी अर्ज कसा करावा:

इच्छुक उमेदवार ज्यांना NHAI भर्ती 2023 च्या अधिसूचनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी कृपया तुमचा अर्ज संबंधित कागदपत्रे/गुणपत्रिका/अनुभव प्रमाणपत्र आणि वर्तमान मोबदला तपशीलांसह संलग्न नमुन्यात hr.nhipmpl@nhai.org वर विषय ओळीसह पाठवू शकतात. पदाचे नाव)”. विषयाशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2023 (संध्याकाळी 06.00 पर्यंत) असेल.


Tuesday, February 7, 2023

श्री बाळासाहेब थोरात महिनाभर टीव्हीसमोर का आले नाहीत याचा अर्थ जेकाही झालं ते नियोजित पूर्ण सुजय विखे पाटील



( नाशिक )- वार्ता - नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे  यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर त्यांचे मामा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे हाताचा ऑपरेशन झाले. ते विश्रांती करत होते. त्यांनी राजकारणात प्रत्यक्ष कोणताही सहभाग घेतला चे दिसत नाही. ते महिनाभार काहीच का बोलले नाही, यावरून आता विरोधक त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. खासदार सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली आहे.

श्री.थोरात महिनाभर कुठलेच टीव्ही च्यांनल समोर का आले नाहीत ?

साधारण  एक महिना बाळासाहेब थोरात राजकारणावर काहीच भाष्य करत नाहीत. मुलाकात देत नव्हते याचा अर्थ जेकाही झालं ते थोरात यांच्या संमतीनं झालं. सुजय विखे पाटील म्हणाले, बाळासाहेब थोरात हे एक महिना टीव्हीसमोर येऊ शकले नाही. याचा खुलासा त्यांनी करायला हवा”, असे सुजय विखे पाटील म्हणाले आहेत.                        सुजय विखे पाटलांचा रोचक टोचक    बोलणं.                                       जर कोणी व्यक्ती आजारी असताना बोलूच शकत नाही, असं नाही. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असेल तर तो सर्वांसाठी असावा. एक महिना राजकारणावर काहीचं भाष्य करत नाही. याचा अर्थ सत्यजीत तांबे यांच्याबाबत जी काही प्रक्रिया घडली आहे ती त्यांच्या संमतीनं घडली आहे. हे कुठही नाकारून चालणार नाही”, असा चुमटाही सुजय विखे पाटील यांनी घेतला आहे.




महाराज बाबा जी बलविंदर सिंग जी यांना राष्ट्रीय सेवारत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ?

(नांदेड) - वार्ता - अर्धापूर : जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा नांदेड येथे अखंड लंगर सेवा देऊन उल्लेखनीय काम क करीत असल्याबद्दल संत बाबा बलविंदर सिंग महाराज यांचा शांतिदूत परिवाराच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय सेवा रत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन शांतिदूत परिवार व क आयएएस अकादमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर व स्पर्धा मार्गदर्शन शिबिरामध्ये मंगळवार दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी नरहर
अर्धापूर.सचखंड गुरुद्वारा नांदेड येथे अखंड लंगर सेवा देऊन उल्लेखनीय काम क करीत असल्याबद्दल संत बाबा बलविंदर सिंग
महाराज यांचा शांतिदूत परिवाराच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय सेवा रत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन शांतिदूत परिवार व क आयएएस अकादमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर व स्पर्धा मार्गदर्शन शिबिरामध्ये मंगळवार दिनांक ३१ जानेवारी २०२३ रोजी नरहर येथे संपन्न केले.

( भगवंत सिंग प्रितम सिंग बत्रा )



Monday, February 6, 2023

लाकडी दांडक्याने व कोयत्याने राडा नगर-पुणे रस्त्यावर दहशत सुपा येथे दोन तरुणांना मारहाण,पानटपरीची तोडफोड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल ?

( अह,नगर ) प्रतिनिधी नगर - पुणे रस्त्यावर दहशत सुपा येथे दोन तरुणांना मारहाण : पानटपरीची तोडफोड; गुन्हा दाखल
 सुपा. नगर-पुणे रस्त्यावरील सुपा परिसरात काही तरुणांनी कोयता, लाकडी दांडक्याने राडा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दोघा युवकांना काही तरुणांनी रविवारी (दि.५) मध्यरात्री दीडच्या सुमारास मारहाण केली. अहोरात्र वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या गावातच गुन्हेगारीने लक्षण वर काढण्यास सुरुवात केल्याने जनसामान्यांच्या संरक्षणाचा शांतता भंग झाल्याचा विषय : निर्माण झाले आहे.
काही तरुणांनी कोयता व लाकडी दांडके घेऊन शिवीगाळ करत दोन युवकांना मारहाण करत जखमी केले.
 त्यांनी आरडाओरडा केल्याने इतर लोक जमा होऊ लागल्यावर मारहाण करणारे दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने पळून गेले. याबाबत समीर सय्यद (रा. सुपा) याने सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली 
नगर-पुणे रस्त्यावरील दरवेश हॉटेलजवळ असणाऱ्या पान दुकानाजवळ काही तरुण थांबले होते.
ते तेथे जवळच लघुशंका करू लागले. तेव्हा पान दुकानावरील समीर सय्यद याने त्यांना 'तुम्ही येथे लघुशंका करू नका, येथे समाजमंदिर आहे' असे सांगितले. यावरून ते तरुण व स्थानिक युवकांत तोल बोल झाल. त्यावेळी तो कैफ मण्यार नावाचा तरुण शिवीगाळ करत पुण्याच्या दिशेने निघून गेला. अर्ध्या तासाने कैफ मण्यार सहकाऱ्यांसह तेथे आला. त्यांच्या हातात कोयता व लाकडी दांडके होते. त्यांनी पान दुकानाची तोडफोड केली. दुकानातील समीर सय्यद व साजीद शेख यांना लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करून जखमी केले. 
समीर व साजीदच्या आवाजाने जवळचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर मारहाण करणारे पळून गेले. जखमी साजीद शेख यास उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
कैफ मण्यार व इतर ५ ते ६ जणांविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लाचखोर कृषी अधिकारी औरंगाबाद येथे एसीबी चे पथक ने रंगेहात पकडला ?

( औरंगाबाद ) - वार्ता - निवेदक, तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता व कृषी दुकानाचा मासिक तपासणीचा अनुकूल अहवाल कृषी अधीक्षक यांना पाठवण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रूपयांची मागणी करून ४ हजार रूपये लाच स्विकारणाऱ्या खुलताबाद पंचायत समितीच्या लाचखोर कृषी लाचखोर कृषी अधिकाऱ्याला अँटी.करप्शन - ब्येरो - विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अशोक रघुनाथ खेडकर (५०) असे लाचखोर कृषी अधिकाऱ्याचे नाव होती.असून त्यांच्याकडे औरंगाबाद पंचायत समिती कार्यालयाचा अतिरिक्त कारभार आहे. तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्र असून या कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता व कृषी दुकानाचा मासिक तपासणीचा अनुकूल अहवाल कृषी अधीक्षक यांना पाठवण्यासाठी तक्रारदार यांनी कृषी अधिकारी अशोक खेडकर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी ५ हजार रूपये लाच देण्याची मागणी करीत सदर प्रकरणात कारवाई दाखल केली.



Sunday, February 5, 2023

, एसटीचा वाहन चालक तळीराम निघाला प्रवाशांनी भरलेली बस साईडला लावून धाब्यावर मध्येधुंद अवस्था करायला ?

( उस्मानाबाद ) - वार्ता - तल्लफ लागली दारू पिण्याची आल्यानं वाहकानं एसटी बस अचानक रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर तो दारू पिण्यासाठी एका धाब्यावर गेला. त्यामुळे प्रवासी दोन तास अडकून पडले. एसटी वाहकामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.
लातूर - लातूरहून कळंबला निघालेल्या बसच्या वाहकाला दारु पिण्याची तल्लफ आली. त्यानंतर त्यानं प्रवाशांनी
खचाखच भरलेली गाडी बाजूला लावली आणि दारू पिण्यासाठी धाब्यावर गेला. प्रवासी मात्र तब्बल दोन तास ताटकळत बसले. अखेर प्रवाशांनी दारूच्या गुत्त्यावर जाऊन वाहकाची गचांडी धरली आणि बस पुढे निघाली. ही घटना घडली लातूरपासून जवळच असलेल्या  वारेगाव  येथे घडली.
अखेर प्रवाशांनी बसमधून उतरून ग्रामस्थांकडे विचारपूस केली. तेव्हा कुठं वाहकाचा प्रताप कळला. हा वाहक गेल्या तीन दिवसांपासून अशाच प्रकारे बस साईडला लावून जवळच्या दारूच्या गुत्त्यावर दारू प्यायला जात असल्याचं प्रवाशांना समजलं आणि त्यांचा संताप अनावर झाला.
ग्रामस्थांच्या मदतीनं प्रवाशी थेट दारूच्या धाब्यावर पोहोचले. वाहकाला जाब विचारताच, 'माझ्या फोनची बॅटरी उतरली म्हणून आलो चार्ज करायला असं सांगू लागला. संतापलेल्या प्रवाशांनी त्याची गचांडी धरली आणि बसकडे आणले. तेव्हा कुठे चालकाने बस पुढे नेली. बेवड्या वाहन चालका मुळे प्रवाशांना तब्बल दोन ते अडीच तास उशीर झाला. तर काही प्रवाशांना तिकीट काढूनही दुसऱ्या वाहनाने जावे लागल्यानं आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.
सर्व एस टी महामंडळ च्या नियम शोभेल असें खरंच धाब्यावर बसून उल्लंघणं करून शिस्थ भंगकेल्याचनिदर्शनास प्रवाश्याना स्पष्ट दिसलें  स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सेवा देण्याचा तसेच एसटीच्या सुस्थितीची आणि चालक-वाहकाच्या 'नो ड्रिंक'चा एसटी महामंडळाचा दावा यामुळे फेल गेला आहे. आता एसटी महामंडळ या वाहन चालकावर काही कारवाई करणार का असा विषय प्रकार उत्पन्न होत आहे.