राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, June 19, 2023

दहा वाहनांवर कारवाई पोलीस प्रशासन,शिर्डीत वाहतूक नियमांचे उल्लंघन

( शिर्डी ) - प्रतिनिधि - वार्ता - नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० वाहनांवर शिडीं पोलिसांनी कारवाई केली आहे. या वाहनांवर हजारो रुपयांचा दंड करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, की शिर्डी शहरात चारचाकी वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक करणे, वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, विमा न उतरवणे, रस्त्यावर वाहने उभी करणे, भरधाव वेगात वाहने चालवणे अशा पद्धतीने नियमाकडे दुर्लक्ष करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. १६ जून रोजी सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. या कारवाईत मोटार वाहन
निरीक्षक विकास सूर्यवंशी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अतुल गावडे, धनंजय गावित, चालक संदीप पलांडे यांनी भाग घेतला होता. आरटीओची कारवाई सुरू होताच नगर मनमाड रोडवरून अनेक वाहने परागंदा झाल्याचे दिसून आले. शिर्डी परिसरात नगर मनमाड रोडवर मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन
विभागाने मोहीम सुरू केलेली असून जे वाहनधारक, चालक, मालक शासकीय नियमांकडे दुर्लक्ष करतील, अशा वाहनधारकावर यापुढील काळातदेखील कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक विकास सूर्यवंशी यांनी दिली. या कारवाईत जवळपास प्रतिवाहन १० हजार रुपयांच्या आसपास दंड करण्यात आला.
---------------------------------------------------===================================
सह,संपादक रंजीत बतरा - शब्द... ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------===================================






कोतवाली पोलिसांची कारवाई अहमदनगर शहरात दुचाकी चोरणारा सराईत आरोपी जेरबंदचार दुचाकी, एक रिक्षा जप्त....

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता -
शहरात मोठया प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विशेष पथक स्थापन करुन शोध मोहिम राबवली असून दुचाकी चोरणारा एक सराईत आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शहरातील माळीवाडा बस स्टॅन्ड परीसरात मोटारसायकल व रिक्षा चोरी करणारा सुरज ऊर्फ सोनु शिवाजी शिंदे हा
अॅटो रिक्षासह मिळून आला. त्याने रिक्षाविषयी चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आल्याने त्यास विश्वासात घेवून अधिक विचारपुस केली असता त्याने ती रिक्षा चिखली पोलीस स्टेशन हद्दीतून चोरून आणल्याची कबुली दिली. तसेच त्याने शहरात व परीसरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी एक रिक्षा व ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. या आरोपीवर यापूर्वी मोटरसायकल
व इतर चोरीचे कोतवाली तसेच तोफखाना पोलीस स्टेशन येथे सात गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मनोज कचरे, पोना शाहीद शेख, पोका प्रमोद लहारे, सुमित गवळी, दिपक रोहकले, सोमनाथ केकान, अशोक कांबळे तसेच सायबर सेलचे पोकॉ नितीन शिंदे यांनी सदरची कारवाई केली असून सदर गुन्हयाचा तपास पोलिस हेड काँस्टेबल इखे हे करत असल्याच समजते आहेत.
---------------------------------------------------===================================
कार्य,संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द
✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------------------------------
=====================================

Sunday, June 18, 2023

जिल्हाविभाजनाचा शासनस्तरावर सध्या कोणताही विषयनाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा...

श्रीरामपूर - प्रतिनिधि - विषेश - समाचार 

शासनस्तरावर सध्या जिल्हा विभाजनाचा कोणताही विषय नसून जिल्हा विभाजनाचा निर्णय घेताना सर्व बाबी तपासून निर्णय होईल. सध्या राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा कुटील डाव काही राजकारणी करत असल्याचे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे ही गेली 43 वर्षांची मागणी आहे. जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रमुख कार्यालये येथे आहेत. त्यात आणखी भर पडून श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उत्तर विभाग कार्यालय संगमनेर येथून श्रीरामपूर येथे स्थलांतरित करावे, संगमनेरचे प्रस्तावित उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रद्द करावे, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे मंजूर करावे, या मागण्यांसह श्रीरामपूर जिल्हा व्हावा, या मागणीचे निवेदन महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांना जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले.
तालुकाध्यक्ष पटारे व मारूती बिंगले यांनी, महसूल खात्याचा कारभार आपल्याकडे आला असल्याने श्रीरामपूर जिल्हा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून आपण श्रीरामपूर जिल्ह्याचे सर्वांचे स्वप्न साकार करावे, अशी आग्रही मागणी केली. केतन खोरे यांनी, जिल्ह्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय, शहरालगत उपलब्ध शेती महामंडळाची जागा, अतिरिक्त नगर रचना कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कार्यालय, रेल्वे स्थानक, एमआयडीसी, जिल्हा सत्र न्यायालयामुळे पायाभरणी श्रीरामपूर येथे झालेली असल्याचे सविस्तर सांगितले.
यावेळी माजी जि.प. सदस्य शरद नवले, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सुनील वाणी, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, रवी पाटील, विठ्ठल राऊत, मंजुषा ढोकचौळे, सुनील साठे, मनोज नवले, अभिषेक खंडागळे, बंडूकुमार शिंदे, पूजा चव्हाण, पुष्पलता हरदास, दत्ता जाधव, रुपेश हरकल, गौतम उपाध्ये, मिलींदकुमार साळवे, अजित बाबेल, बाबासाहेब साळवे, विजय आखाडे, विशाल यादव, अक्षय वर्पे, नितीन ललवाणी, महेंद्र पटारे, विशाल अंभोरे, बाळासाहेब हरदास, योगेश ओझा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------------------------------------------
===================================
सह,संपादक रंजित बतरा - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------





अवैध लाकूड वाहतूक चोरीच्या मार्गाने करणाऱ्या 4 वाहनांवर कारवाई, साहित्य जप्त...

तळेगाव दिघे - प्रतिनिधि - वार्ता - Talegav Dighe
संगमनेर (Sangamner) भाग 2 वनपरिक्षेत्रांतर्गत (Forest Area) असणाऱ्या संगमनेर तालुक्यातील निमोण (Nimon) येथे वन विभागाच्या (Forest Department Officers) अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत अवैध लाकूड वाहतूक (Illegal Timber Transport) करणाऱ्या 3 पिकअप व एक ट्रक (Truck) अशा 4 वाहनांवर कारवाई करीत साहित्य जप्त (Seized) केले. ही शनिवारी (दि. 17 ) कारवाई करण्यात आली. सदर कारवाई 52 घनमीटर निम व इतर प्रजातीचे लाकूड हस्तगत करण्यात आले. दोन वखारीमधून हे लाकूड (Timber) भरण्यात येत होते.
संगमनेर (Sangamner) भाग 2 वनपरिक्षेत्रांतर्गत असणान्य
निमोण (Nimon) शिवारातील नांदूरशिंगोटे-लोणी
राज्यमार्गालगत (Nandurshingote - Loni Highway)
सिटीजन वेब्रिज नजिक अवैधरित्या लाकूड वाहतूक,
साठवणूक व कटाई चालू असल्याची माहिती वनपरिक्षे अधिकारी सागर केदार यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक वनसंरक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्या नेतृत्वाखाली वनपाल व्ही. डी. जाधव, एस. बी. ढवळे, वनरक्षक श्रीमती आ एम. दिघे, एस. एम. पारधी, डी. आर. कडनर, व्ही. आय. 
जारवाल यांच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली.
सदर कारवाई दरम्यान 52 घनमीटर निम व इतर प्रजातीचा लाकूड (Timber) असा मुद्देमाल मिळून आला. सदर मालाची अवैध वाहतूक (Illegal Timber Transport) 3 पिकअप एका ट्रकद्वारे करण्यात येत असल्याचे उघड झाले. हे लाकूड माल दोन वखारीमधून भरण्यात येत असल्याचे दिसून आले. प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 व महाराष्ट्र वन नियमावली 2014 नुसार कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यातील लाकडासाहित वाहने व इतर सामान जप्त
(Seized) करण्यात आले.
अधिक चौकशी वनपाल व्ही. डी. जाधव करीत आहेत. अशा प्रकारची लाकडाची अवैध वाहतूक (Illegal Timber Transport), साठवणूक वा कटाई करताना कुणीही आढळल्यास, वनविभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा संगमनेर (Sangamner) भाग 2 वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी दिला आहे.


सप्टेंबर महिन्यामध्ये होणार औरंगाबाद - छत्रपती संभाजीनगरात जागतिक पर्यटन आयोजन...

औरंगाबाद - प्रतिनिधि - वार्ता - संभाजीनगर जिल्ह्यात विविध पर्यटनस्थळ
 (tourist spot) असून, पर्यटन वाढीसाठी जिल्हा प्रशासन (District Administration) विविध उपक्रम राबवित आहे. सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात आले आहे. तसेच वेरूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. हे दोन्ही उपक्रम जिल्ह्यासाठी पर्यटन विकासातील महत्वाचे पाऊल आहे. यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस यंत्रणा आणि पर्यटन विभाग समन्वयाने काम करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) यांनी भारत पर्यटन चालक एजन्सी सदस्याच्या आढावा बैठकीत दिली.
या बैठकीत महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पर्यटनचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे, छत्रपती संभाजीनगर पर्यटन विकास संस्थेचे जसवंत सिंग यांच्यासह राजीव मेहरा, रवी गोसावी आदी पर्यटन श्रेत्रातील संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सप्टेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या जागतिक पर्यटन परिषदेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात येणार असून यामध्ये एक हजार टूर ऑपरेटरचा सहभाग राहणार असल्याने त्यांच्या राहण्याच्या व इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबधित विभागांना सूचित करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून कार्यक्रम स्थळाचे फायर ऑडिट करून सुरक्षेबाबतची कार्यवाही करावी. तसेच शहराचे ब्रॅण्डिंग करण्यासाठी डिजिटल होर्डिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळ, संस्कृती याविषयची माहिती देण्याबरोबर निमंत्रितांचे स्वागत, आदरतिथ्य करण्याबाबत तयारीचा आ यावेळी जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी घेतला.
या आढावा बैठकीत मुंबईतून दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी वेरूळ महोत्सव शक्य तो सुट्टीच्या काळात आयोजित करावा, जेणेकरून पालक, विद्यार्थी अधिक संख्येने सहभागी होतील, अशी सूचना शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास केली. यावेळी पर्यटन परिषद आणि वेरूळ महोत्सवादरम्यान सांस्कृतिक आयोजनाबाबतही चर्चा करण्यात आली.

---------------------------------------------------
===================================
सह,संपादक रंजित बतरा...शब्द✍️🌹🥀🌺🌷🌸🙏♥️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...+919970331313
===================================
---------------------------------------------------




Saturday, June 17, 2023

श्रीरामपूरकरांची 'कडकडीत 'एकजूट होऊन सर्व पक्ष संघटना व नागरिक जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध...

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर जिल्हा व्हावा तसेच शिर्डी येथे मंजूर झालेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूरला आणावे, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या सर्वपक्षिय बंदला श्रीरामपूर शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कडकडीत बंदच्या माध्यमातून श्रीरामपूरकरांनी कमालीची एकजूट दाखवत आपल्या तीव्र भावनांची खणखणीत जाणीव सरकारला करून दिली आहे. तालुक्यातील अनेक गावे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी बंद होती. श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन, स्वाभिमानी जिल्हा कृती समितीसह विविध संघटनांनी प्रशासनाला जिल्हा निर्मितीच्या मागणीचे निवेदन दिले.
शिंदे-फडणीवस सरकारने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली. त्याचे तीव्र पडसाद श्रीरामपूर तालुक्यात उमटले. या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षिय बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, बसपा, प्रहार, मनसे, आम आदमी पार्टी, शेतकरी संघटना अशा विविध संघटनांनी पाठिंबा दिला. त्यामुळे बंद यशस्वी ठरला.
राज्य सरकारच्या निषेधार्थ श्रीरामपूरसह तालुक्यातील बेलापूर, टाकळीभान, भोकर, अशोकनगर, खोकर, निपाणी वडगाव, वडाळा महादेव, हरेगाव यासह प्रमुख गावामध्ये बंद पाळून पाठिंबा व्यक्त करण्यात आला. श्रीरामपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळातील व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदविला. प्रवासी नसल्याने एसटी महामंडळाने अनेक बसेस रद्द केल्या. भाजीपाला मार्केट, एसटी स्टँड, बाजार समिती या ठिकाणी शुकशुकाट होता. लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून आपल्या भावना व्यक्त केल्या. ग्रामीण भागातूनही बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.सकाळी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी पुतळ्याजवळ सर्वपक्षिय कार्यकर्ते जमले होते. यावेळी त्यांनी श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, अशा घोषणा देत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. श्रीरामपूर मर्चंट असो. व काँग्रेसच्यावतीने पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांना तर स्वाभिमानी जिल्हा कृति समितीच्यावतीने पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी मर्चंट असो. अध्यक्ष राहुल मुथ्था, उपाध्यक्ष राहुल कोठारी, सचिव प्रेमचंद कुंकलोळ, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, हाजी मुज्जफ़र माजी नगरसेवक अशोक कानडे, अंजुम शेख, अशिष धनवटे, श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे, स्वाभिमानी जिल्हा कृति समितीचे सुभाष त्रिभूवन, संदीप मगर, चरण त्रिभूवन, मनसेचे बाबा शिंदे, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे सचिन बडधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लकी सेठी, वकील संघटनेचे अॅड. सुभाष जंगले, अशोक उपाध्ये यांच्या सर्वपक्षिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुक्याचे विभाजन होऊन नवीन राहता तालुक्याची निर्मिती करण्यात आली. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन पालघर जिल्हा तयार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवीनगर केले. हे करत असतानाच जिल्हा विभाजन होणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. उलट शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नेल्याने संतप्त श्रीरामपूरकरांनी बंदची हाक दिली. या बंदमध्ये श्रीरामपुरातील सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला.
भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर जिल्हा मोठा आहे. गेल्या 40 वर्षापासून जिल्हा विभाजन व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार यांनी सोनई येथे झालेल्या सभेत अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर राहणार अशी घोषणा केली होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. तत्कालीन मंत्री स्व. रामराव आदिक, स्व. गोविंदराव आदिक, स्व. दौलतराव पवार, स्व. जयंत ससाणे, माजी आ. भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, आमदार लहू कानडे यांच्यासह अनेकांनी या मागणीसाठी पाठपुरावा केला. या मागणीला शिंदे-फडणवीस सरकारने पाने पुसली असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली.
श्रीरामपूर हे मध्यवर्ती ठिकाण असून नियोजित जिल्ह्यासाठी लागणारे पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, आरटीओ कार्यालय, एसटी महामंडळाची कार्यशाळा, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, टाऊन प्लॅनिंग ऑफिस, रेल्वे मालधक्का, एमआयडीसी या सुविधा श्रीरामपूर येथे उपलब्ध आहे. या सुविधेचा लाभ आजही अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा तालुक्यासाठी होत आहे. म्हणून नवीन जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर येथे सुरू करावे, तसेच नव्याने शिर्डी येथे होणारे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथे सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

---------------------------------------------------
===================================
: - कार्य,संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...+918806490555
===================================
---------------------------------------------------





















अल्पवयीन मुलीस फूसलावून पळवूननेणाऱ्या देवळाली प्रवरा येथील आरोपीस केले अटक

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
अल्पवयीन मुलीस फूसलावून पळवून नेणाऱ्या देवळाली प्रवरा येथीलआरोपीस राहुरी फॅक्टरी परिसरातून पोलिसांनी शिताफीने अटककेली. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. 8 जून 2023 रोजी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेच्या दरम्यान राहत्या घरातून अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आमिष दाखवुन संमतीशिवाय पळवुन नेल्याची फिर्याद या मुलीच्या वडिलांनी दिली होती. या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर आरोपीचा शोध घेण्याचे आदेश तपास पथकास दिले. त्यानुसार तपास पथकाने आरोपी व अल्पवयीन मुलीचा शोध चालु केला. मोबाईल ट्रॅकींग, सीडीआर/ एसडीआर रिपोर्ट तसेच फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध सुरु केला. पोलीस आपल्या मागावर असल्याची भनक आरोपीस लागल्याने सदर अल्पवयीन मुलीस दि. 10 जून 2023 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राहुरी फॅक्टरी येथे सोडुन आरोपी निघून गेला होता.
सदर अल्पवयीन मुलीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता तिच्या शाळेचा बसचालक विजय गोविंद गोडसे (रा.देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर) याने माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, तुझे आई-वडील तुला नेहमी त्रास देतात, ते मला पाहवत नाही, आपण त्यांच्यापासुन लांब कुठेतरी निघून जावू, असे बोलून मला राहत्या घरातून घेवून गेला. मी अल्पवयीन असल्याचे माहित असताना त्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला, असा जबाब मुलीने दिल्याने सदर दाखल गुन्ह्यात भांदवि कलम 366, 366 (अ), 376 पोक्सो कलम 4, 5 (फ), 6,11,12 प्रमाणे वाढ करून आरोपीचा शोधासाठी दोन वेगवेगळी पथके करुन शोध सूरू केला.दि. 16 जून 2023 रोजी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना सदर गुन्ह्यातील आरोपी रात्री 9 वा. सुमारास राहुरी फॅक्टरी परीसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने श्री. गवळी यांच्या आदेशाने या परिसरात तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत अटक केली. सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत अटक केली.
---------------------------------------------------
===================================
सह,संपादक रंजित बतरा...शब्द ✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------