राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, April 11, 2023

बॅटऱ्या चोरणारे B S N L चे तिघांना गजाआड ठोकल्या हातकड्या नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेक्षण (LCB) फ्लाईंग स्कॉड पथक्काची सक्षम कारवाई ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता - अकबर - शेख 
राहाता परिसरात तालुक्यातील रांजणगाव खुर्द येथील भारत संचार निगम लिमिटेड टेलीफोन एक्सचेंज मधील बॅटरी चोरी करून त्याची विक्री श्रीरामपूर येथे करीत असताना तिन आरोपींना नगर येथील गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून जवळ पास १६ बँटऱ्या आणि पिकअप वाहन अशा एकुण ५ लाख २५ ह०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रीरामपुरात चोरीचा माल घेणारे केंद्र
नगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून चोरलेले भंगारासह आदी साहित्यांची श्रीरामपुरात खुलेआम खरेदी केली जात आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती
असूनही ते याकडे कानाडोळ करीत आहेत. चोरीचा माल विकत घेणाऱ्यांवर पोलिसांना कारवाई करण्याची मागणी होत आहे.
योगेश चंद्रकांत झाडीकर (वय ३८, धंदा नोकरी, रा. बीएसएनएल स्टाफ क्वॉर्टर, ता. राहाता) यांचे गणेशनगर जिल्हा परिषद शाळेसमोर, रांजणगाव (ता. राहाता) येथे असलेले बीएसएनएल टेलीफोन एक्सचेंजचे खोलीचा कडी-कोयडा तोडून आत प्रवेश करून खोलीतील २५ हजार ६०० रुपये किंमतीच्या १६ स्क्रॅप वॅट-
या अनोळखी इसमांनी चोरून नेल्या होत्या. सदर घटनेबाबत राहाता पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरचा गुन्हा हा आरोपी लुकमान शहा याने त्याचे दोन साथीदारासह केला असून चोरी केलेल्या बॅटऱ्या पांढरे रंगाचे पिकअप टेम्पोमध्ये भरुन विक्री करण्यासाठी फातिमानगर, श्रीरामपूर येथे येणार असल्याचे कळाल

खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला.काहीवेळेत या ठिकाणी एक पांढरे रंगाचा पिकअप वाहन आली. पोलिसांनी ती थांबविली असता त्यांना  देखील गाडीत लुकमान इसाक शहा (वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर), वसीम गफार शेख (वय २२, रा. संजयनगर, ता. श्रीरामपूर), सादिक असिफ पठाण (वय २९, रा. काझीवाबा रोड, वॉर्ड नं. २, ता. श्रीरामपूर) हे तिथे निदर्शनास आढळून आले व त्यांचे स्पष्टीकरण केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या गाडीची झडती घेतली असतात्यामध्ये बॅटऱ्या आढळून आल्या.याबाबत त्यांच्याकडे चौकशीकेली असता त्यांना प्रथम उडवा- उडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी  संमर्री पावर करताच सरळ सुरळीत पणे गुन्ह्या ची कबुली दिली. पुढील तपास काम गुणे अन्वेक्षण पोलीस अधिकारी (LCB)करीत असल्याचे समजते.


 

 












Monday, April 10, 2023

नव्या नियमांना फेक न्यूज बाबतच्या एडिटर्स गिल्डचा विरोध ?


(नवी दिल्ली) - न्यूज - एजन्सी - फेक न्यूज अर्थात अ दर्जेदार बातम्या कोणत्या आहेत, हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार सरकारला देणाऱ्या कायद्यातील दुरुस्तीला पत्रकार, संपादकांची संघटना (एडिटर्स )गिल्ड ऑफ इंडिया'ने विरोध केला आहे.
सरकारलाच सर्वच शक्ती देणारे कायद्यातील हे बदल मागे घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.गिल्डने शुक्रवारी यासंदर्भात एक निवेदन जारी करत आपली भूमिका मांडली. सरकारने माहिती 
तंत्रज्ञान (मध्यस्थ दिशानिर्देश आणि डिजिटल मीडिया आचार संहिता) दुरुस्ती नियम मागे घ्यावेत. तसेच प्रसारमाध्यमांच्या संघटना व संस्थांसोबत सल्लामसलत करावी, असे गिल्डने म्हटले आहे. कायद्यातील दुरुस्ती व अंमलबजावणीबाबत सरकारने प्रसारमाध्यमांसोबत चर्चा विनिमय
करण्याचे आश्वासन दिले होते, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. नव्या नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने स्वतःला एक फॅक्ट चेक युनिट स्थापन करण्याची शक्ती दिली आहे. याद्वारे एखादी बातमी खरी आहे की खोटी हे ठरवण्याचे सर्वाधिकार आयटी मंत्रालयाकडे
न्यायालयीन अवलोकन, अपील करण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सोशल मीडियावरील एखादी माहिती हटवण्यासाठी किंवा हैंडल ब्लॉक करण्यासाठी काही दिशानिर्देश निश्चित केले होते. परंतु सरकारच्या नव्या कायद्यात या दिशानिर्देशांचे पालन होत असल्याचे दिसत नाही. हे नैसर्गिक न्यायाच्या सिद्धांतांच्या विरोधात असून एक
प्रकारची सेन्सॉरशीप आहे, असा मुद्दा एडिटर्स ग्लिडने मांडला आहे. आयटी मंत्रालयाने प्रसारमाध्यमांशी संबंधित संस्था, संघटनांसोबत कोणत्याही चर्चेविना नव्या नियमांची अधिसूचना जारी केल्याबद्दल गिल्डने तर्क वितरक अवेदन व्यक्त केल्याचे समजत आहे.



















Sunday, April 9, 2023

ॲमेझॉनमध्ये सामंजस्य करार माहिती प्रसारण : मंत्रालय ?

(नवी दिल्ली) - प्रतिनिधि - न्यूज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बुधवारी अमेझॉन इंडियासोबत भागीदारी केली. लेटर ऑफ एगेंजमेंट (एलओई) मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या विविध संस्था ॲमेझॉनच्या विविध व्हर्लिटकल्समध्ये ही भागीदारी हो
. यामध्ये नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एनएफडीसी), प्रसार भारती, प्रकाशन विभाग सरकारच्या वतीने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि सत्यजित रे इन्स्टिट्यूटच्या मीडिया प्रशिक्षण संस्थांचा समावेश आहे. ॲमेझॉनच्या बाजूने एलओईमध्ये अॅमेझॉन प्राईम ॲमेझॉन म्युझिक, ॲमेझॉन ई-मार्केट प्लेस आणि आयएमडीबी यांचा समावेश आहे. यावेळी अनुराग ठाकूर म्हणाले, या करारामुळे चित्रपट संस्थांमधील प्रतिभांच्या संघर्षाचा कालावधी कमी
फिल्म अँड टेलिव्हिजनव्हिडी
ओ, ॲलेक्साहोईल.
भारतीय फिल्म अँड
टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती, इंटर्नशिप, मास्टरक्लास आणि अन्य संधींच्या तरतुदींद्वारे उद्योग-शैक्षणिक संबंध मजबूत करण्यास मदत होईल. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्जनशील अभिव्यक्ती म्हणून अश्लीलता आणि गैरवर्तनाचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे. ओटीटीने देशाचा सामूहिक विवेक प्रतिबिंबित केला पाहिजे.
अभिनेता वरुण धवन म्हणाला, स्ट्रीमिंगच्या मार्गाने भारतीय सिनेमा आता जागतिक स्तरावर पोहोचत आहे आणि स्ट्रीमिंग सेवांनी आज भारतीय सामग्रीला आतापर्यंत अकल्पनीय पोहोच दिले आहे. नवीन अभिनेते आणि निर्माते आतापर्यंत बाजूला राहिले होते, ते आता जगभरातील प्रेक्षकांशी कनेक्ट होऊ शकतात.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी.संपादक.भगवंत.सिंघ.प्रितम.सिंघ.बत्रा.शब्द✍️✅️🇮🇳रचना.संकलन वार्ता...
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------













सोशल मिडियात अफवांचा बाजार चूकीची पोस्ट टाकल्यास गुणे दाखल करून होणार कारवाई पोलिसांचा स्पष्ट संदेश ?

( संभाजीनगर ) - औरंगाबाद - प्रतिनिधि - वार्ता - काही दिवसांपासून जुने वाद, किरकोळ भांडणालासुद्धा धार्मिकतेचा मुलामा देऊन सोशल मीडियात अफवा पसरविण्यात येत आहेत. चुकीच्या आणि ऐकीव माहितीवरच्या पोस्टमुळे पोलिसांची पुरती दमछाक होत असल्याचे विविध घटनांवरून स्पष्ट झाले आहे. शहर पोलिसांनी चुकीची माहिती देणाऱ्या, बदनामीकारक पोस्ट, छायाचित्र टाकणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले. मात्र, हे प्रकार सतत घडत असून, त्यामुळे समाज ढवळून निघत आहे. शहानिशा केल्याशिवाय पोस्ट फॉरवर्ड करू नये, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
तंतोतंत पोलिसांची धावपळ 
दोन समाजांतील वाद असल्याची चुकीची माहिती आल्यानंतर पोलिस तत्काळ सजग होतात. सत्य माहिती समोर येईपर्यंत चुकीची माहिती सोशल मिडियातून फॉरवर्ड होते. तेव्हा पोलिसांचीही स्पष्टीकरण देता देता धावपळ होत असल्याचे विविध घटनांतून दिसत आहे.
सोशल मीडियात समाजात तेढ निर्माण होईल, असा मजकूर, छायाचित्र टाकू नये. चुकीचे व्हिडीओ फॉरवर्ड करू नका. कोणी करीत असेल तर त्याची माहिती पोलिस यंत्रणेला द्या. त्या व्यक्तीवर भारतीय दंड विधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात येईल. शहरातील शांततेसाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत अफवा पसरविणाऱ्यांना रोखले पाहिजे. त्यांची नावेही पोलिसांना कळवावी. त्यांच्यावर कारवाई करता येईल
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::=====================================
-प्रवीणा.यादव-
पोलिस निरीक्षक...संभाजी नगर...औरंगाबाद
शहर सायबर...
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
===================================
सोशल मिडियातील अफवा पाऊस 
१) घाटी रुग्णालयामध्ये एका धार्मिक गुरुची विटंबना करण्यात आल्याचा मेसेज सोशल मीडियात दि. २६ मार्च रोजीच्या मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास व्हायरल झाला. जखमी धार्मिक गुरु हा जालना जिल्ह्यातील होता. मात्र, त्यासाठी मध्यरात्री घाटी रुग्णालयात जमाव आला. जमावाला शांत करताना पोलिसांची कमालीची कसरत झाली.
२) २९ मार्चच्या रात्री किराडपुयातील राम मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दोन गटांत वादावादी झाली. हा वाद पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मिटला. त्यानंतर सोशल मीडियात चुकीचे मेसेज व्हायरल झाले, त्यातूनच एक मोठा जमाव पोलिसांवरच चाल करून आला. पोलिसांसह मंदिरावर दगडफेक करीत शासकीय वाहनांची जाळपोळ करण्यात आली. यात सोळा पोलिस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले.
3)पैठणगेट परिसरात १ एप्रिल रोजी एका दारुड्याने ११२वर फोन करून दोन गटांत दंगल होणार असल्याचे करण गाडेकर या कामगाराने सांगितले. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा गाडेकर हा दारू पिऊन पडलेला पोलिसांना आढळला.
४)५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे खासगी बसला आग लागली. त्या बसच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या बसनेही पेट घेतला. काही वेळातच बस जळतानाचे व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झाले. त्यातून पुन्हा छत्रपती संभाजीनगरात......औरंगाबाद जाळपोळ झाल्याचा संदेश पसरल ही सुद्धा अफ़वाच होती.........
----------------------------------------------------
===================================
----------------------------------------------------===================================




Wednesday, April 5, 2023

निरीक्षकपदी सिंघम पोलिस अधिकारी दिनेश आहेर ( LCB ) कार्य सेवेत ऋजू गुणे अन्व्हेशन ब्युरो अहमदनगर ?

(अहमदनगर) - प्रतिनिधी - वार्ता -
जिल्हा पोलिस दलात महत्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेशन (LCB) निरिक्षक पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने (LCB) ला एक सक्षम अधिकारी मिळाला आहे. त्यांनी यापूर्वी बीड एलसीबीची यशस्वी धुरा संभाळली आहे. त्यांच्या कामगिरीवर 'फिदा' होत पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी त्यांची नियुक्ती एलसीबीच्या निरीक्षकपदी केली आहे.
दरम्यान बदली होवूनही सोडले न गेलेले निरीक्षक अनिल कटके यांना आता सोडण्यात आले असून त्यांना आता नियंत्रण कक्षा हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यांना अजूनही ठेवले जाणार अशी चर्चा चांगलीच झडली होती, मात्र योग्य वेळ येताच अधिक्षक ओला यांनी निरीक्षक कटके यांच्या जागी निरीक्षक आहेर यांना संधी दिली आहे. त्यांच्या रूपाने एलसीबीला "'सक्षम '"अधिकारी मिळाला आहे.
आहेर बीड जिल्यात एल.सी.बी.च्या निरीक्षकपदी असताना उल्लेखनीय कामगिरी त्यांची असून त्यांच्या कामगिरीची दखल अधिक्षक राकेश ओला यांनी घेतली आहे.निरीक्षक आहेर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाचे 'सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक' राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.बीड येथील तपासात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. निरीक्षक आहेर जिल्ह्यात बदलून आल्यानंतर त्यांनी सुरूवातीला बेलवंडी व नंतर सायबर पोलीस ठाण्याचा कारभारही यशस्वी दैइत्व पूर्वक त्यानी संभाळले आहे 


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संपादक :  🖊️✅️ 🇮🇳 राजु मिर्जा 
कार्यकारी संपादक :,, ✍️✅️ 🇮🇳 भगवंत सिंग प्रितम सिंघ बत्रा
सह : संपादक : ✍️ ✅️ 🇮🇳 रणजित बत्रा
उप : संपादक : ✍️ ✅️ 🇮🇳 जितेश बत्रा
इंडियन पिनल कोर्ट :कायदे तज्ज्ञ : तथा राजस्तर सलागार समिती : प्रमुख ऍडव्होकेट : ✍️✅️ 🇮🇳 आर के चौधरी पाटील, B A L L B......
=====================================
==========================================================================














Sunday, April 2, 2023

सोशल मीडियावर अफवा, समाजा समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेजेस कोणी पाठवत असल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.विशेष पोलीस आयुक्त ?

(मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता -  सुरू असलेला रमजान
सणाच्या (Ramadan festival) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र (maharastra) पोलीस (police) यंत्रणा आधीच अलर्टवर होते. परंतु छत्रपती संभाजीनगर येथे घडलेल्या घटनेनंतर आता पोलिस अधिक सतर्क झाले असून खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत. विशेषतः सोशल मीडियावर अफवा, समाजा समाजात तेढ निर्माण होईल असे मेसेजेस कोणी पाठवत असल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
सोशल मिडियावर  समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे. जातीय सलोखा मोडणारी पोस्ट पोलिसांकडून डिलिट केल्या जात असून त्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात असून राज्य गुप्तचर विभाग आणि गुणे अन्व्हेशन विशेष शाखा सतर्क आहेत आणि अशांतता निर्माण करणारी प्रत्येक माहिती खातर जमा गोळा करत असून खबरदारी घेत आहेत.
महाराष्ट्रातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांना अधिक सतर्कता आणि सर्व खबरदारीच्या प्रकिया उपाययोजना करत आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, छत्रपती - संभाजीनगर-औरंगाबाद येथे आधीच अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकच गुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सोशल मीडियावरून आक्षेपचे मेसेज आणि इतर मेसेज डिलीट करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस सायबर पोलिसांची मदत घेत आहेत. सोशल मीडियावरही द्वेषपूर्ण संदेशाचे युद्ध सध्या सुरू असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. असे अनेक संदेश आधीच प्लॅटफॉर्मवरून हटवले आहेत.














Saturday, April 1, 2023

बाजार समिती निवडणुकी साठी ना.विखे-मुरकुटे-ससाणे युती बहुतेक होण्याची शक्यता पुढील चित्र दाखवत आहे परंतु काही गोष्टी पर्द्या मागेच श्रीरामपूर ?

(श्रीरामपूर) विशेष - प्रतिनिधि - वार्ता - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीरामपूर निवडणुकीसाठी आ.कानडे - आदिक - उध्दव ठाकरे.गट.व.शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात अचानक ना. विखे-मुरकुटे व ससाणे यांचीही युतीजवळपास होण्याचे शक्यताने राजकीय चरच्छेद उधाण...
कोण कोणाबरोबर शामिल होणार हे निश्चित नसल्याने उमेदवारी अर्ज कसा भरायचा हे समजत नव्हते. दोन-तीन दिवसांपूर्वी आमदार लहू कानडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी - शिवसेना (उध्दव ठाकरे गट), शेतकरी संघटना यांची एकत्रित बैठक घेऊन सोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र जागा वाटपाबाबत निर्णय नंतर घेणार असल्याचे सांगितले. आता या महाविकास आघाडीच्या विरोधात कोण कसे लढणार हा मुद्दा होता. मात्र अचानकपणे पालकमंत्री ना. विखे-मुरकुटे - ससाणे यांनी एकत्रित येण्याचा निर्णय झाला आणि सर्वांना एक आश्चर्याचा धसकास दिला.
बाजार समितीसाठी आ. कानडे यांच्या महाविकास आघाडी विरुध्द ना. विखे- मुरकुटे-ससाणे यांची युती लढणार हे आता निश्चित झाले आहे. जागा वाटपही निश्चित झाले. ससाणे यांना ८, मुरकुटे यांना ६ तर पालकमंत्री ना. विखे गटाला ४ असा जागा वाटपाचा निर्णय झाला आहे. मात्र यात कोण कोणत्या ठिकाणी लढणार मात्र हे स्पष्ट झाले नसल्यामुळे प्रत्येकी ठिकाणी प्रत्येक गटाचे समर्थक अधिकचे उमेदवारी अर्ज भरुन ठेवणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी याबाबत सर्व चित्र स्पाष्टीकरण होणार आहे

स्थानिक पातळीवर कोणत्याही पक्षाचे राजकारण न करता बाजार समितीच्या आणि तालुक्याच्या विकास सर्वांनी राजकीय संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवा त्या दृष्टीकोनातून निवडणूक लढविली गेली पाहिजे असे तज्ज्ञ जाणकारांचे मनोबल आहे. बाजार समितीत निवडणूक लढविण्याचे हे गणित नगर पालिका निवडणुकीतही जुळण्याची शक्यता असल्यास ठळक चित्र उभारणी होण्यास प्राथमिक अंदाज प्रारंभ होईल.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी संपादक भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन.वार्ता...
============================================================================================================