राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, May 13, 2023

अजब गजब युतीचे विखे मुरकुटे यांनी संघनमताने ससाणे गटाचे बहुतेक चार्जिंग घेतले काडून श्रीरामपुरातील मुरकुटे-ससाणे 'युती' बाबतही संभ्रम वातावर्ण ?

  श्रीरामपूर बाजार समितीच्या राज कारणात काय चालाय 

(श्रीरामपूर) - निवडणुकीच्या तोंडावर झालेली विखे-मुरकुटे-ससाणे गटाच्य 'युतीला काल झालेल्या सभापतीपदाच्या निवडीत तड गेला. या युतीच्या वेळी ठरलेला फार्मूला डावलून विखे गटाने ऐनवेळी भूमिका बदलली. त्यात मुरकुटे गटाने यापूर्वी अशोक साखर कारखाना निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या मुरकुटे- ससाणे युतीचा नियोजित आराखडास न पाळल्याने आता या युतीबाबतही संभ्रमा चे वातावरण निर्माण झाले असे सांगावा लागेन की ससाणे गटाची आहे श्रीरामपूरचे राजकारण हे नेहमी मुरकुटे,आदिक, ससाणे गटाच्या भोवती फिरते आहे.
त्यात विखे गटाची व मुरकुटे गटाची भूमिका महत्वाची कृषी विषय अभ्यासु अनुभवी समर्थ सक्षम ठरत आली तसेज मतदाता यांनी पण विखे मुरकुटे गटाला कौल देण्याचा प्रयत्न निदर्शनास येते हे सर्व सामान्य  शेतकरी वर्गाचे पुढील कार्य काळात उल्लास निय कामे पारपा डतील व होतील असे अनुमान आहे. असे नागरिकांचे  श्रम भोंवती असावेत.विखे गटाने कधी आदिकांना, कधी ससाणेंना तर कधी मुरकुटेंना त्यांच्या विरोधकांच्या विरोधात लढण्यासाठी ताकद दिली. केवळ ताकदच नाही तर 'रसद' ही पुरविली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली विखे-मुरकुटे-ससाणे ही 'अजब हगजब युती' सर्वांना संभ्रमात टाकणारी ठरली. व ससाणे गटा संदर्भात कृषी संदर्भ अपुरा अभ्यास वेळेवर शेतकऱ्याचे कामना तिरंगाई शक्यता निर्माण होईल असे तालुक्यातील जणत्याच्या  विचार शैलीतून भोंवती तर्क वितरक संभ्रम निहाय चर्चा होत असल्याचे समज ते मात्र राजकारणातील एक निरा ळा प्रयोग म्हणून याकडे पाहिले जात होते. अवघ्या महिनाभरापूर्वी म्हणजे श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही युती सत्ता स्थापनेपर्यंतही टिकू शकली नाही.कारण नागरिकांचे चर्चे तुन ऐकण्यास सत्ता चे अस्तित्वात न राहण्या करिता येते की ससाणे गटाचे चार्ज झाल्याली बॅटरी बहुतेक मुरकुटे यांनी पिंनच काडून घेतले असावे असे नागरिकाना वाटत श्रीरामपूर बाजार समितीची निवडणूक विखे-मुरकुटे-ससाणे युतीने एकत्रीत लढवून 18 पैकी 17 जागा जिंकून मोठा विजय मिळविला. त्यात एका अपक्षाने बाजी मारली तोही ना. विखे यांना मानणारा आहे. या विजयामुळे बाजार समिती सभापती व उपसभापती निवडी बिनविरोध होतील,
असे वाटत असताना ऐनवेळी ना. राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक व लोणीचे जावई गिरीधर आसने यांचे नाव सभापतीपदासाठी पुढे करण्यात आले. त्यामुळे विखे गटाचे गिरीधर आसने व ससाणे गटाचे सुधीर नवले सभापतीपदासाठी आमने-सामने ठाकले. यावेळी ससाणे गटाने माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्याशी असलेल्या युतीच्या हक्काने मदत मागितली. मात्र तुम्ही ऐकमेकांशी सुलेनामा करा, असा सल्ला देवून त्यांनी मदत करण्यास नकार दिला.या निवडणुकीत वादी वाद नको या दृष्टी कोनातून म्हणून आपण तटस्थ राहत असल्याचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी सांगितले  असले तरी विखे व मुरकुटे यांनी ससाणें गटाचे ओव्हर चार्जेस का डण्यासाठी टाकलेला हा 'डाव' होता कि काय असे ससाणे गटाचे सदस्यनचा  अंदाज बगन्यास येत असल्याने अशोक कारखाना निवडणुकीच्या तोंडावर झालेली मुरकुटे- ससाणे युती संशयाच्या भोवऱ्यात सापडली असल्याळे  तालुक्यातील जनता बोल बाला करीत आहे...


÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
...राजु मिर्जा...🖊️✅️🇮🇳...+919730595775...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

संभ्रमात टाकणारा सर्वोच्च न्यायलायचा निर्णय राज ?

(मुंबई) - उत्त - सेवा - मीरा रोड : महाराष्ट्र सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, तो निर्णय संभ्रमात टाकणारा आहे, असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. माझ्यावर अनेक केसेस चालू आहेत. त्या केसेसबाबत न्यायालय किंवा पोलिसांकडून ज्यावेळी नोटिसा येतात, त्यातील जी भाषा असते, ती वाचल्यानंतर आपल्याला समजत नाही की, आपल्याला सोडले आहे की, अटक केली आहे. त्याचप्रकारे गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय समजत नाही. तो संभ्रमात टाकणारा आहे, असे ठाकरे म्हणाले.राज ठाकरे यांचा शुक्रवारपासून ठाणे जिल्हा दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्याची सुरुवात मीरा भाईंदरपासून करण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयात विधिमंडळातील जो गट आहे,
तो पक्ष म्हणून समजता येणार नाही. बाहेरचा जो पक्ष आहे तोच पक्ष म्हणून समजला जाईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्यातील पक्षाचे नाव आणि चिन्ह याचे काय होणार? निवडणूक आयोग एक स्वतंत्र यंत्रणा आहे. न्यायालय एक स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे निवडणूकआयोग काय करणार ? हा निर्णय संभ्रम निर्माण करणारा आहे. आता यावर बोलणे योग्य नाही.थोड्या दिवसात माहीत पडेल, असे ठाकरे म्हणाले. तसेच कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिले पाहिजे, आधीचे मुख्यमंत्री हे जपून राहिले नाही, म्हणून हा सर्व पेच उभा राहिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी जपून राहायला पाहिजे, आपण कुठल्या पदावर आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे, असे या वेळी राज ठाकरे म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे जिल्हा दौरा करावा, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी होती. त्यानुसार या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची सुरुवात मीरा भाईंदरपासून केली आहे. हा दौरा वसई, भिवंडी, शहापूर, ठाणे अशा विविध भागांत केला जाणार आहे. २०२४ मध्ये निवडणुका आहेत. त्या निवडणुकीसंदर्भातदेखील हा दौरा महत्त्वाचा आहे. मनसैनिक व पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे, असे ठाकरे या वेळी म्हणाले. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन केले असल्याचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.


÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
सा : राज प्रसारित...कार्यकरी...संपादक...भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा... शब्द...✍️✅️🇮🇳...रचना... संकलन... वार्ता...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷


Friday, May 12, 2023

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरअजित पवार यांनीही भाष्य केले आहे ?

(मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता -
महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. लातूर दौऱ्यावर असताना सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मी माझे मत मांडले होते. आज पुण्यामध्ये अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.दरम्यान अजित पवार म्हणाले, 'जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणलं असतं असे मतसुप्रीम कोर्टाने व्यक्त केले होते.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की यातून जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला.असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.गेल्या वर्षी जूनमध्ये ज्या घटना घडल्या आणि त्याबाबात बऱ्याच जणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दोन दिवसांपूर्वी निकाल येण्याच्या आधीच मी सांगितले होते की, या निकालात विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायचा अधिकार देण्यात येतील आणि तशाच पद्धतीने घडलं. सगळ्याच राजकीय पक्षांना संविधानाने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा आदर करून जनतेचा अपमान होता कामा नये, स्थिरता लाभली पाहिजे असं पाऊल उचलले पाहिजे. कुठलाही निकाल लागलाअसता
तरी सरकारवर परिणाम होणार नव्हता. त्यांच्याकडे बहुमत होते, १६ आमदार अपात्र झाले असते तरी सरकार टिकले असते असं अजित पवारांनी सांगितले. नैतिकतेला धरून शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंची मागणी आहे. परंतु मागणी असून काहीही उपयोग नाही, अटलबिहारी वाजपेयींची उंची आणि आत्ताच्या लोकांची उंची यात जमीन आस्मानचा फरक आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस राजीनामा देतील हे स्वप्नातही पाहू नये असं सांगत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला.
पुढे अजित पवार असे ही म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम वर कितीवेळा चर्चा उखरून काढायची. जे झालं त्याबद्दल आमच्‍ मत मांडून काय फायदा आहे का?' तसंच, 'यातून सगळ्यांना जो धडा मिळाला पाहिजे तो मिळाला. इथून पुढे असा प्रसंग कोणाव येऊ नये. जर असा प्रसंग आला तर त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला समोर गेलं पाहिजे.', असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
------------------------------------------------------------------------==========================================================================
सा : राज प्रसारित...कार्यकारी... संपादक...भावंत सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
==========================================================================------------------------------------------------------------------------






Thursday, May 11, 2023

राजकीय मराठी भाषेची गळचेपी कराल तर...राज ठाकरे यांणी थेट दिला इशारा ?

(मुंबई ) - प्रतिनिधि - वार्ता - कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची (Karnataka Election ) रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी अनेक राजकीय पक्षांनी जंगी सभा आणि जोरदार प्रचार केला आहे. आज या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून १० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी मोठं विधान केलं आहे...
"कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार
बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की, मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार
कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी", असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत
आहे". "तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत", असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं आहे."यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका", असं जाहीर आवाहन मराठी मतदारांना राज ठाकरे यांनी केलं आहे.



----------------------------------------------------======================================================================
सा : राज प्रसारित...संपादक...राजु मिर्जा...शब्द...🖊️✅️🇮🇳...रचना... संकलन...वार्ता...
======================================================================-----------------------------------------------------

अधिक्षक अभियंता कुलकर्णी सार्वजनिक बांधकाम खाते शासकीय सेवातून निवृत्ती होऊन कार्य मुक्त ?


( अहमदनगर )
सार्वजनिक बांधकाम खात्यात गुणवता पूर्वक रस्ते इमारती दर्जेदार पारदर्शक कामकारणारे  यांना उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार जाहीर होऊन मिळाले अस्थांना दिनांक 30/04/2023श्री कुलकर्णी अधिक्षक अभियंता पदा वरून सेवा निवृत्ती कार्य सेवा मुक्त झाले तेंच्या शासकीय कार्य सेवेत पार पडल्याली कामे...
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयइमारत सामाजिक न्याय भवन, निंबळक व अरणगाव येथील रेल्वे उड्डाणपूल, नगरचा बायपास, अशा नगरच्या वैभवात भर टाकणाऱ्या अनेक वास्तू उभ्या करणारे सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता जयंत धोंडोपत उर्फ जे. डी. कुलकर्णी हे नियत वयोमानानुसार नुकतेच शासकीय से वेतून सेवानिवृत्त झाले
आहेत.कुलकर्णी यांनी आपल्या शासकीय सेवेची सुरुवात सहाय्यक अभियंता श्रेणी - १ या पदावरून मार्ग प्रकल्प उपविभाग क्र. २ नगर येथूनच केली होती. त्यानंतर त्यांनी नांदेड, गंगाखेड, औरंगाबाद येथे कार्य केले. कार्यकारी अभियंता म्हणून त्यां लातूर, अकोला, पेण जि. रायगड, नगर, पुणे येथे कार्य केले. तर अधीक्षक अभियंता म्हणून रत्नागिरी व नगर येथे कार्यरत होते शासनाच्या आशियाई विकास
बँकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते प्रकल्पाअंतर्गत राज्याचे समन्वय अधिकारी म्हणून केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सेवाकाळात शासनाच्या विविध समित्यावर त्यांनी काम केले. त्यांना सेवापूर्तीनिमित्त नुकताच निरोप देण्यात आला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, नव्यानेच पदभार स्वीकारलेले अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, दीपक दरे, उदय मुंढे, अनिल कोठारी अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आदी उपस्थित होते.



...राजु मिर्जा...🖊️✅️🇮🇳...












Wednesday, May 10, 2023

निवृत्ती वेतनातवाढ पत्रकाऱ्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून घोषणा ?

( मुंबई ) - प्रतिनिधी - विषेश - वार्ता 
महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना राज्य सरकारच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेअंतर्गत दरमहा ११ हजार रूपयांचे निवृत्तीवेतन देण्यात येते. त्यात वाढ करून आता २० हजार रूपये दरमहा निवृत्ती वेतन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केली. शंकरराव चव्हाण
सुवर्णमहोत्सवी पत्रकारिता कल्याण निधी तसेच अधिस्वीकृती समिती देखील नेमण्याचा शासन निर्णय लगेचच काढू, असेही शिंदे यांनी जाहीर केले. कोविड असो वा इतर कोणती आपत्ती असो, बॉम्बस्फोट असो वा दहशतवादी हल्ला असो पत्रकार हा कायम पुढे असतो. पत्रकारितेसोबतच तो सामाजिक जबाबदारी देखील पार पाडत असतो. त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न सोडविणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना शिंदे पत्रकारांसाठी विविध घोषणा केल्या. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी तर भूमिका कार्यवाह प्रविण पुरो यांनी विशद केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले.प्रसारमाध्यमांमध्ये गेल्या काही काळात मोठया प्रमाणात बदल झाल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पूर्वी प्रिंट मिडिया हा एकमेव होता. आता इलेक्ट्रॉनिक सोबत डिजिटल आणि सोशल मिडिया देखील आला आहे. आम्ही देखील पत्रकारांच्या भल्यासाठीच काम करतो. कोणी विरोधात बातमी दिली तर मी कधीही फोन करून विचारत नाही की विरोधात का बातमी दिली. पण जेव्हा सरकार चांगले काम करत असते तेव्हा चार शब्द जर चांगले लिहिले तर आमचाही हुरूप वाढतो. मेट्रोची कामे असतील. मुंबईचे सुशोभीकरण, खड्डे मुक्त मुंबई अशी अनेक कामे आम्ही करत आहोत. आमचा इतर काही अजेंडा नाही. सर्वसामान्यांना सुखाचे दिवस यावेत हाच आमचा अजेंडा
आहे. कारण आम्ही देखील संघर्ष करूनच इथपर्यंत आलो आहोत, असे शिंदे म्हणाले. निवृत्त पत्रकारांसाठीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.आहोत, असे शिंदे म्हणाले. निवृत्त पत्रकारांसाठीच्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आचार्य अत्रे यांना महाराष्ट्र भूषण द्या

संयुक्त महाराष्ट्राच्या लढयात आचार्य अत्रे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यामुळे आचार्य अत्रे यांना मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी यावेळी केली.


-----------------------------------------------------========================================================================
सा : राज प्रसारित... कार्यकारी... संपादक...भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा... शब्द...✍️✅️🇮🇳रचना...संकलन... वार्ता...
========================================================================
----------------------------------------------------









Tuesday, May 9, 2023

चोरून विल्हेवाट लावणाऱ्या मोटर सायकली ( रॉयल इनफिल्ड ) कंपनी (Bulet) भंगार दुकानदारांसह चौगाणा अटक कोतवाली पोलीसांची कारवाई ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता -
शहरात  बुलेट दुचाकींची चोरी (Bullet Bikes) करून त्याचे पार्ट सुटे करून त्याची विल्हेवाट (Disposal) लावणाऱ्या टोळीचा कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police) धरून पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी चौघांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.त्यातील चोरट्यांना न्याय लयाने कोठडीत रवानंगी केलीतर विल्हेवाट  लावणाऱ्यांना पण पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
20 फेब्रुवारी रोजी मनिष मदनलाल फुलढाळे यांची बुलेट दुचाकी ख्रिस्तगल्ली येथून चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना चोरीस गेलेली बुलेट (Bullet) अहमद मुन्ना शेख (रा. मुकुंदनगर) याने चोरी केली व ती साथीदार शाहरुख आलम शेख (रा. नागरदेवळे) याच्या घरात लपवून ठेवल्याची माहिती कोतवाली पोलिसांना (Kotwali Police) मिळाली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी सदर बुलेट आम्ही चोरुन नंतर तीचे सर्व स्पेअरपार्ट
वेगवेगळे करुन ते भंगार दुकानदार जावेद रऊफ शेख (रा. सादिकमळा, भिंगार व राम विलास ससाणे (रा. गजराजनगर) यांना विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक (Arrested) करुन चोरीस गेलेल्या बुलेटचे स्पेअरपार्टस, इंजिन, चेसीज हस्तगत केली.
अधिक तपास पोलिस बाळासाहेब मासळकर हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गुन्हे शोध पथकाचे पोलिस कर्मचारी मनोज कचरे, हवालदार तनवीर शेख, हवालदार गणेश धोत्रे, हवालदार योगेश भिंगारदिवे, ए. पी. इनामदार, योगेश खामकर, बाळासाहेब मासळकर, संदीप थोरात, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ आदींनी केली.
----------------------------------------------------======================================================================
सा : राज प्रसारित...कार्यकारी संपादक...भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन... वार्ता...
======================================================================
----------------------------------------------------