राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, October 30, 2023

हल्ली फुशारकी करणाऱ्या लोकांच्या चळवळी वाढल्या

*म्हणूनतर सच्च्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या चळवळी मोडल्या !!*
*कोजागिरी निमित्त साहित्य सम्राट चे*
*पुण्यात १७४ वे कवीसंमेलन संपन्न*

*पुणे प्रतिनिधि वार्ता *     
"फुशारकी करणाऱ्या लोकांच्या चळवळी वाढल्या,अन् म्हणूनतर सच्च्या कार्यकर्त्यांच्या चळवळी मोडल्या "अशी चळवळी विषयींची ज्वलंत भावना अध्यक्षीय भाषणात साहित्यिक अनंत कदम यांनी व्यक्त केली.
पुणे येथील हडपसर परिसरातील राममनोहर लोहिया उद्यानात साहित्य सम्राट पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांच्यावतीने पुण्यात १७४ व्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते.
श्री.कदम पुढे म्हणाले. साहित्य सम्राट ही संस्था गेली अनेक वर्षे साहित्य चळवळ राबवत आहे. त्यामुळे ग्रामीण,शहरी, नवोदितांना खुले विचारपिठ सहजच मिळत आहे.अशी चळवळ चालवताना कुणासाठी थांबू नये. नाहीतर उशिरा येणारे भाव खाऊन जातात. त्यांचेच फोटो प्रसिद्ध होतात. या कविसंमेलनास दिग्गज कवी कवयित्री यांनी बागेतील काव्य रसिकांची मने जिंकली.सहभागी झालेल्या कविंमध्ये डॉ. पांडुरंग बाणखेले यांच्या कवितेनंतर कविता काळे यांच्या
"करायचाच असेल वार तर छातीत कर, पाठीत नाही.पाठीत वार करणे लढवय्याचा धर्म नाही" या कवितेने दाद मिळवली.पुढे संजय भोरे यांनी प्रेम विषयाची
"उगीचच मी कल्पनातीत राहून जीवाची हूर हूर लावून घेत होतो.
होईल का माझ्या आयुष्याशी तुझी दोरी बळकट याचाच घोर लावून बसलो होतो" ही कविता सादर केली. त्यानंतर देवेंद्र गावंडे यांनी
"छान झोपलो होतो मी डोळे मिटून. आली माझ्यावर ही बला कुठून. उठलो झोपेतून खळबळून. असाच राहील रातभर बसुन, पाठीला माझ्या चावल ढेकूण" ठेकूण ही विनोदी गेय कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रल्हाद शिंदे यांनी तर
 "गोऱ्या तुझ्या रुपाला भाळतात साले, अन् रंग यौवनाचे ते न्ह्याळतात साले"
अशी गझल सादर केली.लगेचच तानाजी शिंदे यांनी खाजगी नोकरीतील वास्तव आपल्या कवितेतून मांडला.
"खाजगी नोकरीत पिळवणूक
चुकत नाही कधी कुणाला,
नोकरी करावीच लागते शेवटी
मारून तुमच्या मनाला"
पुढे चंद्रकांत जोगदंड यांनी
"तुह्या रूपाची चांदणी जशी नभी लकाकते, धुंद करूनिया अवनीला हळूच ग खुणावते" अशी प्रेम कविता सादर केली.
कवी सीताराम नरके यांनी
"खुळ खुळा झाला तुझा ,रोज नवी कहानी, किती गाळशील येड्या,तुझ्या डोळ्यातुन पाणी"
ही प्रियकराला प्रेमात सल्ला देणारी कविता सादर केली. संस्थेचे अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी स्त्री जीवनाचा महिमा सांगणारी काव्य रचना सादर केली.
"सागरापरी माया असावी हे वाचले, स्त्री तुझ्या मायेने ते शब्द खचले"
  अशा विविध विषयांच्या काव्य रचनांना काव्य रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदिप वनशिव यांनी, कार्यक्रमाचे प्रास्तविक विनोद अष्टुळ यांनी तर आभार सीताराम नरके यांनी व्यक्त केले.

===================================
---------------------------------------------------
*ज्येष्ठ साहित्यिक विनोद अष्टूळ - पुणे*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांचा कौल**आपल्याच बाजूने लागेल -अविनाश आदिक*💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*बी.आर.चेडे - शिरसगांव*
येत्या ५ नोव्हेंबरला शिरसगांव ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे,त्यामध्ये मतदारांचा कौल आपल्या समाज सेवा मंडळाला मिळणारच आहे.सत्ताधारी पदाधिकारी यांनी काय केले त्याचा लेखाजोखा आपल्याकडे आहे.गावकऱ्यांनी आपल्याला संधी दिली तर व्यासपीठाकडे पाहीले तर सर्वांच्या लक्षात येईल की येथे महत्वाचे मान्यवर आहेत. आपला पक्ष सरकारमध्ये असल्याने आवश्यक सहकार्य मिळेल.स्थानिक आम्ही सर्व आहोत.नवीन चेहरे दिल्याने ते चांगल्या उमेदीने काम करतील. श्रीरामपूर शहराजवळ हे गाव आहे.श्रीरामपूरच्या बाबत पुढील काळाबाबत आपल्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर शिरसगावकराना महत्वाची भूमिका बजवावी लागेल.या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने आग्रह करतो की प्रत्येकाने ही निवडणूक माझी आहे हे समजून काम केल्यास निवडणुकीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन समाज सेवा मंडळाच्या ग्रा.प.निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी अविनाश आदिक यांनी केले.
याप्रसंगी आपल्या प्रास्तविकात समाज सेवा मंडळ गटप्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले की, शिरसगांव हे सातत्याने श्रीरामपूर शहराशी संपर्क असलेले शहरालगतचे गाव आहे. त्याचा विकास करणे हे स्थानिक नागरिकांचे काम आहे.या गावात स्व.गोविंदराव आदिक,अविनाश आदिक,अनुराधा आदिक,.डॉ वंदनाताई मुरकुटे,ज्ञानेश्वर (माउली) मुरकुटे हे या गावचे मतदार आहेत.या गावचा विकास होणे गरजेचे आहे, परंतु गेल्या दहावर्षात तसे झाले नाही. साईनाथ गवारे,सोपानराव गवारे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला पण गावच्या दोन्ही गटांनी ते मान्य केले नाही.गावच्या विकासासाठी बरीच मोठी मंडळी सोबत आहेत.त्यांचे माध्यमातून सर्व सहकार्य विकासासाठी मिळणार आहे.त्यामुळे गावचा कायापालट होऊ शकतो.स्व.जी. के.पाटील यांचे गावासाठी मोठे योगदान आहे.सरपंच पदासाठी सौ.जयश्री प्रदीप अभंग ह्या उमेदवार आहेत.त्या यापूर्वीही सदस्यपदी निवडणून आलेल्या आहेत. त्यासाठी वनिता विजय गायकवाड यांनी मोठ्या मनाने सरपंचपदाची उमेदवारी मागे घेतली.दहा वर्षे त्यांना सत्ता दिली आता आम्हाला द्यावी.यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,माजी सभापती डॉ वंदनाताई मुरकुटे,ज्ञानेश्वर मुरकुटे,राजाभाऊ कापसे, बापूसाहेब पटारे,विधिज्ञ मुकुंद गवारे,सोपानराव गवारे,प्रदीप अभंग, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, बाळासाहेब गवारे,आदींनी आपले मनोगत मांडले व उमेदवारांना मतदान करा.निश्चित विजय आपलाच होईल परिवर्तन होईल अशी ग्वाही दिली.व सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सर्व मान्यवर व उमेदवार यांनी नारळ फोडून प्रचार शुभारंभ केला. यावेळी सतीश गवारे,सुभाष यादव,प्रदीप अभंग,इसाक पठाण,मुकुंद गवारे,सोपानराव गवारे,साईनाथ गवारे,आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:* ✍️✅🇮🇳 समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर
*9561174111*
---------------------------------------------------
===================================

गोवा येथे होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी* *बेलापूर येथील अरहम डाकले ची निवड*🌹🥀🌺🥀🌷🌸 🙏 ✅ 🇮🇳...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^
गोव्यात रंगणार १७ वर्षखालील क्रिकेट स्पर्धा*
===================================

बेलापूर - प्रतिनिधि - वार्ता
गोवा येथे होणाऱ्या सतरा वर्षाखालिल क्रिकेट स्पर्धेसाठी बेलापूर क्रिकेट क्लबचा खेळाडू अरहम डाकलेची निवड झाली आहे. माजी खेळाडू अनिल डाकले यांचा तो मुलगा आहे. त्याचे निवडीबद्दल श्रीरामपूर क्रिकेट असोएशनचे अध्यक्ष भास्कर खंडागळे,बाॕबी बकाल आदिंनी सर्वेशचे अभिनंदन केले आहे.बेलापूरला बाळासाहेब खटोड,अशोक भगत,बाळासाहेब खंडागळे,सखाराम कोळसे,राम साळुंके,शरद सोमाणी,बाबा राजुळे,संपत खटोड,भास्कर खंडागळे,अजय नाईक,शशी नाईक,पोपटराव धुमाळ,अण्णा गार्डे, बाळासाहेब नाईक,संपत बोरा,सुभाष कोठारी,रमेश मिसाळ,राजेन्द्र खटोड,श्रीकांत व्यास,रामप्रसाद व्यास ,विजय मुथा,सुनिल भगत,सुरेश भोसले,ज्ञानेश गव्हले,रमाकांत खटोड,प्रकाश भांड,अनिल नाईक ,गणा कोळपकर,बिजू नावंदर,अभिषेक खंडागळे,योगेश नाईक,यशवंत नाईक,बाबा सय्यद ,प्रसाद खरात,सचिन कडेकर,अनिल डाकले,बंटी शेलार,राजू शेलार अशा नामांकीत खेळाडूंची प्रदिर्घ परंपरा आहे.यात नवोदित खेळाडू भर घालित आहे. अरहमच्या निवडीबद्दल त्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
*सहयोगी:* स्वा भिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



*पुंडलिक गवंडी यांचे 'ठिणगी 'आत्मचरित्र म्हणजे नव्या पिढीसाठी ज्ञानज्योत =प्रा.डॉ. शिवाजी काळे*

श्रीरामपूर प्रतिनिधी वार्ता 
आत्मचरित्र हॆ जीवनजाणिवेचे प्रेरणास्तोत्र असते.ते स्वबरोबर कुटुंब,समाज आणि स्थलकाल यांना अमृतमय करते, यादृष्टीने अकोले येथील जेष्ठ साहित्यिक पुंडलिक गवंडी कुमावत यांचे 'ठिणगी 'हॆ आत्मचरित्र म्हणजे आजच्या,उद्याच्या पिढीसाठी ज्ञानज्योतीसारखे आहे, असे मत साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष व जेष्ठ साहित्यिक डॉ. शिवाजी काळे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगर मधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे अकोले येथील जेष्ठ साहित्यिक पुंडलिक चिमणराव गवंडी कुमावत यांच्या 'ठिणगी 'आत्मचरित्राचे प्रकाशन संपन्न झाले, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शिवाजीराव काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे होते. प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. लेखक पुंडलिक गवंडी,अध्यक्ष प्राचार्य डॉ. गागरे आणि मान्यवरांचा प्राचार्य शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी. ई. शेळके,डॉ. रामकृष्ण जगताप, प्रा. शिवाजीराव बारगळ,श्रीरामपूर सुवर्णकार समाज तालुका अध्यक्ष स्वामीराज कुलथे,पत्रकार बाबासाहेब चेडे, संगीता फासाटे, गणेशानंद उपाध्ये, सौ.आरती उपाध्ये, सुरेश बेलदार, भीमशन्कर परदेशी, गणेश गवंडी,शुभदा दहिमिवाळ आदी उपस्थित होते.डॉ. शिवाजी काळे यांनी पुंडलिक गवंडी यांच्या आत्मचरित्रातील शेवगाव, अकोले येथील हृदयस्पर्शी आठवणी विशद करून पुंडलिक गवंडी अकोले परिसरातील साहित्य कोहिनूर आहेत पण त्यांची म्हणावी तशी दखल घेतली गेली नसल्याची खंत व्यक्त केली. पुंडलिक गवंडी यांनी श्रीरामपुरात वाचन संस्कृती प्रतिष्ठानने दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी अध्यक्षीय भाषणातून साहित्य आणि समाज यांचे नाते सांगून 'हातोडा'नंतरची 'ठिणगी'प्रकाशयात्री ठरणारी असल्याचे सांगितले.प्राचार्य टी. ई. शेळके यांनी सांगितले, शिक्षक हा नेहमी पिढी घडवितो, एक आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक आणि लोकप्रबोधक साहित्यिक म्हणून पुंडलिक गवंडी यांचे योगदान प्रेरणादायी आहे, असे सांगून आयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी एका आदर्श साहित्यिकाची दखल घेतली,जे निष्ठावान आणि समर्पित साहित्यिक आहेत,पुंडलिक गवंडी, डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवाजी काळे, सुखदेव सुकळे अशी साहित्यतपस्वी व्यक्तिमत्वे अंधारात असली तरी शब्दप्रकाश देतात त्यांचे कार्य आणि जीवन यांचा अभ्यास झाला पाहिजे असे मत प्राचार्य शेळके यांनी विविध अनुभवातून सांगितले डॉ रामकृष्ण जगताप म्हणाले, खऱ्या साहित्यिकाची आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्याची दखल समाजात आणि साहित्य वर्तुळात घेतली जात नाही,त्यामुळे साहित्य आणि साहित्यिक यांचा शब्दसुगन्ध नव्या पिढीला मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली.पुंडलिक गवंडी यांची नात शुभदा दहिमिवाळ यांनी आपल्या मनोगतातून पुंडलिक गवंडी यांचे कुटुंबप्रेम सांगितले,माझे वडील वारल्यानंतर त्यांनीच आम्हाला आधार दिला, आम्हाला मुलासारखा मान देतात, मुलगी, मुलात फरक करीत नाहीत,त्यांच्यामुळे मी श्रीरामपूरच्या बोरावके कॉलेजमध्ये डॉ. बाबा तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विषयावर पीएच.डी करीत आहे, असे सांगून आठवणी सांगितल्या. सौ. आरती उपाध्ये, निर्मिक उपाध्ये यांनी नियोजन केले. प्रतिष्ठान उपाध्यक्ष संगीता फासाटे यांनी 'हातोडा' ते 'ठिणगी' साहित्यसूत्र सांगून सूत्रसंचालन केले तर प्रतिष्ठान कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आ.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Sunday, October 29, 2023

निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य' या पुस्तकाचे भव्य प्रकाशन संपन्न*💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*एडीजीपी कृष्णप्रकाश (आयपीएस) यांच्यासह देशपातळीवरील तज्ञांनी केली प्रशंसा*

प्रतिनिधी आशा रणखांबे पुणे
"जागतिक अभिरुचीसंपन्न निसर्गशक्तीच्या एकत्रिकरणाचा आरोग्यदायी महासंकल्प " या सिद्धांताचा पाया रचून देश - विदेशामध्ये निसर्गोपचाराचा अनन्यसाधारण प्रचार - प्रसार करणारे ' मिशन नॅचरोपॅथी ' चे संचालक व सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ क्रांती कुमार महाजन यांनी लिहिलेल्या " निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य " या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच भारतीय वायुसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे समारंभपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे अँडीशनल जनरल ऑफ पोलीस श्री. कृष्णप्रकाश (आयपीएस) यांसह भारतीय सेनेतील महावीरचक्र विजेता नायक दिगेंद्र कुमार, वायुसेनेचे एअर मार्शल भूषण गोखले , एअर मार्शल प्रदीप बापट , एअर वाईस मार्शल नितीन वैद्य , सैनिक कल्याण विभागाचे महासंचालक ब्रिगेडीयर राजेश गायकवाड , भारत सरकारच्या जी-२० सचिवालयाचे संचालक श्री. संजीव जैन्य , भारत सरकारच्या युवक कल्याण क्रीडा मंत्रालयाचे संचालक श्री. अतुल निकम , कृष्णलीला वृत्तसमूहाचे प्रमुख डॉ. कौशिक गायकवाड , सुप्रसिद्ध हृदय शल्य विशारद डॉ. यतीन वाघ , संमेलनाध्यक्ष श्री. संतोषभाऊ बारणे , राजमाता जिजाऊ यांचे वडील लखूजीराजे जाधव यांच्या घराण्याचे वंशज महाराज श्री. शिवाजीराजे जाधव , तंजावार घराण्याचे वंशज महाराज श्री. विजयसिंहराजे भोसले या दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते ' निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य ' या पुस्तकाचे समारंभपूर्वक भव्य प्रकाशन घडून आले .
साप्ताहिक कृष्णलीला या वृत्तपत्रामध्ये सातत्याने प्रकाशित लेखांचा समुच्चय करून ' निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य ' या पुस्तकाची लेखक क्रांती कुमार महाजन यांनी मांडणी व निर्मिती केली आहे . विश्व कीर्तिमान लेखक व निसर्गोपचार तज्ञ क्रांती कुमार महाजन यांनी आपल्या जीवनामध्ये निसर्गसाधनेलाच राष्ट्रभाव मानून अनुभव , ज्ञान , संशोधन , अभ्यास आणि सिद्धी यांच्या समन्वयातून हे पुस्तक आरोग्याच्या दृष्टीकोनातून बहुआयामी आणि समृद्ध केले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पोलिसांच्या आरोग्यासाठी निसर्गोपचाराच्या माध्यमातून प्रतिबद्ध राहून कार्य केल्या जाणार असल्याची ग्वाही याप्रसंगी लेखक क्रांती कुमार महाजन यांनी दिली आहे .  लेखक क्रांती कुमार महाजन यांनी विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली असून ' प्राकृतिक चिकित्सा - एक राष्ट्रभाव ' हे त्यांचे पुस्तक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला ' संदर्भ - ग्रंथ ' म्हणून निवड - पात्र ठरले आहे . निसर्गोपचाराच्या प्रचार - प्रसारासाठी क्रांती कुमार महाजन यांनी संपूर्ण भारत देशात आजवर सतरा हजार किलोमीटर अंतराची ' प्राकृतिक चिकित्सा जागरण यात्रा ' पूर्ण केली असून हजारों लोकांना निसर्गोपचाराच्या उपचार व प्रशिक्षणाकरीता त्यांनी प्रवृत्त केले आहे . एकूणच " मिशन नॅचरोपॅथी " च्या माध्यमातून निसर्गोपचाराच्या प्रचार - प्रसाराकरीता प्रतिबद्ध असणारे क्रांती कुमार महाजन हे देशातील तमाम निसर्गोपचारकांना व निसर्गोपचाराच्या संस्थांना एकसंघ करण्याचे अभिनव व अनन्यसाधारण कार्य करीत आहेत . महाराष्ट्र सरकार द्वारा निसर्गोपचाराची अधिकृत कॉन्सिल निर्माण व्हावी व राज्यातील लाखो निसर्गोपचारकांना त्यासंदर्भात न्याय व अधिकृतता लाभावी यासाठी क्रांती कुमार महाजन यांनी आरंभिलेले " मिशन नॅचरोपॅथी " हा आशावाद आता अत्यंत प्रबळ झाला आहे . निसर्गोपचारावर आधारीत विविध पुस्तके व साहित्य त्यांनी निर्माण केले आहे . 
अशा प्रकारे निसर्गोपचाराकरीता समर्पित असणारे क्रांती कुमार महाजन यांनी आपल्या सिद्धहस्त पत्रकारांनी अनुभवांतून लिहिलेले ' निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य ' हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल देशपातळीवर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
*ज्येष्ठ साहित्यिक नवनाथ रणखांबे*

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर- - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*अशांतता दूर करण्यासाठी प्रत्येकाने बोधिवृक्षाचे रोपटे परिसरात लावावे - उत्तम कांबळे* 🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 *छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ‘जागतिक शांतता व प्रगतीसाठी भाषा साहित्य व संस्कृतीचे योगदान’ या चर्चासत्राचे उद्घाटन*

सातारा प्रतिनिधि वार्ता
 ‘’महायुद्धानंतर माणसाची जागा कचराकुंडीतल्या कचऱ्यासारखी झालेली आहे,माणसाचे अवमूल्यन झालेले आहे त्यासाठी आता महायुद्धे थांबली पाहिजेत. शांतता निर्माण होण्यासाठी साहित्यिक,तत्वज्ञ कलावंत यांनी भूमिका घेतली पाहिजे. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असले तरी ते वास्तव नसते. या प्रतिबिंबाच्या तळाशी काय चिकटून बसले आहे ते शोधले पाहिजे. आरसा बळकट तेंव्हा असतो जेंव्हा त्याचा पारा चांगला असतो.साहित्यिकांनी जगभरात माणसे बदलली आहेत. गॉर्कीच्या मदर कादंबरीने पृथ्वीचा तीन चतुर्थांश राजकीय भाग बदलला. ही साहित्याची ताकद आहे. कचऱ्यातील माणूस वाचवायचा असेल तर महायुद्धे थांबवली पाहिजेत त्यासाठी साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे शांतता व अशांतता म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगण्याची गरज आहे. युद्धाचे कारण देखील तृष्णा आहे. वस्तू खपवण्यासाठी आज युद्धे केली जात आहेत. युद्धात आता नियम पाळले जात नाहीत. ही ठोकाठोकी थांबवली पाहिजे. त्यासाठीच आता बोधीवृक्षाचे रोपटे लावले पाहिजे. बोधिवृक्ष दीर्घायुषी असतो.तो प्राणवायू देतो.त्याच्यावर अनेक जीव मुक्कामाला असतात.कोणत्याही वादळात तो तुटून पडत नाही. बोधीवृक्ष दीर्घायुषी आहे. त्याची मुळे खूप खोल गेलेली पृथ्वीच्या प्रदूषित झालेल्या गर्भाशयातील विष त्याच्या मुळ्या ओढून घेतात. अन अन्नातले प्रोटीन पृथ्वीच्या पोटात सोडतात.पृथ्वीचे गर्भाशय स्वच्छ होते.पुन्हा मग माणसे उगवतात ,संस्कृती उगवत राहतात. प्रदुषणाचा. अशांततेचा, युद्धजन्य परिस्थितीचा पट्टा दूर करायचा असेल,तर प्रत्येकाने साहित्यरुपी ,कलारुपी विचाररुपी,संस्कृतीरुपी बोधीवृक्षाचे एकेक तरी रोपटे आपल्या परिसरात लावावे युद्धाचे ढग पळून जातील’’असे मत ज्येष्ठ साहित्यिक ,विचारवंत उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.

 येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या ‘ जागतिक शांतता व प्रगतीसाठी भाषासाहित्य व संस्कृतीचे योगदान ‘ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कर्मवीर अण्णांच्या संस्थेत या प्रकारची चर्चासत्र आयोजित करावीत. तसेच जागतिक शांततेवर अजून दोन दिवस पुढे चर्चासत्र आयोजित केल्यास सखोल समज येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे होते. महाविद्यालयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी ,संस्कृत,अर्धमागधी विभागांनी हे चर्चासत्र आयोजित केले होते. 
           प्रारंभी विषय विवेचन करताना उत्तम कांबळे म्हणाले की,’माणूस निसर्गातून बाहेर पडला तसा तो अशांत होत गेला. सुरवातीला शेतीचा शोध लागला त्या काळात शेती करून घेणारा , आणि शेतीसाठी राबणारा असे दोन वर्ग तयार झाले. पुढे शेती करून घेणारऱ्याची तृष्णा वाढली, त्यातूनच साम्राज्यवाद वाढला. ज्ञान ,सत्ता ,धर्म या क्षेत्रात साम्राज्यवाद वाढला . या सगळ्यात धर्माचा साम्राज्यवाद धोकादायक आहे. माणसाचे मन शांतता आणि अशांतता या दोन्हीनी भरलेले आहे. शांती अंतर्मनात असायला पाहिजे.पण कितीदिवस शांत राहायचे असेही त्याला वाटते. शांतता हे एक मूल्य आहे तर अशांतता ही विकृती आहे. माणसाचा इतिहास पाहता माणसाने दर एक दिवसाला तेरा लढाया केल्याचे आढळते. आतली लढाई जिंकतो तो शांतता मिळवतो .सिद्धार्थ मरतो बुद्ध जन्मतो.माणसाने युद्धे केलीत हेच प्रत्येक प्राचीन धर्म ग्रंथात देखील दिसते. या लढाया सत्य, सत्ता ,न्यायासाठी करतात आणि माणसे मारून ,युद्ध करून शांतता मिळवतात.अणुबॉम्ब शांततेसाठी आहे हे सांगितले. जपान बेचिराख केला.पोखरण करून बुद्ध हसला म्हणून कुचेष्टा करण्यात आली. हिंसेतून शांतता येईल कशी ? अहिंसेतून शांतता येते. जगण्याच्या स्पर्धेत शांतता खलास झाली. त्यामुळेच व्यवस्थेला प्रश्न विचारत साहित्य जन्म घेऊ लागले. प्रश्न विचारले जातात तेंव्हा इथली व्यवस्था प्रश्न चिरडून टाकण्याचे ,माणसे मारण्याचे प्रयत्न करते. विचारी माणूस व्यवस्थेला धोकादायक वाटतो कारण तो प्रश्न विचारतो. हि व्यवस्था त्याच्या विचाराला कोंडून ठेवते,बाजूला टाकते. धर्माच्या आणि जातीच्या नावाने माणसे मारली जातात. माणूस क्रूर होत गेला आहे त्याचे कारण त्याची तृष्णा आहे. म्हणूनच साहित्यिकांनी ,संस्कृतींनी या अशांततेचा विरोध करायला पाहिजे आणि शांततेचे स्वागत करायला पाहिजे शांतता निर्माण करण्यासाठी रोल करावा लागतो. येशूखिस्त शांततेसाठी जगावर प्रेम करा सांगतो. शांती पाहिजे असेल तर बियाणे शोधा. मनातले युद्ध संपवा. शांततेसाठी पोवाडे लिहा .जातिवंत साहित्यिकाच्या काळजात ब्युटी पार्लर असते. त्याच्याकडे दोन गोष्टी असतात त्याची प्रतिभा व्यक्त करण्यासाठी असते तर त्याच्या मनातली वेदना इतरांचे दुःख समजावून घेत असते. माणूस आज संकटात जगतोय.त्याला सुरक्षितता नाही. त्यामुळे त्याला न्यायासाठी संघर्ष करावा लागतो. चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे. सौंदर्य संघर्षातून जन्मते. जगात शांती निर्माण होण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्घाटन सत्राचे प्रास्तविक प्रा.डॉ.केशव पवार यांनी केले. रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी या विषयावर चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल कॉलेजचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आभार प्रा.डॉ.रोशनआरा शेख यांनी मानले. यावेळी चीनच्या सुझाऊ विद्यापीठातील प्राध्यापक फरझान हरत्यान यांनी बीजभाषण केले. डॉ,अर्जुन चव्हाण,डॉ.मुग्धा गाडगीळ, डॉ.राजश्री मोहाडीकर,राजू केंद्रे इत्यादी मान्यवर वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.अनेक मान्यवर चर्चासत्रास उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनानुसार मुख्य समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, समन्वयक डॉ.केशव पवार, डॉ. प्रदीप शिंदे ,प्रा.ऋषिकेश काळे, प्रा.विजया गणमुखी व भाषा विभागातील प्राध्यापक यांनी चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले.

===================================
--------------------------------------------------
*वृत्तविशेष सहाय्य*
डॉ.बाबुराव उपाध्ये (सर) श्रीरामपूर
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*माऊली वृद्धाश्रमाचा सहावा* *वर्धापनदिन उत्साहात संपन्न*

श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
*सर्वसामान्यांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन - डॉ. वंदनाताई मुरकुटे*

ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब,गरजवंत लोकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळाव्या या हेतूने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन भेर्डापूर वांगी येथील प्राईड अकॅडमी शाळेत केले असल्याचे प्रतिपादन मा.सभापती तथा प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका डॉ. वंदना मुरकुटे यांनी केले. 
मैड हॉस्पिटल राहाता यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आयोजित मोफत भव्य सर्व रोग निदान शिबिराच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन व पुष्पगुच्छ अर्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले व शिबिराचा आरंभ करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मैड हॉस्पिटलचे प्रथितयश स्री रोग तज्ञ डॉ. संतोष मैड, माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजश्री देशमुख, डॉ.चंद्रकांत सानप , कैलास बोऱ्हाडे ,डॉ. धरमवीर सहानी, डॉ. परितोष कांबळे, रमेश उंडे ,राजेंद्र कोकणे, बंडोपंत बोडखे, आबा पवार,अर्जुन राऊत, संजीव उंडे, नयन गांधी, अरुण कवडे,दिलीप अभंग ,सुभाष मोरे , तात्यासाहेब शिंदे ,रणछोडदास जाधव, अनिल दांगट,राहुल बनकर, डॉ. कविता खांदरे, डॉ. कोमल बधे ,डॉ. विजय पटेल, दीपक बडाख, आप्पा पवार,हरिभाऊ पटारे,भरत जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 
यावेळी पुढे बोलताना डॉ. वंदनाताई मुरकुटे म्हणाले की, सध्या आरोग्याच्या अनेक समस्या वाढत असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे ते उपचार घेत नाहीत परंतु या मोफत सर्व रोग निदान शिबिरामध्ये त्यांच्या आजाराची निदान मोफत होणार असल्यामुळे त्याचा लाभ त्यांना घेता येतो या शिबिरा अंतर्गत ८५० प्रकारच्या आजारावर मोफत रोग तपासणी व निदान होणार असून त्याचा लाभ परिसरातील नागरिकांना होणार आहे. 
यावेळी डॉ.संतोष मैड म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मुरकुटे दांपत्यांचे अभिनंदन व कौतुक केले. डॉ. मैड यावेळी शिबिर प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की म्हणाले की आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत असून सर्वानी व्यायामाबरोबर आहार चांगला घेतला पाहिजे व स्वतः च्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, तसेच कोणत्या छोट्या आजाराकडे दुर्लक्ष करू नये, त्यातून मोठे आजार उद्भवतात त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले, 
शिबिरामध्ये ३५० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले.सर्व रोग निदान शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राईड अकॅडमी शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================