राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, January 3, 2024

१९३ व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाई फुलेंना अभिवादन


सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आजच्या स्त्रिया स्वातंत्र्य उपभोगत आहेत - आबीद खान

- अहमदनगर - प्रतिनिधि -/ वार्ता -
स्त्री शिक्षणाच्या अद्यपर्वतक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त येथील सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांचा वयाच्या नवव्या वर्षी विवाह झाला व त्यांना ज्योतीबा फुले यांनी विवाहानंतर शिक्षण
 दिले,
त्याच पुढे जाऊन स्त्री शिक्षणाच्या जनक ठरल्या. त्याकाळी स्त्रीयांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन फार संकुचित होता. अशा काळात त्यांनी स्त्रीयांना शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यामुळेच आजच्या स्त्रिया स्वातंत्र्य उपभोगत आहेत, परंतु काय खर्‍या अर्थाने स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजामध्ये खरोखरच बदलाल आहे का?
हा विचार समाजातील प्रत्येकाने करण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी केले.
सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मुख्याध्यापक सय्यद नौशाद, अस्लम पटेल, शेख फरजाना, शेख शाहिन, हीना बाजी आदि उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांचे रूपरेषा राहणीमानप्रमाणे वेशभूषा करून त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या प्रसंगाचे माहिती आपल्या वक्तृत्वाद्वारे सादर केली.
पुढे बोलतांना आबीद खान म्हणाले की, त्या काळी स्त्रीयांबद्दल जी भावना समाजामध्ये होती तीच भावना आजपण समाजामध्ये रुप बदलून वावरत आहे. स्त्रीया आज शिक्षित झाल्या, मोठमोठ्या पदावर पोहचल्या तरी त्यांना आज व्यक्ती स्वातंत्र्य असल्याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. परंतु आता समाजाने हा दृष्टीकोन बदलून स्त्रीयांना सन्मान मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुमताज शेख यांनी केले तर प्रास्तविक यास्मीन शेख यांनी केले. आभार सुलताना बाजी यांनी मानले. यावेळी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
============
सहयोगी : स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Tuesday, January 2, 2024

“क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे आमच्या जीवनातील महत्व”


म्हणतात ना एक पुरुष शिकला की एक घर शिकतो परंतु एक स्त्री शिकली की संपूर्ण समाज शिकतो. याचा अर्थ असा होतो की स्त्री शिक्षणाला किती महत्त्व आहे. असेच काही अनन्यसाधारण महत्त्व आमच्या जीवनात सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या दोघींचे आहे. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख नसत्या तर कदाचित स्त्रियांचे जीवन आजवर अर्थहीनच असते. कारण जीवनाला खरा अर्थ हे शिक्षणामुळेच मिळतो. त्यांनी केलेल्या प्रयत्नातून, संघर्षातून आज स्त्रीयांना महत्व आहे. अनेक रूढी परंपरा, अंधश्रद्धा, सती जाणे, बालविवाह इत्यादी गोष्टींचा त्यांनी विरोध करून त्यांना नष्ट केल्या म्हणूनच तर आज आम्ही अभिमानाने जगत आहोत त्यांनी दिलेल्या विश्वासामुळे, धैर्यामुळे आज स्त्रियांना जागतिक स्तरावर सन्मानित केले जाते. असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे महिला आपले कर्तृत्व दाखवू शकत नाही मग तो सामाजिक क्षेत्र असो किंवा कला, क्रीडा अवकाश,  राजनैतिक व  पत्रकारिता क्षेत्र आज भारतीय महिला आपले सामर्थ्य दाखवताना दिसत आहे आणि ते सुद्धा सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून ती फक्त स्वतःसाठीच नव्हे तर राष्ट्रासाठी देखील कर्तबदारीने काम करीत आहे सावित्रीबाईंनी जसा समाजाचा दृष्टिकोन बदलला आजही अनेक महिला त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहे. सावित्री एक होत्या परंतु त्यांनी देशाच्या हजारो लाखो स्त्रियांच्या मनात जी  शिक्षणाची ज्योत पेटवली होती ती आजवर पेटतच आहे आणि ती कधी विजणारही नाही. कारण सावित्रीबाईंनी शिव्या, शाप, तिरस्कार बरोबर शेणही सोचले परंतु आपल्या धेय्यापासून खाचल्या नाही, माघार घेतली नाही प्रचंड अडचणींना तोंड देऊन त्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली त्यापासूनच तर शिक्षणाची ही ज्योत पेटलेली आहे. आणि संघर्षातून मिळालेले यश हे निरंतर असते. आणि म्हणूनच सावित्रीबाईंनी शिक्षणाची पेटवलेली ही ज्योत कित्येक पटीने वाढतच राहणार आहे.
सावित्रीबाईंना साथ दिली त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांचेही आभार मानले पाहिजे परंतु हे तितकेच खरे की जर सावित्रीबाईंच्या मनात इच्छाशक्ती आणि धैर्य नसते तर कदाचित त्या हे मोठे कार्य करू  शकल्या नसत्या कारण कोणतेही कार्य करण्यासाठी मनामध्ये इच्छाशक्ती असणे खूप महत्वाचे असते. त्या  केवळ स्त्रियांसाठीच लढल्या नाही तर संपूर्ण समाजसाठी लढल्या. शिक्षण एक असे शस्त्र आहे की जे समाज बदलू शकतो. हे सावित्री बाईनी ओळखले आणि आपले कार्य सुरू केले. त्यांनी मुलींसाठी शाळा काढल्या , स्वतः शिक्षिका म्हणून काम केले. आणि मुलींच्या मनातील नकारात्मक विचार संपून सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक वृत्त्ती निर्माण झाली. त्यांनी हे पवित्र कार्य केले नसते तर आज कदाचित स्त्रियांना ' चूल आणि मूल '  इतकेच स्थान पुरेसे असते.मग या समाजात पी. टी.उषा , कल्पना चावला , इंदिरा गांधी , लता मंगेशकर , सानिया मिर्झा इत्यांदिसारख्या कर्तुत्वान स्त्रिया झाल्यास नसत्या. सावित्री बाईंनी आपले तन , मन , धन सर्वस्वी पणाला लावून जिद्दीने महिलांसाठी व समाजासाठी जे मोलाचे कार्य केले त्याची आपण परतफेड करू शकत नाही.हा आपण त्यांनी दिलेला शिक्षणाचा वारसा पुढे अवश्य नेऊ शकतो. स्त्रियांनी आपल्या संस्कृतीचा वसा जपून आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊन आपल्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये त्यांचाही हातभार लागला पाहिजे . शिक्षणाने जग जिंकता येतं , जग बदलतं येतं . हे सावित्री बाईनी आपल्याला दाखून दिले आहे. केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगण्यातच खरे आनंद आहे. हे सावित्री बाईंशी
 शिकावे.
'सत्यासाठी संघर्ष करावा , असत्यला नष्ट करावा.' समाज सावित्री बाईंना कधीच  विसरू शकणार नाही .
“ पेटवलीस तू समाजामध्ये शिक्षणाची ज्योती
  म्हणूनच आज जग सांगत आहे तुझी म्हती ’’
'आणि आम्ही आहोत सावित्रेची लेकी.'
=================================
-----------------------------------------------
*महेजबीन शकील बागवान*
उपशिक्षिका : जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा
बेलापूर, ता.श्रीरामपूर - 9623464737
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Monday, January 1, 2024

आकारी पडीत शेतकऱ्यांचे श्रीरामपूर तहसील कार्यालयासमोर उपोषण


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव,वडाळा महादेव खानापूर, ब्राम्हणगांव, शिरसगांव, उंदिरगांव,निमगाव खैरी,अशा एकूण ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनी लाभधारक मूळ शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी श्रीरामपूर येथील प्रशासकीय
 इमारतीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सोमवारी करण्यात आले. श्रीरामपूर तालुक्यातील ९ गावच्या जमिनी तत्कालीन इंग्रज सरकारने १९१८ या वर्षी द बॉम्बे गव्हर्नमेंट गाझेट १ ओगस्ट १९१८ अन्वये १८९४ सेक्शन ६ कलम १ अन्वये तत्कालीन मुंबई सरकारने अंडर सेक्रेटरी ए.एफ. एल.बर्ने यांनी गव्हर्नर यांचे आदेशानुसार अधिसूचित करून ताब्यात घेतले आहे.वरील ९ गावच्या जमिनी सार्वजनिक प्रयोजनासाठी घेऊन सार्वजनिक खर्चाने विकसित करून पुन्हा बागायती करून पोट पाण्याचे सुविधासह फेरवितरण करण्यासाठी ताब्यात घेतल्या गेल्या आहेत.
त्यात वडाळा महादेव शेतकरी - १४ ५०१ एकर १० गुंठे, मुठेवाडगाव ६६ शेतकरी ७९३ एकर ३२ गुंठे,माळवाडगांव १५४ शेतकरी १९४९ एकर १७ गुंठे खानापूर २० शेतकरी २७८ एकर १२ गुंठे, ब्राम्हणगांव वेताळ ६५ शेतकरी ७६४ एकर ०८ गुंठे, शिरसगांव १ शेतकरी १९ एकर २० गुंठे, उंदीरगाव १५६ शेतकरी २०१२ एकर १८ गुंठे, निमगांव ४३ शेतकरी ४५६ एकर ३१ गुंठे, खैरीगांव ५७ शेतकरी ६०१ एकर १६ गुंठे,अशा ७३७७ एकर १२ गुंठे जमिनी आहेत.२३ जुलै १९२० चे करारनाम्यानुसार सदर बेलापूर सिंडीकेट कंपनी लिक्विडेशनमध्ये गेल्यामुळे सदर जमिनी बेलापूर कमनी हरिगावकडे वर्ग करण्यात आल्या.
वरील एकूण ९ गावाचे क्षेत्र व आकार कमी होवून त्याचे स्वतंत्र हरिगांव हे महसुली गाव तयार झाले असून त्याचे सर्व्हे नंबरचे ब्लॉकमध्ये रुपांतर झाले. व ए बी सी असे ब्लॉक पडले.व एकूण ७३२६ एकर जमिनी झाल्या.
तत्पूर्वी सदर जमिनीचे अधिकार अभिलेख हक्क नोंदणी रजिस्टरला मूळ मालकाचे नाव कमी होवून सदर
 जमिनीला आकारी पडीत जमीन म्हणून नाव दाखल
झाले.महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कालमर्यादा १९६१ च्या तरतुदीनुसार राज्यातील ११ खाजगी साखर
कारखान्याच्या ताब्यातील अतिरिक्त घोषित झालेल्या जमीन या देखील ताब्यात घेण्यात आल्या.व सरकार
जमा झाल्या.त्यापैकी बेलापूर शुगर अलाईड कंपनीकडील अधिक जमीन म्हणून सदर जमिनीचा ताबा महाराष्ट्र सरकारने १९६५ या वर्षी कंपनीचे नाव कमी करून सरकार नाव दाखल झाले.
त्यानंतर २ ओगस्ट १९६५ रोजी सदरच्या जमिनी महारष्ट्र राज्य शेती महामंडळकडे फक्त ऊस उत्पादन करून बेलापूर शुगर इंडस्ट्रीजला कच्चा माल पुरविण्यासाठी ३ वर्षे देण्यात आल्या.कालवधी संपल्यावर कोणतीही मुदतवाढ दिली नाही. खंडकरी यांना आधीच जमिनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु आकारी पडीत जमिनी या तात्पुरत्या स्वरुपात ब्रिटीश शासनाने परत करण्याच्या बोलीवर कराराने घेवून देखील सदरचा करार आज ६० ते ७० वर्षे उलटली तरी मूळ मालकाना जमिनी परत करण्यात आल्या नाहीत.त्या मिळाव्यात अशा आशयाचे निवेदन सोमवारी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना देण्यात आले.
ह्या प्रश्नाची मला जाणीव असून शासन पातळीवर लवकर निर्णय होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन सावंत यांनी दिले.
यावेळी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठ विधिज्ञ अजित काळे,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, इंद्रभान चोरमल, विधिज्ञ सर्जेराव घोडे, बोर्डे, डॉ बापूसाहेब आदिक, डॉ दादासाहेब आदिक, सोपान नाईक, शरद आसने, संपतराव मुठे, बाळासाहेब आसने, सचिन वेताळ, बबन नाईक, परशुराम ताके, अंकुश आदिक, अप्पासाहेब आदिक, सुरेश डोके, रमेश गावडे, आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
===================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


प्राचार्य डॉ. सुनीताताई गायकवाड.............यांचा वाचन संस्कृतीतर्फे.सन्मान 💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
अशोकनगर महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सुनीताताई मिलिंद गायकवाड यांचा नव्या वर्षाप्रारंभी पीएच. डी. प्राप्तीबद्दल वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आला.
  प्राचार्य डॉ.सुनीताताई गायकवाड यांनी 'भारतीय संस्कृती आणि जपानी संस्कृती यांचा तुलनात्मक अभ्यास 'या विषयावर प्रबंध लिहिला होता.या विषयास विद्यावाचस्पती अर्थात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.अतिशय प्रतिकूल अवस्थेत जीवनसंघर्ष करीत त्यांनी ही पदवी प्राप्त केली, त्याबद्दल माजी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एकनाथ औटी आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कौतुक करीत प्राचार्य डॉ. गायकवाड यांचा शाल, श्रीफळ,
 बुके, पुस्तके देऊन सत्कार केला.
याबद्दल प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी राजस्थान विद्यापीठ आणि शिस्तबद्व संशोधनाचे अनुभव सांगितले.जीवनात संयम आणि आदर्श जपणे यातूनच आपणास यश मिळाले असे उदगार काढून आभार मानले
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

छ.शिवाजी कॉलेज मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ सामंजस्य करार


- सातारा - प्रतिनिधि -वार्ता
सातारा - येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांचा सामंजस्य करार नववर्षाचे औचित्य साधून १ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आला.
 शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ ही शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील मराठी शिक्षक यांची महाराष्ट्रातील साहित्य आणि भाषाप्रेमी यांचे संघटन आहे. मराठी भाषा,साहित्य आणि संस्कृती यांचे संवर्धन आणि विकसन करण्याचे ध्येय घेऊन या संघटनेने आजवर मराठी प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यासाठी अनेक कार्यक्रम केले.या संघटनेचे आजवर अनेक महाविद्यालये व विद्यापीठाचे विभाग यांचेशी सामंजस्य करार झालेले आहेत. मराठी भाषा व साहित्य यांचे विकसन करण्यासाठी विद्यार्थ्यासाठी निबंधलेखन,कथा लेखन,कथाकथन ,काव्यवाचन अशा विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे.मराठी प्राध्यापक यांचेसाठी संशोधन निबंध,ललित व ललितेतर ग्रंथाना संघटनेने पुरस्कार दिलेले आहेत. संघामार्फत शिविम संशोधन पत्रिका हे विद्वतप्रणीत त्रैमासिक प्रसिद्ध होत असून युजीसी मान्यताप्राप्त यादीमध्ये व विद्यापीठ यादीमध्ये त्याचा समावेश आहे संघाने राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले असून मॉरिशस,रशिया इत्यादी ठिकाणी संघाचे सदस्य प्राध्यापक यांनी सहभागी होऊन,संस्कृती,साहित्य अभ्यास व संशोधन केलेले आहे. छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय जे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९४७ ला सुरु केले. महाविद्यालयीन पातळीवरील ‘कमवा आणि शिका योजना’ याच महाविद्यालयात सुरु झाली आणि आज देखील ती मोठ्या प्रमाणात याच कॉलेजमध्ये चालू आहे. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या स्थापनेपासून मराठी विषय सुरु असून मराठी विभागात अनेक विद्वान, साहित्यिक, प्राध्यापक यांनी काम केले आहे. प्राचार्य शंकरराव उनउने,वसंत जोशी,ह.बा. कुलकर्णी,सूर्यकांत खांडेकर,
 प्राचार्य,डॉ.मा.के.यादव,डॉ.र.बा.मंचरकर,प्रा.डॉ.द.ता.भोसले,प्रा.श्रीधरहेरवाडे,प्रा.ज.म.डोंबाले,प्रा.डी.ए.माने,प्रा.बी.डी.पाटील,प्रा.डॉ.विमला पाटील, प्राचार्य संभाजीराव देसाई,प्रा.आनंद घाटूगडे, प्रा.डॉ.नलिनी महाडिक, प्रा.सरलादेवी निकम,डॉ.शिवाजी पाटील, प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, प्रा.उत्तमराव सूर्यवंशी, प्रा.मीरा देठे,प्रा.डॉ.शुभांगी भूतकर, डॉ.सुमन पाटील, डॉ. हेमलता गायकवाड,डॉ.मानसी लाटकर, इत्यादी अनेक प्राध्यापक यांनी मराठी विभागात अध्यापन करून भाषाविभाग समृद्धीसाठी योगदान दिले आहे. सध्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय म्हणून कॉलेज झालेले आहे. मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ संचालक म्हणून काम पाहत आहेत.ते स्व
तः शिविम आयोजित मॉरीशस चर्चासत्रात सहभागी झाले आहेत.शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या कार्यकारणीत या मराठी विभागाचे प्राध्यापकांनी महत्वाचे योगदान दिलेले आहे.
दोन्ही संस्थांनी या पूर्वी करार करून राज्यस्तरीय व राष्ट्रीय कार्यक्रम केले आहेत. शिविमद्वारे प्राचार्य संभाजीराव देसाई यांचे स्मृतीप्रीत्यर्थ निबंध लेखन व कथालेखन स्पर्धा आयोजित केल्या जातात.सामंजस्य करार झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी आनंद व्यक्त करून शिविम सोबत यापुढेही विविध विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक हिताचे नाविन्यपूर्ण, व संशोधनविषयक कार्यक्रम घेण्याच्यासाठी
 सहयोग दिला जाईल असे सांगितले.
या कराराच्या वेळी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ.भरत जाधव, प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व विभागातील डॉ.विद्या नावडकर, डॉ.संजयकुमार सरगडे, प्रा. प्रियांका कुंभार,प्रा.श्रीकांत भोकरे,स्वप्नील जाधव,ऋतुजा पाटील,सोनाली जाधव,तुषार बोकेफोडे ,विनय कर्चे,अन्य विद्यार्थी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*लक्ष्मण संभाजी भिसे - इंदापूर (पुणे)*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

ह.भ.प.वेताळ यांचे 'आत्मचिंतन' म्हणजे ज्ञानशिदोरी होय - ह.भ.प. ऋषिकेश महाराज


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
मानवी जीवन हे सतचिंतन आणि अनुभवातून समृद्ध होते. ज्ञान घेतल्यावरच आत्म्याची प्रचिती येते.हे तत्वज्ञान सांगणारे श्रीरामपूर शहरालगत असलेल्या शिरसगांव मध्ये इंदिरानगर येथील हस्तरेषातज्ज्ञ ह.भ.प.सोपानराव वेताळमहाराज यांचे 'आत्मचिंतन'हे पुस्तक म्हणजे जीवन समजून देणारी आणि जीवनपोषक ठरणारी ज्ञानशिदोरीच होय,असे मत गोंधवणी येथील ह.भ.प. ऋषिकेश महाराज यांनी व्यक्त केले.


श्रीरामपूर येथील नेवासा रोडवरील महानुभाव आश्रम आणि श्रीकृष्ण मंदिरात नववर्षाच्या प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे ह.भ.प. सोपानराव वेताळमहाराज यांनी लिहिलेल्या 'आत्मचिंतन 'या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.ऋषिकेशमहाराज बोलत होते.
अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण मंदिराचे प्रमुख विशालदादा पंजाबी होते. संयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून मान्यवरांचा परिचय करून दिला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 'आत्मचिंतन'पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले.यावेळी ज्ञानेश्वर माऊली काळे,संपादक करण नवले, गणेश काळे, विशालदादा पंजाबी आदिंनी श्रीकृष्ण   व श्रीचक्रधरस्वामी मूर्तीचे पुष्पहार आणि फुले वाहून पूजन केले. ऋषिकेश महाराज,वेताळ महाराज यांचा सत्कार केला. श्रीकृष्ण मंदिरातर्फे विशालदादा यांनीही सत्कार केले. यावेळी माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,माजी प्राचार्य किसनराव वमने, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे, करण नवले,ज्ञानेश्वरमाऊली काळे, पोलीस पाटील वसंतराव मुठे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, प्रकाश किरण प्रतिष्ठानचे संस्थापक,अध्यक्ष लेविन भोसले, प्रा. प्रकाश कुलकर्णी,संतकवी एकनाथ डांगे पाटील आदिंनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'भारतीय कुंभार समाजातील संत,'हे मानवा निर्मिक तू 'प्रा.रायभान दवंगे लिखित 'दप्तर 'कथासंग्रह देऊन सर्वांचा नव्या वर्षनिमित्त सत्कार केला.
ऋषिकेश महाराज यांनी पुढे सांगितले की, वेताळमहाराज हे सेवाभावी संत आणि भविष्यकार आहेत.आर्थिक स्थिती नसतानाही त्यांनी आतापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित केली. त्यांचे समाजावर प्रेम आहे.त्यांना जी ज्ञानप्राप्ती झाली, तीच त्यांच्या 'आत्मचिंतन' मध्ये असल्याचे सांगून नववर्षी वाचन संस्कृती प्रतिष्ठानने कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अध्यक्ष विशालदादा पंजाबी यांनी प.पू. प.म. ब्रीजलालदादा पंजाबी यांचे सेवाकार्य पुढे जाण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरणारे असून 'आत्मचिंतन 'पुस्तक हे महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार बाबासाहेब चेडे,    किशोरभाऊ शिंदे,गणेश काळे, विवेक वेताळ, तपस्वनी चंद्रकलाताई,शकुताई, मनोरमाताई, विद्याताई,शैलाताई,   स्वातीताई आदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर विवेक वेताळ यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================





श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना त्वरीत अनुदान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल - मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे २०२२-२३ वर्षामध्ये
अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसानीचे
 सरसकट पंचनामे करुन वंचित राहिलेल्या सर्व शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी असे
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने श्रीरामपूर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की,
राज्य सरकारने आदेश देवुन महसूल अधिकाऱ्यांना
 सांगितले आहे की सर्व शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन
 सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करावे, असे असताना देखील श्रीरामपूर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन आपले महसुलचे सर्कल अधिकारी, तलाठी हे व्यवस्थित रित्या पंचनामा करुन आपल्याकडे व शासनाकडे शेतकर्‍यांचे नाव,गाव, पत्ता बँकेचे अकौंट नंबर, पासबुक झेरॉक्स व्यवस्थित न दिल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. तसेच अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतजमीनीचे सर्कल व तलाठ्याने पंचनामे न करता शेतकर्‍यांकडूनच फोटो व माहिती मागून घेऊन अर्धवट माहिती आपल्या महसुल अधिकार्‍यांनी शासनाकडे पाठविले. आपल्या महसुल अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच अनेक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक शेतकर्‍यांनी आमच्याकडे तक्रार केले आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन सर्व शेतकर्‍यांशी संवाद साधून खरच महसुल अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधवर जाऊन पंचनामा केला की नाही याची शाहनिशा करुन दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कामात कर्तव्य कसुरु केल्याबद्दल त्यांना बडतर्फ करुन त्यांचे विरुद्ध कठोर कायदेशीर शासन करुन गुन्हे दाखल करण्यात यावे. जेणे करुन यापुढे कामात कामचुकारपणा होणार नाही व आपला अन्नदात्या शेतकर्‍यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अशी काळजी यापुढे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना आपण आदेश द्यावे . आमच्या निवेदनाची दखल घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना त्वरीत अनुदान (मदत) देण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, आंदोलन प्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास श्रीरामपूर येथील महसूल अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असेही मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले.
याप्रसंगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष,विलास पाटणी,मनसे उपजिल्हाध्यक्ष,गणेश दिवसे मनसे
 तालुकाध्यक्ष,
सतिश कुदळे मनसे शहराध्यक्ष, संतोष धुमाळ प्रसिद्धीप्रमुख डॉक्टर संजय नवथर, भास्कर सरोदे,नितीन जाधव, ऋषभ बर्वे प्रसाद परे,अमोल साबणे, संदीप विशंमभर,सुरेश शिंदे, दीपक सोनवणे,राजू जगताप, सुरेश शिंदे, विकी परदेसी, नितीन खरे, मारुती शिंदे, आदी. पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================