राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, June 21, 2023

( अकोले ) - प्रतिनिधि - वार्ता - गुटखा लूट प्रकरण

 विशेष पोलीस महानिरीक्षकांचे चौकशीचे आदेश
अकोले कर्नाटकातून महाराष्ट्रात अन्‌ थेट अकोल्याच्या दिशेने निघालेला पकडलेला व नंतर तडजोड करून सोडून दिलेला गुटख्याचा ट्रक 

विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून संबंधित स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रामध्ये गुट्खा बंदी असतानाही छुप्या पद्धतीने गुटखा राज्यात आणून विकला जातो.

प्रत्येक गावात शहरात, खेड्यात गुटखा मिळतो. याकडे पोलीस व अन्न वब औषध प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. नुकतीच कर्नाटकातून गुटख्याने भरलेली ट्रक अकोले येथे धामणगावच्या दिशेने जाण्यासाठी आली होती.

ती अकोले तालुक्‍यात घारगाव ते बोटादरम्यान काही जणांनी लुटली. यात सुमारे २० लाखांपेक्षा जास्त किंमतीचा माल होता, असे समजते. ही गाडी लुटण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या एका कर्मचाऱ्याला समजले.

त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तातडीने संगमनेरात दाखल झाले. त्यांनी ही गाडी लुटणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले; परंतु जिल्ह्यातील एका मोठ्या गुटखा विक्रेत्याच्या मध्यस्थीने त्यांना सोडून देण्यात आले.

विशेष म्हणजे हे पथक सरकारी गाडीने नव्हे, तर एका खासगी गाडीने तेथे आले होते. या न झालेल्या कारवाईची बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

या प्रकरणाची चोकशी सुरू झाली असून संबंधित स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोल्यात असाच अवैध गुट्खा पकडला होता परंतु कुठलीही कारवाई न करता तो सोडून दिल्याचीही चर्चा सर्व सामान्य नागरिकात आहे . यामध्ये लोकप्रतिनिधींनीही तक्रार केली होती; पण याचे पुढे काय झाले? हाही विषय : प्रलंबित आहे.

---------------------------------------------------===================================

सह,संपादक रंजित बतरा  शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...

====================================----------------------------------------------------


येत्या दि. २४ व २५ जून रोजी स्वराजप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांचा नाशिक दौरा

बी.आर.चेडे -शिरसगांव

स्वराजप्रमुख छ्त्रपती संभाजी महाराज येत्या दिनांक २४ व २५ जून रोजी नासिक दौऱ्यावर येणार असून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वराज प्रदेश संपर्क प्रमुख महाराष्ट्र करण गायकर यांनी दिली.शनिवार दिनांक २४ जून रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे नासिक शहरात सकाळी ११ वाजता आगमन होणार असून सायंकाळी ४ वा.स्वराज पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा यश लॉंस, नांदूर नाका नासिक येथे होणार आहे.दिनांक २५ जून रोजी सकाळी १० वाजता रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर नाका नासिक येथे छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी समितीच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास व मविप्र संस्था गौरव छत्रपती शाहू महाराज जीवन विचार व्याख्यानमाला कार्यक्रमास उपस्थिती तसेच दुपारी १ वाजता कालिदास कला मंदिर नासिक येथे राजश्री शाहू महाराज विचार जागर स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

((( वृत्तसंकलन )))

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

अशोक उद्योग समुह व शैक्षणिक* *संकुलाचे वतीने योग दिन साजरा*

🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ 🇮🇳
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
 २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधत अशोक उद्योग समूह व अशोक शैक्षणिक संकुलाच्या वतीने माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली व योग प्रशिक्षक संदीप कासार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अशोकनगर येथे योग दिन साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अशोक उद्योग समुहाचे प्रणेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थितीत योग प्रशिक्षक कासार यांनी यावेळी योगासना विषयी माहिती देवून विविध प्रकारचे योगासनाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे,
 अशोक महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.सुनिताताई गायकवाड, कारखान्याचे अधिकारी बाळासाहेब उंडे, नारायण चौधरी, विजय धुमाळ, भाऊसाहेब दोंड, अण्णासाहेब वाकडे, बाळासाहेब जाधव, रमेश आढाव, गोरक्षनाथ पटारे, अशोक महाविद्यालयाचे प्रा.दिलीप खंडागळे, प्रा.सुयोग थोरात, प्रा.वनिता भराडे, प्रा.पायल सुराणा, डॉ.विवेक साळवे, प्रा.योगेश डेंगळे आदींसह शिक्षकवृंद, कर्मचारी सहभागी झाले होते.

*वृत्तसंकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

Tuesday, June 20, 2023

     बी.आर.चेडे शिरसगांव   

संगमनेर : अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी पेमगिरी येथील बाळासाहेब भोर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. क्रांतिसेनेचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
याअगोदर भोर यांच्याकडे क्रांतिसेनेच्या युवक तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती ती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. विशेषकरून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आपापल्या परीने शक्य होईल त्याप्रमाणे न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे. खांडगाव पेमगिरी रस्त्याचा प्रश्न असेल किंवा प्रवरेच्या पाटाच्या खोदकामात शेतकऱ्यांच्या तुटलेल्या पाईपलाइनचा प्रश्न असेल तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांबाबद त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे पदापेक्षाही त्यांनी नेहमीच आपल्या कर्तुत्व व कौशल्याला प्राधान्य दिलेलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, साहित्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात त्यांचे वास्तववादी विचारांचे लेख व कविता खरोखरच आजच्या पिढीला विचार करायला लावणारे आहेत.
भोर यांच्या या निवडीबद्दल क्रांतिसेनेच्या संस्थपिका राज्याच्या माजी महसूलमंत्री डॉ.शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख, राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे, शिक्षक आघाडी प्रमुख भागचंद औताडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष दरेकर, जिल्हा प्रमुख नवनाथ ढगे आदींसह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
वृत्तसंकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

जिल्हा विकास आराखड्यात" पर्यटन विकासाचा प्राधान्याने समावेश करा

अहमदनगर - शासन आपल्या दारी अभियानांतर्गत उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ द्या -जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर जिमाका वृत्तसेवा 
 जिल्ह्यातील सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला विकासावर आधारित "जिल्हा विकास आराखडा" तयार करण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्यात धार्मिक, साहसी व कृषी पर्यटनाला अधिक वाव आहे. त्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळून रोजगार निर्मिती होण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात पर्यटन विकासाचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. तसेच "शासन आपल्या दारी" अभियानांतर्गत जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विकास आराखडा तसेच शासन आपल्या दारी अभियान कामकाज संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यात प्रसिद्ध अशा अनेक धार्मिक स्थळांबरोबरच साहसी व कृषी पर्यटनाला अधिक वाव आहे. जिल्ह्यातील धार्मिक व साहसी पर्यटन स्थळी पर्यटकांना सर्व सोयी-सुविधा मिळून ते या ठिकाणाकडे आकर्षित व्हावेत व यातून रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी आराखड्यात या बाबींचा समावेश करण्यात यावा. लघु, मध्यम व दीर्घ मुदतीच्या विकासाचा आराखड्यात समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी पर्यटन विभागाला केल्या.
शासन आपल्या दारी" अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
"शासन आपल्या दारी" अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या लाभाबाबत तालुकास्तरीय यंत्रणेने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. जिल्ह्याला दोन लक्ष लाभार्थ्यांना विविध योजनेतून लाभ देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना अभियान काळात लाभ यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच तालुकास्तरीय यंत्रणेला यावेळी त्यांनी दिल्या. बैठकीला विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.        
संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

Monday, June 19, 2023

अहमदनगर जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अहमदनगर - जिल्हा - माहिती -कार्यालय - वृत्तसेवा

 जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये ३ जुलै २०२३ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
जिल्‍ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील वातावरण इत्‍यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्‍यासाठी जिल्‍हादंडाधिकारी यांनी ३ जुलै २०२३ रोजीच्‍या रात्रीचे १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्‍मक आदेश लागु राहतील. असे प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकान्‍वये कळविले आहे.  
 या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.  शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोचेल अशी, व सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी कृती व आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणने अगर तशी चित्रे, चिन्‍हे किंवा इतर वस्‍तू तयार करणे किंवा त्‍यांचा प्रचार करणे. सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी निवडणूक प्रचारार्थ तसेच अन्‍य कारणास्‍तव सभा घेण्‍यास, मिरवणुका काढण्‍यास व पाच पेक्षा तास्‍त व्‍यक्‍ती एकत्र येण्‍यास मनाई केली आहे.
शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच प्रेतयात्रा, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक मिरवणूका, लग्‍न समारंभ, लग्‍नाच्‍या मिरवणूका हे कार्यक्रम, सभा घेण्‍यास अथवा मिरवणूका काढण्‍यास ज्‍यांनी संबंधित प्रभारी पोलीस निरीक्षक तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्‍यक्‍तींना हा आदेश लागु राहणार नसल्‍याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

दोघा सराईत गुन्हेगारांना वेपाऱ्यास लुटणारे दोन तासात अटक तेंच्या कडून एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत : श्रीरामपूर...

( श्रीरामपूर ) - प्रतिनिधि - समाचार पोलिसांनी दोन तासात मुद्देमालासह अटक  केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याची चेन रोख रक्कम व मोबाईल असा एकुण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. श्रीरामपूर शहर पोलीसांची ही विषेश प्रयत्नशिल कामगिरी केली.याबाबतची अधिक माहिती अशी की, बेलापूर ( (ता.श्रीरामपूर) येथील गुरुकृपा स्टील अॅण्ड बिल्डिंग मटेरियल, बेलापुर, दुकानांचे मालक बाळकृष्ण गोविंद खोसे (राहाणार.खोसेवस्ती,बेलापूर चौक,कोल्हार रोड) यांनी रविवार दि. 18 जून रोजी सकाळी 11 वा. त्यांच्या दुकानात लागणारे मटेरियल घेण्यासाठी 20 हजार रुपये खिशात घेतले तसेच त्यांचे जुने ग्राहक प्रशांत डांगे (राहाणार राहाता) यांच्याकडून उधारीचे पैसे आणण्यासाठी मोटारसायकलवर राहाता येथे गेले होते. राहाता येथे डांगे भेटले नाही म्हणून ते पुन्हा गणेशनगर, बाकडी मार्गे दत्तनगर येथे आले व नेहमप्रमाणे टिळकनगर कारखान्याच्या पाठीमागुन एकलहरेमार्गे बेलापुरकडे जाण्यास निघाले.
टिळकनगर येथील रांजणखोल चौकातून थोड्या अंतरावर गेल्यावर दोन इसम त्याच्या मोटारसायकला आडवे होवुन त्यांना थांबवले. त्यातील एका इसमाने त्याच्या हातातील चाकू दाखवून त्यांना धमकावून म्हणाला की, शांत बस आणि आम्ही सांगतो तसे चल, असे म्हणून तो व त्याचा सोबतचा दुसरा इसम असे दोघे खोसे यांच्या मोटारसायकलवर मागे बसन त्यांना मोटारसायकल टिळकनगर कारखान्याकडे घेण्यास सांगितली.
खोसे यांना मोटारसायकल टिळकनगर कारखाना व पुढे एकलहरेकडे जाणाऱ्या रोडने रांजणखोल शिवारात सांळुखेवस्ती समोर मोटारसायकल बाजुला थांबायला सांगितली. मोटारसायकल थांबवताच त्यांनी चाकुचा धाक दाखवून खोसे यांच्या खिशातील 20 हजार रुपये, गळ्यातील सोन्याची चेन व एक मोबाईल काढून घेतला. त्यावेळी तिथे आणखी एक इसम मोटारसायकलवर आला व तिघे मिळून खोसे यांना आणखी पैसे पाहिजे म्हणून मारहाण करु लागले. त्यावेळी खोसे यांनी आराओरडा केल्याने आरोपी मोटारसायकलवर पळुन गेले. याबाबत खोसे यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 583/2023 भादंवि कलम 394, 341.504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने झिरो पोलीस व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला असता संशयित रईस शेरखान पठाण (वय 28, रा. टिळकनगर, ता. श्रीरामपूर) व रोहित सोपान रामटेके (वय 31, रा. रांजणखोल ता. श्रीरामपूर) व त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी हा गुन्हा केल्याची व सध्या ते टिळकनगर परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या परिसरात सापळा लावून, शिताफीने पाठलाग करून यातील दोन आरोपींना पकडले. पोलिसांना त्यांनी गुन्हाची कबुली दिली. त्याच्याकडुन चोरीस गेलेला 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन (अंदाजे 12 ग्रॅम वजनाची), 20 हजार रु. रोख (500 दराच्या 40 चलनी नोटा) व 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अ एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला  अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेकडील तपास पथकातील सहायक पोलीस निरिक्षक़ विठ्ठल पाटील, जिवन बोरसे, पोलीस नाईक रघुनाथ कारखेले, रामेश्वर ढोकणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, रमिझराजा अत्तार, गणेश गावडे, मच्छिद्र कातखडे, संभाजी खरात तसेच अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाकडील पोलीस नाईक सचिन धनाड, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव व आकाश भैरट यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक श्रीमती देवरे या करीत असल्याचे माहिती नमूद केली आहेत.

---------------------------------------------------
===================================
कार्य, संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================

..






.