शिर्डी - प्रतिनिधि - वार्ता - शिर्डी शहरातील खंडोबा चौकात गुंड प्रवृत्तीचे पॉलीशी करणारे काही तरुण युवक मोठी दहशत करत आहे. येणारे साईभक्तांना व स्थानिक नागरिकांना मारहाण करत आहे. खंडोबा चौकात राजरोजपणे मारहाण करणे व दहशत करण्याचा प्रकार सुरू असून याविषयी शिर्डी पोलिस स्टेशनला अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. पोलिसांनी या गुंडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिर्डी शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, साईभक्तांना पॉलिशवाल्या गुंडांकडून वातावरण सातत्याने त्रास देण्याचे काम सुरू असल्यामुळे साई भक्तांमध्ये भीतीचे झाले आहे. निर्माण पोलिसांनी या पॉलिशवाल्यां गुंडाचा बंदोबस्त केला नाही. तर मनसे स्टाईलने यांचा बंदोबस्त करू व होणाऱ्या परिणामास शिर्डी पोलीस स्टेशन जबाबदार राहील. मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते म्हणाले की, १ मे रोजी कैलास भुजबळ यांना मारहाण झाली तर २० मे रोजी किरण गुलदगड याला मारहाण झाली. २५ मे रोजी साईभक्तांना मारहाण झाली असल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. असे असताना पोलीस या घटनेकडे गांभीर्याने विचार करत नाही यावेळी कैलास भुजबळ, संपत हतांगळे, प्रशांत ठोंबरे, रावसाहेब देशमुख, दामोदर ऊमाप, राहुल देशमुख, ज्ञानेश्वर जगदाळे, भिमा गाजरे, सागर जगताप, कुणाल सांबारे, सचिन देशमुख, किरण गुलदगड आदी मनसे सैनिक व ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Sunday, May 28, 2023
श्रीरामपूर तालुका केमिस्ट एन्ड ड्रगिस्ट असोसिएशन वसंत लुक (जर्मन) हॉस्पिटल, श्रीरामपूरयांच्या संयुक्त विद्यमाने ?
:- रविंद्र गुलाटी E. C. केमिस्ट एसोसिएशन
संत लूक हॉस्पिटल
(जर्मन हॉस्पिटल) व श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 29/5 /2023 मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तसेच संत लूक हॉस्पिटलमध्ये
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत वेगवेगळ्या मोफत उपचार तसेच हॉस्पिटल मध्ये डायलेसिस सुविधा उपलब्ध आहे तरी रुग्णांनी
जास्तीत जास्त लाभ घ्यावा
*दिनांक 29/05 /2023
*ठिकाण संत लूक हॉस्पिटल श्रीरामपूर
*वेळ सकाळी 9 ते दुपारी 1
आपला
रवींद्र गुलाटी🙏
(E.C. केमिस्ट असोसिएशन )
अध्यक्ष कै.ओमप्रकाश गुलाटी फाउंडेशन अहमदनगर
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
🙏
* येथे आयोजन केले असून, सर्व गरजुंनी शिबीराचा लाभ घ्यावा.*
* हॉस्पिटलचे वैशिष्टे *
* लहान मुलांचा विभाग *
* जनरल मेडिसिन विभाग *
* जनरल सर्जरी विभाग *
* स्त्रियांसाठी विभाग *
* डेंटल विभाग *
* फिजीयो थेरेपी विभाग *
* डायलेसिस विभाग *
* आपले नम्र *
श्री. शशांक रासकर सचिव, सेंट्रल झोन केमिस्ट असो.
श्री. जालिंदर भवार
अध्यक्ष श्री. रविंद्र गुलाटी अध्यक्ष, गुलाटी ट्रस्ट
श्री. आनंद कोठारी
खजिनदार
श्री. बाळासाहेब ढेरंगे
सदस्य, अहमदनगर केमिस्ट असो.
श्री. सुजीत राऊत सचिव
श्री. संदिप टुपके
श्री. उदय बधे
श्री. प्रशांत कोठारी
श्री. माधव आसने
श्री. कोविल खेमनर
श्री. कैलास चायल
श्री. प्रदिप डावखर
अश्फाक शेख
श्री. रविंद्र चौधरी
श्री. प्रशांत उचित श्री. ओमप्रकाश नारंग
श्री. दिपक उघडे
श्री. शशिकांत गौड
रियाज पोपटिया
संत लूक (जर्मन) हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत वेगवेगळे उपचार तरी रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.
🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ ✅️ 🇮🇳...
: - टीप. प्रभावशैली ( Web ) पाहण्या साठी Zoom,s चा वापर करा, / संपादक...
लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर ज्यो गायकवाड संविधान रत्न पुरस्काराने सन्मानित श्रीरामपूर ?
( श्रीरामपूर ) - प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्याचे भूमिपुत्र असलेले फादर ज्यो गायकवाड गेल्या अनेक वर्षांपासून धर्मगुरू म्हणून येशू संघात कार्य करीत आहेत. ते मराठीचे गाढे अभ्यासक असून निरोप्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ख्रिस्ती मासिकाचे ते अनेक वर्ष संपादक राहिलेले आहेत.
ते ख्रिस्ती अस्मिता साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व प्रगत पदवीधर संघटनेचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे उत्तम साहित्यिक म्हणूनही त्यांना सर्वत्र ओळखले जाते. सध्या ते येशू संघा अंतर्गत अहमदनगर सह बीड जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट सुपिरियर म्हणूनही काम पाहत आहेत.
फादर ज्यो यांनी धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांच्या सेवा कार्यात त्यांनी अनेक दीन-दुबळे, कष्टकरी व गरजूंची सर्वतोपरी सेवा केलेली आहे. "करशील जे गरीबांसाठी होईल ते माझ्यासाठी" या प्रभू येशूच्या शिकवणुकीप्रमाणे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मिशन कार्य केलेले आहे. संविधानास अभिप्रेत असलेले हे कार्य फादर ज्यो यांच्या हातून घडल्याने नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी या दिल्ली येथील संस्थेने याची दखल घेतली व २७ मे २०२३ रोजी दिल्ली येथे संपन्न झालेल्या मायनॉरिटी राष्ट्रीय अधिवेशनात दिल्लीचे आर्च बिशप अनिल कुटो, खासदार इम्तियाज जलील, खासदार कृष्णा व खासदार गौतम यांच्या हस्ते संविधान रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार प्राप्त फादर ज्यो यांच्यावर धार्मिक, सामाजिक, राजकीय व साहित्य क्षेत्रातील सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*
नव्या संसद भवनाचे आज होत आहे लोकार्पण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन ?
( नवी दिल्ली ) - न्यूज - एजन्सी - वृत्तसंस्था वैविध्याने नटलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातून मागवलेल्या साहित्याने भारताची नवीन संसद नटली आहे. त्यात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. इमारतीत वापरण्यात आलेले अस्सल सागवान नागपूरहून मागवण्यात आले आहे तर अशोक चिन्हासाठी लागणारे साहित्य छत्रपती संभाजीनगरहून मागवले गेले आहे. संसद भवनातील सारे फर्निचर महाराष्ट्राच्या राजधानीत तयार करण्यात आले आहे.
नवीन संसद भवनाची उभारणी करताना 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उक्तीनुसार कामांची विभागणी केली गेली. समग्र देशाचा या संसद भवनात सहभाग असायला हवा या हेतूने ठरवून देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्य मागवले गेले. अगदी बांबूपासून ते दगडी कोरीव जाळ्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ज्या भागाचे वैशिष्ट्य आहे तेथून तयार
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवी दिल्ली : संसद भवनाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या भव्य-दिव्य आणि देखण्या वास्तूचे छायाचित्र. (फोटो :पीटीआय)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
करून मागवण्यात आली.
नवीन संसद भवनात देशाची वैविध्यपूर्ण संस्कृतीची झलक बघायला मिळणार आहे. जणू काही
साऱ्या देशाने मिळून ही इमारत उभारली आहे. तीन वर्षांच्या या बांधकामात देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्य मागवण्यात आले आहे....
*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*
संसदेच्या नव्या वास्तूचे स्वप्न नरसिंह राव सरकारमध्ये असताना पाहिले होते. आराखडाही तयार केला होता. पण ते पुढे बराच काळ सत्तेत असूनही पूर्ण करू शकलो नाही. मोदींनी ते पूर्ण करून दाखविले, त्याचे स्वागतच व्हायला हवे. -गुलाम नबी आझाद, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष
*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*
> कोणत्या राज्यातून काय आले<
• नागपूर : बांधकामासाठी लागणारे सर्व सागवान
• औरंगाबाद
: अशोक चिन्हाचे साहित्य
• मुंबई : या इमारतीतील सारे फर्निचर तयार झाले
• त्रिपुरा : फरशीसाठीचे बांबू
मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : शानदार गालिचे
• सरमथुरा (राजस्थान) : लाल-पांढरे वाळूचे दगड
• उदयपूर : भगवा-हिरवा दगड
• लाखा (अजमेर) : लाल ग्रॅनाईट • अंबाजी : पांढरा संगमरवर
• दमण-दीव : फॉल्स सिलिंगसाठी स्टीलचे सांगाडे
• राजनगर (राजस्थान), नोएडा : दगडी जाळीचे काम
इंदूर (मध्य प्रदेश) : अशोक चक्र
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी १२ वाजता संसदेवी नवीन वास्तू देशाला समर्पित करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात यावेळी उपस्थित राहतील.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
२१ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. २५ राजकीय पक्ष या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
होणार आहे. सकाळी महात्मा गांधीच्या पुतळ्या जवळ काही धार्मिक विधी केले जातील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष दोन सत्रांत उद्घाटन सोहळा राज्यसभेचे सभापती सहभागी होतील,
या पक्षांचा बहिष्कार शिवसेना उद्धव ठाकरे) काँग्रेस :राष्ट्रवादी कॉग्रेस, डीएमके, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, भाकप, आमुमो, सीपीआय (एम), आरजेडी, एआयएमआयएम, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फ्रेन्स : आदी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}
Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२८ मे) देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात पंतप्रधान मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनख उपस्थित नव्हते, त्यामुळे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी नवीन संसदेत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचा संदेश वाचून दाखवला. द्रौपदी मुर्मू यांचा संदेश वाचताना हरिवंश सिंह म्हणाले, नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा हा प्रसंग भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा भारताच्या उत्तरेकडील बिंदूपासून दक्षिणेकडील बिंदूपर्यंत आणि पूर्व सीमेपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत विविधतेत राहणाऱ्या सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा आणि अतुलनीय आनंदाचा प्रसंग आहे. भारतीय संसदेला आपल्या मनात विशेष स्थान आहे. संसद ही आपल्या समृद्ध लोकशाही परंपरांचा प्रकाश स्तंभ आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचे भाषण वाचून दाखवताना हरिवंश सिंह म्हणाले, २.५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन आधुनिक संसदेची उभारणी झाली, ही आनंदाची बाब आहे. हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार. भारतीय लोकशाहीच्या अभूतपूर्व विकास प्रवासाच्या या महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाबद्दल आणि अभिमानास्पद क्षणाबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन करताना मला खूप आनंद होत आहे. ही नवीन संसद भविष्यातही आपल्या विकासाची साक्षीदार असेल.
----------------------------------------------------
===================================
: - राजु मिर्जा... 🖊️✅️🇮🇳...(+919730595775)...
===================================
----------------------------------------------------
Thursday, May 25, 2023
सोशल मिडियानेटवर्किंग कर्तबगारी अजब यारी चोरी झालेला ट्रॅक्टर गजब आला दारी ?
( दहिवड ) - प्रतिनिधी - वार्ता -
सोशल मिडिया नेट वर्किंग हे आजच्या युगात संवादाचे सर्वात मोठे माध्यम असून माणसाच्या दैनंदिन जीवनाचा तो एक अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. सोशल मिडीयाचा वॉट्सअप टुईटर फेसबुक इंसटोग्राम वेबणार ट्यूब पोर्टलर असे अनेक निरनिराळ्या प्रकारचा प्रभावी वापर केला तर तो अनेकदा फायद्याचा ठरतो. याचा प्रभावी वापर करून एका शेतकऱ्याने आपला चोरीला गेलेला ट्रॅक्टर पुन्हा मिळवण्यात यश मिळवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळा तालुक्यातील उमराणे येथील दर्शन कांदा आडतसमोर एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह (एमएच 41डी 2984) दि. २२ में रोजी उमराणे येथून
चोरट्यांनी पळवला होता.
ट्रॅक्टर मालक सुभाष आहिरे (सुराणे ता. सटाणा) यांनी व परिसरातील नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता चिंचवे येथील जिओ पेट्रोल पंपावर चोरट्यानी ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरले हे पेट्रोलपंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.
हे फुटेज सोशल मिडियावर झळकताच चोरट्याना याबाबत भनक लागली. ट्रॅक्टर नाशिकच्या पुढे विल्होळी शिवारात रात्रीच्या सुमारास सोडून चोरटे फरार झाले. परिसरातील काही तरुणांनी ट्रॅक्टर मालकास कळविले असता ट्रॅक्टर मालकाने देवळा पोलीसाच्या मार्गदर्शनातून त्या परिसरातून ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतली.
देवळा येथे पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर जमा केले असून पोलीस इनस्पेक्टर समीर बारवकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित समाधान चिंधा ठाकरे (झाडी) व निलेश नानाजी देवरे (महालपाटणे) यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत.
-----------------------------------------------------
====================================
सह : संपादक,रंजित बतरा ✍️✅️🇮🇳...शब्द...रचना...संकलन...वार्ता...
====================================------------------------------------------------------
त्र्यंबकेश्वर वादावरुन रान करणार्यांना राज ठाकरेंनी फटकारलं महणाले, 'हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का ?
असल्याची अनेक उदाहरणे आढळून येतील. माहीम येथील मगदूम बाबाच्या दर्ग्यावर स्थानिक पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल चादर चढवतो. अशा परंपरा या सुरु ठेवल्या पाहिजेत. पण त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकाराकडे चुकीच्या नजरेने पाहणाऱ्यांची वृत्ती कोती आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराबाबतचा निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी घ्यावा. बाहेरच्या लोकांनी त्यामध्ये पडू नये, अशा स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन रान उठवणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ते शनिवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरून राजकारण करणाऱ्यांना धारेवर धरले. त्र्यंबकेश्वर मंदिरात जे काही घडलं ते चूक आहे. या माध्यमातून कोणाला दंगली घडवायच्या आहेत का? जिथे चुकीच्या गोष्टी घडत असतील तिथे प्रहार करणे गरजेचे असते, असे सांगत राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली.जाणुनबुजून काही खोदून काढायचं याला अर्थ नाही. जिथे मराठी मुसलमान राहतात, तिथे दंगली होत नाही, हा माझा अनुभव आहे. त्यांची पोरबाळं तिथेच शिकतात, ते तिकडेच राहतात, त्यामुळे अशा ठिकाणी दंगली होत नाहीत. पण काही लोक हे सामंजस्य बिघडवत आहेत. बहुसंख्य हिंदू असलेल्या राज्यात 'हिंदू खतरे मे' कसा काय असू शकतो, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
------------------------------------------------------------------------
=====================================
((( हायलाइट्स )))
धार्मिक स्थळी हिंदू-मुस्लीमांमध्ये सख्य असल्याची अनेक उदाहरणे आढळून येतील
माहीम येथील मगदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर स्थानिक पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल चादर चढवतो
अशा परंपरा या सुरु ठेवल्या पाहिजेत
=====================================
------------------------------------------------------------------------
कर्नाटक निकालांवरून राज ठाकरेंचा भाजपला पुन्हा टोला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन लगेच काही निष्कर्ष काढता येणार नाही. एका राज्यावर देशभरातील गोष्टींचा आराखडा मांडू शकत नाही. आगामी काळात गोष्टी कशा बदलत जातात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कर्नाटक निवडणुकीच्या बाबतीत मी जेव्हा माझी प्रतिक्रिया दिली, ते भाजपने समजून घेणे गरजेचे आहे. पण भाजपचं असं म्हणणं आहे की, इतरांनी कोणी प्रतिक्रिया देऊ नयेत. मग उद्या वर्तमानपत्रांनी अग्रलेखही लिहायला नकोत. याचा अर्थ भाजपबाबत कोणी बोलायचंच नाही का? हे मात्र कोणाच्याहीबाबतही बोलणार, असे सांगत राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
राज ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाबाबत धरसोडपणाचे धोरण असल्याची टिप्पणी केली. कधी नोट आणायची, कधी नोट बंद करायची. सुरुवातीला नोटाबंदी झाली तेव्हा २००० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये जात नव्हत्या. असा धरसोडपणा परवडणारा नाही. आता लोकांना परत बँकांमध्ये पैसे टाकावे लागतील. असे प्रयोग होत असतात का? मी तेव्हाच बोललो होतो की, नोटाबंदी देशाला परवडणारी नाही, असे राज ठाकरे यांनी जहीर पत्रकात म्हणाले.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
: - राजु मिर्जा...✍️✅️🇮🇳...+919730595775...
----------------------------------------------------===================================
फोडल्याले दान पेट्या आरोपींकडून आठ दुचाकी व मंदिरातील मुद्दे माल हस्तगत करुन जप्त ?
( राहुरी ) - प्रतिनिधि - वार्ता -
जिल्ल्यातील उत्तर नगर भागात दुचाकी चोरीचा सपाटा लावून धुमाकूळ घालणाऱ्या दोन जणांना राहुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. त्यांनी ताहाराबाद येथे मंदिरातील तीन दानपेट्या फोडल्याची कबुली दिली. राहुरी न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महेश चांगदेव लोंढे (वय 23) व रोहिदास सुभाष संसारे (वय 19) दोघेही रा. कानडगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांना आरोपींची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी कानडगाव येथे दिनांक 20 मे रोजी आरोपींच्या राहत्या घरी पोलीस पथक पाठवून त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपींनी दुचाकी चोऱ्यांची कबुली दिली. राहुरी येथील न्यायालया समोर आरोपींना हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
त्यात आरोपींनी राहाता व कोपरगाव येथे प्रत्येकी तीन व लोणी येथे दोन दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. कानडगाव, वरशिंदे परिसरात निर्जनस्थळी झाडाझुडपात उभ्या केलेल्या आठ दुचाकी आरोपींनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. ताहाराबाद येथे 11 मार्च 2023 रोजी मध्यरात्री संतकवी महिपती महाराज मंदिरातील तीन दानपेट्या व सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर असा अठरा हजारांचा मुद्देमाल चोरी प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची कबुली आरोपींनी पोलीस कोठडीत दिली.
राहाता, कोपरगाव, लोणी हद्दीत ज्यांच्या दुचाकी चोरी झाल्या आहेत. त्यांनी दुचाकीच्या मुळ कागदपत्रांसह राहुरी पोलीस ठाण्यात ओळख पटवावी. न्यायालयामार्फत दुचाकी सोडवून घ्याव्यात. असे आवाहन पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी केले. दुचाकी नं. एमएच 15 सीएल 7597, एमएच 16 एल 5228, एमएच 16 एक्स 4886, एमएच 17 एसी 9486 व विना नंबर चार अशा एकूण आठ दुचाकी पोलिसांनी हस्तगत करुन जप्त केल्या आहे.
-----------------------------------------------------
===================================
सह,संपादक...रंजित बतरा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...+919970331313
===================================
----------------------------------------------------
Subscribe to:
Comments (Atom)